वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

Home » वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
विशिष्ट अद्याक्षरापासून सुरु होणारे शब्द बघायचे असल्यास त्या अद्याक्षरावर टिचकी मारावी
All | A(353) | B(196) | C(440) | D(176) | E(159) | F(191) | G(199) | H(228) | I(145) | J(23) | K(34) | L(211) | M(211) | N(121) | O(109) | P(606) | Q(24) | R(198) | S(434) | T(259) | U(63) | V(109) | W(42) | X(31) | Y(4) | Z(27) |

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा


There are 24 names in this directory beginning with the letter Q.
quadrangular
चौधारी चार धारा असलेले, उदा. कांडवेलीचे खोड (Vitis quadrangularis Vahl.)

quadrant
चतुर्थ फलित अंदुकाच्या विभागणीतील एक चतुर्थांश भाग

quadrat
चौकोन, चतुष्कोणक बहुधा प्रत्येकी एक मीटर बाजू असलेला, चौरस आकाराचा, त्यातील वनश्रीच्या संघटनेचा अभ्यास करण्याकरिता राखून ठेवलेला भूभाग. q.permanent स्थायी चौकोन वर्षानुवर्षे अनुसंधानाकरिता राखून ठेवलेला कायम चौकोनी भूभाग.

quadri
चतुः- चारीच्या संबंधी उपसर्ग

quadrifid
चतुर्भागी चार भागाचे बनलेले.

quadrifoliate
चतुर्दली चार दले स्पष्ट असलेले. उदा. संयुक्त पान (Marsilea quadrifolia नावाचा एक जलनेचा)

quadrifurcate
चतुःशाखी चार शाखांत विभागलेला (अक्ष)

quadrilobate
चतुःखंडी चार तुकडे (खंड) पडलेले (पान, फळ)

quadrilocular
चतुष्पुटक चार कप्पे असलेले (फळ, किंजपुट, परागकोश), उदा. तिळाचा किंजपुट, सायकसचा परागकोश, तुळशीचे फळ. four celled

quadrinucleate
चतुष्प्रकली चार प्रकले असलेली (कोशिका), उदा. गदाकोशिका (बीजुक तयार होण्यापूर्वी) अथवा यीस्ट (किण्व) ची धानीकोशिका.

quadriplex
चतुर्घटक द्विगुणित प्रकल असलेल्या शरीराच्या कोशिकेत पितरांकडून (आईबापाकडून) प्राप्त झालेल्या एका प्रभावी गुणाचे चार घटक असण्याचा प्रकार, duplex, simplex, nulliplex.

quadripolar spindle
चतुर्धुवी तर्कु चार टोके (धुव) असण्याची कोशिकेतील तर्कुतंतूंच्या आकृतीची मांडणी, बीजुके निर्माण करणाऱ्या मातृकोशिकेत प्रकलाचे अर्धसूत्रण होते त्यावेळी कधी हा प्रकार आढळतो. bipolar spindle.

quadrivalent
चतुःसंयोजी १ चार कोशिका निर्मिणारी (कोशिका) २ चार रंगसूत्रे एकत्र असलेले.

qualitative
गुणात्मक प्राणी अथवा वनस्पती यांच्या एखाद्या जातीतील प्रकारात असलेला न मोजता येण्यासारखे (भेद), उदा. रंग, फुलांचा वास, फळांची चव, बियांचे रंग इ. प्राण्यांतील क्रौर्य व चापल्य.

quantitative
परिमाणात्मक वनस्पतींतील (अथवा प्राण्यांतील) जातींच्या प्रकारात असलेले (मोजमाप करता येण्यासारखे) भेद, उदा. उंची, वजन, पानाचे खंड, फुलाच्या पाकळ्या, प्राण्याच्या पायाची बोटे, आकारमान, पिलांची संख्या इ.

quaternary
चतुर्थक, चतुर्थ चवथे,उदा. एखाद्या अक्षाचा पुनः पुनः तीन वेळा विभागून बनलेला चवथा भाग. q. period चतुर्थ कल्प, क्काटर्नरी पीरीयड. भूशास्त्रीय कालखंडाचा सर्वात अलीकडचा भाग, नवजीव (नूतन जीव) महाकल्पातील सर्वात शेवटचा काल, म्हणजे सुमारे सहा लक्ष ते अकरा हजार

quiescent
निश्चल, सुप्त निष्क्रीय अवस्थेतील सजीव.

quill
शल कठीण, निमुळत्या टोकाचा लहान शूल, दंड (अक्ष) किंवा अवयव quillwort शलपर्ण Isoetales.

quincuncial
विपरिहित पुष्पदलांच्या (कळीतील) मांडणीतील एक प्रकार, यामध्ये दोन पाकळ्या पूर्णपणे बाहेर, दोन पूर्णपणे आत व एका पाकळीची एक किनार आतील पाकळीच्या किनारीवर व दुसरी किनार बाहेरच्या एका पाकळीच्या किनारीखाली असते. यामुळे या सर्व पाकळ्या २,१,५,३ व ४ ह्या अनुक्रमाने जोडल्यास फिरकीप्रमाणे संरचना बनते. (उदा. गुलाब)

quincunx
पंचराश्यंतर पत्याच्या डावातील पंचा प्रमाणे किंवा फाशा (समघन) वरील पाच टिंबाप्रमाणे (चार कोपऱ्यास चार टिंबे व मध्ये एक टिंब याप्रमाणे) मांडणी,झाडांची मांडणी कधी याप्रमाणे करतात.

quinine
क्विनीन, कोयनेल कोयनेलच्या (सिंकोना) झाडाच्या सालीतील क्षाराभ (अल्कलॉइड), सिंकोनाच्या व रेमिजियाच्या इतर जातीतूनही हे उपलब्ध होते. हा त्या वनस्पतीतील उत्सर्ग होय. उदा. Cinchona officinalis L., Remijia sp.

quinquefoliate
पंचपर्णी पाच पाने असलेले उदा. Panax quinquefolius

quinquefoliolate
पंचदली पाच दले असलेले संयुक्त पर्ण

quintuplinerved
पंचशिरी पाच प्रमुख शिरा असलेले (पान), उदा. एरंड