वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

Home » वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
विशिष्ट अद्याक्षरापासून सुरु होणारे शब्द बघायचे असल्यास त्या अद्याक्षरावर टिचकी मारावी
All | A(353) | B(196) | C(440) | D(176) | E(159) | F(191) | G(199) | H(228) | I(145) | J(23) | K(34) | L(211) | M(211) | N(121) | O(109) | P(606) | Q(24) | R(198) | S(434) | T(259) | U(63) | V(109) | W(42) | X(31) | Y(4) | Z(27) |

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा


There are 211 names in this directory beginning with the letter M.
mace
१ जायपत्री २ गदा, मुग्दल १ जायफळाच्या बीजावरचे एक जाडसर व अपूर्ण आच्छादन पहा aril २ सामान्य भाषेतील अर्थ, वेत्र

maceration
विमज्जन, भिजवण पाण्यात भिजवुन किंवा रासायनिक द्रव्यांचा संस्कार करून वस्तुला मऊपणा आणण्याची प्रक्रिया, ह्यापासून अर्क काढणे, आंबवणे इत्यादी प्रक्रिया पुढे चालू ठेवता येतात.

macrandrospore
गुरु पुंबीजुक दोन बीजुक प्रकारांपैकी नर- (पुं-) गंतुकधारी निर्माण करणारे बीजुक spore

macrandrous
१ दीर्घ पुं तंतुवंत २ दीर्घपुष्पी १ रेतुकनिर्मिती करणारा नित्य लांब किंवा मोठा तंतू असलेली वनस्पतींची जाती किंवा तशा तंतूंच्या साहाय्याने लैंगिक प्रजोत्पत्ति, उदा. ईडोगोनियम शैवल २ लांबट फुलांचा प्रकार nanandrons

macro-
दीर्घ-, गुरु-, बृहत् लांबटपणा किंवा मोठा आकार दर्शविणारा उपसर्ग m.cladous दीर्घशाखी लांबट फांद्या असलेली वनस्पती m.conidium गुरु विबीजुक जीवनचक्रातील दोन विबीजुकांपैकी मोठे पहा conidium m. cyst गुरुकोष्ठ मोठ्या आकाराचे कवच, पहा cyst m. fungus गुरुकवक,

macromolecular
महारेणवीय, बृहद्रेणवीय फार मोठा रेणुभार असलेले, उदा. कोशिकेतील लहान मोठे घटक, प्रथिने, लिपिडे, बहुशर्करा

macula
१ खात २ बिंदु, ठिपका ३ गुलिका १ वनस्पतीवर आढळणारी लहान व उथळ खाच २ काही वनस्पतींच्या अवयवांवर आढळणारा रंगीत ठिपका ३ बारीक फोड (गाठ)

maculatus (spotted)
ठिपकेदार, बिंदुयुक्त ठिपके असलेले, उदा. आवरण (फळाचे व बीजाचे), किंवा खोडाची साल इ.

maculose
ठिपकेदार

magnification
विवर्धन, विस्तारण विस्तार, वाढविलेले आकार व आकारमान

magnifier
विवर्धक, विस्तारक आकार व आकारमान वाढवून दाखविणारे (भिंग)

magnifying power
विवर्धनक्षमता विवर्धकाचे (वाढ करून दाखविण्याचे) सामर्थ्य

Magnoliaceae
चंपक कुल, मॅग्नोलिएसी सोनचाफा, कवठी चाफा, टुलिप वृक्ष इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे प्रारंभिक कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) करतात. हचिन्सन यांनी चंपक गण (मॅग्नोलिएलीझ) या स्वतंत्र गटात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, क्षुपे व लता, तैलमार्गयुक्त, साधी सोपपर्ण पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अवकिंज, एकाकी, फुले टोकास किंवा पानांच्या बगलेत असतात, पुष्पदले सुटी, परिदले मंडलित किंवा सर्पिल, केसरदले व किंजदले अनेक व सर्पिल, मृदुफळ, सपक्षफळ किंवा पेटिकाफळ, बिया सपुष्क

main vein
प्रधान सिरा, मध्यशीर

majus
बृहत्तर अधिक मोठे या अर्थाची लॅटिन संज्ञा, हिचा वापर वनस्पतींच्या शास्त्रीय नावात गुणनामाकरिता केलेला आढळतो. उदा. Antirrhinum majus L.

malacogamy
मृदुकाय युति मृदुकाय प्राण्यांनी गोगलगायीसारख्या घडविलेले फलन उदा. गोंडाळ, अळूच्या काही जाती.

malacoid
पाच्छल, श्लेष्मल, बुळबुळीत, श्लेष्माभ

malacophilous
मृदुकायप्रिय, मृदुकायपरागित मृदुकायांद्वारे (गोगलगायीसारख्या मृदु शरीराच्या प्राण्यांकडून) परागण वा फलन घडवून आणणारी (वनस्पती).

malacophyllous
मृदुपर्णी, रसाळपानी, मांसलपर्णी मऊ अथवा रसाळ पानाची (वनस्पती), उदा. घोळ, कोरफड इ. m.leaf मृदुपर्ण, मांसलपर्ण, रसाळ पान

male
पुं-, नर पुल्लिंगवाचक उपसर्ग (किंवा विशेषण) उदा. पुं गंतुक m.cell पुं कोशिका प्रजोत्पादक नर केशिका m.cone पुं शंकु फक्त केसरदले (लघुबीजुकपर्णे) असलेला शंकू उदा. सायकस, चिल पहा cone m. floret पुं पुष्पक सूर्यफुलाच्या फुलोऱ्यातील किंवा काही गवतांच्या

male gamete
पुं पेशी, नर पेशी, रेतुक sperm. sperm

malformation
विकृति अनित्य अवयव किंवा तत्सम आणि अकार्यक्षम संरचना प्रकार उदा. पानावर येणाऱ्या गाठी, अर्बुद, गुल्म इ.

Mallpighiaceae
माधवी कुल, माल्पिघिएसी बागेतील शोभिवंत माधवी लता (मधुमालती), लाल बोर, गाल्फिमिया इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक मोठे कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) करतात, हचिन्सन यांनी माल्पिघिएलीझमध्ये (माधवी गणात) केला आहे. प्रमुख लक्षणे- लहान वृक्ष, झुडपे व महालता (अंतर्रचना अनित्य). पाने साधी, सोपपर्ण, बहुधा समोरासमोर, अनेकांत प्रपिंडयुक्त ठिपके असलेली, विशिष्ट प्रकारचे शाखित केस सर्वत्र, एकसमात्र, द्विलिंगी, पंचभागी फुले, बहुधा १० केसर दलांची दोन मंडले तळाशी एका वर्तुळात जुळलेली, पाकळ्या पाच, सुट्या, तीन ऊर्ध्वस्थ जुळलेल्या किंजदलांच्या संयुक्त किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक बीजक, तीन फलांश होऊन फुटणारे शुष्क (पालिभेदी) फळ, अनेकदा पंखयुक्त कृत्स्नफल, बी अपुष्क

maltase
माल्टेज (माल्टिन) रुजणाऱ्या शूकधान्यात आढळणारे व संचित पदार्थांचे रासायनिक रुपांतर घडविणारे वितंचक (कार्बनी निदेशक). डायास्टेजपेक्षा हे अधिक क्रियाशील असून माल्टोज शर्करेचे रुपांतर दोन ग्लूकोजच्या रेणूंत करते. maltin

Malvaceae
भेंडीकुल, कार्पास कुल, माल्व्हेसी भेंडी, मुद्रा, जपा (जास्वंद), कापूस (तूल), पारोसा (पारिस) पिंपळ, अंबाडी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, शाल्मली (लाल सावर), दुरियन, सफेत सावर, गोरख चिंच इत्यादींचा अंतर्भाव पूर्वी याच कुलात करीत, परंतु त्यांचे एक स्वतंत्र कुल शाल्मली कुल (बॉम्बॅकेसी) हल्ली केले आहे (हचिन्सन). दोन्ही कुले भेंडी गणात (कार्पास गणात, माल्व्हेलीझमध्ये) समाविष्ट आहेत. याशिवाय मुचकुंद कुल (स्टर्क्युलिएसी) व परुषक कुल (टिलिएसी) इत्यादीही त्याच गणात आहेत. माल्व्हेसी कुलाची प्रमुख लक्षणे- शरीरावर तारकाकृती केस असलेले वृक्ष, क्षुपे व औषधी, साधी सोपपर्ण, एकाआड एक पाने, फुले बहुधा एकाकी, पानांच्या बगलेत, द्विलिंगी, नियमित, सच्छद्रक व अवकिंज, संदले पाच व जुळलेली, पाकळ्या पाच व तळाशी केसर नलिकेशी चिकटलेली, केसरदलाच्या नळीतून किंजल वाढत जाऊन नंतर किंजल्क पसरते. परागकोशात एक कप्पा, बहुधा पाच ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात एक किंवा अनेक बीजके, फळ मुद्रिका किंवा बोंड, इतर वनस्पती, चिनी कंदील, बला, चिकणा, तुपकडी, गुलखेरा, रानभेंडी, वनभेंडी इ.इ.

mamiform
स्तनाभ, स्तनासारख्या आकाराचे फळ (उदा. मॅमे ऍपल- Mamme apple, Mammea american L.) mamillar, mamillate

mamilliform
स्तनाग्राभ, पिंडिकाभ स्तनासारख्या उंचवट्यावरील टोकाप्रमाणे, उदा. अळूच्या पानावरील मखमलीसारख्या पृष्ठावर (अपित्वचेवर) असलेल्या कोशिकावरणाचे उंचवटे, काही फुलावरील अपित्वचा याच प्रकारच्या कोशिकांची असल्याने त्यावर पाणी टिकून न राहता गळून जाते.

mangrove formation
कच्छ समावास नद्यांच्या मुखाजवळ आणि उष्ण कटिबंधात इतरत्र जेथे दैनिक भरतीच्या वेळी भरपूर खारे पाणी जमते व ओहोटीच्या वेळी तेथे सतत साचलेला चिकल उघडा पडतो अशा ठिकाणी वाढणाऱ्या विशिष्ट वनस्पतींचा समुदाय.

mangrove plant
कच्छपादप, समुद्रतटीय वनस्पति खाऱ्या दलदलीत वाढणारे व विशिष्ट लक्षणांनी (आधारामुळे, श्वसनमुळे, अपत्यजनन, चिवट पाने इ.) ओळखले जाणारे झुडुप किंवा लहान वृक्ष उदा. कांदळ, चिप्पी, तिवार इ.

manna
मान्ना शर्करा तूलीरा (सेल्युलोज) पासून बनलेली, विशिष्ट साखर असलेला काही वनस्पतींचा घनीभूत पाझर, उदा. फॅक्सिनस

mantle
प्रावरण tapetal layer

manubrium
हस्तक कोशिका handle cell.

manubrium
हस्तक कोशिका handle cell.

manure
खत वनस्पतींना अन्न या दृष्टीने उपयुक्त होणारे कार्बनी किंवा अकार्बनी पदार्थ, उदा. वर खते, जोर खते, मिश्र खते, कंपोस्ट, कुजकट जैव पदार्थ

manuring
खत घालणे, खतावणी

maqui
मॅकी बव्हंशी सदैव हिरव्या राहणाऱ्या झुडपांची घनदाट वनश्री, ही संज्ञा कोर्सिकातील आहे.

Marantaceae
आराट कुल, मॅरॅन्टेसी आरारुट, टोपीतांबू इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे (फुलझाडांचे) कुल, याचा समावेश एकदली गणात करतात. Scitramineae

Marattiaceae
मॅरॅट्टिएसी नेचांपैकी स्थूलबीजुककोशी उपवर्गातील व मॅरॅट्टिएलीझ गणातील एकमेव कुल, ऍन्जिऑप्टेरिस, मॅरॅट्टिया, डॅनिया व कौलफुसिया इत्यादी वंश यात अंतर्भूत आहेत. प्रमुख लक्षणे - जाडजूड, सु.१ मीटरपेक्षा लहान व फांद्या नसलेल्या खोडावर मोठी, सोपपर्ण, अवसंवलित पि

marcescent
अवर्धी अपाती कोमेजलेला पण न गळता झाडावर राहणारा (अवयव)

margin
धारा, कडा, किनार पाने, उपपर्णे, संदले, प्रदले यासारख्या सपाट अवयवांची किनार, शरीराची सीमारेषा.

margin
धारा, कडा, किनार पाने, उपपर्णे, संदले, प्रदले यासारख्या सपाट अवयवांची किनार, शरीराची सीमारेषा.

marginal
धारास्थित, सीमांतिक अवयवांच्या कडेने असणारे, प्रत्यक्ष कडांवर किंवा कडांखाली असणारे (दात, बीजके, बीजुककोश, प्रपिंड, केस, काटे, पुंजत्राण इत्यादी अवयव, उपांगे).

marginicidal
धाराभिदुर किंजदलाच्या किनारीवर (किंजपुटाच्या शिवणीवर) होणारा (स्फोट फळाचे तडकणे), उदा. वाटाणा

maritimus
समुद्री, सागरी, समुद्रवासी समुद्रासंबंधी अथवा समुद्रतीरावरचे, समुद्राजवळ असणारे maritime

marking
अंकन कोशिकावरणावर आढळणारे अनेक प्रकारचे जाडीचे प्रकार उदा. वलयाकार, सर्पिल इ.

marsh formation
पंक समावास दलदलीत (पाणथळ) जागी वाढणाऱ्या वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय

Marsiliaceae
मार्सिलिएसी जलनेचे या नेचांच्या गटात पूर्वी अंतर्भूत केलेले एक कुल, यात फक्त मार्सिलिया, पिल्युलॅरिया व रेग्नेलिडियम हे तीन वंश असून हल्ली या कुलाचा अंतर्भाव तनुबीजुककोशिक नेचांच्या उपवर्गात करतात. बीजुककोश दोन प्रकारचे (लघु व गुरु), बीजुककोशपुंज पानाच्या

Martyniaceae
वृश्चन कुल, मार्टीनिएसी फुलझाडांपैकी विंचवी (वृश्चन वृश्चिक विंचू) व तत्सम इतर द्विदलिकित जातीचे कुल. एकूण वंश फक्त तीन व जाती नऊ, यांचा अंतर्भाव काही शास्त्रज्ञ तिल कुलात (पेडॅलिएसीत) करतात, प्रसार- उष्ण व उपोष्ण कटिबंध, हचिन्सन यांनी टेटू गणात (विग्न

massula
फेनपुंजक १ काही जलनेचांमध्ये (सालव्हीनिया, ऍझोला) आढळणारा शुष्क, फेसाळ, श्लेष्मल, लघुबीजुकयुक्त सूक्ष्म पुंजका २ आमरे अथवा रुई कुलातील वनस्पतींत आढळणारा परागांच्या कणांचा पुंजका pollinium

master factor
प्रधान घटक, प्रघटक विशिष्ट क्षेत्रात महत्त्वाच्या (प्रमुख) दर्जाच्या पादप समुदायाच्या अस्तित्वाबद्दल जबाबदार असलेला परिस्थितीतील घटक, उदा.डोंगराची ऊंची, पर्जन्यमान, जमिनीतील लवण किंवा पाणी इ.

mat
दृढजाल मुळ्या व जमिनीतील तंतूसारखे खोड (मूलक्षोड) यांचे घट्ट विणल्यासारखे जाळे असलेला (वनस्पति समुदाय)

mating
संगम, मीलन दोन प्रजोत्पादक कोशिकांचा पूर्ण मिलाफ (एकरुप होणे).

matrix
आधात्री कवक अथवा शैवाक (दगडफूल) ज्यावर वाढते ती आधारभूत वस्तू (उदा. लाकूड, विष्ठा, कार्बनी पदार्थ, झाडांची साल इ.) ज्यामध्ये कोशिका किंवा कणरुप वस्तूंना आधार मिळेल असे अंतराकोशिकी श्लेष्मल किंवा अधिक घनस्वरुप माध्यम (उदा. प्राण्यांतील उपास्थि - कार्टिलेज)

matroclinous
मातृलक्षणी, मातृमुखी मातेचे गुणदोष दर्शविणारा (संकरज)

maturation
परिपक्कन पूर्ण विकास होण्याची प्रक्रिया, उदा. पराग, गंतुके, बीजके, बीजुके, फळे इ.

maximus
महत्तम फार मोठे या अर्थाची लॅटिन संज्ञा. उदा. भोपळ्यासारख्या (Cucurbita maxima Duchesne) फार मोठ्या फळाची वनस्पती.

meadow
शाद्वल अनुकूल परिस्थितीत सलगपणे नरम व उंच गवतांचा प्रदेश, तृणसंघाताचा (स्टेप्स) एक प्रकार steppes

mealy
पिष्ठमय, पुठुळ भरपूर पीठ असलेले, उदा. काही बियांतील पुष्क farinaceous

mechanical tissue system
आधार ऊतक तंत्र, यांत्रिक ऊतक समूह (व्यूह) शरीरास मजबुती देणारा, तसेच नाजूक भागास संरक्षण देणारा सजीव किंवा बहुधा निर्जीव कोशिकांच्या समूहाचा संच किंवा अशा संचांचा व्यूह. उदा. काष्ठ, दृढोतक, स्थूलकोनोतक इ.

mechanism
यंत्रणा यंत्राप्रमाणे चालणारी किंवा यांत्रिक पद्धतीचा उपयोग केलेली योजना अथवा संरचना

medial
मध्यवर्ती, मध्य- मध्ये असलेली

median plane
मध्य प्रतल, मध्यस्त पातळी फुलाचा छद व अक्ष यांमधून जाणारी उभी पातळी (अग्रपश्च).

medium
माध्यम, मध्यस्थ परागण किंवा फलन ह्या प्रक्रिया घडवून आणणारा साहाय्यक (उदा. पाणी, वारा, प्राणी)

medulla
१ निकाष्ठ २ तंतुजालक १ पहा pith, medulla २ कवकातील जालाश्म किंवा तत्सम मोठ्या रचनेतील अनेक सुट्या तंतूंचा गुंता, धोंडफुलाच्या शरीरातील कवकतंतूचा विरळ थर sclerotium, Lichens.

medulla
१ निकाष्ठ २ तंतुजालक १ पहा pith, medulla २ कवकातील जालाश्म किंवा तत्सम मोठ्या रचनेतील अनेक सुट्या तंतूंचा गुंता, धोंडफुलाच्या शरीरातील कवकतंतूचा विरळ थर sclerotium, Lichens.

medullary
निकाष्ठीय, भेंडयुक्त, मज्जायुक्त भेंडात असलेले, भेंडासंबंधी m.bundle मज्जावृंद भेंडात विखुरलेले वाहक वृंद पहा vascular bundle m.ray मज्जाकिरण, निकाष्ठ किरण भेंडापासून काष्ठातून बाहेर मध्यत्वचेत जाणाऱ्या मृदुतकाचे पदर (स्तर). द्विदलिकित वनस्पतींच्या

medullate
मज्जायुक्त भेंड असणारे (खोड)

mega-
गुरु-, महा-, बृहत्- मोठा या अर्थी उपसर्ग m.gamete गुरुगंतुक, महायुग्मक दोन प्रजोत्पादक कोशिकांपैकी मोठी व बहुधा स्त्रीलिंगी m. nucleus गुरुप्रकल दोन प्रकलांपैकी अधिक मोठे m. phanerophyte गुरुवृक्ष, महावृक्ष मोठा (सुमारे तीस मीटर उंच) बीजधारी वृक्ष m.

meiosis
न्यूनीकरण विभाजन, अर्धसूत्रण, अर्धसूत्री विभाजन कोशिकेतील मूळच्या एका द्विगुणित प्रकलातील दुप्पट रंगसूत्रांची संख्या निम्मी (एकपट) करणारी व दोन एकगुणित प्रकले निर्माण करणारी प्रक्रिया, त्यानंतर लागलीच त्या प्रकलातील रंगसूत्रांची संख्या कायम (एकपट) ठेवून व

meiospore
एकगुणित बीजुक अर्धसूत्रणाने बनलेले बीजुक.

melanin
कालिकण, कृष्णरंजक काही सूक्ष्मजंतूतील काळा रंग

melanophyllous
गर्दवर्ण पर्णी गडद रंगाची पाने असलेले (झाड) उदा. बकूळ

melanospermous
गर्दवर्ण बीजुकी बीजी गडद रंगाची बीजुके अगर बीजे असलेले

Melastomaceae
अंजनी कुल, मेलॅस्टोमेसी लाखेरी, लोखंडी, अंजनी इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे-समोरासमोर किंवा झुबक्यांनी (वर्तुळात), साधी पाने असलेल्या औषधी किंवा झुडपे अथवा लहान वृक्ष, फुले आकर्षक, नियमित, तीन किंवा अनेकभागी, केसरदले, संदले किंवा प्रदले यांच्या दुप्पट, किंजदले जुळलेली व तितकीच, मृदुफळ किंवा बोंड, बिया अपुष्क व अनेक

Meliaceae
निंब कुल, मेलिएसी कडुनिंब, बकाणा निंब, निंबारा, तूण, मॅहोगनी, लाल चंदन इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश भांड गटात (जिरॅनिएलीझमध्ये) बेंथॅम व हूकर (आणि एग्लर व प्रँटल) यांनी केला आहे. परंतु हचिन्सन यांनी निंब कुलाला निंब गणाचा दर्जा दिला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे किंवा वृक्ष, पाने बहुधा पिसासारखई संयुक्त, फुले द्विलिंगी, संदले व प्रदले क्वचित जुळलेली, बहुधा केसरदलांची नळी अथवा पाच, सुटी, पाच किंवा कमी, जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात १-२ बीजके, किंजल एकच, फळे विविध, बिया एक किंवा अनेक.

member
अवयव आकारविज्ञानाच्या दृष्टीने एखाद्या वनस्पतीचा कोणताही भाग.

member
अवयव आकारविज्ञानाच्या दृष्टीने एखाद्या वनस्पतीचा कोणताही भाग.

membranaceous
पटलाभ, पटली अतिपातळ पडद्यासारखे, उदा. शेवाळीचे पान membranous

membrane
पटल, पापुद्रा सर्व सारख्या कोशिकांचा नाजूक अतिपातळ पडदा

Mendel's Laws
मेंडेलांचे नियम (मेंडेलवाद) ग्रेगर योहान मेंडेल या वनस्पतिशास्त्रज्ञांचे आनुवंशिकी शाखेतील मौलिक संशोधन, ह्या वरील शीर्षकाखाली प्रसिद्ध असून लॉक या शास्त्रज्ञांची तत्संबंधीची व्याख्या पुढे दिल्याप्रमाणे आहे- विषमरंदुकाने (संकरजाने) निर्मिलेल्या गंतुकांमध्

Mendelian character
मेंडेली लक्षण allelomorph

Mendelian inheritance
मेंडेली अनुहरण, मेंडेली वंशागति मेंडेल यांनी शोधलेल्या नियमानुसार, पिढ्यानुपिढ्या चालू राहणारी, लक्षणांची परंपरा   Mendel's laws

Mendelism
मेंडेलवाद अनेक संकर प्रयोगांनी मेंडेल यांनी प्रकाशात आणलेली वनस्पतींतील अनुहरणविषयक माहिती व त्यावरुन काढलेले निष्कर्ष Mendel's laws

Menispermaceae
गुडूची कुल, मेनिस्पर्मेसी गुळवेल (गुडूची), वसनवेल, काकमारी,पहाडवेल इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश मोरवेल गणात (रॅनॅलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- लहानमोठ्या वेली, झुडपे व वृक्ष, एकाआड एक साधी पाने, एकलिंगी, विभक्त वनस्पतीवर, बहुधा

merenchyma
कवकोतक, कवकोति plectenchyms

mericarp
फलांश, अंशफल शुष्क फळ भंगून त्यापासून सुटे होणारे एकबीजी व बहुधा न फुटणारे भाग उदा. लाजाळू, कोथिंबीर, एरंड, चक्रभेंडी, जिरेनियम इत्यादींची फळे schizocarpic, coccus, lomentum

meristele
रंभक एकच मध्यवर्ती रंभ असलेल्या खोडावरील प्रत्येक पानाशी संबंधित असा रंभाचा भाग, उदा. ऑफिओग्लॉसम नेचा.

meristem
विभज्या, विभाजी ऊतक ज्यापासून पुढे विशेष प्रकारची ऊतके, अवयव व उपांगे बनतात असे विकसनशील (सतत नवीन कोशिका निर्माण करणारे) ऊतक किंवा एकच कोशिका अथवा अनेक ऊतकांचे थर, खोड, मूळ, शाखा यांच्या टोकास, तसेच विशेषतः द्विदलिकित वनस्पतींच्या व प्रकटबीज वनस्पतींच्या

meristematic
विभाजी सतत वाढत राहणाऱ्या ऊतकांची किंवा कोशिकेची लक्षणे दर्शविणारा घटक m.cell विभाजी कोशिका सतत विभागणीने संख्यावाढ करणारी कोशिका (पेशी)

mesarch
उभयवर्धी दोन्ही बाजूस आदिप्रकाष्ठ असलेले (प्रकाष्ठ किंवा वाहक वृंद), अनुप्रकाष्ठाने सभोवार वेढलेला आदिरंभ protoxylem, xylem, metaxylem

mesocarp
मध्यकवच फळाच्या सालीच्या तीन भागांपैकी मधला थर, मृदुफळात किंवा आठळी असलेल्या (अश्मगर्भी) फळात हे थर स्पष्ट दिसतात, उदा. संत्रा, आंबा इ.

mesolphloem
मध्यपरिकाष्ठ बाह्य सालीच्या आतील हिरवट भाग, यामध्ये द्वितीयक परिकाष्ठाचा काही (बाहेरील) भाग अंतर्भूत असतो. middle or green bark

mesophanerophyte
मध्यम बीजी वृक्ष, मध्यमवृक्ष ८ ते ३० मी. उंचीचे बहुवर्षायु व कळ्यांना अपुरे संरक्षण असलेला बीजधारी वृक्ष

mesophyll
मध्योतक, मध्योति, पर्णमध्योति पानातील वाहक वृंद (किंवा रंभ) आणि अपित्वचा या खेरीज इतर सर्व ऊतकसमूह

mesophyte
मध्यवनस्पति जमिनीतील व हवेतील ओलाव्याबाबत कधीही दुर्भिक्ष किंवा अतिरेक नसलेल्या ठिकाणी वाढणारी वनस्पती. उदा. आंबा, काजू, वड, पिंपळ इ.

mesopodium
वृंत, देठ पानाचा देठ leaf stalk

mesothermophilous
शीतकटिबंधीय शीतकटिबंधातील (वनस्पती) mesothermic

Mesozoic era
मध्यजीव महाकल्प, मेसोझोइक ईरा सुमारे २३ ते ९ कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड, पुराजीव महाकल्प आणि नवजीव महाकल्प यांमधील कालखंड

mestome bundle
सूत्रहीन वृंद दृढकोशिका व सूत्रे यांचा अभाव असलेला वाहक वृंद hadrome, leptome

metabolic
चयापचयी चयापचयातील किंवा त्यासंबंधी

metabolism
चयापचय कोशिका किंवा शरीर यास सतत चालू असलेली, जैव, विधायक व विध्वंसक रासायनिक प्रक्रिया. आत घेतलेल्या पदार्थांचे रुपांतर, संचय व ऊर्जा निर्माण करून सजीवास कार्यक्षम बनविण्याची क्रिया anabolism, katabolism

metabolite
चयापचयोत्पाद वर वर्णन केलेल्या चयापचयातून निर्माण झालेले पदार्थ (उपयुक्त व टाकाऊ)

Metachlamydeae
युक्तप्रदली उपवर्ग संवर्त आणि जुळलेल्या पाकळ्यांचा पुष्पमुकुट असलेल्या द्विदलिकित वनस्पतींचा एंग्लर आणि प्रँटल यांच्या पद्धतीतील उपवर्ग. यात पाच गणांचा अंतर्भाव केला आहे. यांमध्ये फुलात एकूण चार किंवा पाच मंडले असतात. उदा. तिंदुक कुल, मधूक कुल, पारिजातक क

metagenesis
पिढ्यांचे एकांतरण सुस्पष्ट असे गंतुकधारी व बीजुकधारी यांचे एकानंतर दुसरे व त्यानंतर पुन्हा पहिले असे जीवनचक्र. उदा. शेवाळी, नेचे इ. alternation of generations

metamorphosis
रुपांतरण एखाद्या अवयवाचे दुसऱ्यात रुपांतर होण्याची प्रक्रिया (प्रकार), उदा. केसरदलांचा पाकळ्यात बदल (रुपांतरण), हे व्यक्तीच्या किंवा जातीच्या विकासात होते. उपपर्णांचे किंवा पानांचे काट्यात रुपांतरण, उदा. काही निवडुंग,   ontogeny, phylogeny, Euporbiaceae,

metaphase
मध्यावस्था कोशिकेच्या विभाजनात रंगसूत्रांची तर्कूच्या मध्यावर पसरलेली अवस्था, यात स्वतंत्र रंगसूत्रे किंवा रंगसूत्रार्धे स्पष्ट असतात. mitosis, meiosis  metakinesis

metaphloem
अनुपरिकाष्ठ आदिपरिकाष्ठानंतर बनलेला प्राथमिक परिकाष्ठाचा भाग protophloem

metaphysis
सहसूत्र paraphysis

metastasis
१ प्रक्षेपण २ चयापचय १ नित्य स्थानावरुन अवयवाचा अन्य स्थानावर उगम २ पहा metabolism

metasyndesis
अग्रसंलग्न कोशिकेच्या विभागणीत रंगसूत्रांच्या जोड्या बनतेवेळी (मध्यावस्था) परस्परांच्या टोकास चिकटून राहण्याचा प्रकार telosynapsis, syndeosis

metatype
मूलस्थानरुप मूळच्या स्थानातून संकलनाने आणलेली (अधिकृत) वनस्पती

metaxylem
अनुप्रकाष्ठ आदिप्रकाष्ठानंतर बनलेला प्राथमिक प्रकाष्ठाचा भाग

metazenia
परागप्रभाव स्त्रीलिंगी अवयवांतील कोशिकांच्या समूहावर दिसून येणारा परागाचा प्रभाव (परिणाम).

metoecious
भिन्नाश्रयी heterocious

micella
श्लेषिका कोशिकेचे आवरण किंवा पिष्ठकण यांच्या निर्मितीत संरचनेच्या स्थापनेस जबाबदार असा स्फटिकी पदार्थ.

micrandre
ऱ्हस्व नरतंतु (पुं-तंतु) dwarf male nanandrous

micranthous
लघुपुष्पी लहान फुले असलेले

micro-
सूक्ष्म-, लघु-, अल्प- अतिलहान या अर्थी उपसर्ग. m. aplanospore सूक्ष्म अचरबीजुक अति लहान व हालचाल न करणारे बीजुक (प्रजोत्पादक अलिंगी कोशिका). उदा. शैवले, काही कवक m. biology सूक्ष्मजीवविज्ञान विषाणू, सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव यासंबंधीची ज्ञानशाखा m. biotic

microbe
सूक्ष्मजीव उदा. आदिजीव, सूक्ष्मजंतू

micron
मायक्रॉन मिलिमीटरचा एक हजारांश, सूत्र्म दर्शकाखाली वस्तू मोजण्याचे एकक

mid rib
मध्यसिरा, मध्यशीर पानातील पात्यामध्ये तळापासून टोकापर्यंत गेलेली प्रमुख शीर, ही देठातून अखंडितपणे आलेली दिसते. mid vein

middle lamella
मध्यपटल दोन कोशिकांमधील सामान्य प्राथमिक पातळ पडदा, याच्या दोन्ही बाजूस त्या कोशिकांचे स्वतंत्र आवरण बनते.

migration
स्थलांतर, स्थानांतर पूर्वी नसलेल्या ठिकाणी प्रवेश किंवा आक्रमण करून सुस्थित होणे

mildew
भुरी, बुरा एरिसायफी या कवकांच्या गटातील व विबीजुके निर्माण करून रोगाचा फैलाव करणारी वनस्पती. हिचे भुरकट रंगाचे ठिपके (किंवा आवरण) पानावर भुकटी टाकल्याप्रमाणे दिसते. ती तंतुमुक्त असल्यास तंतुभरी (sooty mildew) व भुकटीसारखी असल्यास चूर्णभरी (powdery mildew) म्हणतात.

milk
चीक वनस्पतीतील चिकाला सामान्यपणे दिलेले इंग्रजी नाव, त्यावरुन Milk tree (Brosimum galactodendron D.Don.) व्हेनेझुएलातील एक दूध देणारे झाड, Milk weed (Asclepias sp.), दुधवेल (Hoya wightii Hook). Milk bush (Euphorbia tirucalli L.) नांग्याशेर latex

mimicry
अनुकृति, मायावरण बहुधा संरक्षणाकरिता किंवा प्रसाराकरिता दुसऱ्या जातीच्या वनस्पतीची, प्राण्याची अथवा अवयवाची (फसवी) नक्कल उदा. एरंडाचे बी किंवा घेवडा, सिताफळ, रामफळ इत्यादीचे बी कीटकाचे अनुकरण (शरीरसादृश्य) करतात, काही कीटक पानांची नक्कल किंवा काटकीचा आभास करतात.

mimosaceae
शिरीष कुल, लज्जालु कुल, मिमोझेसी, शिकेकाई, शिरीष, लाजाळू (लज्जालु), बाभूळ, शमी, गारदळ, इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव शिंबी (शिंबावंत) गणात केला जातो. प्रमुख लक्षणे- पिसासारखी सयुक्त पाने असलेली झुडपे किंवा वृक्ष, लहान नियमित, तीन, पाच क

miscibility
मिश्रणीयता दोन द्रव पदार्थ परस्परांशी एकरुप होण्याची उभयतांतील क्षमता

mitochondria
कलकणु कोशिकेतील प्रकलापासून निघालेले रंज्यद्रव्याचे विशिष्ट कण, त्यांची संरचना जटिल व आकार भिन्न असून त्यांत वितंचके असतात. हरित्कणूंचा उगम यांचेपासून होत असावा असे मानतात. chondriosomes

mitosis
समविभाजन कोशिकेच्या प्रकलातील द्विगुणित रंगसूत्राच्या संख्येत बदल न करता, फक्त प्रत्येक रंगसूत्र उभे विभागून पुन्हा सारख्या रंगसूत्रांची दोन प्रकले बनविली जाणारी, कोशिका विभागणीची प्रक्रिया. प्राणी व वनस्पती यांच्या शरीराची वाढ करणारी कोशिका विभागण्याची प

mitra
१ फणा (फडी) २ भूछत्रशिर १ फडीच्या आकाराची पाकळी २ काही कवकाच्या जाड गोलसर छत्रासारखा शिरोभाग

mitriform
फणाकृति, छत्राकृति, कुंचारुप वर वर्णिल्याप्रमाणे असलेला mitrate

mixed
भिन्न अनेक प्रकारच्या वनस्पतींचे (घटकांचे) मिश्रण असलेले m.bud मिश्र कलिका कोवळी पाने व फुलांचे अविकसित भाग एकत्र असलेली कळी m.forest मिश्रवन भिन्न (पानझडी, सदापर्णी, खुरटी व वेली इ.) प्रकारच्या वनस्पतींचे मिश्रण असलेले जंगल m.formation मिश्र समावास

mixo chimaera
मिश्र विचित्रोतकी कृत्रिमरीत्या दोन भिन्न वाणांच्या कवकांच्या तंतूतील अंतर्द्रव्य मिसळून बनविलेला विचित्र प्रकार. m. chromosome मिश्र रंगसूत्र, मिश्र गुणसूत्र नित्य रंगसूत्रापैकी दोन्हींच्या मिश्रणाने बनलेले नवीन रंगसूत्र

mixtae
मिश्रपुंजी स्थान व कालसापेक्ष क्रमाने पक्व न होणारे असे बीजुककोशाचे पुंज धारण करणारे समबीजुक नेचे, बीजुककोश पुंजातील काही कोश प्रथम व काही नंतर पक्व होतात, परंतु त्यांच्या स्थानांशी पक्वतेचा संबंध नसतो.

mobile
जल, चंचल, चलनक्षम सहज हालणारे, वनस्पतींचे काही अवयव किंवा सुट्या वनस्पती उदा. परागकोश, काही एककोशिक शैवले. वारा किंवा समुद्राच्या लाटा यामुळे स्थानांतर करणारी वालुकाराशी

mobility
चलनक्षमता, गतिशीलता हालचाल करण्याची किंवा स्थलांतर करण्याची पात्रता

mode of life
जीवनपद्धति, जीवनरीती विशेषेकरून अन्नग्रहणाच्या किंवा क्रियाशीलतेच्या प्रकारात अनुकूल ठरलेला जीवनक्रम, उदा. शवोपजीवी, जीवोपजीवी, निष्क्रीय, क्रियाशील इ.

model
प्रतिकृति, आदर्श वनस्पती अथवा प्राणी यांच्या शरीराच्या अवयवांची किंवा संरचनेची हुबेहुब नमुना दर्शविणारी कृति (चित्र), नियमाप्रमाणे बनविलेले व संवर्धन केलेले नमुनेदार आणि अपेक्षेप्रमाणे इच्छित फल देणारे (उदा. शेतपीक, उद्यान, लागवड इ.)

modification
रुपांतर, परिवर्तन बाह्य परिस्थितीनुसार घडून येणारे (अस्थिर) तात्पुरते किंवा स्थिर बदल, पिढ्यानपिढ्या चालू असलेले तात्पुरते बदल कायम स्वरुपात गेल्याची उदाहरणे आहेत. खोड, पाने व मुळे यांची काही कायम रुपांतरे काटे, तणावे या स्वरुपात आढळतात.

molecular biology
रेणवीय जीवविज्ञान प्राणी व वनस्पती यांतील जीवद्रव्याच्या संरचनेतील रेणू व अणू यांची माहिती व त्यानुसार जीवद्रव्याची संघटना, त्याचा उगम, त्याचे गुणधर्म, विशेषतः सजीवांचे वर्तन यावर प्रकाश टाकणारी विज्ञानाची शाखा, सजीव व निर्जीव यातील मूलभूत फरक समजून येण्यास, पृथ्वीवर जीवांची निर्मिती कशी झाली व इतर ग्रहावर जीवन असणे शक्य आहे किंवा कसे हे समजण्यास या माहितीचा उपयोग होतो. आनुवंशिकता ही घटना समजण्यासही या शाखेतील माहिती अधिकाधिक मिळण्याचे संशोधन सुरु आहे.

molecule
रेणु एखाद्या पदार्थाचा सर्वात लहान घटक कण, मूळच्या पदार्थांचे सर्व गुण यात असून तो स्वतंत्र राहू शकतो. रेणू फुटून त्याचे भाग (अणू) अलग होतात.

mon-
ग्रीक उपसर्ग एक या संख्येचा संबंध दर्शविणारा ग्रीक उपसर्ग m.adellphous androecium एकसंघ फुलातील सर्व केसरदलांचा एकच स्तंभ (जुडगा) असलेल (फूल किंवा केसरमंडल) उदा. जास्वंद, गुलखेरा m. androus १ एककेसरदली २ एकरेतुकाशयी १ एकच केसरदल असलेले, उदा. कर्दळ, काजू,

mongrel
संकरज hybrid जुनी संज्ञा

moniliform
मालाकृति monoliform

mono
एक- एक या अर्थी उपसर्ग monoecious एकत्रलिंगी दोन प्रकारची (नर व स्त्री) फुले एकाच झाडावर असण्याचा प्रकार, उदा. भोपळा, एरंड इ. अबीजी वनस्पतींत कधी दोन्ही प्रकारची जननेंद्रिये एकत्र असलेल्या गंतुकधारीला हेच विशेषण लावतात, पहा dioeceous mono embryony

monograph
विनिबंध एखाद्या वंसाची, कुलाची किंवा गणाची संपूर्ण संशोधित शास्त्रीय माहितीची पुस्तिका

monsoon forest
मोसमी वन (जंगल) उष्णकटिबंधातील मोजका पाऊस पण दीर्घ शुष्क काल अशा ठिकाणी वाढणारे दाट (पानझडी) जंगल (अशी शिंपर यांची व्याख्या). विपुल पाऊस व थंड हवा असल्यास सदापर्णी बन.

monstrocity
विकृति अनियमित वाढीमुळे अनित्य, आकस्मित व चमत्कारिक (बहुधा फार मोठे) स्वरुप प्राप्त झालेली संरचना उदा. मक्यावर दोन्ही प्रकारची फुले एकाच सामान्य दांड्यावर येण्याचा प्रकार

moorland
जीर्णक भूप्रदेश समुद्रसपाटीपासून ते (बिटनमदील) उंच टेकड्यांच्या माथ्यापर्यंत पसरलेल्या ह्या प्रदेशात (जीर्णक) व संतानक कुलातील (एरिकेसी) वनस्पती विशेषेकरून आढळतात, पहा एरिकेसी

Moraceae
वट कुल, मोरेसी तुतू, वड (वट), फणस, अंजिर, उंबर, पिंपळ इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लर व प्रँटल यांना याचा अंतर्भाव वावल गणात (आर्टिकेलीझ) केला होता. तसेच हचिन्सन यांनीही त्याच गणात इतर पाच कुलांसह केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडुपे व वृक्ष, चिकाळ, पानास उपपर्णे व ती साधी, एकलिंगी लहान फुले, फुलोरे विविध, परिदले असल्यास चार सुटी किंवा जुळलेली, केसरदले तितकीच व त्यासमोर, दोन जुळलेल्या किंजदलाच्या उर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, फळ (कपाली, आठळी युक्त)

Moringaceae
शिग्रु (शेवगा) कुल, मोरिंगेसी शोभांजन अथवा शेवग्याच्या एका द्विदलिकित वनस्पतींच्या वंशातील फक्त तीन जातींचा समावेश असलेले लहान प्रतिरुपी कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी वरुण गणात (कॅपॅरिडेलीझमध्ये) केला आहे. एंग्लर व प्रँटल यांनी ऱ्हीडेलीझ गणात केला आहे.

Morphogenesis
आकारजनन वनस्पतींच्या आकारप्रधान लक्षणांचा उगम व विकास इत्यादींची माहिती देणारी ज्ञानशाखा

Morphology
आकारविज्ञान सजीवांचे स्वरुप व त्यांची जडणघडण यांच्या अभ्यासाची शाखा, यामध्ये बाह्यांग व अंतरंग यांच्या अभ्यासाचा समावेश करतात. फक्त अंतर्रचनेचा अभ्यास शारीर या शाखेत करतात. फक्त अवयवांच्या आरंभापासून त्यांचा विकास पूर्ण होईपर्यंतच्या क्रमवार माहितीस विकासतंत्र (morphosis) म्हणतात.

mosaic
चित्रन्यास चित्राप्रमाणे दृश्य अथवा मांडणी m.disease चित्रन्यास विकृति, केवडा रोग तंबाखू व इतर काही वनस्पतींच्या पानांवर चित्रविचित्र ठिपके किंवा ठिगळे येणारा क्रियावैज्ञानिक रोग

moschate
कस्तूरीगंधी कस्तुरीचा वास येणारे उदा. कस्तुरीभेंडी (Abelmoschus moschatus Medik, Musk mallow) musky

moss
शेवाळे शेवाळी विभागातील वनस्पतींचे सामान्य नाव पहा Bryophyta, Musci

moth flower
पतंगपुष्प, शलभपुष्प पतंगाकडून परागित होणारे फूल उदा. टाकळा, पिवळा, धोतरा इ.

mother cell
जनक (मातृ) कोशिका नवीन कोशिकांची निर्मिती करणारी कोशिका m.plant जनक वनस्पति मूळची उत्पादक वनस्पती, संकरजाची बीजधारक वनस्पती

motile
चल-, चर-, चलनशील हालचाल करणारे, तरंगत (पोहत) जाणारे, उदा. काही गंतुके, बीजुके, शैवले इ.

motility
चलनक्षमता, चलिष्णुता हालचाल करण्याचे सामर्थ्य

motor cell
प्रेरक पेशी bulliform cell

motor organ
प्रेरक अवयव हालचाल घडवून आणण्यास उपयुक्त असा अवयव किंवा उपांग, उदा. काही पानांच्या तळाशी असलेला फुगीर भाग (पुलवृंत), केसल, प्रकेसल इत्यादी प्राकलाचे धागे, काही गवतांच्या पानांच्या अपित्वचेतील विशेषत्व पावलेल्या कोशिका (उदा. मका), त्यामुळे पानांची रुक्ष हवेत सुरळी होते, नंतर पुन्हा पान सपाट होते.

mould
१ बुरशी २ साचा १ कवकांपैकी विशिष्ट तंतूमय वनस्पती, मृत पदार्थावर व क्वचित सजीव वनस्पतींच्या अवयवांवर ही आढळते कारण ती परोपजीवी असते. २ प्राचीनकाळी वनस्पतींच्या अथवा प्राण्यांच्या शरीराचे किंवा अवयवांचे ठसे नरम मातीत उठून त्यांचे पुन्हा दगडासारखे रुपांतर झ

mountane
पर्वतीय, शैलेय पर्वतासंबंधी, पर्वतावरची किंवा डोंगरी (वनस्पती) उदा. तिमरु (Diospyros montana Roxb.)

moveable
चलनशील आतील किंवा बाहेरील चेतकामुळे हालणारे अथवा स्थानांतर करणारे उदा. गवतांचे परागकोश, काही शैवले, प्रजोत्पादक कोशिका

movement
हालचाल, चलन, वलन अवयवांचे आंदोलन किंवा वळणे, उदा. फळांचे स्फोट, सूक्ष्मजंतू, शैवले, प्रजोत्पादक कोशिका यांची हालचाल, तणावे, वेढणारे खोड, फूल मिटणे व उमलणे

mucilage
श्लेष्मा, श्लेष्मल द्रव्य बुळबुळीत पदार्थ, उदा. पाण्यातील वनस्पतींचे आवरण, काही फळातील (भेंडी, भोकर, बांडगूळ) अथवा काही बियांतून पाण्याच्या संपर्काने येणारा तसाच पदार्थ उदा. तालीमखाना, इसबगोल, घोळ व कोरफड यांच्या पानातील चिकट रस

mucilaginous
चिकट, श्लेष्मल, बुळबुळीत

mucro
लघुसूचि आखूड, तीक्ष्ण टोक

mucronate
सूच्याग्र सुईसारखे बारीक टोक असलेले (पान, तुस, छद इ.), उदा. त्रिधारी निवडुंगाचे पान, गव्हाचे तुस, कांदळाचे पान (Rhizophora mucronata Lam.)

multi-
बहु- अनेक या अर्थाचा उपसर्ग multi cellular बहु-अनेक कोशिक अनेक कोशिकांचे बनलेले, शरीर किंवा अवयव multi ciliate बहुकेसली अनेक सूक्ष्म धागे (प्राकलाचे) असलेले, उदा. सायकस किंवा नेफोलेपिस नेचा यांची रेतुके, इडोगोनियम शैवलाची बीजुके, गंतुके multi costate

multiple corolla
बहुचक्रीय पुष्पमुकुट एकापेक्षा अधिक पाकळ्यांची वर्तुळे असलेला पुष्पमुकुट उदा. गुलाब, सोनचाफा इ. m.(composite) fruit संयुक्त फळ फुलोऱ्यापासून बनलेल्या अनेक लहान फळांचा एकत्रित समूह उदा. फणस, बारतोंडी, अननस m.gene hypothesis बहुजनुक गृहीतक व्यक्तीतील एखादे

multipolar
बहुधुवी काही कोसिका विभाजनात द्विधुवी तर्कूऐवजी अनेक टोके असलेला तर्कू आढळतो. bipolar spindle

multiseriate
बहुश्रेणिक अनेक श्रेणी (रांगा) असलेले

muricate
पिटकित, खर्बर अनेक आखूड, कठीण व लहान टेंगळे (गाठी) यामुळे खरबरीत असलेले उदा. मामफळ (Anona muricata L.)

Musa form
कदलीरुप केळीच्या झाडाप्रमाणे असलेले स्वरुप, औषधीय (नरम) हिरवे, मोठे खोड व त्याला लपेटून असलेल्या अनेक पानांचे आवरक तळ

Musaceae
कदली (रंभा) कुल, म्यूझेसी केळ (कदली), रॅव्हॅनेला, हेलिकोनिया (ंजंगली केळ) चवेणी इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव हल्ली कदली गणात (सिटॅमिनी) करतात. परंतु हचिन्सन शुंठी (झिंजिरेलीझ) गणात करतात. प्रमुख लक्षणे- मोठ्या नरम (काष्ठ नसलेल्या) म

Musci
हरिता वर्ग, म्युस्सी शेवाळी विभागातील कायकाभ वनस्पतींच्या तीन वर्गांपैकी ए, यकृतका व शृंगका हे इतर दोन वर्ग होत. Mosses

Muscinae
शेवाळी विभाग, म्युस्सिनी अबीजी वनस्पतीपैकी अत्यंत साध्या कायकाभ शरीराच्या पण प्रत्यक्ष कायक वनस्पतींच्यापेक्षा अधिक प्रगत, जलस्थलवासी, ओल्या ठिकाणी मखमलीसारखा थर बनविणाऱ्या वनस्पती Thallophyta, Bryophyta  Bryophyta

mushroom
भूछत्र, अळंबे कवक वनस्पतींपैकी छत्रासारख्या आकाराच्या वनस्पतींचा प्रकार Agaricales

mutable
उत्परिवर्तनीय एकदम विशेष प्रकारचा फेरबदल होणारे (उत्परिवर्तनशील)सजीव

mutant
उत्परिवर्ती, उत्परिवर्तक उत्परिवर्तन झालेले दर्शविणारा (सजीव किंवा जनुक)

mutation
उत्परिवर्तन प्राणी व वनस्पती यांच्या जातींतील संततीत एकदम दिसून येणारा व पुढील पिढ्यांत बहुधा चालू राहणारा विशेष प्रकारचा फरक (प्रभेदन), उदा. सरासरीपेक्षा बरीच अधिक ऊंची, आकार, रंग, बुद्धी इत्यादींमध्ये दिसणारा फरक m. progressive प्रागतिक उत्परिवर्तन

mutation theory
उत्परिवर्तन सिद्धांन्त प्रजोत्पादक (पुनरुत्पादक) कोशिकेतील जनुकात किंवा रंगसूत्रात अकस्मात बदल झाल्यामुळे प्राणी किंवा वनस्पती यांच्या नवीन जातींचा उगम एका दमात (टप्प्यात) घडून येतो अशी संकल्पना (उपपत्ती), हा बदल रासायनिक प्रक्रियेमुळे किंवा रंगसूत्रावरील जनुकाच्या स्थानांतरामुळे निसर्गतः घडून येतो. तथापि तो बदल कृत्रिमरीत्या घडविणे अलीकडे शक्य झाले आहे.

muticous
शूकहीन बिनटोकाचे, बोथट किंवा लांब व टोकदार नसलेले (छद), उदा. कसिली (Abutilon muticum Sweet)

mutualism
पारस्पर्य, अन्योन्यत्व एकमेकांचे हितसंबंध (अवलंबन) असण्याचा प्रकार

mycelial
कवकजातीय कवकजालासंबंधी m.layer कवकजाल स्तर कवकजालाचा पापुद्र्यासारखा थर m. strand कवकजाल पट्ट सूत्रमय कवकजाल कवकतंतूचा विणलेला जुडगा Fungi

mycelium
कवकजाल कवकाचे बहुधा तंतुमय शरीर Fungi

myceloid
कवकजालाभ कवकतंतूंच्या जाळ्यासारखे

mycetism
भूछत्र विषबाधा काही भूछत्रामुळे (चुकीने त्यांचा शरीरात बहुधा अन्नातून प्रवेश झाल्यामुळे) घडून आलेला विषारी परिणाम. mushroom.

Mycetozoa
श्लेष्मकवक वर्ग, मायसेटोझोआ कायक वनस्पतींपैकी कवक (Fungi) वनस्पतींच्या विभागातील एक वर्ग, वर्गीकरणाच्या अन्य पद्धतीत यालाच श्लेष्मकवक उपवर्ग (Myxomycetes) अथवा श्लेष्मकवक विभाग (Myxopohyta, Myxothallophyta, Myxomycophyta) म्हणतात. प्रमुख लक्षणे- साधे, लहा

Mycologist
कवकविज्ञ, कवकतज्ञ कवक वनस्पतीसंबंधी भरपूर ज्ञान असलेला संशोधक शास्त्रज्ञ

Mycology
कवकविज्ञान कवकांची संपूर्ण माहिती संकलित करणारी विज्ञानशाखा

Mycoplasm
कवकद्रव्य रोगकारक कवकातील जीवद्रव्याचा अंश, हा काही आश्रय बीजात सुप्तावस्थेत राहून बीज रुजतेवेळी पुन्हा क्रियाशील बनतो व उगवणाऱ्या वनस्पतीत रोगकारक ठरतो असे काही शास्त्रज्ञ मानतात.

mycorrhiza
संकवक कवक व उच्च वनस्पतींची मुळे यांच्या एकत्र जीवनातील (सहजीवी)संबंध m. ectotrophic बहिःस्थित संकवक कवकतंतू मुळात न शिरता पृष्ठभागावर राहून अन्नशोषण करणारे सहजीवन (उदा. पाइन वृक्ष) m. endotrophic अंतःस्थित संकवक दुसऱ्या वनस्पतीच्या मुळात कवकतंतू शिरुन

mycosis
कवक बाधा प्राण्यांच्या शरीरात कवकाचा प्रवेश झाल्याने घडून आलेला विकार (विकृति) उदा. नायटा, काही कानाचे रोग, खेळाडूंचा पदरोग (athlete's foot ) इ.

mycosis
कवक बाधा प्राण्यांच्या शरीरात कवकाचा प्रवेश झाल्याने घडून आलेला विकार (विकृति) उदा. नायटा, काही कानाचे रोग, खेळाडूंचा पदरोग (athlete's foot ) इ.

mycotrophic
संकवकधारी संकवक धारण करणारी (वनस्पती), उदा. चीड

Myricaceae
कट्फल कुल, मिरिकेसी कायफळ (कट्फल) ह्या द्विदलिकित फुलझाडाचा व त्याच्या वंशातील इतरांचा आणि शिवाय इतर दोन वंशांच्या जातींचा (एकूण जाती पन्नास) अंतर्भाव करणारे लहान कुल, हचिन्सन (व एंग्लर) यांच्या पद्धतीत मिरिकेलीझ या स्वतंत्र गणात अंतर्भाव असून इतर शास्त्र

Myristicaceae
जातिफल (जायफळ) कुल, मिरिस्टिकेसी जायफळाच्या झाडाचा अंतर्भाव असलेले लहान द्विदलिकित कुल, याचा समावेश मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) एंग्लर व प्रँटल आणि बेसी यांनी केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे किंवा वृक्ष, पाने साधी एकाआड एक, सतत हिरवी व तैलप्रपिंडयुक्त. एकलि

myrmecophilous
१ पिपीलिका प्रिय २ पिपीलिका परागित १ मुंग्यांना अन्नपुरवठा करून आश्रय देणारी व त्यांचे कडून संरक्षण मिळणारी (वनस्पती). उदा. बाभळीची एक जाती २ मुंग्यांकडून परागण करविणारी (वनस्पती)

myrmecophobous
पिपीलिकाद्वेष्टी केस, प्रपिंडे यांच्या साहाय्याने मुंग्यांना दूर ठेवणारी (वनस्पती)

myrmecophyte
पिपीलिका वनस्पती मुंग्यांचे साहचर्य दर्शविणारी वनस्पती.

Myrsinaceae
विडंग कुल, मिर्सिनेसी काजळा, वावडिंग (विडंग), आर्डिसिया, मीसा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश एंग्लर व प्रँटल (व बेंथॅम आणि हूकर) यांनी प्रिम्यूलेलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे व वृक्ष, पाने सदा हिरवी व एकाआड एक, फुले सच्छदक, द्विलिंगी, एकलिंगी, नियमित व चार पाच भागी, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले पाकळ्यासमोर चिकटलेली, क्वचित वंध्यकेसर, ऊर्ध्वस्थ किंवा अर्ध अधःस्थ किंजपुटात एक कप्पा व अनेक बीजके, आठळीयुक्त फळात एक किंवा अनेक केसपुष्प बीजे, कधी मृदुफळ

Myrtaceae
जंबुल कुल, मिर्टेसी जांभूळ, पेरु, जांब, लवंग इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश (मिर्टेलीझ) जंबुल गणात केला आहे. प्रमुख लक्षणे - साधी, समोरासमोर, तैलप्रपिंडयुक्त पानांचे वृक्ष व झुडपे, द्विलिंगी चार पाच भागी, नियमित, सच्छदक, परिकिंज, अपिकिंज फुले, संदले सुटी व सतत राहणारा, पाकळ्या सुट्या, केसरदले अनेक, बिंबाच्या कडेने चिकटलेली, दोन किंवा अधिक अधःस्थ किंजदलांच्या संयुक्त किंजपुटात एक ते अनेक बीजके, फळ विविध, बहुधा मृदुफळ, अनेक अपुष्क बिया

Myrtales
जंबुल गण, मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) यामध्ये जंबुल कुल, दाडिम कुल, कांदल कुल, अर्जुन कुल, शृंगाटक कुल आणि धातकी कुल यांचा समावेश केला जातो. हचिन्सन यांनी मात्र धातकी कुल, शृंगाटक कुल, दाडिम कुल यांना वेगळ्या धातकी गणात (लिथेलीझ) घातले आहे व इतरांना जंबुल गण

Myxa
श्लेष्मा बुळबुळीत पदार्थ, उदा. भोकर फळातील (Cordia myxa L.) चिकट मगज mucous

myxamoeba
श्लेष्मादिजीव श्लेष्मकवकात आढळणाऱ्या बीजुकापासून निर्माण होणारी, आदिजीवाप्रमाणे वावरणारी, नग्न, जिवंत कोशिका

Myxomycetes
श्लेष्मकवक वर्ग, मिक्सोमायसेटीज Mycetozoa

Myxophyceae
नीलहरित शैवले, मिक्सोफायसी Cyanophyceae  Schizophyceae