वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

Home » वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
विशिष्ट अद्याक्षरापासून सुरु होणारे शब्द बघायचे असल्यास त्या अद्याक्षरावर टिचकी मारावी
All | A(353) | B(196) | C(440) | D(176) | E(159) | F(191) | G(199) | H(228) | I(145) | J(23) | K(34) | L(211) | M(211) | N(121) | O(109) | P(606) | Q(24) | R(198) | S(434) | T(259) | U(63) | V(109) | W(42) | X(31) | Y(4) | Z(27) |

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा


There are 228 names in this directory beginning with the letter H.
habit
१ रीति २ बाह्यरुप १ वृत्ति, वर्तन अथवा आहारविषयक सवय, उदा. जीवोपजीवी, स्वोपजीवी २ बाहेरून दिसणारी शारीरिक रुपरेखा (स्वरुप), उदा. गुच्छाकृती, चवरीसारखे, उशीसारखे, सरपटणारे, चढत जाणारे, वृक्ष, क्षुप, औषधी इ.

habitat
अधिवास, निवासक्षेत्र वनस्पती जेथे निसर्गतः फुलते, वाढते, प्रजोत्पादन करते असे ठिकाण, उदा. दाट वन, कुरण, खडकाळ किंवा रेताड मरुप्रदेश, समुद्रतट, जलाशय इ.

hadrocentric
मध्यप्रकाष्ठक, केंद्रकाष्ठिक

hadrocentric bundle
मध्यप्रकाष्ठक वृंद मध्ये प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असलेला वाहक ऊतकांचा संच, उदा. नेचाची तिरश्वर शाखा concentric bundle

hadrome
प्रकाष्ठ, काष्ठ वाहक वृंदातील काष्ठयुक्त वाहकांचा भाग, विशेषतः पाण्याची ने आण करणारा घन आवरणाच्या मृत कोशिकांचा (ऊतकाचा) भाग xylem  xylem

haematoxylin
हीमॅटॉक्सिलीन गर्द तांबूस रंगाचे द्रव्य, एका वनस्पतीच्या (Haematoxylon campechianum L.) मध्य काष्ठापासून काढलेले असून त्याचा उपयोग सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षणाकरिता करतात.

hair
केश वनस्पतींच्या शरीरावर अपित्वचेपासून वाढणारे भिन्न प्रकारचे केस, हे एककोशिक, अनेककोशिक, मऊ, राठ, दाहक, संरक्षक, प्रपिंडीय इ. विविध प्रकारचे असतात. उदा. कापसाचे धागे

hair shaped
केशाकृति केसासारखे बारीक व लांब

hairiness
केशालुत्व, केसाळपणा

hairy
केशालु, केसाळ, रोमिल

halbert-rhaped
तोमराकृति भाल्याच्या आकृतीचे उदा. हरणखुरीचे पान, त्रिकोनी व तळाकडील दोन कोनांची टोके बाहेरच्या बाजूस वळलेली hastate

half (semi) cylindric
अर्धचितीय ईक बाजू सपाट व दुसरी अर्धगोलाकार अशा आकाराचा लांबट (अवयव), उदा. कित्येक पानांचे देठ, काही पाती, उदा. कोरफड

half bred
संकरज cross breed  hybrid

half equitant
अर्धारुढ semi-equitant

half inferior
अर्धाधःस्थ संवर्ताच्या नलिकेत किंजपुट अर्धवट सुटा असून त्या सभोवार पाकळ्या व केसरदले असलेला किंजपुट

half moon shaped
अर्धचंद्राकृति अर्ध्या चंद्राप्रमाणे आकाराचे, उदा. कृष्णकमळाच्या एका जातीचे, तसेच एका नेचाच्या जातीचे पान (Adiantum lunulatum) lunate, crescent shaped

haliplankton
समुद्रप्लवक समुद्रातील सजीवांचा तरता व पृष्ठाचा आसपासचा समूह.

halobiontic
लवणांबुवासी. फक्त खाऱ्या पाण्यातच राहणारी (वनस्पती).

halophilous
लवणप्रिय मिठाशिवाय इतर क्षार असलेल्या किंवा खारट जमिनीत विशेषेकरून वाढणारी (वनस्पती), माचुरा, कांकरा, चिप्पी, तिवार, कांदळ इत्यादी समुद्रकिनारी वाढणारी झाडे

halophobous
लवणद्वेष्टी, लवणविरोधी क्षारमुक्त किंवा खारट जमीन टाळणारी (वनस्पती) halophobe

halophyte
लवण वनस्पति क्षारयुक्त (विशेषतः खारट) पाण्याच्या सान्निध्यात वाढणारी वनस्पती, पीलू, केवडा, ऊंडी, नारळ इत्यादी आणि वर उल्लेखिलेल्या लवणप्रिय वनस्पती, सागरशैवले

hand microtome
हस्त सूक्ष्मछेदक हाताने चालविता येणारे, सूक्ष्म छेद घेण्याचे यंत्र

handle cell
हस्तक कोशिका, मुष्टि कोशिका कांडशरीरिका शैवलाच्या रेतुकाशयाच्या (पुं- जननेंद्रियाच्या) बाहेरील आवरणातील आधारभूत कोशिकांपैकी एक Characeae. manubrium

hanging root
पारंबी झाडाच्या शाखेपासून निघून खाली लोंबणारे व पुढे जमिनीत खोलवर घुसून आधार देणारे मूळ, उदा. वड

haploid
एकगुणित प्रजोत्पादक कोशिकेच्या प्रकलातील रंगसूत्रांची एकपट संख्या, इतर कोशिकात ही संख्या दुप्पट असते. बहुतेक सर्व गंतुकधारी पिढीत एकपट व बीजुकधारी पिढीत ती दुप्पट (संख्या) असते व बीजुके तयार होताना ती संख्या पुन्हा एकपट होते. diploid

haploidization
एकगुणन कोशिकेतील रंगसूत्रांची संख्या दुप्पट असताना, ती एकपट होण्याची प्रक्रिया, अर्धसूत्रण

haploidy
एकगुणितत्त्व एकगुणित रंगसूत्रे असण्याचा प्रकार

haplophase
एकगुणितावस्था haploid  gamophase

haplophase
एकगुणितावस्था haploid  gamophase

hapteron
दृढधर बहुकोशिक पण वाहक ऊतके नसलेला आणि चिकटून राहण्यास उपयुक्त असा अवयव उदा. फ्यूकस शैवल holdfast

haptogropism
स्पर्शानुवर्तन खडबडीत पृष्ठभागाच्या स्पर्शाच्या चेतनेमुळे वेटाळत वाढण्याची प्रतिक्रिया, उदा. अमरवेल, प्रतान, मोरवेलीची देठे, कित्येक वेलींची टोके

haptostele
प्रथमाद्यरंभ मध्ये प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असा सममध्य वाहक संच असलेला अत्यंत साधा व अतिप्राचीन वाहक वनस्पतींत आढळणारा रंभ उदा. ऱ्हिनिया stele

haptotropic
स्पर्शानुवर्तनी स्पर्शामुळे घडून येणारी वाढ दर्शविणारे (अवयव)

hard bast
उपकाष्ठ परिकाष्ठाच्या सूत्रल (घनकोशिकायुक्त) भाग phloem, bast

hastate
प्रशराकृति, तोमराकृति halbert shaped

haulm
संधिखोड सांधेदार खोड culm

haustorium
शोषक आश्रय वनस्पतींतून अन्न शोषून घेण्याचा जीवोपजीवी वनस्पतीचा लहान मुळासारखा रुपांतरित अवयव उदा. अमरवेल, बांडगूळ

head
१ स्तबक २ शीर्ष १ पहा capitutum २ टोकाचा भाग h. cell शीर्ष कोशिका कारा (या नावाच्या) शैवल वनस्पतीतील रेतुकजनक तंतूंच्या तळाशी असलेली कोशिका, यामध्ये प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकार आहेत.

heart shaped
हृदयाकृति cordate

heart wood
मध्यकाष्ठ खोडातील भेंडाभोवती (केंद्रवर्ती) असलेला सर्वात जून व मृत लाकडाचा भाग duramen

helicoid
शुंडी गोगलगाईच्या शिंपल्याप्रमाणे वेटोळे असलेला (फुलोरा अथवा शाखांची मांडणी), सोंडेप्रमाणे h.cyme (bostryx, depranium) वक्रवल्लरी, शुंडी फुलोऱ्यातील अक्षाच्या एकाच बाजूस पण भिन्न पातळीत नवीन अक्ष येऊन आणि दरवेळी त्यावर टोकास आलेल्या फुलांमुळे वाढ थांबून

heliophilous
प्रकाशप्रिय भरपूर सूर्यप्रकाशात वाढणारी (वनस्पती), उदा. सूर्यफूल, एरंड, गुलाब, निंब, आंबा, नारळ इ.

heliophobous
प्रकाशद्वेष्टी प्रत्यक्ष सूर्यप्रकाश टाळणारी, नेचे, सिलाजिनेला इ.

heliophyte
प्रकाशप्रिय वनस्पति

heliotactic
प्रकाशानुचलनी प्रकाशाच्या चेतनेनुसार होणाऱ्या शरीरांतर्गत प्रक्रियेमुळे त्याकडे किंवा त्याविरुद्ध दिशेकडे (अनुक्रमे धन व ऋऋण) स्थानांतर करणारी वनस्पती किंवा घडणारी (हालचाल), उदा. स्वतंत्र व चलनशील वनस्पती (शैवले) अथवा त्यांचे सुटे भाग (बीजुके, गंतुके इ.)

heliotaxis
प्रकाशानुचलन वर वर्णन केलेली स्थानांतराची प्रक्रिया, उदा. हरित्कणु, सूक्ष्मजंतू

heliotropic
प्रकाशानुवर्तनी प्रकाशाच्या दिशेला किंवा दिशेविरुद्ध वाढत वळणारा (वनस्पतीचा अवयव), खोडाची व मुळाची टोके

heliotropism
प्रकाशानुवर्तन, सूर्यावर्तन वर वर्णन केल्याप्रमाणे वाढण्याची प्रक्रिया (प्रतिक्रिया) apheliotropism

helmet shaped (galeate)
स्फटाकृति पोकळ व अर्ध्या कमानीसारखे, उदा. अतिविषाच्या फुलातील पाकळीसारखे संदल hooded

helophyte
आर्द्रप्रिय वनस्पति दलदलीत वाढणारी वनस्पती, उदा. पाणकणीस, लव्हाळा, अळू, एक्किसीटम, जलनेचे, शिंगाडा

helotism
दास्यत्व धोंडफुलातील कवक व शैवल यांच्या परस्परसंबंधात कवक हे आश्रित व शैवल आश्रय असा संबंध ध्वनित करणारी संज्ञा, वास्तविक तो परस्परावलंबनाचा (सहजीवनाचा) एक प्रकार आहे Lichen

hemi cryptophyte
अर्धगूढपादप, अर्धगूढ कलिकोद्भिद जमिनीच्या पृष्ठालगत अनेक वर्षे राहणारा पोषक (शाकीय) अवयव आणि कळ्या असणारी वनस्पती, यावर अनेकदा पालापाचोळ्याचे आवरण असते.

hemi-
अर्ध निम्मेपणा दाखविणारा उपसर्ग

Hemibasidii
अर्धगदाकवक उपवर्ग, हेमिबेसिडी गदाकवक वर्गातील तांबेरा व काणी या दोन गणांचा समावेश असलेला गट, यामध्ये विशिष्ट विश्रामी बीजुकाच्या अंकुरणानंतर गदाकोशिका बनते. h. cellulose अर्धतूलीर, हेमी सेल्युलोज कोशिकावरणातील एक कार्बाएहायट्रेट संचित पदार्थ उदा. खारकेचे

hemicarp
फलांश, अंशफल mericarp

hemiparasite
अर्धजीवोपजीवी semiparasite, semisaprophyte

hepaticae
यकृतका वर्ग, हिपॅटिसी शेवाळी (बायोफायटा) विभागातील तीन वर्गापैकी एक. या वनस्पतींचे शरीर पानासारखे सपाट, साधे व जमिनीवर केसासारख्या मुळांनी चिकटलेले, क्वचितच साधे खोड व साधी सूक्ष्म पाने असलेले व अंतर्रचनेत भिन्न ऊतकांनी भरलेले असते. प्रजोत्पादक इंद्रिये ब

herb
औषधी लहान, मऊ, वर्षापेक्षा बहुधा जास्त न जगणारी, पण जगल्यास जमिनीवर कायम काष्ठयुक्त खोड नसलेली वनस्पती. उदा. सूर्यफूल, मका, कोबी, डेलिया, झेंडू इ.

Herbaceae
औषधीय उपवर्ग, हर्बेसी द्विदलिकित वनस्पतींच्या वर्गातील गट, हचिन्सन यांनी येथे सर्व औषधी आणि त्यांपासून विकास पावलेल्या झुडपांचा समावेश केला आहे.

herbaceous
औषधीय वर वर्णन केल्याप्रमाणे (खोड अथवा वनस्पती), उदा. काकडीचा वेल, गुलबुश

herbage
पल्लव वनस्पतीचे शाकीय भाग

herbal
औषधी ग्रंथ, पादप कोश सर्व तऱ्हेच्या वनस्पतींची विविध माहिती संकलित करून देणारा जुन्या पाश्चात्य पद्धतीचे ग्रंथ, उदा. जॉन जेरार्डचा ग्रंथ

herbalist
औषधी ग्रंथकर्ता, पादपकोशकर्ता वर वर्णन केल्याप्रकारच्या ग्रंथाचा लेखक (संकलन, संपादक)

herbarium
वनस्पतीसंग्रह अभ्यासाच्या सोयीकरिता विविध प्रकारे जमवून ठेविलेल्या वनस्पतींचा साठा, व्यापकप्रमाणात हल्ली सजीव वनस्पतींचे संवर्धन व संशोधन अशा संस्थेत केले जाते.

herbivorous
वनस्पत्याहारी, शाकाहारी केवळ वनस्पती (गवते, पाचोळा, तण, फळे इत्यादी) खाऊन राहणारे (प्राणी), उदा. काही पक्षी, गाईबैल,मेंढ्या, घोडे, हत्ती इ. मनुष्यांपैकी काही फक्त वनस्पतिज पदार्थ खाऊन जगतात त्यांना शाकाहारी म्हणतात.

hercogamy
विष्कंभयुति संरचनेतील विशेषत्वामुळे स्वयंफलन न होऊ देणारी योजना. उदा. सूर्यफुलातील केसरदले व किंजदले यांच्या पक्व होण्याच्या भिन्न वेळा व ऊंचीतील फरक, कळलावीच्या फुलातील या दोन अवयवांचे स्थान h. half अर्ध विष्कंभयुति जमल्यास परफलन, पण ते न जमल्यास निदान

hereditary
आनुवंशिक वंशपरंपरेने आलेले (लक्षण), संपादित नसलेले, उदा. पुष्पगंध, पुष्पसंरचना h. symbiosis आनुवंशिक सहजीवन जनक वनस्पतींच्या ऊतकातून (बीजुक, बीज) काही जंतू किंवा कवक संततीच उतरण्याचा प्रकार

heredity
आनुवंशिकता आईबापापासून व काही प्रमाणात इतर पूर्वजांकडून संततीत कमीजास्त प्रमाणात लक्षणे उतरण्याची प्रवृत्ती व त्यामुळे दिसणारे साम्य, ह्या प्रक्रियेत होणाऱ्या काही घटनांमुळे काही लक्षणांत फरक पडून संततीस वेगळेपणा येतो अथवा नवीन लक्षणे प्राप्त होतात.

heritability
अनुहर्यत्व एका पिढीतून दुसरीत उतरण्याची लक्षणांची शक्यता (क्षमता)

heritable
अनुहर्य एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरणारे (लक्षण), सर्वच आनुवंशिक लक्षणे किंवा वंशपरंपरा चालू ठेवले जाणारे लक्षण (गुण, दोष) germinal, congenital, aquired

hermaphrodite
उभयलिंगी, द्विलिंगी चिन्ह ४ + केसरदले व किंजदले असलेले (फूल). दोन्ही लिंगभेद दर्शविणारी इंद्रिये असणारी गंतुकधारी पिढी (उदा. काही शैवले, शेवाळी इ.) पहा bisexual, monoclinous, perfect

hesperidium
जंबीरसम, नारंगक नारिंगासारखे फळ, अनेक जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलापासून बनलेले, अनेक कप्प्यांचे, रसाळ केसांनी भरलेले व चिवट सालीचे मृदुफळ, उदा. लिंबू, पपनस इ.

hetero carpous
विषमफली एकापेक्षा अधिक प्रकारची फळे निर्मिणारी (वनस्पती). h. chlamydeous विषमपरिदली संवर्त व पुष्पमुकुट स्पष्टपणे भिन्न असलेले (फूल) उदा. जास्वंद, गुलाब. h. gametic विषमगंतुकी, विषमयुग्मकी दोन प्रकारची नर गंतुके (पुं-गंतुके) किंवा स्त्री गंतुके निर्मिणारी

hetero-
असम-, विषम ग्रीक भाषेमध्ये, भिन्न अथवा अनित्य या अर्थाचा उपसर्ग

heterochromosome
असमरंगसूत्र, विषमरंगसूत्र नर व मादी यांच्या शरीरातील लिंगविषयक किंवा अन्य प्रकारे फरक पडलेले रंगसूत्र

heterochromous
असमवर्णी, विषमवर्णी एकाच फुलोऱ्यातील काही फुले एका रंगाची व इतर दुसऱ्या रंगाची असण्याचा प्रकार, उदा. कॉसमॉस, ऍस्टर, डेलिया, इत्याईदंचे स्तबक फुलोरे. बुगनवेलियाचा एक प्रकार

heterocotylous
असमदलिकित दोन्ही दलिका सारख्या नसलेले (बी)

heterocotylous
असमदलिकित दोन्ही दलिका सारख्या नसलेले (बी)

heterocyst
असमकोष्ठ इतराहून भिन्न (मोठी, पारदर्शक, जिवंत व दुहेरी आवरणाची) शैवल कोशिका, उदा. नीलहरित शैवले

heteroecious
अनेक (बहुधा दोन) आश्रयावर वाढणारी (उपजीविका करणारी, वनस्पती), उदा. तांबेरा गहू व दारुहळद या आश्रयावर आळीपाळीने वाढते. autoecious

heteroecism
अनेकस्थता, भिन्नाश्रयता वर वर्णन केलेला प्रकार

heterogamous
१ भिन्नपुष्पकी २ विषम गंतुकी १ दोन प्रकारची (उभयलिंगी व एकलिंगी किंवा वंध्य) फुले असणारे स्तबक अथवा तो फुलोरा धारण करणारी वनस्पती उदा. सूर्यफूल, झिनिया, गोरखमुंडी, शेवंती, दवणा इ. २ भिन्न गंतुके (स्त्री व नर) असलेली (वनस्पती)

heterogamy
१ असमयुति २ विषमगंतुकत्व ३ पुष्पविविधता १ दोन भिन्न गंतुकांचा संयोग २ दोन प्रकारची (पुं. व स्त्री) गंतुके असण्याचा प्रकार ३ नर व स्त्री पुष्पांच्या कार्याचा अथवा मांडणीचा बदल isogamy

heterogeneity
असमजनन १ पहा alternation of generations, abiogenesis, २ कळ्यातील भेदांमुळे किंवा निसर्गलीलेमुळे झालेली निर्मिती

heterogeneity
असमजनन १ पहा alternation of generations, abiogenesis, २ कळ्यातील भेदांमुळे किंवा निसर्गलीलेमुळे झालेली निर्मिती

heterogenetic
असमजनित परफलनामुळे झालेले h. variation असमजनित भेद परफलनामुळे उद्भवलेले बदल

heterogenous
नैकविध विविधतापूर्ण (वैचित्र्यपूर्ण) असणारे, एकविध (एकरुप) नसलेले

heteromerous
१ असमभागी २ स्तरित १ पहा heterocyclic २ भिन्न थरांचे बनलेले, उदा. धोंडफुलातील शैवल आणि कवक यांची स्वतंत्र थरयुक्त मांडणी असलेले शरीर homoimerous

heteromorphic
असमरुपी, विषमरुपी अनित्य संरचना असलेले किंवा विकृतियुक्त, अवयवातील भिन्नत्व दर्शविणारे dimorphic  heteromorphous

heteromorphism
असमरुपता, विषमरुपत्व वर वर्णन केलेली लक्षणे असण्याचा प्रकार

heterophyllous
विषमपर्णी भिन्न माध्यमात (पाणी व हवा) असलेल्या खोडाच्या भागंआवर भिन्न प्रकारची पाने असणारी (वनस्पती). उदा. कमळ, शिंगाडा, अतिविष (Aconitum heterophyllum Wall).

heterophylly
विषमपर्णत्व वर वर्णिलेला प्रकार

heteroplasy
अनित्यवृद्धि जखमेमुळे त्यानंतर तेथे होणारी अनित्य वाढ उदा. गाठ, फोड इ.

heteroprothally
विषम पूर्वकायकत्व नर व स्त्री गंतुकधारी (पूर्वकायक) अलग असण्याचा प्रकार उदा. सिलाजिनेला, एक्किसीटम unisexual, dicliny

heterosis
संकरज (संकर) ओज दोन सापेक्षतः शुद्ध प्रकारातील वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या संततीत एकत्र आलेल्या व आकारमान आणि जोम याशी संबंधित अशा अनेक जनुकांच्या श्रेणीच्या संमिश्र परिणामामुळे आढळून येणारे विशेषत्व in breeding  hybrid vigour

heterospermy
असमबीजत्व एकाच वंशातील काही जातीत सपुष्क व काहीत अपुष्क बीजे असण्याचा प्रकार. उदा. मोरस (Morus)

heterosporous
असमबीजुक नर व स्त्री गंतुकधारी निर्माण करणारी दोन (लघु व गुरु) प्रकारची बीजुके प्रसवणारी (वनस्पती), उदा. सिलाजिनला, आयसॉएटिस, काही जनलेचे (सालव्हीनिया)

heterospory
असमबीजुकत्व दोन प्रकारची बीजुके निर्माण करण्याचा प्रकार (क्षमता).

heterostyly
भिन्न किंजलत्व एकाच जातीत भिन्न उंचीची किंजले असणारी फुले असण्याचा प्रकार, उदा. कदंब कुल, आंबुशी, प्रिम्यूला

heterothallic
विषमजालकित, विषमकायिक नर व स्त्री अशी दोन प्रकारची गंतुके भिन्न कायकावर किंवा तंतूमय शरीरावर असणारी वनस्पती, उदा. म्यूकर बुरशी, काही शैवले, शेवाळी इ. homothallic

heterothallism
विषमजालकता, विषमकायिकता वर वर्णन केलेला प्रकार homothallism

heterotrophic
परोपजीवी इतर सजीव किंवा मृत शरीरावर उपजीविका करणारी (वनस्पती), उदा. बुरशी, सूक्ष्मजंतू, कवक इ. autotrophic

heterotropism
परोपजीवन, परोपजीविता वर वर्णन केलेला प्रकार

heterotropous
तिर्यङमुख  amphitropous

heterotypic division
विषमविभाजन कोशिकांच्या विभाजनात द्विगुणित रंगसूत्रांच्या संख्या विभागणीने संपूर्ण सारख्या जनुकांचे नसलेले व एकपट (एकगुणित) संरचनेचे दोन संच बनण्याची प्रक्रिया meiosis, homotypic division

heterozygosis
विषमरंदुकत्व खाली वर्णिलेला प्रकार

heterozygote
विषमरंदुक दोन वैकल्पिक भिन्न लक्षणे (जनुके) असलेल्या गंतुकांच्या संयोगाने बनलेली संयुक्त कोशिका, यापासून होणाऱ्या संततीत लक्षणांचा संकर आढळतो allelomorphic pair of characters

heterozygous
विषमरंदुकी विषमरंदुकता असलेले

hexacyclic
षट्चक्रीय सहा मंडलाचे (फूल), संवर्त व पुष्पमुकुट यंआची मिळून चार किंवा केसरदलांची दोन अथवा तीन मंडले व इतरांची अनुक्रमे चार किंवा तीन अशी एकूण सहा

hexagonous
षट्कोनी सहा धारा असलेले (खोड, बी किंवा फळ)

hexamerous
षट्भागी प्रत्येक मंडलात सहा पुष्पदले असलेले फूल

hexandrous
षट्केसरी, षट्पुंकेसरी

hexandry
षट्केसरत्व फुलात सहा केसरदले असण्याचा प्रकार, उदा. मोहरी, नागदवणा

hexapetalous
षट्प्रदली सहा पाकळ्या असलेले (फूल), उदा. हिरवा चाफा

hexaploid
षट्गुणित रंगसूत्रांची सहापट संख्या असलेली (वनस्पती)

hexarch
षट्सूत्र, षडादिकाष्ठ आदिप्रकाष्ठाचे सहा गट असलेला रंभ stele

hibernal aspect
शिशिर दृश्य, शिशिर प्रभाव हिवाळ्यात आढळणारे वनस्पति समुदायाचे स्वरुप hiemal

hibernation
शीत निष्क्रियता, ग्रीष्मनिद्रा हिवाळ्यातील सुस्ती अथवा निष्क्रियता, काही झाडांची पाने गळून पडल्याने खोड व फांद्या यांचे क्रियाशीलत्व तात्पुरते थांबलेले आढळते, उदा. खैर, काटेसावर, रामफळ इत्यादींची पाने गळतात. शीतकटिबंधात प्रखर थंडीत हा प्रकार विशेषेकरून आढळतो. भूमिगत खोड किंवा बीजस्वरुपातही अशीच निष्क्रीयता आढळते.

hilum
१ नाभि २ कणकेंद्र ३ परागकेंद्र १ बीजक जेथे बीजबंदास अथवा बीजकाधानीस चिकटलेले असते तेथे त्यावर पडलेला वण २ तौकीर पदार्थांचे थर कणातील ज्या बिंदूभोवती बनतात तो बिंदू, यालाच कोणी locus म्हणतात ३ परागकणाचे छिद्र

hippocrepiform
अश्वक्षुराभ, अर्धवर्तुळाकृति घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेला, उदा. गर्भ, परागकोश.

hirsutus
दीर्घकेशी, दीर्घरोमी लांब व विरळ केसाचे उदा. गजकर्णी (Rhinacanthus hirsuta Kurg). (hirsute)

hispid
राठकेशी, दृढरोमी राठ किंवा ताठर केस असलेले, उउदा. भोपळीचा वेल, Acalypha hispida Burm शोभेचे झुडुप

histogenesis
ऊतकजनन, ऊतिजनन ऊतकांचा उगम व निर्मिती आणि त्यांचा विकास

histology
सूक्ष्मशारीर, ऊतकविज्ञान सूक्ष्मदर्शकांच्या साहाय्याने केला जाणारा वनस्पतींच्या (किंवा प्राण्यांच्या) शरीरांच्या संरचनेचा अभ्यास अथवा त्यासंबंधीच्या माहितीची शाखा

hoary
पलित भुरकट, पांढरट व दाट लव असलेले

holandric
य रंगसूत्री, वाय रंगसूत्री. य रंगसूत्र असलेले. Y chromosomal

hold fast
दृढबंध आधाराला घट्ट धरुन ठेवून स्थिरत्व देणारा चकतीसारखा अवयव, उदा. शैवले, शैवाक (धोंडफूल), hapteron

hollard
पूर्ण जलांश जमिनीतील पाण्याचा पूर्णांश

hologamy
प्रकलसंयोग गंतुकातील प्रकलांचा संयोग

holoparasite
पूर्ण जीवोपजीवी अन्य सजीवावर पूर्णपणे आपले पोषण करणारी (वनस्पती), उदा. अमरवेल, तांबेरा, काणी

holophytic
पूर्ण स्वोपजीवी, पादपसमभोजी संपूर्णपणे स्वावलंबनाने पोषण करणारी

holophytism
पूर्ण स्वोपजीवन संपूर्णपणे स्वावलंबी असलेले जीवन

holosaprophyte
पूर्ण शवोपजीवी (मृतोपजीवी) saprophyte

holotype
मूलस्वरुप ज्यावरुन प्रथम वर्णन लिहिले गेले तो मूळच्या वनस्पतीचा एकमेव नमुना किंवा तिचा अन्य अवयव. allotype

homo chlamydeous
समपरिदली संदले व प्रदले असा फरक नसलेले (फूल) उदा. कमल कुल  h. gametic समगंतुकी, समयुग्मकी एकाच प्रकारटची नर (पुं-) किंवा स्त्री गंतुके निर्मिणारी (अनुक्रमे नर किंवा स्त्री व्यक्ती), उदा. काही पक्षी व मासे यांमध्ये नर समगंतुकी व माद्या विषमगंतुकी असतात.

homo-
सम- सारखेपणा दर्शविणारा ग्रीक भाषेतील उपसर्ग

homochlamydeous
समपरिदली सर्व परिदले सारखी असलेले (फूल), संवर्त व प्रदले यात फरक नसतो. उदा. निशिगंध, कुमूर, नागदवणा

homocyclic
समचक्रीय, समवलयी सर्व पुष्पदलांची मंडले दलसंख्येने सारखी असलेले (फूल) उदा. नारळ, धोत्रा.

homoeomerous
अस्तरित, संमिश्र भिन्न स्तर नसलेले, काही धोंडफुलाच्या संरचनेत शैवल व कवक यांचे मिश्रण असलेले (शरीर, कायक)

homogamy
१ समपक्कता २ समयुति १ एकाचवेळी पूर्ण फुलातील पराग व किंजल्क पक्क होऊन कार्यक्षम असण्याचा प्रकार, उदा. धोत्रा २ सारख्या गंतुकांचा संयोग

homogeneous
एकविध एकजिनसी, एकाच प्रकारचे अथवा गुणधर्माचे, विविधता नसलेले.

homologous
१ समजात, सजातीय २ समरचित, समजातीय १ वरकरणी भिन्न वाटले तरी मूलतः एकाच प्रकारचे, सारख्याच मूलभूत संरचनेचे, उदा. संदले व प्रदले, प्राण्यातील काही अवयव, उदा वाघळाचे पंख व व्हेल माशाचे (देवमाशाचे) पर २ संततीमध्ये माता व पिता यांच्याकडून आलेल्या व तत्त्वतः समान लक्षणांबद्दल जबाबदार असलेल्या रंगसूत्रांच्या एका जोडीपैकी प्रत्येक रंगसूत्र

homology
समजातता, सजातीयत्व मूलभूत सारखेपणा असण्याचा प्रकार, उदा. फड्या निवडुंगाचे खोड (पानासारखे दिसणारे) व त्रिधारी निवडुंगाचे खोड शास्त्रीय दृष्ट्या अक्ष, परंतु वरकरणी भिन्न आहेत. तसेच वाटाण्याची पानासारखी उपपर्णे, घोटवेलीचे ताणे व बोरीची काटेरी उपपर्णे यांचे स्वरुप भिन्न पण मूलतः तिन्ही पर्णतलाची उपांगे आहेत.

homoplasy
समवृद्धि, समतोविकास काही कारणाने होणाऱ्या अनित्य वाढीत पूर्वीप्रमाणेच नवीन भाग अंतर्भूत असण्याचा प्रकार

homosporangic
समबीजुक जनक एकाच प्रकारची बीजुके बनविणारी

homosporic
समबीजुकोद्भूत एकाच प्रकारच्या बीजुकापासून झालेली, उदा. (बहुतेक) नेचांचा पूर्वकायक (गंतुकधारी)

homosporous
समबीजुक सर्वच बीजुके सारखी असलेली (वनस्पती) उदा. अनेक नेचे heterosporous

homospory
समबीजुकत्व सर्व बीजुके सारखी असण्याचा प्रकार

homothallic
समजालकित, समकायिक प्रजोत्पादक लैंगिक अवयवांच्या निर्मितीच्या दृष्टीने एकाच प्रकारचे जालक (कलकतंतूंचे व शैवल तंतूंचे जाळे) अथवा कायक असलेली जाती उदा. काही कवक, शैवले, शेवाळी इ.

homothallism
समजालकता, समकायिकता गंतुकांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सारखे किंवा सामान्य तंतू किंवा कायक असण्याचा प्रकार heterothallism

homotypic division
समविभाजन कोशिकेच्या न्यूनीकरण विभाजनातील पहिल्या विषम विभागणीनंतरची रंगसूत्रांची संख्येबाबत सारखेपणा राखणारी दुसरी विभागणी, परिणामी आरंभीच्या द्विगुणित कोशिकेपासून चार एकगुणित कोशिका (बीजुके, रेतुके, अंदुके इ.) बनतात. heterotypic division meiosis, mitosis

homozygosis
समरंदुकत्व सारख्या प्रजोत्पादक कोशिकांच्या (गंतुकांच्या) संयोगाने रंदुक बनण्याचा प्रकार, खालील संज्ञा पहा.

homozygote
समरंदुक सारख्या (वैकल्पिक जनुकांच्या सारखेपणा असलेल्या) गंतुकांच्या संयोगापासून बनलेली संयुक्त कोशिका, अशा कोशिकेपासून संकरप्रजा निर्माण होत नाही heterozygote, allelomorphic pair of characters

homozygous
समरंदुकी वर वर्णन केलेल्याप्रमाणे समरचित रंगसूत्रांच्या जोडीतील प्रत्येकावर विशिष्ट स्थानी सारखीच जनुके असलेली व्यक्ती

honey
मध प्रथम मधमाश्यांनी शोषून घेऊन आपल्या पोवळ्यात साठविल्यावर पुढे मनुष्याने त्यातून काढून घेतलेला, फुलातील गोड रस (मधुरस) h. dew मधुबिंदु एका (अर्गट) रोगकारक कवक वनस्पतीने आपल्या बीजुकांच्या प्रसाराकरिता कीटकांना खाद्य म्हणून बनविलेला गोड रस h. guide

hood
स्फटा, फणा

hooded
स्फटाकृति, फणाकृति नागाच्या फडीच्या आकाराचा (अवयव), उदा. साल्व्हिया, तुळस, सब्जा इत्यादींच्या पुष्पमुकुटातील मोठी वरची पाकळी cucullate

hook
अंकुश टोकाशी आकड्यासारखे (गळासारखे, वक्र) मागे वळलेले उपांग उदा. हिरवा चाफा, वेत h. climber अंकुशलता अंकुशासारख्या उपांगानी किंवा अवयवांनी वर चढत जाणारी वेल, उदा वाघनखी h. sensitive संवेदी अंकुश स्पर्शग्राही व त्यानुसार प्रतिक्रिया दर्शविणारा अंकुशासारखा

hordein
होर्डाइन बार्लीत असणारे विशेष प्रकारचे प्रथिन

hormogonium
मालांश, मालाखंड नीलहरित शैवलांच्या तंतुयुक्त शरीराच्या अनेक कोशिकांचे माळेसारखे तुकडे, हे विशिष्ट (असमकोष्ठ) कोशिकांच्या साहाय्याने सुटे होऊन नवीन वनस्पती बनवितात उदा. नॉस्टॉक, ऍनाबीना इ. heterocyst

hormone
संप्रेरक, हॉर्माएन सर्व सजीवांच्या शरीरातील चयापचयामध्ये चालना देणारा व त्यातील विविध प्रक्रियांची गति कमीजास्त करणारा वितंचकासारखा कार्बनी पदार्थ, भिन्न प्रक्रियात भाग घेणारे संप्रेरक भिन्न असून त्यांपैकी काही विशिष्ट प्रपिंडातून स्त्रवतात व सर्व शरीरभर

Horned liverworts
शृंगका, शृंगी यकृतका Anthocerotae

hortensis
उद्यानविषयक, उद्यानवासी बागेतील किंवा बागेसंबंधी, उदा. आकाशनिंब (Millingtonia hortensis L.) हा वृक्ष बागेत शोभादायक म्हणून किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावतात.

horticulture
उद्यानविज्ञान बागेसंबंधी सर्व माहिती संकलन करणारी ज्ञान शाखा

hortus
बाग, उद्यान विशेष प्रकारे वाढविलेल्या निवडक वनस्पतींचा समूह

host
आश्रय दुसऱ्या सजीवास आधार अगर पोषण देणारा प्राणी अगर वनस्पती epiphyte, parasite

hull
१ तूस २ टरफल १ पहा glume २ पहा pericarp, epicarp

humus
कुजात, कुजकट पदार्थ जमिनीतील काळपट व कुजकट कार्बनी (वनस्पतिज व प्राणिज) पदार्थ, जमिनीच्या पोताशी व सुपिकतेशी याचा निकट संबंध असून त्यामुळे जमीन धुपून जात नाही. h.plant (saprophyte) शवोपजीवी वनस्पती मृत शरीरावर उपजीविका करणारी वनस्पती, उदा. कवकांपैकी काही

husk
तुष फोल, चौडे, सालपट, काही फळांचे अथवा बियांचे बाहेरचे आवरण, हे परिदले किंवा छदे यापासून बनलेले असते, उदा. गूजबेरी

hyaline
पारदर्शक पलीकडचे दर्शविणारे (उपांग अवयव इ.)

hyaloplasm
बाह्यप्राकल ectoplasm

hyalosome
अवर्णकणु रंगद्रव शोषून न घेणारा प्राकलातील सूक्ष्म कण

hybrid
संकरज अशुद्ध वंश, मिश्र प्रजा, जननिक दृष्टीने भिन्नता असलेल्या दोन जाती किंवा प्रकार यांच्यापासून जन्मलेले h.bisexual द्विलिंगी संकरज आई व बाप यांची लक्षणे (गुणदोष) मिश्र (जोड) स्वरुपात दर्शविणारी संकरप्रजा h. derivative साधित संकरज दोन संकरजांची अथवा एक

hybridisation
संकरण वर वर्णिलेली प्रक्रिया (कृति)

hybridise
संकर करणे कृत्रिमरित्या दोन भिन्न जातींत किंवा प्रकारात प्रजोत्पादन घडवून आणणे अथवा मिश्रप्रजा निर्माण करणे cross breed

hybridology
संकरविद्या संकरणासंबंधीची माहिती

hydathode
जलप्रपिंड शरीरातील अत्याधिक पाणी बाहेर टाकण्याची योजना (प्रपिंड) यामध्ये जलस्त्रावक ऊतक व जलरंध यांचा अंतर्भाव होतो, जलरंधाचा कधी अभाव असतो पण असल्यास त्याची संरचना पर्णरंधाप्रमाणे असून उघडझाक नसते. नेफोलेपिस नेचामध्ये टाकलेल्या पाण्यात चुना विरघळलेला असत

Hydnaceae
शूलकवक कुल सत्य गदाकवक उपवर्गातील व पटलकवक गणातील त्रिकोनी काट्यासारखा अवयवावर गदाकोशिका असलेल्या कवकांचे कुल Eubasidii, Agaricales  Spine fungi

hydric
जलविषयक पाण्यातील, पाण्यासंबंधी

hydrocarpic
वारिफलजनक, जलफलजनक परागणाची कृति पाण्याच्या पृष्ठावर झाली असताही त्यानंतर फळ पाण्याखाली बनविणारी (वनस्पती), उदा. सवाला (Vallismeria).

hydrocentric
मध्यप्रकाष्ठक hadrocentric

hydrochasy
आर्द्रस्फुटन h. sere (hydrarch succession) जलीय क्रमक पाणथळ जागी आरंभापासून विकास होणारा पादप समुदाय अथवा वनस्पतींचा समूह. hygrochasy.

hydrogenase
हायड्रोजनेज रेणुवीय हायड्रोजनचा कार्यद्रव्यासारखा वापर करणारे कार्बनी निदेशक, नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणण्याशी हे संबंधित असते. क्लोरेला नावाच्या शैवलामध्ये नायट्राइटचे क्षपण घडवून आणण्यात याचा संबंध येतो.

hydrolase
हायड्रोलेज जलविच्छेदनामध्ये साहाय्यक वितंचक (कार्बनी निदेशक)

hydrolysis
जलविच्छेदन, जलापघटन, हायड्रॉलिसिस पाण्याचा वापर करून रासायनिक संयुगाचे दोन भाग करविणे, एक भाग H व दुसरा OH बरोबर संयोग पावतो. उदा. Nacl चे NaOH आणि HCl असे दोन भाग पडतात.

hydrome
जलवाहक पाण्याची ने आण करणाऱ्या शरीर घटकांचा संच, xylem  hadrome

hydromorphy
जलानुरुपता, जलरुपता पाण्यात राहून जीवन काढण्यास उपयुक्त असे (रुपांतरित) शरीर असण्याचा प्रकार उदा. हायड्रिला, नायास इ.

hydronastic
जलानुकुंचनी पाण्याच्या सान्निध्यामुळे कमीजास्त वाढ होऊन झालेले (अवयवांचे वलन), या वळणाचा पाण्याच्या दिशेशी संबंध नसतो.

hydrophilous
१ जलप्रिय २ जलपरागित ३ जलसाधित १ सदैव भरपूर ओलावा असलेल्या ठिकाणी वाढणारी वनस्पती उदा. बाम्ही, शेवाळी २ पाण्याकडून पराग नेण्याची कृति घडविणारी उदा. सवाला, नायास ३ रंदुकनिर्मितीत (प्रजोत्पादनात) पाण्याच्या माध्यमाचा वापर करणारी (वनस्पती) उदा. शैवले व जलकवक

hydrophobe
जलद्वेष्टी, जलविरोधी पाणी वर्ज्य करणारी hydrophobous

hydrophyte
जलवनस्पति, जलोद्भिद सतत अंशतः अगर पूर्णपणे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती, उदा. कमळ, कुमुद, शिंगाडा इ.

hydroponics
मृदहीन कृषि, जलकृषि नित्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीत लागवड न करता पोषण भरपूर मिळेल अशा विद्रवात किंवा अशा विद्रवाच्या वापराने केलेली वनस्पतींची लागवड अथवा संवर्धन, चांगल्या शेतजमिनीची दुर्मिळता असते तेथे ही पद्धत फायदेशीर होते. soilless cultivation, water

Hydropteridales
जलनेचे गण पाण्यात वाढणारे नेचे, यांचा स्वतंत्र गण न मानता त्यांचा अंतर्भाव तनुबीजुककोशी (लेप्टोस्पोरँजिएटी) उपवर्गात स्वतंत्र कुलात करतात. Filicinae, Filicales  water ferns

hydrotactic
जलानुचलनी पाण्याच्या चेतनेमुळे घडून येणारे (स्थलांतर) उदा. श्लेष्मकवक वनस्पतींचा प्राकल

hydrotaxis
जलानुचलन वर वर्णन केल्याप्रमाणे घडून येणारी प्रतिक्रिया chemotaxis

hydrotropic
जलानुवर्तनी पाण्याच्या चेतनेमुळे वाढ होऊन घडून येणारे वनस्पतींच्या अवयवांचे वलन (वळणे) chemotropic, geotropic

hydrotropism
जलानुवर्तन वर वर्णन केलेली पाण्याकडे किंवा पाण्यापासून दूर वाढण्याची अवयवांची प्रतिक्रिया, उदा. बीज रुजल्यावर त्यातील मोड जमिनीतील ओलसर भागाकडे वळुन वाढतो, त्याउलट रोपाचे वरचे टोक (अंकुर) प्रकाशाकडे वर वाढते. phototropism, heliotropism, geotropism

hygrochasy
आर्द्रस्फुटन पाणी शोषून घेतल्यामुळे घडून येणारी वनस्पतींच्या अवयवांची तडकून फुटण्याची प्रतिक्रिया, उदा. काही प्रदेशातील वनस्पतींची फळे, उदा. जेरीकोचा गुलाब xerochasy  hydrochasy

hygrometer
आर्द्रतामापक हवेतील ओलावा (बाष्पांश) मोजण्याचे उपकरण

hygrophilae
आर्द्रप्रिय वनस्पती, उन्दोद्भिद ओलसर हवा व जमीन पसंत करणारी वनस्पती. उदा. काही नेचे, शेवाळी, अळू, कर्दळ, केळ इ. hygrophyte

hygroscopic
उन्देक्षीय, आर्द्रताशोषी पाणी शोषून फुगणे व पाण्याअभावी आकसणे अशी प्रतिक्रिया दर्शविणारे उदा. शेवाळी (परितुंड दंत), नेचे (बीजुककोशाचे वलय), बीजुक क्षेपक (एक्किसीटम) इ. h.cell चलित्र कोशिका पहा bulliform cell

hymen
पटल पापुद्रा, त्वचेसारखा पण पातळ पडदा

hymenium
बीजुकोत्पादक स्तर (थर) गदाकवकात आढळणारा व बीजुकघरातील बीजुकांची उत्पत्ति करणाऱ्या कोशिकांचा सलग थर Basidiomycetes, Agaricales

Hymenomycetae
पटलकवक गण, हायमेनोमायसेटी Agaricales

hypanthodium
कुंभासनी पुष्पासनाचा फुगून वाढलेला व कुंभाच्या (कलशाच्या) आकाराचा सूक्ष्म व बहुधा एकलिंगी फुलांचा समूह, उदा. अंजिर, वड, उंबर इ. syconus

hyperplasy
अतिवृद्धि कोशिकांच्या संख्यावाढीमुळे ऊतक व अवयव यांच्या आकारात अधिक वाढ होण्याचा प्रकार

hypertrophy
अतिपुष्टी कोशिकांच्या आकारवाढीमुळे अवयवांच्या किंवा ऊतकांच्या आकारात अति वाढ होण्याची प्रक्रिया

hypha
कवकतंतु कवक वनस्पतींच्या शरीराचा एक तंतू, यात कधी आडपडदे असतात व तंतूंना कधी शाखा असतात, कवकतंतूंच्या कोशिकांत प्राकलकणू नसतात, एक किंवा दोन प्रकल किंवा अनेक प्रकल असतात, अनेक तंतू एकत्र येऊन पातळ पापुद्रे, छदे, ऊतके किंवा मांसल अवयव बनतात, उदा. बुरशी, भू

hypnospore
विश्रामी बीजुक प्रतिकुल परिस्थितीत सुरक्षित स्थितीत जिवंत राहणारे बीजुक spore

hypo-
अधः, अव-, अधर-, अभि- खालचे या अर्थी उपसर्ग

hypobasal
अवतल तळाकडील अर्धा भाग, गर्भकोशिकेच्या (रंदुकाच्या) विभाजनात पहिल्या अवस्थेतील गंतुकधारीला चिकटलेला तिचा खालचा अर्धा भाग, उदा. नेचे, शेवाळी इ.

hypocotyl
अधराक्ष बीजातील दलिकांच्या खाली असलेला प्रारंभिक अक्षाचा भाग, द्विदलिकित बीजातून बाहेर आलेल्या मूळांकुराच्या टोकामागील भाग epicotyl

hypodermal
अभित्वचीय अपित्वचेच्या खालच्या कोशिकांच्या थराशी संबंधित असलेले

hypodermis
अभित्वचा, अधस्त्वचा अपित्वचेखालचा थर, कधी हे थर दोन किंवा तीन असून कोशिकावरण कधी जाड तर कधी फक्त त्यांचे कोपरे जाड व अनेकदा कोशिका मृत असतात. सजीव कोशिकात हरितकणूही आढळतात. उदा. सूर्यफुलाचे अथवा मक्याचे खोड epidermis

hypogeal
अवभौम बीज रुजताना, बीजातील दलिका जमिनीत राहून गर्भांकुराचे पोषण करतात, अशा प्रकारे बीजाची रुजण्याची पद्धती (अंकुरण) उदा. हरभरा

hypogynous
अवकिंज किंजमंडलाच्या खालच्या पातळीवर पण त्यास न चिकटलेले असे (इतर भाग- पुष्पदले) अथवा असा संरचनेचे (फूल), उदा. मोहरी, तिळवण इ.

hyponasty
अधर (अधो) वर्धन खालची बाजू (पृष्ठभाग) अधिक जलद वाढून अवयवास वक्रता येण्याचा प्रकार, उदा. कलिकावस्थेत प्रथम अशा वाढीने फुलातील सर्व अवयव परस्परास वेढून संरक्षण होते. फूल उमलण्याच्या वेळी याउलट कृति (वाढ) होऊन फूल उमलते. बीजाच्या रुजण्याच्या वेळी मूलांकुर ज

hypophyll
१ अवपर्ण २ पर्णतल १ पानाच्या किंवा तत्सम अवयवाच्या खाली अर्धवट वाढलेले पान किंवा खवल्यासारखा अवयव किंवा उपांग उदा. रस्कस २ पानाच्या देठाचा खोडाशी चिकटलेला भाग

hypophysis
मूलजनक प्राथमिक मूळ व त्याची टोपी यांची निर्मिती करणारी, फुलझाडांच्या गर्भाची कोशिका

hypoplasy
विकृतवृद्धि अपुऱ्या पोषणाने वाढ थांबल्याने झालेली विचित्र वाढ

hypopodium
१ पर्णतल २ किंजवृंत १ पानाच् तळ २ किंजदलाचा देठ

hyposperm
अवबीजक बीज अथवा बीजक यांचा तळभाग, याच्या वरच्या बाजूस बीजकाचे आवरण प्रदेहापासून सुटे होते.

hyposporangium
अवपुंजत्राण बीजुककोशाच्या खालून वाढणारे आवरण, उदा. काही नेचे

hypostatic
संनियंत्रित epistatic

hypotrophy
अवविकास अवयव किंवा भाग यांची अपूर्ण वाढ

hypsophyll
छद bract

hysterophyte
शवोपजीवी मृत पदार्थांवर उपजीविका करणारी (वनस्पती), उदा. भूछत्र, कंदकवक, भूकंदुक इ.

hysterostele
लघुरंभ ऱ्हसित किंवा नष्टप्राय झालेले रंभ (वाहक ऊतकांचा चितीय भाग) उदा. काही जलवनस्पती stele