वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

Home » वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
विशिष्ट अद्याक्षरापासून सुरु होणारे शब्द बघायचे असल्यास त्या अद्याक्षरावर टिचकी मारावी
All | A(353) | B(196) | C(440) | D(176) | E(159) | F(191) | G(199) | H(228) | I(145) | J(23) | K(34) | L(211) | M(211) | N(121) | O(109) | P(606) | Q(24) | R(198) | S(434) | T(259) | U(63) | V(109) | W(42) | X(31) | Y(4) | Z(27) |

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा


There are 63 names in this directory beginning with the letter U.
ubiquitous
सार्वत्रिक सर्वसामान्यपणे आढळणारा (सजीव).

ulginiose
अनूपस्थ दलदलीत वाढणारी (वनस्पती). ulginous

ulmaceae
कारगोळ कुल, उल्मेसी कारगोळ, एल्म, सेल्टिस, इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश वावल गणात (अर्टिकेलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- उपपर्णयुक्त साध्या एकाआड एक पानांच्या काष्ठयुक्त वनस्पती, सुट्या किंवा जुळलेल्या ४-५ परिदलांचे एक वर्तुळ, फु

ultimate
अंतिम, अग्रस्थ टोकावर असलेली (शाखा, कळी किंवा कोशिका)

ultra
अति- अतिशय या अर्थी उपसर्ग

umbel, simple
चामरकल्प फुलोरा चवरीसारखा, एका बिंदूतून अनेक फुले निघालेली, तथापि सर्वात लहान (कोवळी) फुले मध्यभागी व सर्वात जून बाहेरच्या बाजूस अशी मांडणी (व उमलण्याचा क्रम) असलेला अकुंठित फुलोरा, उदा.रूई, कांदा, कोथिंबीर, लोखंडी (Memecylon umbellatum Burm.) u. compound

umbellales
चामर गण, अंबेलेलीझ, अंबेलिफ्लोरी बेंथॅम व हूकर यांनी या गणात द्विदलिकित फुलझाडांपैकी चामर कुल व तापमारी कुल (ऍरॅलिएसी) यांचा अंतर्भाव केला आहे. सुट्या पाकळ्या, द्विलिंगी, अरसमात्र, पंचभागी फुले, अधःस्थ किंजपुट, चामरकल्प (चवरीसारखा) फुलोरा इत्यादी लक्षणे स

umbellate
चामरयुक्त चवरी किंवा तत्सम मांडणी असलेले, चामरासंबंधी.

umbelliferae
चामर कुल, अंबेलिफेरी कोथिंबीर, गाजर (गृंजन), बडिशेप, शेपू, ओवा, जिरे इत्यादी औषधीय, द्विदलिकित वनस्पतींचे कुल, विभागलेली, एकाआड एक व तळाशी खोडाला वेढणारी पाने, चवरीसारखा फुलोरा, पांढरी, हिरवट किंवा पिवळट व अपिकिंज, नियमित लहान फुले, द्विकिंज व द्विपुटक किंजपुट, पालिस्फोटी फळ व दोन बीजे इत्यादी लक्षणे या कुलात आढळतात (शिवाय वर वर्णन केलेली) याला एपिएसी कुल असेही म्हणतात.

umbelliform
चामराभ चवरीसारखे

umbilical cord
नाळ funicle

umbilicate
नाभियुक्त छत्राकृती असून केंद्राजवळ दबलेले.

umbilicus
नाभि hilum.

umbo
ककुद बीजक धारण करणाऱ्या छदाच्या टोकावरील तिकोनी उंचवटा उदा. चीड (Pinus sp.)

umbonate
ककुदयुक्त केंद्राजवळ ककुद असलेले.

umbraculiferous
छत्राकृति, छत्राभ छत्राप्रमाणे आकार असलेले, उदा. बजरबट्ट वृक्ष (Corypha umbraculifera) umbrella shaped

umbranched
अशाखी, शाखाहीन, अशाख उदा. नारळाचे खोड

umbrosus
छायावासी छायेत वाढणारी (वनस्पती).

unavailable
अप्राप्य न मिळण्यासारखे.

unciform
अंकुशाकृति एका टोकास वाकलेले (आकड्याप्रमाणे) उदा. केस, काटे इ. uncus.

uncinate
अंकुशधारी अंकुशासारखी उपांगे असलेले (अवयव) उदा. एका कवकाचे (Uncinula necator) पलिघ धानीफल, एका जनलेचाच्या (Azolla) लघुबीजुकांच्या फेनपुंजकावरचे अंकुशयुक्त उपांग. massula. uncate

uncorticated
मध्यत्वचाहीन मध्यत्वचा नसलेले किंवा ती टाकलेले (खोड), कांडशरीरिका (कारेसी) शैवलांपैकी जातीत काही मद्यत्वचायुक्त व काही मध्यत्वचाहीन असतात. characeae. ecorticate

uncovered
अनाच्छादित, नग्न कोशिकावरण नसलेली (कोशिका), आवरण नसलेला (बीजुक पुंज), फलावरण हीन (बीज), इ. काही गंतुके, बीजुके. naked.

uncus
अंकुश गळाप्रमाणे अथवा टोकास वळलेले असलेला (केस, काटा इ. उपांगे) उदा. वेत. hook

underdeveloped
अर्धविकसित पूर्ण वाढ न झालेला (अवयव).

underground
भूमिगत, भूमिस्थित जमिनीखाली असलेला (अवयव, उदा. बटाटा, हळकुंड, आले, रताळे, सुरण इ.)

undergrowth
निम्नरोह जंगलात इतर वृक्षाखाली वाढलेल्या वनस्पती.

undershrub
क्षुपक लहान झुडूप.

undeveloped
अप्रगत, अविकसित पूर्ण वाढ न झालेला (अवयव, सजीव)

undifferentiated
अप्रभेदित वाढ होत असताना अवयवांत अंतर्गत फरक न पडणारा (अवयव, सजीव).

undulate
तरंगित तरंगाप्रमाणे (लाटेप्रमाणे) वर खाली वाढलेली (किनार, चढ उताराचे मैदान) wavy

unfertilized
अफलित, अनिषेक दोन प्रजोत्पादक कोशिकांचा संयोग न होता निर्माण झालेला (सजीव)

unfree water
अमुक्तजल, बद्धजल मातीच्या कणांनी घट्ट धरुन ठेवलेले व सहज मुळांना उपलब्ध न होणारे प्राणी bound water

unguiculate
नखरी, नखरयुक्त वर पसरट परंतु तळाकडे लहान देठ (वृतक, नखर) असलेला (अवयव, उदा. पाकळी) ungulate

unguiform
नखराकृति नखरासारखे, उदा. वाघनखीची दले (Bignonia unguis cati.L.)

uni-
एक एकटेपण (एकत्व) दर्शविणारा किंवा एका भागाचा अंतर्भाव दर्शविणारा, उपसर्ग u.axial एखाक्ष एकच अक्ष (दांडा) असलेला, उदा. फुलोरा u. carpellate एककिंज एकच किंजदलाचे (फळ, किंजपुट) उदा. वाटाण्याची शिंबा (शेंग) u. cellular एककोशिक एकाच शरीरघटकांचे (कोशिका, पेशी)

unijugate
एकद्विदली एकच दलांची जोडी असलेले संयुक्त पान.

unipolar
एकधुवी एकच टोक असलेले (उपांग, अवयव इ.), एका टोकास असलेले (विशेषतः सूक्ष्मजंतुंच्या कोशिकेच्या टोकास)

unit character
एकक लक्षण (घटक) अनुहरणामध्ये (एका पिढीतून दुसरीत उतरणाऱ्या प्रक्रियेत) गंतुकाद्वारे, न विभागता जाणारे, निश्चित व स्वतंत्र गुण किंवा गुणधारक घटक, वैकल्पिक गुणांच्या जोडीतील प्रत्येक स्वतंत्रपणे आपले वैशिष्ट्य कायम राखून व अनुहरणाच्या नियमानुसार पुढील पिढीत

unit of vegetation (community)
समुदाय वनश्रींतील एक समूह घटक.

univalent
एकयुजी कोशिकेच्या न्यूनीकरण (अर्धसूत्रण) विभआजनाच्या पहिल्या भागात एकत्र येऊन जोडीत समावेश झालेल्या (द्वियुजी) दोन रंगसूत्रांपैकी एक bivalent.

univalent
एकयुजी कोशिकेच्या न्यूनीकरण (अर्धसूत्रण) विभआजनाच्या पहिल्या भागात एकत्र येऊन जोडीत समावेश झालेल्या (द्वियुजी) दोन रंगसूत्रांपैकी एक bivalent.

universal
सर्वसामान्य सर्वत्र आढळणारे (लक्षण, पादप इ.)

unreduced gamete
द्विगुणित गंतुक रंगसूत्रांची संख्या निम्मी (एकगुणित) न झालेली प्रजोत्पादक कोशिका (गंतुक), एक अनित्य प्रकार), अशा दोन गंतुकांच्या संयोगाने चतुर्गुणित संततीची निर्मिती होते.

unseptate
पटहीन विभागणारे आडपडदे नसलेला (तंतू, कोशिका, सूत्र, नलिका इ.), उदा. काही शैवले, कवक, (व्हाउचेरिया, म्यूकर इ.)

unstable gene
अस्थिर जनुक वारंवार उत्परिवर्तन (बदल) घडून येणारा रंगसूत्रातील सूक्ष्म घटक)   u. community अस्थिर समुदाय कायम स्थितीत फार थोडा काळ टिकणारा वनस्पतींचा नैसर्गिक समूह. gene.

unstratified
अस्तरित, स्तरहीन थरावर थर नसण्याचा प्रकार, उदा. शैवल व कवक यांचे थर नसून ते घटक मिसळून एकत्र राहणारी संरचना असलेली (काही धोंडफुले- शैवाक)

unstriated
अरेखित रेषा नसलेले, उदा. फळाची साल, बियाचे टरफल इ. unstriped

unsymmetrical
असमात्र, असममित समात्रता (दोन अथवा अनेक सारखे अर्ध होण्याची क्षमता) नसलेले. asymmetrical

upper
उत्तर, ऊर्ध्व वरची (बाजू), वर असलेले (आच्छादन) u.limit ऊर्ध्वसीमा वरची (ज्यास्तीत जास्त) मर्यादा, उदा. पर्वताची उंची, रासायनिक विक्रियेचे तापमान इ.

ureaceous
कृष्णवर्णी, कालवर्णी करपट काळ्या रंगाचे

urecolate
कुंभाकृति, घटाकार गडूच्या आकाराचे, तळाशी व टोकाशी व टोकाशी अरुंद पण मध्ये फुगीर, उदा. संतानकाचा पुष्पमुकुट (काऊबेरी, संतानक, गंधपुरा) इ. च्या कुलातील अनेक वनस्पती). शेवाळीचा बीजुकाशय pyxidium.

Uredinales
तांबेरा गण, युरेडिनेलीझ अर्धगदाकवकंपैकी एक जीवोपजीवी व तांबूस, पिवळट किंवा पिंगट ठिपक्यांनी ओळखू येणारा कवक गण Hemibasidii

urediniospore
ग्रीष्मबीजुक summer spore

uredosorus
ग्रीष्मबीजुकपुंज ग्रीष्मबीजुकांचा समूह, ग्रीष्म ऋतूत बनलेल्या बीजुकांचा पुंजका.

uredospore
ग्रीष्मबीजुक summer spore.

urens
दाहक, दंशक संपर्काने आग उत्पन्न करणारे उदा. आग्या, खाजोटी, इ. वनस्पती.

urn-shaped
कुंभाकृति, घटाकृति कुंभाकार, घटाकार, लहान तपेलीसारखे urceolate.

urticaceae
वावल (वावळा) कुल, अर्टिकेसी बेंथॅम व हूकर यांनी पूर्वी हा द्विदलिकित फुलझाडांचा गण मानला होता. यातील सर्व वनस्पती आता हचिन्सन यांनी चार कुलात समाविष्ट केल्या आहेत. वटकुल, गंजा (गांजा) कुल, वावल (वावळा) कुल व कारगोळ कुल. एंग्लर व प्रँटल यांनी वावल गणातील (

Urticales
वावल (वावळा) गण, अर्टिकेलीझ वर वर्णिल्याप्रमाणे हचिन्सन यांनी पुरस्कार केलेल्या ह्या गणात वटकुल, गंजाकुल, वावलकुल व कारगोळ कुल या शिवाय बर्बीसी व सायफोस्टेगीएसी या दोन कुलांचाही समावेश होतो. त्यांच्या मते हा गण ऱ्हसित असून याचा उगम मोरवेल गण व चंपक गण या दोन्ही पासून झाला असावा कारण ह्या वावल गणात सर्व स्वरुपाच्या वनस्पती आढळतात.

Ustilaginales
काणी (काजळी) गण, युस्टिलॅजिनेलीझ अर्धगदाकवकांपैकी जीवोपजीवी व काजळी सारखी भुकटी (बीजुके) बनविणाऱ्या कवक वनस्पतींचा गण Hemibasidii.

utricle
क्लोम लहान एकबीजी किंवा अनेकबीजी, फुगीर, शुष्क फळ, उदा. माठ, राजगिरा.

utricular
दृतिसम गळ्यासारखे, फुगीर पिशवीसारखे. utriculiform