वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

Home » वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 4593 names in this directory
A
ए ; फुलाच्या सूत्रमय वर्णनात (पुष्पसूत्रात) वापरण्याचे केसरमंडलासंबंधीचे व इंग्रजीतील ँड्रोशियमचे आंतरराष्ट्रीय आद्याक्षर; फुलांतील ह्या नर पुष्पदलांची संख्या या आद्याक्षरापुढे लिहून दर्शविता येते. floral formula androecium

a-
अ-, - शिवाय, - हीन अभावदर्शक उपसर्ग; प्रत्ययाप्रमाणेही उपयुक्त apetalous, aphyllous

ab-
अप-, अ- अनित्यवाचक, दूरत्व अथवा विरुद्धपणा दर्शविणारा उपसर्ग

abaxial
अपाक्ष, अक्षविमुख खोड अथवा अक्ष यांच्या विरुद्ध बाजूकडील अथवा त्यांच्या केंद्रापासून दूर असलेला (अवयव, उपांग इ.) - side अपाक्ष (अक्षविमुख) पार्श्व खोडापासून दूर असलेली (पानाची) बाजू - sporangium अपाक्ष बीजुककोश पानाच्या अथवा त्यासारख्या अवयवाच्या खालच्या

aberration
विपथन नित्यापासून भिन्न (अनित्य) प्रकार. उदा. परिस्थितीतील विशिष्ट घटकामुळे किंवा अनित्य अंतस्थ घटनेमुळे प्राप्त झालेले एखाद्या वनस्पतीतील विशिष्ट लक्षण किंवा लहान मोठ्या अवयवाचा अनित्यपणा chromosome

abiogenesis
अजीवजनन; जडोत्पत्तिवाद जड किंवा निर्जीव वस्तूपासून सर्व सजीव सहज उत्पन्न झाले असावे अशी जुनी समजूत biogenesis special creation

abjection
अपक्षेपण तुटून किंवा अलग होऊन जोराने फेकले जाण्याची प्रक्रिया; उदा. काही कवक वनस्पतींची बीजुके बीजुकधरापासून सुटून निघण्याचा प्रकार - of spores बीजुकक्षेपण वर वर्णिल्याप्रमाणे बीजुकांचे तंतूपासून तुटून जाणे

abjunction
विबीजुकसंभव विशेष प्रकारची बीजुके तंतूपासून पडद्यांनी अलग होऊन बनण्याचा प्रकार conidium

abnormal
असामान्य, विकृत सामान्यपणे न आढळणारे, उदा. फार मोठे फळ, नित्यापेक्षा अधिक मोठा किंवा संख्येने अधिक (अवयव), एका केळाच्या सालीत दोन स्वतंत्र मगज

abnormality
विकृति वैचित्र्य दर्शवणारी निर्मिती, अनित्यता

abortion
१ अविकसन २ गर्भाभाव ३ गर्भपात १ एखाद्या अवयवाची अर्धवट वाढ किंवा क्वचित वाढ खुंटण्याची प्रक्रिया उदा. कळ्या किंवा बारीक अपक्व फळे गळून पडणे, फुलांतील केसरदलात संक्षेप २ पक्व बीजातील गर्भाच्या अभावामुळे बीज वांझ असण्याचा प्रकार ३ गर्भ गळून जाण्याची प्रक्रिया

abortive
अविकसित, सदोष, वंध्य अर्धवट बनलेला किंवा अवशेषरुप (अवयव) उदा. सूर्यफुलाच्या किरण पुष्पकातील वांझ किंजमंडल, बीजके नसलेला किंजपुट, न रुजणारे बी

abrupt
अकस्मात एकदम फरक पावणारे, हळूहळू निमुळते न होता एकदम टोकदार बनलेले (पान), टोकास दल नसलेले संयुक्त पान (उदा. टाकळा.)

absciss (abscission) layer
अपाच्छेदक स्तर पान अथवा तत्सम अवयव निसर्गतः गळून पडण्यापूर्वी खोड व पानाचा (देठाचा) तळ यांमध्ये प्रथम असलेला व नंतर हळुहळु नाश पावणारा विशिष्ट कोशिकांचा थर, य्च्या खोडाकडील बाजुस बुचासारख्या पदार्थाच्या घटकांचा (त्वक्षा) थर असल्याने पान गळून पडल्यावर खोडा

abscission
अपाच्छेदन, झड स्वाभाविकपणे अवयव गळून पडण्याची (झडण्याची) वर वर्णिलेली प्रक्रिया. उदा. काही झाडाच्या सालीचे तुकडे, पाकळ्या, फळे इ.

absence
अनुपस्थिती व्यक्तीतील एखाद्या लक्षणाबद्दल जबाबदार असलेल्या जनुकाचा अभाव presence gene

absorb
शोषणे बाहेरील द्रवरुप अथवा वायुरुप पदार्थ शरीरात ओढून घेणे, यात बहुधा भौतिक प्रक्रियेचा (विसृति) संबंध असतो. diffusion

absorbability
शोषणीयता, शोषणक्षमता शोषून घेण्याचे सामर्थ्य

absorbent root
शोषक मूळ शोषण करणारे मूळ

absorption
१ शोषण २ अभिशोषण १ शोषून घेण्याची प्रक्रिया (कार्य) २ विशेषप्रकारे (विसृतीने) झालेली शोषणाची प्रक्रिया

abstriction
विबीजुकक्षेपण विशिष्ट तंतूच्या टोकास बनलेली बीजुके आकुंचनाने सुटी होऊन फेकली जाणे, या संज्ञेत बीजुकसंभव व अपाच्छेदन ही अभिप्रेत आहेत.

abundance
वैपुल्य विशिष्ट स्थानी निसर्गतः आढळणाऱ्या वनस्पतींच्या समुदायातील एखाद्या किंवा प्रत्येक जातीच्या संख्येबद्दलची माहिती. frequency, density.

Acanthaceae
वासक कुल, ऍकँथेसी वासक (अडुळसा), कोरांटी, कोळसुंदा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, बेसींच्या वर्गीकरणाप्रमाणे या कुलाचा समावेश नीर बाम्ही गणात (स्क्रोफ्युलारिएलीझ) केला असून हचिन्सन यांनी पर्साएनेलीझ गणामध्ये केला आहे. या कुलातील वनस्पतींची लक्षणे पाने

acanthaceous
१ कंटकित २ वासक कुलोत्पन्न १ काटेरी २ वासक कुलांतील (वनस्पती), उदा. तालीमखाना (Asteraccantha longifolia Nees)

acaullescent
अस्कंध, स्कंधहीन, क्षोडहीन जमिनीवर (सहज) न दिसणारे खोड असलेली (वनस्पती), उदा. घायपात, कोरफड, कांदा, शेवरा (Phoenix acaulis Roxb.) इ.

accelerator
प्रवेगकर वितंचकाची क्रिया अधिक वेगाने घडविणारे (विद्युत विच्छेद) द्रव्य enzyme

accessory
अतिरिक्त, गौण, साहाय्यक प्रमुख अवयवाशिवाय इतर (अधिक); उदा. आगंतुक व साहाय्यक कळ्या -- fruit अतिरिक्त फळ किंजपुटाखेरीज फुलातील इतर भागांपासून (पुष्पासन, देठ इ.) बनलेला फळासारखा मांसल अवयव उदा. काजू, सफरचंद, स्ट्रॉबेरी इ.

accrescent
सहवर्धिष्णु - इतर अवयवाबरोबर वाढत जाऊन न गळता राहणारा उदा. फळाबरोबर वाढत जाणारा फुलातील एखादा अवयव (वांग्याचा संवर्त, काजूचा देठ)

accumbent
संमुख - समोरासमोर निकट असलेले, उदा. दलिका (हरभरा, वाटाणा)

aceae
- कुल कुलवाचक लॅटिन संज्ञा बनविताना लॅटिन वंशनामापुढे लावण्याचा प्रत्यय, उदा. वृन्ताक (वांगे) कुल (Solanaceae या नावात Solanum या वंशनामापुढे प्रत्यय लावला आहे), वांग्याचे शास्त्रीय नाव Solanum melongena L. हे आहे.

acellular
अकोशिकेय, अकोशिक कोशिकायुक्त संरचना नसलेले, उदा. सर्व जड वस्तू (दगड, खनिजे इ.)

aceous
- प्रमाणे, - सम वनस्पतींच्या लॅटिन वंशनामापुढे किंवा कुलनामापुढे विशेषणात्मक संज्ञा बनविण्यास लावलेला प्रत्यय, उदा. गुलाबसम अथवा गुलाबाप्रमाणे किंवा गुलाब कुलातील Rosaceous

acephalous
अशीर्षक डोक्यासारखा भाग नसलेला (अवयव)

Aceraceae
किनार कुल, ऍसरेसी किनार (ऍसर किसीयम), मॅपल, सिकॅमूर, शुगर मॅपल इत्यादी विशेषतः उत्तर गोलार्धातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी या कुलाचा समावेश अरिश्ट (रिठा) गणात केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, साधी, पिसासारखी किंवा हस्ताकृती खंडित, समोरासमोर पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अरसमात्र फुले, संदले व प्रदले ४-५, कधी पाकळ्या नसतात, केसरदले बहुधा ८, किंजदले दोन व ऊर्ध्वस्थ, केसरदलाबाहेर किंवा मध्ये बिम्ब, किंजपुटात दोन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, दोन पंखांचे व शुष्क (पालिभेदी) फळ, किंवा सपक्ष कृत्स्नफळ, अपुष्प बिया

acerose
सूच्याकृति, सूचिसम सुईसारखे टोक, धारदार कडा व अत्यंत निमुळते, उदा. चीड- (चिल) चे पान, शतावरीची फांदी

achene
कृत्स्नफल शुष्कफळाचा एक प्रकार, हे न फुटणारे, एकबीजी, पातळ सालीचे, एका किंजदलाचे व ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून बललेले असून बीजावरण व फलावरण अलग असतात. उदा. मोरवेल, स्ट्रॉबेरी, कमळ यांच्या फळातील एक सुटा भाग

achenial fruit
कृत्नाभ फल सर्वसाधारणपणे वर वर्णन केल्याप्रमाणे शुष्क एकबीजी व न तडकणारे कोणतेही फळ, उदा. सूर्यफूल, माठ, मका, गहू इ.

achlamydeous
अपरिदल परिदले (संवर्त व पुष्पमुकुट) नसलेले, उदा. अळू, केवडा यांची फुले

acicular leaf
सूचिपत्र, सूचिपर्ण acerose

acorn
छदककपाली, वंजुफल लहान छदांच्या पेल्याने वेढलेले ओक (वंजू) चे (किंवा तत्सम) कवची फळ

acotyledonous
अदलिकित गर्भात दलिकेचा अभाव असलेली (वनस्पती) Cryptogamia.

acquired
अर्जित, संपादित स्वतःच्या प्रयत्नाने मिळविलेले किंवा परिस्थितीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे घडून आलेले (फरक), उदा. पुरेशा पोषणाअभावी वनस्पतीस आलेला खुरटेपणा, एकाच बाजूने सतत लागलेल्या वाऱ्यामुळे आलेला बाक

acro-
अग्र- टोक किंवा शेंडा या संदर्भात उपसर्गाप्रमाणे वापरलेली संज्ञा a. carpus अग्रफलयुक्त, अग्रफली शेंडेफळ असलेले a. petal अग्रवर्धी केवळ टोकाशीच वाढणारे (खोड, अक्ष इ.) a. succession अग्रवर्धी अनुक्रम खोडाच्या किंवा इतर अवयवांच्या टोकास सदैव वाढ होत

actino-
अरीय, अर- आरे (किरणासारखे भाग) असलेला उदा. मोरपंखी (Actiniopteris dichotoma Bedd.) या नेचाची पाने a. meter प्रकाश मापक छायाचित्राच्या कागदाचा उपयोग करून प्रकाशाच्या भिन्न तीव्रतेचे मापन करण्याचे उपकरण a. morphic अरसमात्र, नियमित एखाद्या अवयवाच्या (उदा.

activator
प्रभावक, क्रियाप्रवर्तक, त्वरक वितंचकाची क्रिया चालू करणारा पदार्थ, येथे वितंचक स्वयंपूर्ण नसते, कधी कधी हा क्रियाप्रवर्तक धातुस्वरुप असतो proenzyme, coenzyme

active
सचेष्ट, सक्रिय, क्रियाशील नैमित्तिक किंवा सतत हालचाल करणारे, सुप्तावस्थेत नसून वाढ होत असलेले, उदा. गंतुक, बीजुक, कळी इ. a. transport क्रियाशील परिवहन पाणी किंवा अन्नद्रव्य यांचे जलद स्थलांतर. dormant

aculeate
कंटकित, काटेरी काटे असणारे, तीक्ष्ण टोक असलेले उदा. वेडी बाभूळ (Parkinsonia aculeata L.) कणगर (Dioscorea aculeata L.)

aculeus
कंटक, काटा कठीण, तीक्ष्ण उपांग

acuminate
प्रकुंचित, पुच्छाकार शेपटीसारखे हळूहळू निमुळते होत गेलेले उदा. पिंपळाच्या पानाचे टोक, सफेद कचनार (Bauhinia acuminate L.)

acute
आकुंचित, लघुकोनी, टोकदार लघुकोनासारखे टोकदार, उदा. कण्हेरीच्या पानाचे टोक खैरचाफा (Plumeria acutifolia Poir) दोडका (Luffa acutangula (L.) Roxb.)

acyclic
अमंडलित, अचक्रिक, अचक्रीय चक्राकार किंवा मंडलाकार मांडणी नसलेली, मळसूत्राप्रमाणे सर्पिल मांडणी असलेली (पाने किंवा पुष्पदले) उदा. कमळाचे फूल cyclic

ad-
-कडे, जवळचे या अर्थी उपसर्ग, मराठीत प्रत्ययासारखा उपयोग करतात adaxial

adapt
जमवून घेणे जरुर ते शारिरिक फरक घडवून परिस्थितीशी समरस होणे

adaptability
अनुयोजकता परिस्थितीशी जमवून घेण्याची (समरस होण्याची) क्षमता, हे सर्व सजीवांचे लक्षण समजले जाते.

adaptation
अनुयोजन, अनुकूलन बदलत्या परिस्थितीशी समरस होण्याची प्रतिक्रिया

adaptive (inducible) enzyme
जिवंत कोशिकेतील चयापचयात, परिस्थितिसापेक्ष विशिष्ट कार्यद्रव्यांनी तेथेच निर्मिलेले नवीन आणि विशिष्ट वितंचक (कार्बनी निदेशक) उदा. एश्रेचरिया कोली या सूक्ष्मजंतूंचे गाही वाण ग्लुकोज व अमोनिया या कार्बनयुक्त व नायट्रोजनयुक्त प्राथमिक उग्दमावर वाढविले असता त

adaptor RNA (+ RNA)
योजक आर एनए प्रथिन संश्लेषणात प्रभावित अमिनो अम्ल ज्या विशिष्ट लहान, विद्राव्य आरएनए रेणूला चिकटून राहतात त्याला ही संज्ञा वापरतात. RNA

adaxial
अभक्ष्य, अक्षसंमुख खोडासमोरचे, खोडाजवळचे, अक्षालगत असलेले, उदा. सिलाजिनेला किंवा लायकोपोडियम या वनस्पतींचे बीजुककोश a. surface of the leaf अभ्यक्ष पर्णपृष्ठ - पान खोडाशी समांतर नसल्यास, पानाची वरची (प्रकाशाकडे वळलेली) बाजू व ते समांतर असल्यास खोडाकडे

adelphous
ससंघ फुलातील केसरदलांचा एक अथवा अनेक संच (जुड्या) असण्याचा प्रकार उदा. जास्वंद

adhension
आसंग फुलातील एका मंडलाची दले दुसऱ्या मंडलातील दलांशी अंशतः किंवा पूर्णपणे चिकटून असण्याचा प्रकार, उदा. धोत्र्याच्या फुलातील केसरदले पाकळ्याशी तळात चिकटलेली परंतु वर सुटी असतात. epipetalous, episepalous, gynandrous

adherent
आसक्त, अभिलग्न दोन निराळे अवयव परस्परास चिकटून असणे उदा. किंजपुटास चिकटून राहिलेला संवर्त, काकडी, पेरु इ.

adhesive
आसंगी, आसंजक चिकटून राहण्याची क्षमता असलेला, उदा. भिंतीस चिकटून राहणारी मुळे किंवा ताणे काही वेलींना वर चढण्यास मदत करतात (नागवेल, मिरवेल, अंजनवेल) a. disc आसंगी बिम्ब चिकटण्यास उपयुक्त असा चकतीसारखा भाग, उदा. Parthenocissus tricuspidata Planch या वेलीचे

adnate
पृष्ठाबद्ध एकादा अवयव दुसऱ्याच्या पृष्ठभागास पूर्णपणे चिकटून वाढलेला असणे, उदा. गुलाबाच्या पानाची उपपर्णे, काही फुलातील परागकोशाची एक बाजू संपूर्णपणे तंतूस चिकटून असते (कमळ). dorsifixed

ADP
एडीपी, ऍडिनोसीन डायफॉस्फेट ATP

adpressed
आलग्न एखादा अवयव दुसऱ्यावर सपाट दाबून असणे उदा. काही खवले किंवा तत्सम पाने appressed

adsorption
पृष्ठशोषण काही घन किंवा द्रव पदार्थाच्या पृष्ठबागावर लवणे (रेणू किंवा आयने) चिकटून राहण्याची प्रक्रिया, जमिनीतील चिकणमातीचे व कुजकट जैव पदार्थाचे कलिल कण तेथील लवण पदार्थ या पद्धतीने धरुन ठेवतात.

adventitious
आगंतुक अनपेक्षितपणे दुसऱ्या अवयवावर उगम पावलेले काही अवयव उदा. कलमांवर येणारी मुळे किंवा नवीन कळ्या, पानफुटीच्या तुटून पडलेल्या पानावर येणारी नवीन रोपे

aecidiospore
वर्षाबीजुक बहुधा पावसाळ्यात बनणारे कवकाचे बीजुक (प्रजोत्पादक कोशिका)

aeciospore
वर्षाबीजुक तांबेरा रोगाच्या कवकाचे द्विगुणित प्रकल असलेले, लैंगिक प्रक्रियेने बनलेले व बहुधा पावसाळ्याच्या सुमारास निर्मिले जाणारे बीजुक. aecidiospore

aecium
वर्षाबीजुकपुंज वर वर्णन केलेल्या बीजुक प्रकाराचा संच. aecidium, aecidiosorus

aeration
वातन, वायुमिश्रण द्रव्य किंवा घन पदार्थात वायूचे मिश्रण करण्याची प्रक्रिया

aerenchyma
वायूतक वायूने भरलेल्या पोकळ्या असलेला कोशिकांचा समूह, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींत हवेच्या पुरवठ्याकरिता असे समूह (ऊतक) आढळतात, तसेच समूद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या अनेक वनस्पतींतील हे ऊतक त्वक्षाकरापासून बनलेले असते, उदा. शिंगाडा, तिवर, कमळ, चि

aerial
वायवी, हवाई जमिनीवरच्या भागात (हवेत) वाढणारा (अवयव) उदा. खोड, पाने, क्वचित मुळे a. root वायवी मुळे हवेत वाढलेले मूळ, मुळे सामान्यपणे जमिनीत वाढतात, तथापि कधी हवेतही ती खोडापासून उगम पावतात उदा. वडाच्या पारंब्या, खाऱ्या चिखलात वाढणाऱ्या काही वनस्पतींची

aerobe
वायुजीवी, सानिल हवेच्या सान्निध्यातच जगणारे, उदा. काही सूक्ष्मजंतू

aerobic
सानिल हवेच्या सान्निध्यातच घडून येणारी (प्रक्रिया), उदा. श्वसन, प्रकाशसंश्लेषण a. respiration सानिल श्वसन हवेतील प्राणवायुचा उपयोग करून पदार्थातील ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया, जलवनस्पतीत पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचा श्वसनार्थ उपयोग होतो respiration,

aerophyte
अपिवनस्पति दुसऱ्या वनस्पतीच्या फक्त आधाराने वाढणारी वनस्पती, हिचा जमिनीशी संपर्क नसतो, उदा. शैवाक (धोंडफूल), शेवाळी, आमरे, काही नेचे इ. epiphyte

aerotactic
वातानुचलनी हवेच्या दिशेकडे किंवा त्याविरुद्ध दिशेकडे स्थानांतर करणारी (वनस्पती उदा. काही शैवले, सूक्ष्मजंतू)

aerotaxis
वातानुचलन हवेतील प्राणवायूच्या चेतनेनुसार घडून येणारी हालचाल उदा. अस्थिर वनस्पती किंवा स्थिर वनस्पतींचे सुटे भाग

aerotropic
वातानुवर्तनी हवेच्या चेतनेनुसार वाढीची दिशा ठेवणारे (अवयव)

aerotropism
वातानुवर्तन हवेच्या दिशेकडे किंवा दिशेविरुद्ध होणारी वनस्पतींच्या अवयवांची वाढ, उदा. खाऱ्या दलदलीतील झाडांची मुळे chemotropism

aestival aspect
वासंतिक दृश्य, उष्मकालीन प्रभाव. उन्हाळ्यात दृष्टीस पडणारे वनस्पतिसमुदायाचे स्वरुप, फुलांनी भरलेले (उदा. गुलमोहर) अथवा नवीन पालवीमुळे हिरवेगार दिसणारे (उदा. वड)

aestivtion
पुष्पदलसंबंध कळीतील पुष्पदलांची (संदले व प्रदले) परस्परसंबंध दर्शविणारी मांडणी ptyxis, vernation

aethalium
उपधानक श्लेष्मकवक वनस्पतींत कधी कधी सूक्ष्म व अनेक बीजुककोश एकत्र होऊन बनणारा प्रजोत्पादक अवयव Myxomycetes

affinity
आप्तभाव वनस्पतींतील (अथवा प्राण्यांतील) सादृश्यामुळे दिसून येणारे व्यक्तींतील (अथवा लहानमोठ्या गटातील) रक्ताचे नाते, त्यांचे नैसर्गिक वर्गीकरण या नात्यावर केले जाते.

after-ripening
अनुपक्कन, अनुपाक वनस्पतींचे बीज पूर्णपणे तयार झाल्यानंतरही लागलीच न रुजता काही वेळानंतर (विश्रांतिकालानंतर अथवा प्रसुप्तावस्थेनंतर) रुजते., ह्या मध्यावधीला वरील संज्ञा वापरतात. या कालात बीजामध्ये काही क्रियावैज्ञानिक (शरीरव्यापारविषयक) बदल घडून येतात.

Agaricales
पटलकवक गण, ऍगॅरिकेलीझ सत्यकवक विभागातील गदाकवक वर्गात अंतर्भूत असलेल्या दोन उपवर्गातील सत्य गदाकवकातील एक गण, भूछत्रे, शूलकवक इत्यादींचा येथे समावेश असून यामध्ये प्रथमपासून गदाकोशिका उघड्याच असतात किंवा गदाबीजुके बनून पक्व होतेवेळी त्या उघड्या होतात.

Agavaceae
घायपात कुल, ऍगॅव्हेसी घायपात गणातील एक कुल (एकदलिकित फुलझाडे), अरुंद, लांबट किंवा भाल्यासारख्या पानांचा झुबका खोडाच्या टोकावर राहतो, फुलातील परिदले शुष्क नसून बहुधा ती जुळून नलिका बनते, किंजपूट ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ, इतर लक्षणे पुढे घायपात गणात दिल्याप्रमाणे, उदा घायपात, दर्शना, युका, नागीन, फर्क्रिया इत्यादी.

Agavales
घायपात गण, ऍगॅव्हेलीस हचिन्सन यांनी बनविलेला एकदलिकित फुलझाडांचा एक गण. याचा प्रसार उष्ण व उपोष्ण खंडातील शुष्क प्रदेशात व ऑस्ट्रेलियात आहे. प्रमुख लक्षणे - वृक्षासारख्या व अनेक वर्षे जगणाऱ्या वनस्पती, काष्ठमय खोडावर किंवा जमिनीवर वाढणाऱ्या खोडाच्या टोकास जाड, मांसल, सूत्रल, कधी कधी काटेरी असलेल्या पानांचा झुबका, फुले लहान, सच्छद, अनेक शाखायुक्त परिमंजिरीवर येतात, ती बहुधा अरसमात्र, द्विलिंगी, किंवा एकलिंगी व दोन स्वतंत्र झाडावर येतात, परिदले शुष्क किंवा मांसल, केसरदले सहा व परागकोशात दोन कप्पे, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुटात तीन किंवा एक कप्पा व त्यात अक्षावर किंवा मध्यावर बीजके, बोंडे किंवा मृदुफळ, बीजे सपुष्क, या गणात फक्त एकच कुल (घायपात कुल) घातले आहे.

agent
मध्यस्थ, माध्यम वनस्पतीतींल परागण, फलप्रसार व बीजे अथवा बीजुके यांचा प्रसार घडवून आणण्यास साहाय्य करणारे वारा, प्राणी इत्यादीसारखे घटक pollination

aggregate fruit
संघफळ, घोसफळ एकाच फुलातील अनेक सुट्या किंजदलापासून बनलेल्या अनेक साध्या फळांचा, घोस, मोरवेल, पिवळा किंवा हिरवा चाफा, रुई इ. carpel  etaerio

aggregation
जमाव अनेक वनस्पतींच्या निसर्गतः एकत्र वाढण्याने बनलेला समूह, हा प्रकार त्यांचे प्रजोत्पादक घटक एकत्र आल्याने व अनुकूल परिस्थितीमुळे घडून येतो. उदा. शेवाळी, गवते, टाकळा इ.

agrad
संवर्धित पादप विशेष प्रकारे वाढविलेली वनस्पती.

agrostology
तृणविज्ञान सर्व गवतांचा तपशीलवार अभ्यास व त्यावरून मिळालेली माहिती अंतर्भूत करणारी शाखा.

air
हवा, वायु, वात, अनिल a. bladder वायुकोश, वाताशय हवेने भरलेला फुग्यासारखा अथवा गेळ्यासारखा अवयव उदा. चीडचे परागकण, सरगॅसम किंवा फ्यूकस शैवलाच्या कायकाचे भाग a. canal (air passage) वायुमार्ग, हवामार्ग वनस्पतीच्या शरीरात हवेची ये-जा होण्याकरिता बनलेले लहान

Aizoaceae
वालुक कुल, ऐझोएसी ficoideae.

aka
पक्ष, पंख काही फुलांच्या पुष्पमुकुटातील पंखासारख्या दोन पाकळ्या, उदा. गोकर्ण, वाटाणा इ. wing, pl. alae

alate
पंखधारी पंख असलेले

alba
श्वेत प्रकार पांढरा, उदा. मेंदी (Lawsonia alba Lamk.)

albinism
श्वेतत्त्वः, विवर्णता शरीराचा एखादा अवयव किंवा सर्व शरीर रंगहीन (पांढरट) असण्याचा प्रकार, उदा. पांढऱ्या फुलांचे प्रकार (गुलाब, गोकर्ण, कण्हेर, जास्वंद इ.), कित्येक पशूंतही असे प्रकार सामान्यपणे आढळतात (मांजर, कुत्रा, ससा, मेंढी, गाय इ.)

albino
विवर्ण (श्वेत), रंजकहीन पांढऱ्या फुलांची किंवा पानांची (वनस्पती) किंवा पांढरे प्राणी, उदा. धोतरा, पांढरा वाघ

albumen
पुष्क बीजातील दलिकाबाहेर असलेला अन्नांश, उदा. एरंड, मका इ. endosperm

albuminous seed
सपुष्क बीज पुष्क असलेले बीज endospermic seed

alburnum (sap wood)
रसकाष्ठ काही बहुवर्षायू झाडांच्या जुन्या खोडांमध्ये सालीच्या आतील फिकट रंगाच्या काष्ठाचा व कार्यक्षम भाग, द्रव पदार्थांची ने आण याच भागातून होते duramen (heart wood)

ales
गणवाचक प्रत्यय उदा. Sapindales अरिष्ट (रिठा) गण, लॅटिन वंशनामापुढे (Sapindus) प्रत्यय लावून गणवाचक संज्ञा बनविली जाते.

aleurone grain
अपांडुर कण प्रथिनाचा सूक्ष्म कण, वनस्पतीच्या भिन्न अवयवांतील संचित अन्न या स्वरुपात कधी कधी आढळते a. layer आपांडुर स्तर वर वर्णन केलेल्या पदार्थाने भरलेल्या कोशिकांचा थर, उदा. मक्याचे दाणे protien

alga
शैवल (अ. शैवले), आल्गा (अ. आल्गी) बहुधा पाण्यात वाढणारी, बीजहीन, एक किंवा अनेक कोशिकांची बनलेली, साधी, (कायकाभ) हिरवी, पिंगट, लालसर किंवा निळसर वनस्पती thalloid, thallophya  (pl. algae)

algalogist
शैवलविज्ञ, शैवलवेत्ता शैवलांचा विशेष अभ्यासु व ज्ञानी

Algalogy
शैवलविज्ञान शैवलांचीच फक्त तपशीलवार माहिती देणारी विज्ञानशाखा

alien
अन्यदेशीय विशिष्ट निमित्ताने बाहेरील प्रदेशातून आलेली व कायम रहिवासी झालेली तणासारखी वनस्पती, उदा. पिवळा धोत्रा, गाजरी, ओसाडी इ.

allelomorph (allel)
विकल्प वनस्पतीच्या एकाच जातीतील दोन प्रकारांचे भिन्नत्व (विरुद्धपणा) दर्शविणारा गुण (लक्षण) किंवा जनुक, उदा. वाटाण्याच्या जातीतील उंचपणा व खुजेपणा, फुलांचा पांढरेपणा व लाली gene

allelomorphic pair of characters
वैकल्पिक गुणयुगुल वर वर्णन केलेल्या विरुद्ध गुणांची जोडी असे भिन्न गुण असणाऱ्या व्यक्तींच्या प्रजोत्पादनामुळे होणाऱ्या संततीस संकरप्रजा (सकरज) म्हणतात. या संततीत आईबापांच्या भिन्न गुणांपैकी कधी एकाचाच प्रभाव दिसतो व दुसरा गुण सुप्तावस्थेत असून पुढील पिढ्य

alliaceous
कंदर्प-लशुन-गंधी कांदा किंवा लसूण यांचा वास येणारे

alliance
१ संघ, संघसमष्टी २ उपवर्ग १ वनस्पतींच्या अनेक व विशिष्ट प्रकारच्या समुदायांनी (संगतीनी) बनलेला नैसर्गिक व मोठा समुदाय, पादप संघटना व पादपसमाजशास्त्र याबाबत परस्परात आप्तभाव दर्शविणाऱ्या अनेक पादप संगतींचा गट २ काही विशिष्ट व नैसर्गिक वनस्पति कुलांचा एकत्र

allogamy
परयुति वनस्पतींच्या एकाच जातीतील दोन भिन्न व्यक्तींच्या प्रजोत्पादक कोशिकांचे (गंतुकांचे) मीलन (फलन) autogamy

allogenic succession
परजात (परजनित) अनुक्रमण, परानुक्रमण बाह्य परिस्थितीमुळे पादपसमुदायाला विशिष्ट चरमावस्थेप्रत पोचविणारी प्रक्रिया autogenic, succession.

allopatric speciation
अवरोधी जातिनिर्मिती भौगोलिक कारणांमुळे पूर्वी अलग पडलेल्या पूर्वजांपासून स्वतंत्रपणे अवतरणाऱ्या नवीन जातींची निर्मिती.

allopolyploidy
असमगट गुणन व्यक्तीच्या शरीराच्या कोशिकेतील रंगसूत्रंआची संख्या तिप्पट, चौपट इ. अशी असून त्यापैकी एखादा (किंवा अधिक) संच एका जातीच्या वनस्पतीचा व उरलेले संच दुसऱ्या जातीच्या वनस्पतींचा असण्याचा प्रकार autopolyploidy

allotetraploid
उभयद्विगुणित आई व बाप यांच्या द्विगुणित रंगसूत्रांचा संच मिळालेली चतुर्गणित (जाती), द्विगुण संकरजातील रंगसूत्रे दुप्पट झाल्यामुळे बनलेली असमगट गुणित जाती. allopolyploidy, amphiploid.

allotype
मूलप्ररुप holotype

alpine vegetation
आल्पीय वनश्री पर्वत शिखरावर वृक्षमर्यादेपलीकडे असलेली खुरटी (फक्त औषधी व लहान झुडपे असलेली) वनश्री.

alternate
एकांतरित, एकाआड एक अक्षाच्या (खोडाच्या) प्रत्येक पेऱ्यावर एक अशा क्रमाने आलेली, उदा. पाने, पुष्पदले अथवा शाखा

alternation of generations
पिढ्यांचे एकांतरण लिंगभेद न दर्शविणाऱ्या (द्विगुणित) एका पिढीपासून दुसरी लैंगिक पिढी (एकगुणित) निर्माण होणे व पुनरपि हिच्यापासून अलैंगिक पिढीची उत्पत्ती होणे, याप्रकारचे जीवनचक्र, काही शैवले, शेवाळी व नेचाभ ह्या वनस्पतींच्या गटात ही घटना स्पष्टपणे दिसून य

alternative inheritance
वैकल्पिक (पर्यायी) अनुहरण संततीमध्ये काही व्यक्ती आईबापांच्या दोन (वैकल्पिक - प्रभावी व अप्रभावी) गुणांपैकी एकच गुण दर्शवितात तर काही दुसरा (पर्यायी) गुण दर्शवितात असा प्रकार.

alternative pair of characters
वैकल्पिक (पर्यायी) गुणयुगुल allelomorphic pair of characters

alveolar
विवरयुक्त

alveolus
विवर १ वस्तूच्या पृष्ठभागावरील रिकामी खोलगट जागा (पोकळी) उदा. मधमासांचे पोळे, सूर्यफुलाच्या पुष्पासनावरील खाच २ अनेक छिद्रे असलेल्या कवकाच्या शरीरावरील कप्पा ३ कोशिकेतील जीवद्रव्याच्या फेसासारख्या अवस्थेतील रिती जागा

Amarantaceae
अपामार्ग (आघाडा) कुल, ऍमरँटसी अपामार्ग (आघाडा), कुरडू, माठ, पोकळा, राजगिरा, तांदुळजा इत्यादि द्विदलिकित वनस्पतींचे (फुलझाडांचे) कुल, हचिन्सन यांनी या कुलाचा अंतर्गत चक्रवर्त गणात (चाईनोपोडिएलिझ) केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ या गणात केला आहे व त्यात चक्रवर्त कुल समाविष्ट आहे. प्रमुख लक्षणे- बहुतेक औषधीय वनस्पती, एकलिंगी किंवा द्विलिंगी,छदे व छदके असलेली बिनपाकळ्याची फुले, संदलासमोर बहुधा पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ किंजपुट आणि न फुटणारे किंवा करंड्या एक किंवा अनेक. सपुष्पक

amaryllidancease
मुसळी, कुल,ऍमारिलीडेसी मुसळी, घायपात, नार्सिसस, कुमूर, नागदवणा इत्यादी एकदलित वनस्पतींचे कुल. या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरिडेलीझ) बेसींच्या पद्धतीत केला असून हचिन्सन यांनी मुसळी गणात (ऍमारिलिडेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- कंद, दृढकंद प्रकारचे खोड, मूलज पाने, फुलोऱ्यास प्रथम महाछदाचे आवरण, परिदले सहा, खाली नळीसारखी व वर सुटी, सहा केसरदले, अधःस्थ, तीन कप्यांचा व अनेक बीजकांचा किंजपुट, मृदुफळ किंवा बोंड इ.

Amentiferae
नतकणिश गण, ऍमेंटिफेरी नतकणिश फुलोरा असलेल्या वनस्पतींचा गट, यामध्ये भूर्ज कुल, ओक कुल, वालुंज कुल, अक्षोट कुल इत्यादींचा समावेश केला जात असे.

amentum (catkin)
नतकणिश फुलोऱ्याचा एक प्रकार, यावर बिनदेठाची लहान, एकलिंगी, सच्छद व बिनपाकळ्याची फुले असुन फुलोरा बहुधा लोंबता कणिश प्रकारचा असतो. उदा. भूर्ज, मिरवेल, वंजू (ओक), नागवेल, हॅझेल, पॉप्लर इ. spike, inflorescence

amitosis
असम विभाजन एका कोशिकेची दोन किंवा अधिक भागात होणारी प्रत्यक्ष विभागणी, विभागणीनंतर ते विभाग पूर्णपणे सारखे होतातच असे नाही, यामध्ये कोशिकेतील प्रकलादी भागांची साधीच विभागणी होते, तसेच त्यानंतर कोशिकावरण लागलीच बनते असे नाही, केव्हा तर यामुळे बहुप्रकली कोश

amoeboid
आदिजीवसदृश अत्यंत सूक्ष्म व प्रारंभिक प्राण्याप्रमाणे (ऍमीबा प्रमाणे) उदा. श्लेष्मकवकातील गंतुके a. movement आदिजीवसदृश हालचाल आदिजीवाप्रमाणे छद्मपादांनी सरकवण्याची प्रक्रिया, कोशिकावरण नसलेल्या सजीव (प्राकल) घटकांचे स्थलांतर या पद्धतीने होते. उउदा.

AMP
ईमपी ऍडिनोसीन मॉनोफॉस्फेट या रासायनिक पदार्थाच्या नावाचे संक्षिप्त रुप. ऍडॅनेलिक अम्ल, एक न्यूक्लीओटाइड (प्रकलातील संयुग), nucleotide.

amphibious
जलस्थलवासी, जलस्थलीय पाण्यात व जमिनीवर जगणारे (जीव) उदा. दलदलीत वाढणारी वनस्पती, कमळ, पाणकणीस, प्राण्यांच्या बाबतीत उभयचर ही संज्ञा वापरतात.

amphicribral
मध्यप्रकाष्ठक प्रकाष्ठाभोवती परिकाष्ठ अशी मांडणी असलेले (एकमध्य वाहक वृंद), उदा. काही नेचे (ग्लीकेनिया ऑस्मुंडा) xylem, phloem, stele

amphigenesis
सलिंग प्रजोत्पादन (जनन) लिंगभेदयुक्त अवयवांच्या साहाय्याने झालेली पुनरुत्पत्ति.

amphimixis
गंतुकमीलन, युग्मकसंयोग नर व स्त्री गंतुकांचा संयोग (एकरुप होणे) gamete

amphiphloic
द्विपरिकाष्ठी प्रकाष्ठाच्या आत व बाहेर परिकाष्ठ असलेले (रंभ), उदा. नेचा (ऍडिँटम)

amphiploid
उभयद्विगुणित दोन जातींच्या संकराने प्राप्त झालेल्या प्रत्येकी दुप्पट रंगसूत्रामुळे एकूण चौपट रंगसूत्रे असलेली संकरज वनस्पती उदा. तंबाखूच्या व धोत्र्याच्या काही जाती amphidiploid

amphisarca
घनकवची मृदुफळ कठीण कवचाच्या आत मऊ मगज असलेले साधे फळ, उदा. कवठ, बेलफळ, गोरखचिंच इ. berry

amphithecium
बाह्यकोश विकासावस्थेतील अतिशय कोवळ्या (अपक्व) बीजुकाशयाचे बाहेरील आवरण उदा. शेवाळी endothecium

amphitropous
तिर्यङ्मुख, उभयवर्ती बीजबंधाशी काटकोन केलेले (बीजक), याचे बीजकरंध व बीजकतल विरुद्ध टोकास असून नाभि या दोन्हीपासून सारख्या अंतरावर असते, रंध, तल व नाभि यांचा त्रिकोन बनतो. उदा. लेग्ना (डकवीड) Lemnaceae.

amphivasal
मध्यपरिकाष्ठक परिकाष्ठाभोवती प्रकाष्ठ असलेले (एकमध्य वाहक वृंद, रंभ), उदा. दर्शना (Dracaena Sp.)

amplexicaul
संवेष्टी खोडाभोवती वेढून राहणारा पानाच्या देठाचा पसरट तळ, उदा. कोथिंबीर, जिरे इ.

ampulla
आशय bladder  bladder

amylaceous
तौकीरमय, पिठूळ

amyloplast
तौकीरकणु पिष्ठ (पिठूळ पदार्थ) कण बनविणारा कोशिकेतील प्राकणु (सजीव कण) plastid, starch

anabolism
उपचय पिष्ठ, प्रथिन, मेद इत्यादी पदार्थ किंवा प्राकल (कोशिकेतील सजीव पदार्थ) काष्ठ, तूलीर (कौशिकावरण) इत्यादी बनविण्याची विधायक प्रक्रिया katabolism

Anacardiaceae
आम्रकुल, ऍनाकार्डिएसी आंबा, काजू, चारोळी, मोई इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव अरिष्ट (रिठा) गणात (सॅपिंडेलीझ) केला जातो. या कुलाची प्रमुख लक्षणे- राळयुक्त चीक, लहान, एकलिंगी किंवा द्विलिंगी, नियमित फुले, संदले ३-७ जुळलेली, पाकळ्या ३-७ सुट्या, पेल्यासारखे बिम्ब, केसरदले ३-७ किंवा दुप्पट, ऊर्ध्वस्थ किंजपुट व बहुधा आठळीयुक्त फळ.

anaerobe
अननिल, अवायुजीवी हवेशिवाय जगणारे, उदा. नायट्रेट क्षारांचा नाश करणारे जमिनीतील सूक्ष्मजंतू anaerobic

anaerobic respiration
अननिल श्वसन प्राणवायू बाहेरुन आत घेतल्याशिवाय चालणारी काही सजीवांतील ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया, उदा. काही सूक्ष्मजंतु, किण्व (यीस्ट), या प्रकारात विशिष्ट पदार्थाच्या विघटनातून ऊर्जा प्राप्त केली जाते.

analogous
समरुप, सदृश दोन किंवा अधिक अवयवांमध्ये समान कार्यामुळे आलेला सारखेपणा दर्शविणारे उदा. द्राक्षवेलीचे (खोड) ताणे व वाटाण्याचे (दल) ताणे, निवडुंगाचे व बाभळीचे काटे भिन्न अवयवांची रुपांतरे आहेत. homologous

analogy
समरुपता, सादृश्य समान कार्यामुळे आलेला (भिन्न अवयवातील) स्वरुपातील सारखेपणा homology

analysis floristic
पादपजातीय विश्लेषण एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या वनश्रींच्या अन्वेषणात आवश्यक असलेली तेथील अनेक समुदायात आढळणाऱ्या वनस्पतींची तपशीलवार माहिती. उदा. नामनिर्देश, संख्या, प्रकार, प्रभाव स्थायिकता इ. तसेच भौगोलिक, स्वरुपविषयक, परिस्थितीविषयक माहितीही त्या वनश्रीती

anandrous
केसरहान केसरदले नसलेले (फूल) उदा. पोपईची स्त्री पुष्पे, सूर्यफुलाची किरणपुष्पके

anaphase
पश्चावस्था कोशिकेच्या समविभाजनातील चारीपैकी उपांत्य अवस्था, यामध्ये प्रकलातील रंगसूत्रांची विभागणी संपून त्यांचा एकेक संच कोशिकेच्या दोन टोकाकडे स्थिर होतो mitosis

anastomose
सिरामीलन, सिरासंधी अनेक शिरा परस्परांना जोडल्या जाणे

anastomosing (netted)
जाळीदार अनेक शिरा परस्परांशी जुळून बनलेली जाळीसारखी संरचना

anastomosis
सिराजाल अनेक लहान मोठ्या शिरांची जाळीदार मांडणी उदा. अनेक पाने

anatomist
शारीरविज्ञ शरीराच्या अंतर्रचनेसंबंधीची विशेष ज्ञानी व्यक्ती

anatomy
शारीर शरीरातील संरचनात्मक माहिती a. minute (histology) सूक्ष्म शारीर, उतकविज्ञान सूक्ष्मदर्शकाच्या साहायाने मिळणारी शरीराच्या भिन्न अवयवांची तपशीलवार संरचनात्मक माहिती, यामध्ये कोशिका व त्यांचे समूह (ऊतके) या संबंधीची माहिती असल्याने येथे ऊतकविज्ञान अशीही

anatropous
अधोमुख, अधोवर्ती खाली वळलेले बीजकरंध असलेले (बीजक) उदा. सूर्यफूल, येथे बीजबंध बीजकाच्या आवरणाशी चिकटलेला असून बीजकरंध व नाभि जवळ जवळ असतात. ovule, raphe

ancestral
पैतृक आनुवंशिकतेमुळे पूर्वजांकडून मिळालेले उदा. पानां-फुलां-फळांचे वैशिष्ट्य, संरचना इ.

anchored
तललग्न तळाशी चिकटलेले

androcyte
रेतुकजनक प्रजोत्पादक नर (पुं.-) कोशिका बनविणारी मूळची कोशिका

androecium
केसरमंडल, पुं-केसरमंडल फुलातील परागकण बनविणाऱ्या एक किंवा अनेक अवयवांचा (केसरदलांचा) संच stamen, pollen

androgenic haploid
पुंजनित एकगुणित रंगसूत्रांचा एकच संच असलेल्या (एकगुणित) नरकोशिकेपासून बनलेले (अपत्य) parthenogenesis, haploid

androgynophore
केसरकिंजधर फुलातील पाकळ्यांमधून वर वाढलेला व प्रथम केसरमंडल आणि नंतर किंजमंडल धारण करणारा अक्ष (दंड) उदा. पांढरी तिळवण

androphore
केसरधर पाकळ्या व केसरदले यांमधील देठासारखा भाग (अक्ष) उदा. कृष्णकमळ gonophore

androsporangium
पुं बीजुककोश पुं-बीजुक (लघुबीजक) बनविणारी कोशिका, हिचेच रुपांतर (पक्व झाल्यावर) कोशात होते.

androspore
पुं बीजुक रुजल्यावर एक खुजा (ऱ्हस्व) पुं-तंतू उत्पन्न करणारे व हालचाल करणारे (चर) बीजुक उदा. इडोगोनियम शैवल nanandrium

anemometer
पवनमापक, वातमापक, पवनमापी वाऱ्याच्या वेगाची नोंद करणारे उपकरण, स्थल विज्ञानात उपयुक्त

anemophile
वातप्रिय वाऱ्यात चांगल्या प्रकारे वाढणारी (वनस्पती)

anemophilous
वायुपरागित वाऱ्याच्या साहाय्याने परागांचे वहन (सिंचन) करणारी वनस्पती, उदा. गवते, सायकस इ.

anemophily
वायुपरागण वाऱ्याकडून परागण घडविण्याची पद्धत

anemophobe
वातवर्ज्यक, वातद्वेष्टी वारा वर्ज्य करणारी (वनस्पती) anemophobous

anfractuose
सर्पिल, तरंगित नागमोडीसारखे, पिळीव, उदा. पांढरी सावर (Eriodendron anfractuosum DC) (sinuous, spirally twisted)

Angiospermae
आवृतबीज वनस्पती उपविभाग, ँजिओस्पर्मी बीजाला फलावरणाचे संरक्षण असणाऱ्या वनस्पतींचा गट, सामान्य भाषेत, फुलझाडे. वनस्पति कोटीतील बीजी वनस्पतींच्या विभागातील दोन्हीपैकी एक उपविभाग, दुसरा उपविभाग, प्रकटबीज वनस्पती Gymnospermae, flower

angle of divergence
परामुखता कोन एकाआड एक पानांच्या मांडणीत, भिन्न पातळीतील दोन जवळच्या (क्रमागत) पानांतील स्थानांतर, हे कोनाच्या अंशात दर्शविले जाते. उदा. गवताच्या खोडावर प्रत्येक पेऱ्यावर एक पान असून एकूण पाने दोन रांगांत असतात म्हणून परामुखता कोन १८० अंश मानला जातो.

angular
कोनयुक्त, कोनीय कोन असलेले, आडव्या छेदात अवयवाचा परीघ वाटोळा नसून चौकोनी किंवा षट्कोनी असलेले (उदा. खोड, फळ, बी इ.,) उदा. कांडवेल, मोथा, निवडुंग, तुळस, इत्यादींचे खोड, भेंडीचे फळ

animate
सजीव, चेतन हालचाल, श्वसन, वर्धन, पोषण व प्रजोत्पादन इत्यादी सजीवांची लक्षणे दर्शविणारे, जिवंत, अर्थात् प्राणी, वनस्पती, विषाणू, सूक्ष्मजंतू इ.

anisogametes
असमगंतुके सारखे नसलेले (नर व स्त्री असा भेद दर्शविणारे) प्रजोत्पादक घटक (कोशिका) isogametes

anisogamy
विषमयुति, असमयुति सारख्या नसलेल्या दोन प्रजोत्पादक कोशिकांचा (गंतुकांचा) संयोग heterogamy

anisomerous
असमभागी प्रत्येक मंडलातील पुष्पदलांची संख्या सारखी नसलेले (फूल), उदा. वाटाण्याचे फूल (संदले पाच, प्रदले पाच, केसरदले दहा, किंजदले दोन) isomerous

anisophyllous
भिन्नपर्णी एकाच वनस्पतीवर दोन प्रकारची पाने असणारी, ती एकाच माध्यमात (हवेत किंवा पाण्यात) असतात उदा. सिलाजिनेला मार्टेन्सी.

anisophylly
भिन्नपर्णत्व वर वर्णिल्याप्रमाणे दोन प्रकारच्या पानांचे अस्तित्व

anisostaminous
असमकेसर सर्व केसरदले सारखी नसणारी (वनस्पती) उदा. मोहरीच्या फुलात काही केसरदले आखूड तर काही लांब असतात anisostemonous

annual
वर्षायु वार्षिक, एकच वर्ष किंवा ऋऋतू आयुष्य असणारे उदा. मका, मिरची (Capsicum annuum L.), सूर्यफूल (Helianthus annuus L.) a. ring वार्षिक वलय खोडामध्ये दरवर्षी एक याप्रमाणे बनत असलेले प्रकाष्ठाचे वर्तुळ. बहुवर्षायू वृक्षांच्या खोडांतील वर्तुळे मोजून

annular
वलयाकृति, कंकणाकृति बांगडीसारख्या आकाराचे (कंगोरे असलेली वाहिका किंवा वाहिनी)

annulus
वलय, स्फोटक वलय १ भूछत्र (कवक) वनस्पतीच्या दांड्यावर असलेले काकणासारखे कडे २ नेचे वनस्पतींच्या बीजुककोशावर असलेला जाड आवरणाच्या कोशिकांचा थर, यामुळे कोशाच्या स्फोटास चालना मिळते. ३ शेवाळी वनस्पतींच्या बीजुकाशयावर स्फोट घडवून आणणारा जाड कोशिकांचा थर

anomalous structure
असंगत संरचना सर्वसाधारणतः नित्य न आढळणारी खोड किंवा मुळे यांची अंतर्रचना, बहुधा द्वितीयक वाढीत ऊतककराच्या अनित्य क्रियेमुळे अशी अंतर्रचना निर्माण होते व कित्येकदा तिचे विशिष्ट कार्य असते. उदा. सायकस व मोठ्या वेलींची खोडे, मुळा, गाजर, बीट यासारखी मांसल मुळे

Anonaceae
सीताफल कुल, ऍनोनेसी सीताफळ, रामफळ, मारुतीफळ, हिरवा चाफा, हिरवा अशोक इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) मध्ये केला जातो, हचिन्सन यांनी सीताफळ गणात (ऍनोनेलीझमध्ये) केला आहे. या कुलाची सामान्य लक्षणे वृक्ष अथवा झुडुपे, साधी एकाआड एक पाने, फुलात तीन संदले, तीन किंवा सहा सुट्या पाकळ्या, अनेक केसरदलांची सर्पिल मांडणी व अनेक ऊर्ध्वस्थ व सुटी किंजदले, घोसफळ व सपुष्क रेषाभेदित बिया

antagonism
विरोध १ वनस्पतींच्या पोषणामध्ये खनिज लवणांच्या वैयक्तिक विषारी परिणामांचे परस्पराकडून निराकरण होण्याचा प्रकार २ एका जीवाच्या वाढीवर दुसऱ्याचा अवरोध

antagonistic symbiosis
विरोधी सहजीवन दोन सजीव एकत्र जीवन कंठत असताना एकाचा दुसऱ्यावर हानीकारक परिणाम होण्याचा प्रकार उदा. आश्रय देणारी एक वनस्पती व तिच्यावर जगणारी दुसरी वनस्पती (आकाशवेल, तांबेरा, काणी अर्गट यासारखे रोग) symbiosis

anterior
पुरश्च, अग्र, अग्रीय सजीवांच्या शरीराचा किंवा अवयवाचा पुढचा (डोक्याकडील, टोकाकडील) भाग, खोडावरील बाजूच्या फुलांच्या बाबतीत खोडाजवळची बाजू पश्च व त्याविरुद्ध असलेली बाजू ती पुरश्च.

antero-posterior
अग्रपश्च पुढचा व मागचा भाग यातून जाणारी किंवा परस्पराविरुद्ध टोकातून जाणारी (रेषा किंवा दिशा) a.plane अग्रपश्च प्रतल वर वर्णन केल्या प्रकारची उभी पातळी

anthella
निम्नाग्र पुष्पबंध गुलच्छ नावाच्या फुलोऱ्यात वरच्या पातळीत खोलगटपणा असणारा प्रकार उदा. प्रनड (Juncus)  corymb.

anther
परागकोश फुलातील केसरदलाच्या तंतूच्या टोकास असणारी व परागकणांच्या भुकटीने भरलेली पिशवी, याचे बहुधा दोन खंड असून प्रत्येकात प्रथम दोन कप्पे असतात, पुढे त्याचा एक कप्पा (कोटर) बनतो. pollen sac

antheridial chamber
रेतुकाशय कोटर रेतुकाशये अंतर्भूत करणारी पोकळी, उदा. ँथोसिरॉस शेवाळी (शृंगकावर्ग)

antheridiophore
रेतुकाशयदंड रेतुकाशयांना आधार देणारा दांडा उदा. शेवाळी

antheridium
रेतुकाशय पुं-गंतुके (प्रजोत्पादक नरकोशिका) निर्माण करणारा बहुकोशिक अवयव, शेवाळी, नेचे व नेचाभ वनस्पतीत आढळतो, काही शैवलांत एककोशिक अवयव याच नावाने ओळखतात.

antheriferous
परागकोशधारी अनेक परागकोश धारण करणारा (दांडा किंवा नलिका), उदा. जास्वंद

antherizoid
रेतुक प्राणी व वनस्पती यामध्ये आढळणारी, हालचाल करणारी, केसलयुक्त प्रजोत्पादक पुं-कोशिका (पुं-गंतुक) gamete  spermatozoid

anthesis
पुष्पविकसन, पुष्पकाल फुलणे, वनस्पतीला फुले येणे, कळ्या उमलणे, काही वनस्पती वर्षातून एकदाच फुलतात (उदा. गुलमोहोर), तर काही कमीजास्त प्रमाणात वर्षभर फुलतात उदा. कण्हेर, गुलाब इ., काहींच्या जीवनात एकदाच फुले येतात (उदा. बांबू).

Anthocerotae
शृंगकावर्ग, ँथोसिरोटी शेवाळी वनस्पतींच्या विभागातील एक वर्ग, काहींच्या मते यकृतका वर्गातील तीन गणांपैकी एक, ँथोसिरोटेलीझ, मार्चाशिएलीझ व युंगरमॅनिएलीझ हे तीन गण होत, हल्ली बहुतेक शास्त्रज्ञ हेपॅटिसी (यकृतका), ँथोसिरोटी (शृंगका) व मुस्सी (हरिता) असे शेवाळी

anthocyanin
वर्णद्रव्य, नील रक्त द्रव्य फुले, फळे, पाने इत्यादींमध्ये आढळणारे निळे किंवा लाल (गडद किंवा फिकट) रंगद्रव्य, हे कोशिकारसात विरघळलेले असते, विशिष्ट ऋऋतूत किंवा कोवळेपणी कित्येक पानात आढळते. यामुळे ते अवयव रंगीत दिसतात. नायट्रोजनच्या कमतरतेमुळेही हे लक्षण आढळते.

anthophore
प्रदलदंड, प्रदलधर संदले व प्रदले यांमधील अक्षाचा भाग, बहुधा हा संक्षिप्तच असतो.

anthophyll
सवर्ण पुष्पदल रंगीत संदल किंवा प्रदल, कधी कधी केसरदले व किंजदले ही रंगीत असतात (उदा. कर्दळ)

anthracnose
करपा, कवडी १ द्राक्षवेलीचा एक रोग (Phoma) २ कापसावरचा एक रोग (Colleotrichum) यामध्ये फळांवर किंवा पानांवर पिंगट ठिपके येऊन पिकाची हानी होते. काकडी, टरबूज, भात इत्यादीवरही करपा रोग येतो.

antiauxine
प्रतिवृद्धिनियामक वृद्धीचे नियमन करु न देणारा

antibiotic
प्रतिजैव काही सूक्ष्म जीवांच्या वाढीस आळा घालणारे नैसर्गिक कार्बनी पदार्थ, यांची निर्मिती बहुतेक काही सूक्ष्मजीव करतात.

antibody
प्रतिद्रव्य शरीरात बाहेरुन आलल्या हानिकारक द्रव्याला विरोध करणारे द्रव्य

anticlinal
पृष्ठजात्य पृष्ठभागाशी काटकोन करणारे (उदा. कोशिकावरण)

anticlockwise
अपसव्य, वामावर्त, डावी घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वळण घेणारी (वेल) (उदा. घेवडा, अमरवेल) clockse, dextrose, twiner  sinistrorse

antienzysue
प्रतिवितंचक वितंचकाच्या आंबविण्याच्या क्रियेस विरोध करणारे द्रव्य

antipetalous
प्रदलसंमुख पाकळ्यांच्या समोर असणारे (उदा. केसरदले)

antipodal
तलस्थ फुलझाडांच्या बीजकातील गर्भकोशाच्या तळाजवळ असणारी उदा. कोशिका, सामान्यपणे या तीन असतात.

antisepalous
संदलसंमुख संदलाच्या समोर असलेला (संदलाशी एकाआड एक नसणारा) उदा. पाकळी किंवा केसरदलासारखा अवयव

antiseptic
पूतिरोधक जंतुनाशक, कुजणे, नासणे, आंबणे इत्यादी प्रक्रियेशी विरोध करणारे व त्यामुळे त्या प्रक्रियेला जबाबदार असणाऱ्या जंतूस मारक द्रव्य

antitoxin
प्रतिविष शरीरातील विषाला मारक (पदार्थ)

Apetalae
अप्रदल (प्रदलहीन) उपवर्ग, एपेटॅली पाकळ्या नसलेली फुले असण्ऱ्चा द्विदलिकित वनस्पतींचा बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरणातील उपवर्ग. या वनस्पती मूलतः प्रारंभिक समजून त्यांचा वेगळा गट केला गेला, तथापि त्यांपैकी कित्येक ऱ्हासामुळे प्रदलहीन असून मुक्तप्रदल (सुट

apetalous
अप्रदल, प्रदलहीन पाकळ्या (पुष्पमुकुट) नसलेले (फूल), उउदा. गुलबुश, एरंड. गुलबुशाच्या फुलातील रंगीत पाकळ्यासारखा भाग परिदलमंडल असून संवर्तासारखा तळातील भाग छदमंडल असते.

apex
अग्र शेंडा, टोक, खोडाच्या पानाच्या किंवा मुळाच्या टोकाचा भाग

apheliotropism
ऋऋण प्रकाशानुवर्तन प्रकाशाच्या चेतनेमुळे वनस्पतींच्या अवयवांचे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेकडे वाढणे अथवा वळणे (वाढण्याची प्रवृत्ति) heliotropism  negative heliotropism

aphyllous
पर्णहीन, अपण पानांचा अभाव असणारे (खोड), उदा. शतावरी, अमरवेल, सोमलता इ. leafless

aphylly
पर्णाभाव, पर्णहीनत्व, अपर्णत्व पाने नसण्याचा प्रकार उदा. नेपती (Capparisaphylla Roth)

Apiaceae
एपीएसी Umbelliferae

apical
अग्रस्थ, शीर्षस्थ शेंड्यावर (टोकावर) असलेले (उदा. फूल किंवा कळी)

apiculate
तीक्ष्णाग्र आखूड, तीक्ष्ण पण लवचिक टोक असलेले (पान) उदा. त्रिधारी निवडुंग

aplanogamete
अचर गंतुक गतिशून्य प्रजोत्पादक कोशिका, उदा. स्पायरोगायरा शैवल, बुरशी

aplanospore
अचर बीजुक हालचाल न करणारे बीजुक, उदा. अनेक कवक वनस्पती, अनेक उच्च दर्जाच्या वनस्पती

apocarpous
मुक्तकिंज, पृथक अंडपी सुटी (अलग) किंजदले असलेले, उदा. मोरवेल, पिवळा चाफा, कुडा इत्यादींची फुले

apocarpy
मुक्तकिंजत्व मुक्तकिंज असण्याचा प्रकार

apocynaceae
करवीर कुल, ऍपोसायनेसी कण्हेर (करवीर), कुटज (कुडा), तगारी, पांढरा चाफा, करवंद, सातवीण इत्यादी फुलझाडांचे (द्विदलिकित) कुल. या कुलाचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत किराइत गणात (जेन्शिएनेलीझ) केला असून हचिन्सन यांनी करवीर गणात (ऍपोसायनेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे - दुधासारखा चीक, साधी पाने बहुधा समोरासमोर किंवा मंडलित, पूर्ण, नियमित, द्विलिंगी फुले, जुळलेल्या चार ते पाच पाकळ्या व त्यास चिकटलेली, सुटी, चार ते पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ सुट्या किंवा जुळलेल्या दोन किंजदलांचे किंजमंडल, फळे विविध, पंखयुक्त किंवा केशयुक्त (कधी साध्या) बिया

apogamy
अफलित जनन, अनिषेक जनन लैंगिक प्रक्रियेच्या (फलनाच्या) अभावीही प्रजोत्पादन घडून येणे उदा. काही नेचे a. reduced (meiotic euapogamy) न्यूनित अनिषेक जनन गंतुकधारीच्या कोशिकांपासून नवीन बीजुकधारीची निर्मिती, हा बीजुकधारी एकगुणित असतो. a. vegetative शाकीय अफलित

apomict
असंगजनित फलनाशिवाय बनलेली (वनस्पती)

apomixis
असंगजनन प्रजोत्पादनामध्ये गंतुकांचा संयोग किंवा प्रकलाचे न्यूनीकरण (विभाजन) न होता नवीन पिढीची निर्मिती, यामध्ये अफलित जनन, अबीजुक जनन व अनिषेक जनन यांचा समावेश होतो.

apophysis
१ आशयतल २ शल्कपीटिका १ शेवाळीतील बीजुकाशयाचा तळचा भाग २ काही शंकुमंत वनस्पतीतील बीजकाच्या खवल्यावर असलेला उंचवटा, उदा. चीड (पाइन)

aposepalous
मुक्तसंदल polysepalous

apospory
अबीजुकजनन बीजुकनिर्मिती न होता बीजुकधारी (द्विगुणित) पिढीच्या इतर भागांपासून नवीन लैंगिक अवयव धारण करणाऱ्या (गंतुकधारी) पिढीची निर्मिती, उदा. काही नेचे, ही गंतुकधारी पिढी अनित्य (द्विगुणित) असते. haploid, diploid, gametophyte, sporophyte

apostrophe
विन्मुखावस्था तीव्र प्रकाशाच्या चेतनेमुळे हरितकणयुक्त कोशिकेच्या उभ्या भिंतीजवळ ते कण एकाखाली एक अशी ओळ करून राहण्याचा प्रकार (अथवा त्याकरिता केलेली हालचाल)

apothecium
मुक्त धानीफल शैवाक (धोंडफूल) व काही धानीकवकात आढळमारा उघडा, पेल्यासारखा किंवा वाटीसारखा, बीजुके निर्माण करणारा अवयव  perithecium,  ascus

apparent
आभासी प्रत्यक्षात नसलेले, वरवर आढळणारे किंवा दिसणारे

appendage
उपांग शरीरावर किंवा अवयवावर वाढलेला गौण किंवा कमी प्रतीचा लहान अवयव, उदा. केस, खवला, काटा इ.

appendicular
उपांगीय, उपांगासंबंधी

appendicular theory
उपांगीय सिद्धांत ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून अधःस्थ किंजपुटाचा क्रमविकास झाला असून त्यामध्ये इतर पुष्पदलंआच्या तळभागांपासून बनलेल्या आवरणाने तो किंजपुट प्रथमपासून क्रमाने वेढून तो बदल झाला असावा अशी एक उपपत्ती, ही दुसऱ्या उपपत्तीपेक्षा अधिक ग्राह्य मानली गेली

appendiculate
सोपांग उपांगे असलेला (भाग)

apposite
सन्निध दोन सारखे अवयव परस्पराजवळ असणे

apposition theory
स्तराधान सिद्धांत कोशिकावरणाच्या प्राथमिक थरावर आतील बाजूस नवीन थर बसून वाढ होते अशी उपपत्ती

appresorium
आबंधक आश्रय वनस्पतीस बाहेरुन चिकटून राहण्यास उपयुक्त असा अवयव, उदा. जीवोपजीवी कवक वनस्पती

appressed
आलग्न adpressed

aqua culture
मृदुहीन कृषि, जलकृषि पोषक द्रावणाच्या साहाय्याने वनस्पतींची कृत्रिम पद्धतीने वाढ (संवर्धन) करण्याची पद्धती (प्रकार), यालाच soiless culture असे म्हणतात. कारण या पद्धतीत नित्याप्रमाणे जमिनीतील खनिज पोषणावर वनस्पती अवलंबून नसतात. water culture, hydroponics

aquarium
जलजीवपात्र, जलजीवालय सदैव पाण्यात असणाऱ्या वनस्पती व प्राणी यांना नैसर्गिक परिस्थिती प्राप्त करून देणारी व त्यांची वाढ व प्रजोत्पादन यास मदत करणारी कृत्रिम पेटी (पात्र), अशा अनेक पेट्यांतून मोठ्या प्रमाणावर वनस्पती व प्राणी ठेवून त्यांचा अभ्यास व प्रदर्शन करण्याची सोय असलेली संस्था (जलजीवालय)

aquatic
जलवासी, जलीय, जलचर सदैव पाण्यात असणारे, उदा. शैवले, मासे इ. उदा. नावळी (Ipomoea aquatica Forsk).  a. life जलजीवन पाण्यातील जीवनक्रम, जलजीव (पाण्यात राहणारे सजीव)

aqueous
आप्य, जलीय पाणी असलेले, पाण्यात केलेले (विद्रव, द्रावण) a. tissue आप्योतक पाण्याचा संचय करणाऱ्या कोशिकांचा समूह, ह्या कोशिकामधून रित्या जागा (मोकळ्या) कमी असून हरितकणूंची संख्याही कमी असते. उदा. मांसल पाने, खोड इत्यादी मरुवनस्पतींचे अवयव watery

Araceae
सुरण कुल, ऍरेसी वेखंड, सुरण, अळू, गोंडाळ इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत न्यूडिफ्लोरी (नग्नपुष्प) श्रेणीत परंतु हचिन्सन यांच्या पद्धतीत सुरण गणात (ऍरेलीझ) या कुलाचा समावेश आहे, प्रमुख लक्षणे - महाछदाने संरक्षित अस

Araliaceae
तापमारी, कुल, ऍरेलिएसी तापमारी (ऍरिलिया), फॅटसिया, पॅनॅक्स, हेडेरा इत्यादी उद्यानवनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश चामर गणात केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष, झुडुपे, वेली, राळनलिकायुक्त, पाने साधी किंवा संयुक्त, फुलोरे चामरकल्प किंवा स्तबक, फुले द्विलिंगी

arbor
वृक्ष काष्ठयुक्त बहुवर्षायु झाड  tree उदा. कुंभा (Careya arborea Roxb.), चिनी कंदील (Malvaviscus arboreus Cav.)

arboraceous
वृक्षसदृश वृक्षाप्रमाणे मोठे व काष्ठयुक्त

arboreous (arboreal)
वृक्षस्थ, वृक्षवासी वृक्षावर राहणारे

arborescent
वृक्षसम, वृक्षसदृश वृक्षासारखे

arboret
लहान वृक्ष

arboretum
१ वृक्षसंवर्धनस्थान, वृक्षालय, वृक्षोद्यान २ वृक्षविज्ञान १ वृक्षासंबंधीच्या संशोधनार्थ बनविलेली बाग २ वृक्षासंबंधीच्या माहितीचे पुस्तक (वृक्षविज्ञान)

arboriculture
वृक्षसंवर्धन लहान मोठ्या वृक्षांची पद्धतशीर लागवड अथवा त्यासंबंधी माहिती

arc indicator
चाप निदर्शक वनस्पतीची उंचीतील वाढ मोजण्याचे कमानी पट्टीचे उपकरण

archegoniophore
अंदुककलशधर एक अथवा अनेक अंदुककलशांना आधारभूत दांडा, उदा. मार्चांशिया, फिंबिऍरिया इ. शेवाळी

archegonium
अंदुककलश शेवाळी, नेचे व तत्सम (नेचाभ) वनस्पतींत आढळणारा सुरईच्या आकाराचा बहुकोशिक व स्त्रीगंतुक (अंदुक) असलेला अवयव

archesporium
बीजुकपूर्वक बीजुके निर्माण करणारी आद्य कोशिका, हिच्यापासून प्रथम अनेक जनक कोशिका बनून नंतर शेवटी बीजुके निर्माण होतात sporocyte, spore

archicarp
पूर्वफल काही कवकात आढळणारा, लैंगिक प्रक्रियेनंतर बनणारा व पुढे बीजुककोश निर्मिणारा अवयव

Archichlamydeae
आद्यपरिदली श्रेणी अथवा उपवर्ग Choripetalae

arcuate
धन्वाकृति, चापाकृति धनुष्याप्रमाणे बाकदार किंवा वाकलेले.

arcuate
धन्वाकृति, चापाकृति धनुष्याप्रमाणे बाकदार किंवा वाकलेले.

aril
अध्यावरण, बीजोपांग बीजकाच्या तळापासून उगम पावून बीजकाभोवती अंशतः किंवा पूर्णपणे वाढणारे बीजावरण, उदा. लिची, कमळ, विलायती चिंच इ. caruncle  arillus

arillate
बीजोपांगयुक्त, अध्यावरणयुक्त बीजोपांग (तिसरे आवरण) असलेले (बीज)

arillode
छद्मी अध्यावरण बीजकरंधापासून वाढून बीजकावर पसरलेले बीजावरण, जायपत्री हे जायफळाच्या बीजावरील छद्मी आवरण बीजकाच्या दोन्ही टोकापासून (बीजकरंध व बीजकबंध यापासून) वाढते false aril

aristate
प्रशूकी awn

Aristolochiaceae
ईश्वरी कुल, ऍरिस्टोलोकिएसी पोपटवेल (कुक्कुटवेल), सापसंद (ईश्वरी) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) केला जातो, याची प्रमुख लक्षणे- बहुधा एकाआड एक पानांच्या औषधी, क्षुपे किंवा वेली, फुले मोठी, एकसमात्र व द्विलिंगी, परिदले जुळलेली, केसरदले व किंजदले जुळून किंजकेसराक्ष बनतो, अधःस्थ किंजपुट, बिया अनेक, मृदुफळ किंवा बोंड. हचिन्सन यांनी हे कुल ईश्वरी गणात घातले आहे

armature
शस्त्रसंभार वनस्पतींच्या शरीरावर किंवा शरीरात आढळणाऱ्या स्वसंरक्षक योजना उदा. काटे, दाहक (दंशक, कंडूत्पादक) केस, दुर्गंध, चीक, विषारी द्रव्ये इत्यादी

armed
शस्त्रसज्ज संरक्षक उपांगे असलेले

Aroideae
सुरण कुल, ऍरॉइडी araceae

aromaticus
सुगंधि खमंग वास किंवा रुचि असलेले, उदा. पानाचा ओवा (Coleus aromaticus Lour)

arrangement
मांडणी, विन्यास खोडावरील पानांची, फुलातील दलांची, किंजपुटातील बीजकांची, इत्यादींची विशिष्ट व्यवस्था

Articulatae
संधिपादप वर्ग Equisetinae

articulated (jointed)
संधियुक्त, सांधेदार सांधे असलेले, सांधलेले, उदा. एक्किसीटमचे खोड, लिंबू किंवा पपनसाच्या पानाचे पाते

artificial selection
कृत्रिम निवड एका जातीतील अनेक वनस्पतींतून (किंवा प्राण्यातून) मनुष्याच्या आवडीप्रमाणे (गरजेप्रमाणे) विशिष्ट गुणयुक्त व्यक्तींची (प्रकारांची) पैदाशीकरिता (किंवा संकर घडवून आणण्याकरिता) केलेली निवड, कित्येक खाद्य वनस्पती किंवा पाळीव प्राणी मनुष्याने शेकडो वर्षे केलेल्या निवडीतूनच उगम पावले आहेत.

arvensis
क्षेत्रज लागवडीच्या जमिनीतील (वनस्पती) उदा. पुदीना (Mentha arvensis L.)

ascending
आरोही, चढणारा गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर वाढत जाणारा (अवयव)

ascent
आरोह, उद्गम चढण, अवयव (खोड) अथवा वनस्पती किंवा त्यातील द्रव पदार्थ वर चढविला जाण्याची प्रक्रिया (रसारोह)

ascidium
चषिका, कलश पेला किंवा कुंभ यांसारखा लहान अवयव

Asclepiadaceae
रुई (अर्क) कुल, ऍस्क्लेपीएडेसी रुई, मांदार, हरणदोडी, अंतमूळ, माकडी, सोमलता, उतरणी, कावळी, उपळसरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश किराईत गणात (जेन्शिएनेलीझ मध्ये) केला जातो, हचिन्सन यांच्या पद्धतीत करवीर गणात (ऍपोसायनेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व वेली, बहुधा दुधी चीक आढळतो, पाने साधी व समोरासमोर, द्विलिंगी, पंचभागी, पूर्ण व नियमित लहान फुले, पाकळ्या जुळलेल्या व त्यावर केसरदलांशी संबंधित तोरण (परिवलय) तसेच केसरदले व किंजदले यांचा किंजकेसराक्ष, बहुधा परागांचे पुंज असून दोन किंजपुटापासून दोन स्वतंत्र पेटिकाफळे व त्यात शिखालू (केसाळ झुबका असलेली) बीजे असतात.

ascocarp
धानीफल धानीकवक वनस्पतीत लैंगिक प्रक्रियेनंतर आढळणारा व धानीबीजुकांची निर्मिती करणारा अवयव apothecium, perithecium

ascogonium
धानीयोगी धानीकवकात आढळणारा प्रजोत्पादक स्त्रीलिंगी अवयव

ascolichens
धानी शैवाक Lichens

Ascomycetes
धानीकवक वर्ग, ऍस्कोमायसेटीज कवक वनस्पतींपैकी विशिष्ट प्रकारची बीजुके (धानी बीजुके) निर्माण करणारा (सत्यकवक विभागातील) एक गट, उदा. बाजरीवरील अर्गट रोग Eumycophyta, ergot

ascospore
धानीबीजुक धानीकवकातील प्रातिनिधिक व विविध आकाराचा एककोशिक प्रजोत्पादक घटक, हे धानी नावाच्या कोशिकेत प्रकलाच्या न्यूनीकरण विभागणीनंतर बनतात, संख्येने ही बीजुके चार किंवा आठ असतात व ती निर्मिणाऱ्या कोशिकेस धानी म्हणतात.

ascpgenous filament
धानीजनक तंतू धानी व त्यातील बीजुके निर्माण करणारा तंतूसारखा अवयव

ascus
धानी धानीकवकात बहुधा नेहमी आढळणारा बीजुककोश, यातील बीजुके रुजून नवीन कवक वनस्पतीची निर्मिती होते. उदा. किण्व (यीस्ट) या कवकातील धानीत चारच धानीबीजुके बनतात.

asexual
अलिंग, निर्लिंग, अलिंगी, अलैंगिक लिंगभेदयुक्त प्रजोत्पादनाचा संबंध नसलेली व बीजुकांच्या साहाय्याने घडून येणारी नवीन वनस्पतीची निर्माणपद्धती. a. organ अलैंगिक अवयव लिंगभेदयुक्त लक्षणाचा अभाव दर्शविणारा अवयव, उदा. बीजुककोश a. reproduction अलिंग जनन लिंगभेद

asiphonogamous
अनिनालयुतिक निनालयुति नसलेली (वनस्पती) siphonogamous

aspect
१ समुखांश २ प्रभाव १ सूर्यप्रकाश वारा पाऊस इत्यादींच्या समोर असण्याच्या प्रक्रियेचे प्रमाण २ वनश्रींच्या किंवा एखाद्या पादपसमुदायाच्या स्वरुपावर बदलत्या ऋतुमानाचा परिणाम.

aspection
ऋतुप्रभाव भिन्न हवामानाच्या कालाचा वनस्पति समुदायावर होणारा परिणाम अथवा दृश्य स्वरुपातील बदल.

asper
खर्बर केस किंवा बारीक पुटकुळ्या यामुळे आलेला खडबडीतपणा उदा. पराया (Streblus asper Lour).

assay, biological
जैव आमापन जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले मूल्यमापन, नियंत्रित परिस्थितीत एखाद्या पदार्थाचा सजीवावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यमापन, उदा. गवतांचे पशुखाद्य या दृष्टीने मूल्य निश्चित करण्यास शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करणे.

assimilability
सात्मीकरणक्षमता शरीरात वर वर्णन केल्याप्रमाणे सामावुन घेण्याचे सामर्थ्य

assimilation
सात्मीकरण, समावेशन बाहेरुन घेतलेले अन्नघटक शरीरात सामावून घेणे अथवा शरीराशी एकरुप बनविण्याची प्रक्रिया, यामध्ये अन्नघटकांची रुपांतरे अभिप्रेत आहेत.

association
संगति, साहचर्य पादपीय समाजशास्त्रातील नैसर्गिक मूलभूत एकक, विशिष्ट पादपीय संघटना, स्थलविषयक घटकातील ऐक्य व स्वरुपदृष्ट्या असलेली एकता इ. वैशिष्ट्ये असलेला वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय. अनेक वनस्पतींच्या समुदायातील दोन किंवा अधिक प्रधान जाती सतत एकत्र वाढल्य

association of species
जाति संगति, जाति साहचर्य दोन किंवा अधिक जाती नियमितपणे वारंवार एकत्र (जवळ जवळ) वाढण्याची घटना.

associes
वर्धी संगति विकासावस्थेत असलेला (म्हणून अस्थिर) वनस्पतींचा विशिष्ट समुदाय. association.

assortment
व्यवस्थापन एकत्र असलेल्या भिन्न वस्तू (किंवा गुण) भिन्न गटामध्ये विभागून ठेवण्याची प्रक्रिया उदा. आनुवंशिकीमध्ये एका व्यक्तीत आईबापाकडून आलेले पर्यायी (वैकल्पिक) गुण (घटक) स्वतंत्र राहून प्रजोत्पादनानंतर पुढच्या पिढीत (संततीत) भिन्न अपत्यांत स्वतंत्रपणे उ

aster stage
तारकावस्था कोशिकेतील प्रकलांच्या विभाजनात स्वतंत्र झालेली रंगसूत्रे कोशिकेच्या मध्यावर वर्तुळाकार मांडली गेल्याने ताऱ्याप्रमाणे भासणारे दृश्य, mitosis

Asteraceae
सूर्यफुल कुल, ऍस्टरेसी, कंपॉझिटी compositae

asymmetrical
असमात्र, असममित शरीराच्या किंवा विशिष्ट अवयवांच्या बाबतीत प्रमाणबद्धतेचा अभाव, त्यामुळे कोणत्याही पातळीने त्या शरीराचे किंवा अवयवाचे दोन सारखे भाग करता येत नाहीत, उदा. निवडुंगाचे फूल

atmometer
बाष्पीभवनमापक वाफेच्या रुपाने हवेत जात असलेल्या पाण्याचे मापन करणारे उपकरण, एक सच्छिद्र मृत्तिकापात्र potometer

atom
अणु रासायनिक मूलद्रव्याचा सर्वात लहान घटक.

ATP
एटीपी (ऍडिनोसीन ट्रायफॉस्फेट) वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या सजीव द्रव्यात सदैव आढळणारा व ऊर्जासंचय करणारा आद्य रासायनिक पदार्थ (संयुग), ही ऊर्जा ऑक्सिडीकर विक्रियांत (कार्बाएहायड्रेट, प्रथिने व मेदी संयुगे यांच्या ऑक्सिडीकरणात) निर्माण होते व तिचा

atrophy
अपक्षयः, पुष्टिरोध शरीरावयवांच्या अगर विशिष्ट ऊतकांच्या किंवा कोशिकांच्या आकारमानात घट होणे, पोषणातील दोष किंवा रोग ही कारणे त्यास जबाबदार असतात, केव्हा तर अवयव अर्धवट बनतो अगर पूर्णपणे लोप पावतो.

atropous
ऊर्ध्वमुख किंजपुटात बीजकरंध वर असलेले (सरळ बीजुक), उदा. सायकस orthotropus

attached
अभिलग्न चिकटलेली (वनस्पती), एक अवयव किंवा काय दुसऱ्यास चिकटून असलेला, उदा. दगडफूल, शैवल

attachment
अभिलाग १ चिकटून असण्याची वृत्ती किंवा घटना उदा. परागकोश केसरतंतूस चिकटून असण्याचा प्रकार २ रंगसूत्रातील तर्कयुजाचे स्थान centromere

attenuate
निमुळते क्रमाने अरुंद होत गेलेले उदा. कांद्याची पात, काही काटे

auricle
कर्णिका मनुष्याच्या बाह्य कानाच्या खालच्या भागाप्रमाणे दिसणारा भाग (पानाचा तळभाग) उदा. नेफोलेपिस, नेचा, तरवडीची (Cassia auriculate L.) उपपर्णे

auricled
सकर्णिक, पातिवत्, कर्णिकाभ कर्णिकाप्रमाणे पात्याचा तळ असलले (पान), उदा. सालीट, मका, चांदवेल

autecology
स्वस्थलविज्ञान, स्वपारिस्थितिकी एखादी वनस्पती जेथे निसर्गतः उगवते, वाढते, फुलते व तेथील परिस्थितीशी एकरुप होते त्यासंबंधीची (ते स्थल व ती वनस्पती यांचे परस्परसंबंधदर्शक) माहिती synecology

authority
प्राधिकारी, कर्ता एखाद्या कुलाचे, वंशाचे किंवा जातीचे नाव ज्या शास्त्रज्ञाने प्रथम प्रसिद्ध केले ती व्यक्ती उदा. Liliaceae Adanson या नावात अंतर्भूत केलेली व्यक्ती (Adanson).

autoecious
एकस्थ एकाच आश्रय वनस्पतीवर संपूर्ण जीवन काढणारी (वनस्पती) उदा. कवकापैकी काही जाती (काणी तांबेरा, मूळकूज इ.)

autoecism
एकस्थितत्त्व, एकस्थत्व एकाच आश्रयावर वाढण्याची क्षमता

autogamy
आत्मयुति केवळ स्वतःच्याच (शरीरातील, फुलातील) पुं व स्त्री गंतुकांचा संयोग

autogenesis
स्वयंजनन पूर्वी सजीव रुपात नसलेल्या कोणत्याही वस्तूपासून होणारी सजीवाची निर्मिती, हा समज अनेक वर्षे प्रचलित होता  abiogenesis  spontaneous generation

autogenic
स्वयंजात, स्वजात, स्वयंजनित स्वतःपासून निर्माण झालेले

autogenic succession
स्वजात (स्वयंजनित) अनुक्रमण, स्वानुक्रमण वनस्पतींच्या समुदायाच्या स्थलातील बदल त्यांच्या प्रक्रियेमुळेच घडून आल्याने त्यात हळूहळू फरक पडून त्याचे अंतिम अवस्थेत रुपांतर होण्याची प्रक्रिया allogenic succession.

autogenous
स्वयंभव, स्वजात एकाच जातीतील अनेक वनस्पतींत (अथवा प्राण्यांत) दिसणारा, पण स्वसंपादित नसलेला (भेद, गुण, लक्षण).

autonomous
स्वयंप्रेरित, स्वायत्त शरीराबाहेरील चेतकाशिवाय घडून येणारे, उदा. कोशिकेतील प्राकलाची भ्रमंती, खोडाच्या टोकाची नागमोडीसारखी वाढ (प्रच्यवन) cyclosis, nutation  spontaneous

autonomy (of characters or factors)
गुणघटकांचे स्वातंत्र्य (स्वायत्तता) आनुवंशिक गुणांचे,लक्षणांचे किंवा लक्षणांबद्दल जबाबदार असलेल्या घटकांचे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरताना परस्परांवर अवलंबून नसणे

autophyte
स्वोपजीवी आपले अन्न स्वतः बनविणारी वनस्पती, दुसऱ्या सजीव किंवा मृत जीवावर अवलंबुन नसणारी वनस्पती.

autopolyploidy
समगट गुणन व्यक्तीच्या शरीराच्या कोशिकेतील रंगसूत्रांची संख्या तिप्पट, चौपट इ. अशी असून ते सर्व संच एकाच जातीच्या वनस्पतीतून गुणनामुळे आलेले असण्याचा प्रकार allopolyploidy

autosome
अलिंग रंगसूत्र लिंगभेदांशी संबंध नसलेले गुणसूत्र chromosome

autotroph
स्वोपजीवी, स्वयंजीवी, स्वयंपोषी निर्वाहाकरिता दुसऱ्या सजीवावर किंवा मृत शरीरावर अवलंबून नसणारा स्वतंत्र (सजीव), उदा. सर्व हिरव्या वनस्पती autotrophic

autozygous
स्वयंयुग्मनजी, स्वरंदुकी स्वतःच निर्मिलेली स्त्री व नर गंतुके एकत्र होऊन बनलेल्या रंदुकाने प्रजोत्पादन करणारी

autumn wood
शरद्काष्ठ हिवाळ्यात तयार होणारा लाकडाचा (प्रकाष्ठाचा) भाग, वसंतऋऋतूत तयार होणाऱ्या लाकडापासून हा ओळखता येतो, दोन्हींचे मिळून एक वार्षिक वलय बनते annual ring

auxilliary
साहाय्यक विशेषप्रकारे मदत देणारी (कोशिका) उदा. लाल शैवाले

auxin (hormone)
वृद्धिसंप्रेरक, ऑक्सिन वनस्पतींत वाढीसंबंधी महत्त्वाचे कार्य घडवून आणणारा रासायनिक पदार्थ (दूत), प्राण्यांमध्ये अनेक नलिकाहीन प्रपिंडातून असा अंतःस्त्राव रक्ताद्वारे शरीरात पसरविला जातो. प्रकाशाच्या दिशेकडे खोड वळते याचे कारण प्रकाशाचा परिणाम ह्या संप्रेरकावर होतो

auxonometer
वृद्धिमापक वनस्पतीतील वाढ (लंबन) मोजण्याचे उपकरण

available
उपलब्ध, प्राप्य प्राप्त करून घेता येण्यासारखे

awl shaped
आराकृति तळापासून टोकाकडे निमुळते होत गेलेले (चांभाराच्या आरीसारखे) निरुंद व टोकदार, उदा. एरिओकॉलॉन व आयसॉएटिस यांची पाने subulate

awn
प्रशूक गवते व शूकधान्ये यांच्या परितुषावर किंवा इतरत्र वाढलेले राठ केसासारखे उपांग उदा. Berberia aristata DC दारुहळद arista

axial
अक्षीय अक्षावरचे, अक्षासंबंधी axis

axil
कक्ष, कक्षा बगल, खोडास पान चिकटलेले असते तेथील बगलेसारखा (कोनासारखा) भाग

axile
अक्षलग्न अक्षाला (आसाला) चिकटून वाढलेले a. placentation अक्षलग्न बीजकविन्यास किंजपुटातील फक्त आसालाच चिकटून असणारी बीजकांची मांडणी, उदा. नागदवणा

axillary
कक्षस्थ, कक्षास्थ, कक्षीय पानाच्या किंवा छदाच्या बगलेत असलेला (अवयव), उदा. कळी, फूल, शाखा, काटा इ. उदा. काळा माका (Caesulia axillaris Roxb.)

axis
आस, अक्ष प्रमुख आधारभूत कण्यासारखा अवयव, उदा. खोड, फुलोऱ्याचा दांडा इ. a. daughter जन्याक्ष, उपाक्ष मुख्य दांड्यावर असलेला दुय्यम प्रतीचा अक्ष a. embryonic गर्भाक्ष गर्भावस्थेतील वनस्पतीचे अक्ष a. median अग्रपश्च अक्ष अग्रस्थ व उलट बाजूचा (तलस्थ) भाग

azure
निळा आकाशाप्रमाणे रंग असलेला

azygospore
अगंतुबीजुक (दोन सारख्या प्रजोत्पादक कोशिकांपैकी फक्त एकापासूनच संयोगाशिवाय बनवलेली प्रजोत्पादक कोशिका उदा. म्युकर उदा. भ्यूकर बुरशी, स्पायरोगायरा शैवल इ. parthenospore

azygous
अजोज पिसासारख्या संयुक्त पानाच्या मध्यशिरेवरच्या एकाद्या लसाल उलटी बाजूस दलाचा अभाव असण्याचा प्रकार unpaired

bacca
मृदुफळ आठळी (बाठा) नसलेले मगजयुक्त किंवा रसाळ साधे फळ उदा. केळ, संत्र, पेरु, बहुधा यातील कठीण बिया भगजात विखुरलेल्या असतात. उदा. बिर्मी (Taxus baccata L.) (baccate, fruit , berry)

Bacillariophyease
करंडक वर्ग Diatomaceae

bacillus
दंडाणु साधारणपणे अत्यंत साधी, अतिसूक्ष्म, एककोशिक, लांबट, हरितद्रव्यहीन, परोपजीवी वनस्पती, कधी कधी ही संज्ञा बीजुकजनक दंडाणूंच्या वंशालाच फक्त वापरतात. उदा. विषमज्वर व धनुर्वात इत्यादींचे रोगकारक सूक्ष्मजंतू bacterium

back cross
पूर्वसंकर संकरजाच्या आईबापापैकी एकाशी केलेला (झालेला) त्याचा संकर, या प्रयोगामुळे आनुवंशिक लक्षणांचे अनुहरण कसे होते यावर प्रकाश पडतो.

bacteriocidal
जंतुनाशक सूक्ष्मजंतुंचा नाश घडवून आणणारे (द्रव्य)

bacterioid
विकृतजंतू शारीरिक बिघाड झालेला जंतू, शिंबी (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या मुलावरील गाठीत हे जंतु आढळतात.

Bacteriology
सूक्ष्मजंतुशास्त्र सूक्ष्मजंतूसंबंधी सर्व तपशीलवार माहितीची विज्ञान शाखा

Bacteriophage
सूक्ष्मजंतुभक्षी सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे

bacteriosis
सूक्ष्मजंतुविकृति सूक्ष्मजंतुपासून उद्भवलेला रोग

bacteriostatic
सूक्ष्मजंतुरोधक सूक्ष्मजंतूंची वाढ थांबविणारे

Bacterium
शाकाणु, जीवाणु, सूक्ष्मजंतु साधी, अतिसूक्ष्म, एककोशिक, भिन्न आकार दर्शविणारी, हरितद्रव्यहीन, परोपजीवी वनस्पती, काही हालचाल करतात. काही स्वोपजीवी (स्वावलंबी) व काही मृतोपजीवी व जीवोपजीवी असतात. कुजणे, आंबणे, नासणे इत्यादी प्रक्रिया घडविण्याचे व प्रकाश, रंग

bacteroid
सूक्ष्मजंतुसम सूक्ष्मजंतुसारखे

balausta
दाडिमक, दाडिमसम डाळिंबासारखे फळ, बीजाभोवती रसाळ आवरण असणारे व अधःस्थ किंजपुटापासून बनलेले मृदुफळ, bacca

Balsaminaceae
तेरडा तेरणा कुल, बाल्समिनेसी रिठा (्अरिष्ट) गणातील फुलझाडांचे एक लहान कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी हल्ली जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) केला आहे. बेंथॅम व हूकर यांनी यातील वनस्पतींचा समावेश जिरनिएसी कुलात (भांड कुलात) केला आहे. तेरडा कुलात दोन वंश व सुमारे

banner
ध्वजक पतंगरुप फुलात आढळणारी मोठी, रुंद व ठळकपणे दिसणारी पाकळी, उदा. गोकर्ण, तूर, अगस्ता papilionaceous.

barbate
लंबकेशी मऊ लांबट केसाचे पुंजके असलेले bearded

bare area
अनावृत क्षेत्र, नग्न प्रदेश वनस्पतीची वस्ती ज्यावर अद्याप झाली नाही किंवा असलेली पूर्णपणे नाश पावलेली आहे अशी भूमी.

bark
वल्क, साल जुन्या काष्ठमय खोडाची किंवा मुळाची बाहेरुन संरक्षण करणारी बव्हंशी मृत कोशिकांची बनलेली साल, वल्क या संज्ञेत सजीव त्वक्षाकरासह त्यावरील सर्व मृतकोशिकांचे थर समाविष्ट करतात. cork cambium, cork, ring bark, scale bark

barren
१ ऊषरा २ वंध्य, वांझ १ जीवनास आवश्यक त्या परिस्थितीच्या अभावी नापिक राहिलेली जमीन उदा. वाळवंट, खडकाळ किंवा हिमाच्छादित प्रदेश २ फळ किंवा कार्यक्षम बीज न बनवणारे (फूल) उदा. लागवडीतील केळ, अलू, गुलाब इ. b. bract वंध्यछद बगलेत फूल नसलेले छद उदा. अननस b.

barrier
प्रतिबंधक, अवरोधक, रोधक अडसर, अडथळा करणारे, वनस्पतींच्या जातींच्या मुक्त प्रसाराला मर्यादा घालणारा घटक, उदा. उंच पर्वत, प्रतिकूल हवामान, महासागर इ.

basal
तलोद्भव, तलीय, तल किंजपुटात तळापासून उगम पावलेले, उदा. सूर्यफुलाचे बीजक basilar

basal cell
तलीय कोशिका, आधार कोशिका

base
तळ, तल वनस्पतींच्या अवयवांचा तळचा भाग basis

Basellaceae
मयाळ (उपोदकी) कुल, बॅसेलेसी Chenopodiaceae

basidiocarp
गदाफल गदाकवक वर्गात बहुतेक आढळणारा व गदाकोशिका आणि त्यावरची गदाबीजुके निर्माण करणारा प्रजोत्पादक अवयव

Basidiolichens
गदा शैवाक Lichens

Basidiomycetes
गदाकवक वर्ग, बेसिडिओमायसेटिज सत्यकवकांपैकी काहींमध्ये विशिष्ट प्रकारची गदेसारख्या बीजुककोशावर निर्माण होणारी गदाबीजुके निर्माण करणारा एक गट, उदा. भूछत्रे, तांबेरा, काणी इ. Eumycetae, Eubasidii, Hemibasidii  (Basidiomycetae)

basidiospore
गदाबीजुक गदाकवकामध्ये आढळणारे व गदेसारख्या कोशिकेबाहेर निर्माण होणारे एककोशिक व एकगुणित बीजुक (प्रजोत्पादक अलिंग कोशिका).

basidium
गदाकोशिका गदाकवकात आढळणारी विशिष्ट, काहीशी गदेसारखी व प्रजोत्पादक, अखंड किंवा विभागणारी कोशिका, हिच्या टोकावर दोन किंवा चार बीजुके बनून ती सुटून जातात व रुजल्यावर नवीन एकगुणित कवकतंतूंचे जाळे बनते. गदाबीजुके बनण्यापूर्वी गदाकोशिकेत द्विगुणित प्रकल असतो. बीजुके बनण्यापूर्वी न्यूनीकरण विभाजनाने एकगुणित प्रकल बनतात व प्रत्येक बीजुकात एक याप्रमाणे प्रवेश करतात.

basifixed (innate)
तलबद्ध केसरतंतूच्या टोकावर तळाशी चिकटलेला (परागकोश) उदा. टाकळा, तरवड इ.

basilar
तलोद्भव basal

basipetal
तलवर्धी टोकापासून तलाकडे क्रमाने होणारी (फुलोऱ्याची) वाढ, यामुळे सर्वात जून भाग (उदा. फुले) टोकाजवळ व सर्वात कोवळा (अपक्व फुले, कळ्या) तळाजवळ असा प्रकार, उदा. जाई, चमेली, रानटी गुलाब यांचे फुलोरे acropetal, centripetal

bast
परिकाष्ठ वनस्पतींच्या शरीरात अन्नरसाची ने-आण करणाऱ्या जिवंत, लांबट कोशिका (सछिद्र नलिका) व त्यासमवेत आढळणाऱ्या इतर कोशिका, सूत्रे इत्यादींचा संच (ऊतक) b. fibre परिकाष्ठ सूत्र परिकाष्ठातील दृढ आवरणाच्या लांब व मजबूत कोशिका b. hard उपकाष्ठ परिकाष्ठालगतचा

beaded
मणिमालाकृति अनेक गाठींचे बनलेले व मण्यांच्या माळेप्रमाणे दिसणारे, उदा. काही मुळे, काही लाल शैवलाचे तंतू, काही केसरदलावरचे केस monoliform

beak
चंचू अवयवाचा किंवा त्यावरील लांबट टोकदार (चोचीसारखा) भाग

beard
प्रशूक awn

Begoniaceae
शोभापर्ण कुल, बिगोनिएसी बिगोनिया, बिगोनिएला इत्यादी चार लॅटिन नावाच्या वंसातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल. बेसींनी यांचा अंतर्भाव लोझेलीझ गणात व हचिन्सन यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ) केला आहे. तत्पूर्वी बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गणात केला होता. प्रमुख लक्षणे - बहुवर्षायु, भूमिस्थित खोडाच्या औषधीय वनस्पती, काही मुळांच्या साहाय्याने वर चढणाऱ्या वेली, मूलज, सोपपर्ण किंवा एकाआड एक, असमात्र ,साधी पाने, बगलेतील लहान ग्रंथिल अवयव किंवा पानाचे तुकडे यांपासून नवीन वनस्पती बनतात. फुले एकलिंगी, परिदले सुटी, नरफुलात दोन किंवा चार परिदले व स्त्री फुलात दोन ते पाच, केसरदले अनेक, जुळलेल्या दोन ते तीन अधःस्थ किंजदलापासून बनलेल्या किंजपुटात दोन ते तीन कप्पे व त्यात अनेक अधोमुखी बीजके, पंखयुक्त बोंड व अपुष्क बिया, शोभादायक पानांमुळे शोभापर्ण कुल असे या कुलाला म्हटलेले आढळते.

bell jar
घंटापात्र, हंडी घंटेच्या आकाराचे प्रयोगाकरिता वापरात असलेले खाली अधिक रुंद व वरच्या बाजूस थोडे निरुंद व फुगीर असे काचपात्र

bell shaped
घंटाकृति फुलातील घंटेच्या आकाराचा संवर्त किंवा पुष्पमुकुट उदा. लाल भोपळा, पिवळी कण्हेर इ. campanulate

belt life
जैवपट्ट वनस्पतींच्या (पादप) समुदायांच्या भौगोलिक वाटणीवरुन केलेल्या वर्गीकरणातील कमी पातळीवरचे एकक, जैव जिल्हे व जैव प्रांत हे अनुक्रमे त्यापेक्षा वरच्या पातळीतील आहेत. zonation.

belt transect
अनुच्छेदी पट्ट वनस्पतींच्या मोठ्या समुदायातील नमुन्यादाखल निश्चित केलेल्या क्षेत्रातील एक अरुंद जमिनीचा पट्टा, यातील वनस्पतींची मोजदाद वगैरे करून त्या समुदायातील पादपसंघटनाची माहिती घेण्याची पद्धत आहे.

Bennettitales
बेनेटायटेलीझ मध्यजीव महाकल्पातील विलुप्त प्रकटबीज वनस्पतीचा गण, बाह्यरुप, खोड व पान यांची संरचना सायकॅडेलीझ प्रमाणे. दोन्ही प्रकारची बीजुकपर्णे एकाच शंकूत असतात Cycadales, Gymnospermae

benthos
जलतलस्थ जीवसमूह खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात तळाशी राहून जगणारा प्राणी वा वनस्पती यांचा समूह plankton, nekton, pelagic

berry
मृदुफळ bacca  (beccate fruit)

Betulaceae
भूर्जकुल, बेच्युलेसी भूर्ज, हॅझेल, कुनिस इत्यादी द्विदलिकित प्रारंभिक (किंवा ऱ्हसित) वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) सर्वसाधारणपणे केला जातो. तत्पूर्वी नतकणिश गणात (ऍमेटिफेरी) किंवा ओक गणात (क्कर्सिफ्लोरीत) केला जात असे. प्रमुख लक्षणे

bi-
द्वि-, दु-, द्विगण-, उभय दोन, दोनदा, दोन्हीने युक्त या अर्थाचा उपसर्ग

bicarpellary
द्विकिंज दोन किंजदलापासून बनलेला (किंजपुच, किंजमंडल) उदा. रुई,सदाफुली इ. bicarpellate

biciliate
द्विकेसली दोन केसले असलेली (कोशिका), उदा. काही शैवले (क्लॅमिडोमोनॅस) अथवा त्यांची गंतुके (क्लॅडोफोरा, उल्व्हा इ.) cilium. gamete

bicollateral
द्विसंलग्न दोन बाजूंनी वेढलेला, प्रकाष्ठाच्या दोन्ही बाजूस ऊतककर व परिकाष्ठ असलेला (वाहकवृंद), उदा. काकडीचे खोड vascular bundle

bicolor
द्विवर्णी, दुरंगी पानाचे वरचे व खालचे पृष्ठ भिन्न रंगाचे असलेले उदा. बिगोनिया, ताराफळ, कमळ, ट्रॉडेस्कॅन्शिया, उदीचिराइत Exacum bicolor Roxb. two coloured

bicrenate
द्विस्थूलदंतुर पानाच्या कडेवरचे बोथट दाते पुन्हा प्रत्येक दात तसाच बोथट दात्यांनी भरलेला असणे crenate

bicuspidate
द्विकंटकाग्र दोन तीक्ष्ण काटे असलेल्या टोकाचे (पान)

bidentate
द्विप्रदंतुर बाहेर वळलेले पानाच्या कडेवरचे दाते, पुन्हा तसेच दारेरी असण्याचा प्रकार dentate

biennial
द्विवर्षायु बीरुजल्यापासून ते पुन्हा बीजाची निर्मिती व त्यानंतर मृत्यु या सर्व घटना दोन वर्षात संपविणारी (वनस्पती), कोबी, मुळा, गाजर इ.

bifacial
द्विपार्श्व वरचा व खालचा असे दोन भिन्न पृष्ठभाग असलेले (पान व खोड) उदा. जमिनीवर सरपटणाऱ्या वेलीचे (रताळे) किंवा जमिनीत आडवे वाढत असणाऱ्या वनस्पतीचे (आले, कर्दळ) खोड, खोडाशी काटकोन करून वाढणारे पान (जास्वंद, रुई, पेरु इ.) dorsiventral

bifid
द्विभिन्न एकाचे दोन भाग झालेले उदा. पान, पाकळी इ.

biflagellate
द्विप्रकेसली दोन प्रकेसले असलेली (कोशिका) flagellum

biflorus
द्विपुष्पी दोन दोन फुले येणारे उदा. कुळीथ (Dolichos biflorous L.)

bifoliar (spur)
द्विपर्णी (प्ररोह) फक्त दोनच पाने असणारा (प्ररोह) उदा. चीड (पाइन) dwarf shoot.

bifoliate
द्विदली दोन दले असलेले संयुक्त पान, उदा. अंजन (Hardwickia binata Roxb.), हिंगण इ. binate, bifoliolate

bifurcate
द्विविध, द्विभक्त द्विधा झालेले, दुभंगलेले उदा. किंजल्क, किंजल, अक्ष

biglandular
द्विप्रपिंडी दोन प्रपिंड (स्त्रवणाऱ्या ग्रंथि) असलेले उदा. चेंडूफळ (Parkia biglandulosa W A)

Bignoniaceae
टेटू कुल, बिग्नोनिएसी आकाशनिंब, टेटू, पाटल, वाघनखी, मेढशिंगी, कारंजवृक्ष, खडशिंगी, निळा गुलमोहोर (जॅकरंदा) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी पर्साएनलीझ व बेसीनी नीरबाम्ही गणात (स्क्रोफ्यूलारिएलीझमध्ये) केला आहे. याची प्रमुख लक्षणे - वृक्ष व मोठ्या वेली, संयुक्त, पिसासारखी व समोरासमोर पाने, द्विलिंगी, अनियमित आकर्षक फुले, संदले जुळलेली, पुष्पमुकुट द्व्योष्ठक व जुळलेल्या पाकळ्यांचा, चार केसरदलांपैकी दोन लांब, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे, बोंडात सपक्ष बिया

bilabiate
द्व्योष्ठक दोन ओठांप्रमाणे (संवर्त किंवा पुष्पमुकुट) उदा. तुळस, अडुळसा इ. b. personate द्व्योष्ठक संवृत पाकळ्यांच्या खालच्या ओठावरील उंचवट्यामुळे तोंडाचे भोक फार लहान असणारे, उदा. हरणखुरी b. ringnet द्व्योष्ठक विवृत पाकळ्यांचे दोन्ही ओठ उघडलेल्या

bilateral
द्विपार्श्व दोन बाजु (डावी व उजवी), वरची व खालची) असलेले, दोन्ही बाजूवर असलेली (उदा. पाने) b. symmetry द्विपार्श्व समात्रता परस्परांशी काटकोन करणाऱ्या दोन पातळ्यांनी किंवा एकाच पातळीने विभागल्यावर दोन सारखे अर्ध होणारी (संरचना)

bilaterally symmetrical
द्विपार्श्व समात्र दोन किंवा एका पातळीने विभागल्यावर दोन सारखे अर्ध होतात असा (अवयव, बहुधा फूल)

bilobed
द्विखंडी, द्विपाली, द्विखंडित दोन भाग पडलेले, उदा. कांचन, मर्यादवेल यांची पाने, काही परागकोश (गारवेल, सॅल्व्हिया) गिंको (Gingko biloba), मर्यादवेल (Ipomoea biloba Forsk) ही शास्त्रीय नावे द्विखंडी पानांची सूचक आहेत. bilobate

bilocular
द्विपुटक १ दोन कप्पे असलेला (किंजपुट) उदा. मोहरी, कोथिंबीर २ दोन कप्यांचे (परागकोश) anther  (two celled)

bimerous
द्विभागी प्रत्येक मंडलात दोनच भाग असलेले (फूल) उदा. मोहरीकुल dimerous

binary
द्वैती दोन भागांचा, दोन मूलतत्त्वांचा, जोड्यांचा संबंध येत असलेला b. fission द्विभाजन, द्वैती विभाजन प्रत्यक्षपणे एका कोशिकेच्या दोन बनणे, उदा. काही सूक्ष्म वनस्पती व प्राणी

binomial nomenclature
द्विपद नामकरण वनस्पती व प्राणी यांना दोन भाग असलेल्या संज्ञांनी व्यक्त केली जाणारी शास्त्रीय नावे देण्याची पद्धती, यापैकी पहिला भाग वंशनाम व दुसरा त्या वनस्पतीचे (किंवा प्राण्याचे) जाति वैशिष्ट्यदर्शक असतो, एकाच वंशनामाच्या अनेक जाती असतात त्यावेळी भिन्न जातींतील आप्तभाव या पद्धतीने सहज कळून येतात. उदा. वड, पिंपळ, अंजीर व उंबर यांच्या शास्त्रीय नावांतील वंशनाम (Ficus) यावरुन त्या एकाच वंशातील जाती आहेत हे कळून येते. तसेच जातिवाचक नामावरुन प्रत्येकाचे वैशिष्ट्य कळून येते (Ficus benghalensis, F. religiosa, F. carica, F. glomerata इ.), हल्ली या लॅटिन नावापुढे मूळ नाव देणाऱ्या शास्त्रज्ञांचे संक्षिप्त नाव देण्याची पद्धत आहे. (उदा. F. carica L., F.glomerata Roxb.)

binomial system
द्विपदनाम पद्धति दोन भाग असलेली नावे (संज्ञा) वापरण्याची पद्धत, उदा. प्राणी व वनस्पती यांची शास्त्रीय नावे

binucleate
द्विप्रकल दोन प्रकले असलेली (कोशिका) nucleus

biochemistry
जीवरसायनशास्त्र सजीव प्राणी व वनस्पती यांच्या शरीरात चालू असलेल्या किंवा त्यांच्या मध्यस्थीने शरीराबाहेर चाललेल्या रासायनिक प्रक्रियेसंबंधीच्या माहितीचे शास्त्र, उदा. शरीरातील पचन, विघटन, संघटन, ऊर्जानिर्मिती, शरीराबाहेरील कुजणे, आंबणे, इत्यादी सूक्ष्मजंतुद्वारे होणाऱ्या घटना, वितंचन

biociation
जैव संगति विशिष्ट स्थानातील काही वनस्पती व प्राणी यांचा संयुक्त व मोठा समावास, उदा. टंड्रा, आल्पीय शाद्वल (गवताळ प्रदेश), काष्ठवन, मरुवन इ. यांमध्ये वनस्पती व प्राणी यांचे संयुक्त, लहान व अनेक समुदाय असू शकतात.

biocoenosium
जैव समुदाय वनस्पती व प्राणी यांचा नैसर्गिकरीत्या बनलेला एकत्र समुदाय.

biogenesis
जीवजनन विद्यमान व पूर्वी असलेल्या सजीवांपासूनच नवीन जीव उत्पन्न होण्याची नैसर्गिक व सनातन परंपरा abiogenesis

biological
जीवशास्त्रीय, जैव, जीवविज्ञानीय जीवशास्त्रासंबंधी, जीवशास्त्राच्या माहितीचा उपयोग करून, जीवासंबंधी

biological clock
जैव घड्याळ, जैव कालगणक वनस्पती व प्राणी यांच्या शरीरक्रियेत आढळणारी नियमित दैनिक लयबद्धता, प्रकाश व अंधार यांचा शरीरक्रियेवर होणारा परिणाम अटळ असतो व शरीरक्रियेतील लयबद्धता घड्याळाच्या नियमितपणाशी तुल्य असते. परंतु घड्याळाने दर्शविलेल्या कालगणनेशी संबंधित

biological spectrum
जैव वर्णपट एखाद्या मर्यादित विशिष्ट क्षेत्रातील विविध प्राणी व वनस्पती यांच्या उपस्थितीची प्रतिशत (शेकडा) वारंवारता दाखविणारे कोष्टक. b. type (life form) जीवाकृति, जीवरुप सजीवाचे स्वरुप (आकार, आकारमान इ.) पहा life form.

biologist
जीवशास्त्रज्ञ, जीववैज्ञानिक सर्व सजीवांचा पद्धतशीर संपूर्ण अभ्यास केलेला तज्ञ.

biology
जीवशास्त्र, जीवविज्ञान सर्व सजीवांचा संपूर्ण अभ्यास व त्यामुळे उपलब्ध झालेले ज्ञान

bioluminescence
जीवदीप्ती काही जीवांच्या विशिष्ट रासायनिक शारीरिक प्रक्रियेमुळे उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश, यामध्ये वितंचनाचा संबंध असावा. उदा. काजव्यांचा प्रकाश, काही सूक्ष्मजंतू व कवक (भूछत्रे) या घटनेस जबाबदार असतात. वास्तविक ही रासायनिक दीप्ती आहे कारण रासायनिक विक्रियेतून ही घटना होते. काही कुजट लाकडातून असा प्रकाश येतो. तसेच अनेक समुद्रातील प्राणीही या प्रकाशामुळे ओळखू येतात.

biome
जीवसंहति विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीशी समरुप होऊन एकत्र राहणाऱ्या सर्व सजीवांचा सापेक्षतः स्थिर व प्रभावी वनश्रीयुक्त समुदाय, तेथील सर्व सजीवांत एक समतोल आढळतो, उदा. टंड्रा, धुवीय प्रदेश, गवताळ प्रदेश.

biometer
जीवमापक सजीवांचे प्रमाण मोजून निश्चित करण्याची पद्धती, उदा. एखाद्या जमिनीतील मातीच्या नमुन्यात असलेल्या जीवांचे प्रमाण निश्चित करण्याची पद्धत.

biometry
जीवसांख्यिकी सजीवांच्या अभ्यासात गणित व सांख्यिकी यांचा वापर करून बनविलेले शास्त्र व संपादन केलेले ज्ञान. पैतृक अनुहरण (Law of ancestral heredity) आणि पितृपरागति (Law of filial regression) यांचे सिद्धांत अशा अभ्यासानेच काढले आहेत.

bion
स्वतंत्र पादप पूर्णपणे स्वावलंबी वनस्पती. biont

bionomic
स्थलविज्ञानीय, पारिस्थितिकीय परिस्थितीतील घटकांसंबंधी. ecological

biophilous
जीवोपजीवी parasitic. biogenous

biophysics
जीवभौतिकी भौतिक (वास्तव) शास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला सजीवांचा अभ्यास, तपमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब, समुद्रसपाटीपासून उंची इत्यादी घटकांचा सजीवावर होणारा परिणाम अथवा त्यांच्या प्रतिक्रिया, भौतिक नियमाप्रमाणे घडून येणाऱ्या शारीरिक प्रक्रिया

bioplasm
जीवद्रव्य सर्व सजीवांतील मूलभूत जिवंत पदार्थ protoplasm

biosphere
जैवगोल, जीवावरण जेथे जीवन शक्य होते असा पृथ्वीभोवतालचा भाग, यामध्ये जमीन, पाणी व वातावरणाचा काही भाग समाविष्ट होतो.

biota
स्थानिक जीव विशिष्ट स्थानातील (स्थानिक) प्राणी व वनस्पती.

biotic
जैव जीवासंबंधी, जीवनविषयक b. adaptation जैवानुकूलन इतर वनस्पतीशी यशस्वी स्पर्धा करण्यास स्वरुपात व शरीरक्रियात फरक पडून परिस्थितीशी समरस होण्याची घटना. b. climax जैव चरमावस्था सजीवांनी निश्चित केलेली वनस्पतीसमुदायाची अंतिम अवस्था, उदा. आगीमुळे किंवा

biotic
जैव जीवासंबंधी, जीवनविषयक b. adaptation जैवानुकूलन इतर वनस्पतीशी यशस्वी स्पर्धा करण्यास स्वरुपात व शरीरक्रियात फरक पडून परिस्थितीशी समरस होण्याची घटना. b. climax जैव चरमावस्था सजीवांनी निश्चित केलेली वनस्पतीसमुदायाची अंतिम अवस्था, उदा. आगीमुळे किंवा

biotine
बायोटीन एच जीवनसत्त्व, यीस्ट या सूक्ष्म कवकाच्या वाढीस आवश्यक कार्बनी पदार्थ

biotype
जैव समुदाय b. (physiological race) १ क्रियावैज्ञानिक वाण २ समजननिक वाण ३ जनुकविद्या १ शरीर क्रियांमधील फरक दर्शविणारा त्याच जातीतील लहान प्रकार २ वांशिक (जनुक संचाच्या) दृष्टीने ऐक्य असलेली दुसरी व्यक्ती अथवा अनेक व्यक्तींचा गट ३ स्थानिक समुदायातील सारखी

biovulate
द्विबीजकी दोन बीजके असलेला (किंजपुट) किंवा खवला, उदा. गिंको, थुजा

biparous
द्विपद अक्षाच्या टोकापासून दोन्ही बाजूस वाढलेला b. cyme द्विपद वल्लरी मुख्य अक्षावर शेंड्याला फूल येऊन वाढ खुंटते व नंतर दोन्ही बाजूस दोन फुले येतात, ती साधी वल्लरी उदा. जाई, मोगरा इ. अधिक जटिल प्रकारात त्याऐवजी बाजूस दोन उपाक्ष येऊन त्यांना प्रत्येकी

bipinnate
द्विगुण पिच्छाकृति पिसासारखी दलांची मांडणी असलेल्या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्ष) दोन्ही बाजूस असलेली दले पुनश्च तशीच विभागलेली असण्याचा प्रकार, उदा. गुलमोहोर, बाभूळ, संकेश्वर, कॉसमॉस (Cosmos bipinnatus Cav.) इ.

bipolar
द्विधुवी दोन टोके असलेले, कोशिकेतील प्रकलाची अप्रत्यक्ष विभागणी सुरु असता प्राकलाचे अनेक धागे तर्कूसारख्या (घोट्यासारख्या) आकृतीत बांधले गेल्यामुळे दोन टोके असलेली व मध्ये फुगीर असलेली मांडणी

bipolar spindle
द्विधुवी लुंठ (तर्कू) वर वर्णन केलेली तर्कूसारखी आकृती

biseriate
१ द्विश्रेणीबद्ध २ द्विमंडलित १ दोन रांगांत असलेले २ दोन वर्तुळे असलेले उदा. संवर्त व पुष्पमुकुट

biserrate
द्विगुणदंतुर पानाच्या दातेरी कडेवरील दाते पुनश्च दातेरी असण्याचा प्रकार serrate

bisexual
द्विलिंगी, आंतरराष्ट्रीय चिन्ह ४ + नर व स्त्री प्रजोत्पादक अवयव निर्माण करणारे (दोन्ही अवयव एकाच व्यक्तीवर असणारे) उदा. फूल, वनस्पतीची पिढी. बहुतेक प्राण्यांत दोन स्वतंत्र व्यक्तीवर हे अवयव असतात. काही वनस्पतींत दोन प्रकारची फुले (नर व मादी) एकाच झाडावर (

bispinose
द्विकंटकित दोन काटे किंवा तत्सम उपांगे असलेले उदा. शिंगाड्याचे (Trapa bispinosa Roxb.) फळ.

bisporangiate
द्विबीजुककोशिक दोन प्रकारचे बीजुककोश असलेले अवयव (शंकू, फूल) अथवा वनस्पती

bisporic
द्विबीजुकी लघु व गुरु अशी दोन प्रकारची बीजुके असलेली (वनस्पती), उदा. सिलाजिनेला, मार्सिलिया, सायकस इ. bisporangiate या संज्ञेला हाच मराठी पर्याय वापरता येईल, कारण दोन प्रकारच्या बीजुककोशात ती बीजुके बनतात sporangium, spore  bisporous

bistipular
द्वयोपर्णी दोन उपपर्णे असणारी उदा. कापूस, जास्वंद, गुलाब इत्यादींची पाने (bistipulate)

biternate
द्विगुण त्रिदली तीन दले असलेल्या संयुक्त पानाचे प्रत्येक दल पुनरपि तिन्हीत विभागून तीन दलके असलेले, ternate

bivalent chromosomes
द्वियुजी रंगसूत्रे कोशिकेच्या न्यूनीकरण विभागणीत एकत्र येऊन जोडी जमविणारी समरचित रंगसूत्रे, यापैकी एक नर-गुंतकातून व दुसरे स्त्री गुंतकातून आलेले असून त्यावरील जनुके वैकल्पिक किंवा अविभाज्य गुणाबद्दल जबाबदार असतात. gene, allelomorph, gamete

Bixaceae
केसरा कुल, बिक्सेसी केसरी (कडुकवीठ), बिक्सा व इतर दोन वंशांतील जातींचे फार लहान द्विदलिकित वनस्पतींचे कुल, प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, सोपपर्ण, अखंड, एकाआड एक पाने, द्विलिंगी पंचभागी फुले, केसरदले अनेक, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात अनेक बीजके, बोंडात अनेक सपुष्प बिया असतात. केसरी (Bixa orellana L.)

Blackman reaction
ब्लॅकमन विक्रिया प्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) करण्याच्या वनस्पतींतील प्रक्रियेत प्रकाशाच्या अभावी घडून येणाऱ्या सर्व रासायनिक विक्रिया, यानाच तिमिर विक्रिया म्हणतात. ब्लॅकमन या शास्त्रज्ञांनी प्रथम निदर्शनास आणल्याने त्यांचे नाव दिले गेले आहे. अंधार विक्रिया असेही म्हणतात.

bladder
गेळा, फुगा, आशय हवेने भरलेला व त्यामुळे हवेत किंवा पाण्यात तरंगण्यास उपयुक्त असा अवयव उदा. शैवले (सरगासम, फ्यूकस), चीडचे परागकण

bladdery
फुगीर, आशयित फुगे असलेला, फुगलेला

blade
पाते पानाचा पसरट व बहुधा हिरवा भाग, काही जमिनीवरील खोडांची खवल्यासारखी पाने हिरवी नसून पाती अरुंद असतात. पाकळ्यांचा पसरट भाग, phyllode  lamina, epipodium

blastogenic
उपजत, जन्मजात जन्मापासून असलेले व बाह्यपरिस्थितीमुळे प्राप्त न झालेले उदा. शारीरिक फरक, भेद germinal, congenital

bleeding
रक्तस्त्राव वनस्पतींच्या बाबतीत जखमेतून रस किंवा चीक वाहण्याची प्रक्रिया, नीरा, माडी, ताडी हे रसच होत exudation

blending inheritance
संमिश्र अनुहरण आईबापापासून संततीत उतरताना पूर्वी असलेल्या पर्यायी लक्षणांचे होणारे मिश्रण, येथे एका लक्षणाचा दुसऱ्यावर अंशमात्र प्रभाव दिसतो. गुण दोष युक्त लक्षणे अनेक जनुकांमुळे प्राप्त होतात त्यावेळी संततीत त्यांचा आविष्कार पूर्णपणे आढळणे शक्य नसते.

blepharoplast
आधार कणिका कोशिकेतून बाहेर निघालेल्या केसासारख्या बारीक (प्रकेसलाच्या), जीवद्रव्याच्या धाग्याच्या तळाशी असलेला सूक्ष्म कण flagellum.

bloom (on surface)
१ राग २ बहर, पुष्पपुंज १ पृष्ठभागावर येणारा पातळ थर, उदा. शैवलाचा थर पाण्यावर विशिष्ट ऋऋतुत येतो, मेणाचा थर पानावर येतो. २ फुले येणे (बहार) किंवा फुलांचा झुबका येणे

Blue green algae
नील हरित शैवले, निळी हिरवी शैवले (वर्ग), सायनोफायसी निळसर, काळसर, क्वचित गर्द हिरव्या रंगाच्या शैवल वनस्पती, इतर शैवलांशी तुलना करता, ह्या अधिक साध्या व पुरातन आणि काही बाबतीत सूक्ष्मजंतूशी तुल्य असतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेक कोशिक, तंतुमय, प्

blunt
गोलाग्र, बोथट गोलसर टोक असलेला (अवयव), उदा. काही शैवल व कवक यांचे तंतू, शिंबा, पानाचे टोक इ.

body cell
कायकोशिका, तनुकोशिका प्रजोत्पादक अवयवांखेरीज शरीराच्या इतर कोणत्याही भागातील कोशिका, काही शंकुधारी वनस्पतींत ज्या पासून नर कोशिका बनतात तिला हीच संज्ञा वापरतात.

bog
रुतण, दलदल ओली व अत्यंत भुसभुशीत (सुविरल) जमीन, यात विशिष्ट वनस्पतीच वाढू शकतात. उदा. स्फॅग्रेसी कुलातील शेवाळी, ओक, क्रेनबेरी इत्यादींच्या काही जाती

bole
सोट, स्तंभ वृक्षाच्या खोडाचा कठीण, सरळ व शाखाहीन भाग

Bombacaceae
शाल्मली कुल, बॉम्बॅकेसी लाल सावर, सफेत सावर, गोरख चिंच, बाल्सा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे स्वतंत्र कुल Malvaceae (जास्वंद कुल)

Boraginaceae
भोकर कुल, बोरॅजिनेसी भाकर, छोटा कल्प, धत्रंग (दत्रंग, अजानवृक्ष) त्रिपक्षी, गोंदणी, लिचरडी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत भोकर गणात (पोलेमोनिएलीझ) केला असून हचिन्सनच्या पद्धतीत भोकर गण (बोरॅजिनेलीझ) वरच्याहून अलग केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- फुलोरा- वृश्चिकाब वल्लरी, फुले द्विलिंगी, बहुधा नियमित, पंचभागी, पाकळ्या जुळलेल्या, नलिकाकार, विविधाकृति पुष्पमुकुट, केसरदले पाच व पाकळ्यास तळाशी चिकटलेली, दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ अश्वगर्भी किंवा चार कपालिकांचे, वृंत्ताक कुल (सोलॅनेसी) व हरिणपदी कुल यांचे या कुलाशी आप्तभाव असून त्यांचाही अंतर्भाव याच गणात (पोलेमोनिएलीझमध्ये) केला जातो.

Boraginales
भोकरगण, बोरॅजिनेलीझ Boraginaceae

Bordeaux mixture
बोर्डाए मिश्रण साधारणपणे ४ पौंड मोरचूद, ४ पौंड चुना, सुमारे ५० गॅलन पाण्यात एकाचवेळी मिसळून कवकजन्य रोगावर (रोगी वनस्पतीवर) शिंपडण्याचे मिश्रण, यातील घटकांचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलून वापरतात.

border parenchyma
मृदुतकावरण, सीमावर्ती मृदुतक वाहक घटकाभोवती असलेले, मृदु कोशिकांच्या एक किंवा अधिक थरांचे आवरण.

bordered pit
अनुलिप्त खात (खाच), वलयी गर्त सभोवार वलय असणारी खाच, विशेषेकरून प्रकाष्ठाच्या कोशिकावरणावर (प्रकटबीज वनस्पतीतील) आढळते, दोन जवळच्या कोशिकावरणाची जाडी वाढत असता काही भाग पातळ राहून, काही भाग पूर्वीच्या आवरणापासून अलग राहतो तो खाचेभोवती वलयाप्रमाणे दिसतो.

boss
पिटिका फळावर, देठावर, तंतूवर किंवा बीजावर असलेला उंचवटा.

bostryx
एकपद शुंडी (वल्लरी) शेंड्याला फूल आल्याने मुख्य अक्षाची वाढ खुंटते व नंतर एका बाजूस बगलेतील कळीपासून उपाक्ष वाढतो व त्याचीही तीच गत होते. पुढे हाच प्रकार एकाच बाजूस नवीन उपाक्ष क्रमाने वाढून शेवटी एक वाकडा सोंडेसारखा फुलोरा बनतो. उदा. गेळफळ, हॅमेलिया इ.

botanical garden
शास्त्रीय उद्यान वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने वनस्पतींची मांडणी केली असून त्याशिवाय प्रायोगिक कार्याच्या व संशोधनाच्या सोयी उपलब्ध असलेली बाग

botanist
वनस्पतिशास्त्रज्ञ, वनस्पतिविज्ञ वनस्पतिशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करून तसेच त्यामधील काही शाखांमध्ये संशोधन करून एकंदरीत पारंगत असलेली व्यक्ती.

botanize
वनसंचार आपले नैसर्गिक जीवन जेथे अनेक वनस्पती चालू ठेवतात अशा वने, उद्याने, उपवने इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांच्या विषयीची माहिती मिळविणे

Botany
वनस्पतिविज्ञान, वनस्पतिशास्त्र १ सर्व प्रकारच्या वनस्पतींची तात्त्विक व व्यावहारिक माहिती मिळवून त्यांच्यासंबंधींचे निश्चित ज्ञान संकलन करणारी ज्ञानशाखा. यालाच कोणी उद्भिज्जशास्त्र, वानसशास्त्र अशीही नावे दिली आहेत. २ वनस्पतिविज्ञानाबद्दलचे पाठ्यपुस्तक, स

bough
बृहत्तर शाखा, महाशाखा सर्वात मोठी फांदी

bound water
बद्धजल प्राकृतिक गुणधर्मामुळे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागात शोषून ठेवलेला पाण्याचा अंश adsorption, free water

brachy-
ऱ्हस्व- आखुडपणा किंवा खुजेपणा दर्शविणारा उपसर्ग. b. blast ऱ्हस्व प्ररोह मर्यादित वाढ असलेला पल्लव पहा spur b. cladous ऱ्हस्वशाखी फार आखूड फांद्या असलेले (झाड) b. form ऱ्हस्वरुपी एकाच आश्रय वनस्पतीवर वाढणाऱ्या तांबेरा नावाच्या कवकीय रोगातील वर्षाबीजुकीय

bract
छद फुले अथवा फुलोरा व त्याच्या फांद्या यांच्या तळाशी असलेला लहान खवल्यासारखा संरक्षक अवयव, केळीच्या फुलोऱ्यावर जाड तांबूस व चिवट मोठी छदे (महाछदे) येतात तर केवड्याच्या फुलोऱ्यावर मोठी पण सुवासिक छदे येतात. spathe  (hypsophyll)

bract scale
छदशल्क शंकुधारी वनस्पतींवरील स्त्री शंकूवर बीजधारी खवल्याखाली असणारा लहान खवल्यासारखा संरक्षक अवयव

bracteate
सच्छद छद्राचा आधार असलेले (फूल किंवा फुलोरा) उदा. बुगनवेलीया, पानचेटी इ.

bracteody
छदीभवन पुष्पदलांचे छदासारख्या उपांगांत रुपांतर होण्याची प्रक्रिया bract

bracteolate
सच्छदक छदक असलेले (फूल), उदा. खडशेरणी,

bracteole
छदक फुलोऱ्याच्या तळास असणारे अवयव ते छद मानून फुलाच्या तळास असलेल्यास छदक म्हणतात. उदा. गोकर्ण, घेवडा इ. bractlet

branch
शाखा फाटा, फांदी, मुख्य खोडापासून (अक्षापासून) वाढलेला व सर्वसाधारणपणे तशीच संरचना, आकार व कार्य असलेला दुय्यम अथवा तिय्यम दर्जाचा अक्ष.

branch gap
शाखा विवर खोडावरील ज्या स्थानापासून शाखा निघते तेथील वाहक उतकांच्या चितीत (स्तंभात) पडलेली फट (खिंड)

branch tendril
शाखा प्रतान तणाव्यात रुपांतर झालेली शाखा उदा. द्राक्षवेल.

branch trace
शाखालेश शाखेतील वाहक वृंदाशी खोडातील वाहक भागाला (रंभाला) जोडणारा वाहक भाग

branched
शाखित, सशाख, शाखायुक्त फांद्या (शाखा) असलेल (खोड)

branching
शाखाबंध, शाखाविन्यास प्रमुख अक्षापासून निघालेल्या नवीन शाखांचा उगम, विस्तार व मांडणी (अथवा त्या संबंधीची माहिती).

branchless
शाखाहीन, शाखा नसलेले

branchlet
लघूतर शाखा, लघुशाखा लहान फांदी,

brand spore
ग्रीष्मबीजुक जाड आवरणाचा बहुधा काही काळ विश्रांति घेणारा व बहुधा काळपट रंगाचा काही कवकात आढळणारा प्रजोत्पादक घटक (बीजुक), उदा. काणी Ustilaginales. ureldospore, summer spore

Brassicaceae
मोहरी (सर्षप) कुल cruciferae.

breathing pore
श्वसन रंध, वातरंध हवा आत बाहेर जाण्याकरिता असलेले छिद्र b. root श्वसनमूळ वायुविनिमय करण्याकरिता विशेषत्व पावलेले मूळ अथवा मुळाचा भाग. खाऱ्या दलदलीतील जमिनीतील मुळापासून जमिनीवर आलेल्या उभ्या शाखा, त्यावरील वल्करंधातून हवेची ये-जा घडून येते कारण अशा जमिनीत

breed
१)प्रजा, संतति २) प्रजनन १ विशिष्ट गुणयुक्त प्रकार, वंश किंवा अवलाद २ पैदास करणे, प्रजनन करणे वनस्पतींतील किंवा प्राण्यांतील जाती व विशिष्ट प्रकारांची निर्मिती b. in अंतःप्रजनन अगदी जवळच्या आप्तसंबंधात प्रजोत्पादन घडवून आणणे, हा प्रकार सुप्रजाननाच्या

brevi-
ऱ्हस्व- खुजेपणा (आखुडपणा) दर्शविणारा उपसर्ग. b. stigma ऱ्हस्वकिंजल्क फार आखूड किंजल्क (स्त्री केसराचे टोक) असलेले, उदा. सोमलता (Sarcostemma brevistigma Wight)

bridle
प्राकलतंतु कोशिकेतील मध्यवर्ती प्राकलखंडापासून निघून कोशिकावरणाच्या जवळ असलेल्या प्राकलस्तराशी जोडणारा तंतूसारखा भाग (धागा), उदा. स्पायरोगायरा शैवलाच्या तंतूतील कोशिका

bristle
रोम, शूक ताठर केस

bristly
रोमश ताठर जाड केस असलेला (अवयव) उदा. भेंडीची पाने किंवा भोपळ्याची पाने अथवा खोड

broad leaved
रुंदपानी, विस्तृतपर्णी रुंदट किंवा पसरट असलेले झाड उदा. पळस, साग इ.

Bromeliaceae
अननस (आपनस) कुल, बोमेलिएसी अननस, टिलँड्सीया इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेसींच्या पद्धतीत या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरेडेलीझ) केला असून हचिन्सन यांनी अननस गण या स्वतंत्र गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- काही गुच्छाकृती औषधीय वनस्पती व अपिवनस्पती, फुलोरा सच्छद, द्विलिंगी किंवा एकलिंगी विभागी फुले, परिदल मंडले दोन, केसरदले सहा व कधी तळाशी चिकटलेली, किंजपुटात अक्षलग्न बीजके व तीनच कप्पे, बीजे सपुष्क, सपक्ष व केसाळ

Brown algae
पिंगल शैवले, फीओफायसी (वर्ग) हरितद्रव्याव्यतिरिक्त एक पिंगट द्रव्य प्राकणूत असणाऱ्या व बहुधा खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या शैवलांचा गट, वनस्पती अनेककोशिक व मोठ्या, प्रजोत्पादक कोशिका (बीजुके, गंतुके) चलनशील व बाजूस दोन असम केसले असलेल्या, सलिंग व निर्लिंग प्रज

Brownian movement
बाऊनी हालचाल (आंदोलन) कलिल विद्रवातील सूक्ष्म कणांची सतत चालू असणारी सूक्ष्म हालचाल, द्रवपदार्थांच्या रेणूंशी त्या सूक्ष्म कलिककणांच्या असंतुलित (तोल नसलेल्या) भडिमारामुळे (माऱ्यामुळे) ती घडून येते.

bryologist
शेवाळीवेत्ता (विज्ञ) शेवाळासंबंधी अधिकतर ज्ञान संपादित केलेला (शास्त्रज्ञ)

Bryology
शेवाळी विज्ञान शेवाळी (बायोफायटा) संबंधीची माहिती

Bryophyta
शेवाळी विभाग, बायोफायटा शैवलांपेक्षा अधिक प्रगत तथापि वाहक उतकांचा पूर्ण अभाव असलेल्या आणि नेचाभ (टेरिडोफायटा) वनस्पतींशी प्रजोत्पादक अवयव (रेतुकाशय व अंदुककलश) व पिढ्यांचे एकांतरण या बाबतीत साम्य असलेल्या हरितद्रव्ययुक्त वनस्पतींचा गट. सर्वसाधारणपणे या वनस्पती स्थलवासी असूनही त्यांचे प्रजोत्पादन बाहेरील पाण्यावाचून घडून येत नाही म्हणून त्या संदर्भात यांना जलस्थलवासी म्हणणे योग्य, ह्या वनस्पतींमध्ये ठळकपणे ओळखली जाणारी (एकगुणित) पिढी प्रजोत्पादक नर व स्त्री कोशिका (गंतुके) बहुकोशित अवयवांत निर्माण करते व त्यांच्या संयोगाने बनलेली संयुक्त कोशिका (रंदुक) त्याच जनक वनस्पतीवर पोसली जाते व तिच्यापासून दुसरी अलिंगी प्रजोत्पादक कोशिका (बीजुके) बनविणारी पिढी (द्विओगुणित किंवा बीजुकधारी) वाढते. या बीजुकांपासून पुनरपि पहिली (गंतुकधारी) सारखी प्रमुख वनस्पती निर्मिली जाते. याप्रमाणे या दोन पिढ्यांत (एकगुणित व द्विगुणित) एकांतरण असते. ह्यापैकी अत्यंत प्रगत वनस्पतींना नाजुक पाने, खोड व केसासारखी मुळे असतात व त्यांची संरचना फारच साधी असते. यकृतका, शृंगका व हरितका असे यामध्ये तीन वर्ग मानतात.

bud
मुकुल, कुङमल, कलिका, कळी, कोरक खोडावरील सर्व अवयव अविकसित अवस्थेत एकत्र सामावून ठेवणारी संरचना, विकास पूर्ण होताना तिचे रुपांतर साध्या शाकीय अवयवात किंवा फुलात होते, अविकसित प्ररोह, कायक वनस्पतींत ही संज्ञा शरीराच्या प्रजोत्पादक, साध्या व स्वतंत्र होणाऱ्या घटकास वापरतात.

bud flower-
कलिका फुलाची कळी reproductive bud

bud scale
कोरक शल्क कळीच्या संरक्षणार्थ तिच्यावर प्रथम असणारे व नंतर गळून पडणारे खवल्यासारखे उपांग उदा. पिवळा चाफा, वड, फणस इत्यादींचे खवले उपपर्णे होत व ती पुढे गळून पडतात. आले, कर्दळ यांच्या जमिनीतील खोडावर खवले असतात.

bud, stem-
कोरक शाकीय अवयवांचा अंतर्भाव करणारी कळी vegetative bud

budding
मुकुलन १ कळ्या येणे २ एका कोशिकेवर दुसरी व पुढे तिसरी किंवा चौथीही येणे उदा. किण्व ३ डोळा बांधणे, कळीचे कलम बांधणे gemmation, grafting

bulb
कंद रसाळ खवल्यांनी वेढलेले, बिंबात रुपांतर पावलेले व जमिनीच्या पृष्ठभागाखाली वाढणारे संक्षिप्त खोड, यापासून खाली आगंतुक मुळे असून खवल्यांच्या बगलेतून वाढणाऱ्या कळ्यापासून नवीन कंद बनतात व शाकीय उत्पत्ति होते. कंदाचे काही प्रकार हवेत खोडावर येतात. b. scaly

bulbel
लघुकंद कंदापासून आलेला लहान अपत्यकंद

bulbiferous
कंदधर कंदधारी, कंद असणारी वनस्पती, कंदाचे काही प्रकार पानांच्या बगलेत किंवा फुलोऱ्यातही येतात उदा. घायपात, कारंदा (Dioscorea bulbifera var. sativa Prain)  bulbil

bulbil
कंदिका लहान कंद, पानांच्या बगलेत किंवा कडेवर वाढलेली लहान गाठीसारखी किंवा फक्त सूक्ष्म मांसल पानांच्या झुबक्यासारखी प्ररोहरुप संरचना, ही मूळच्या वनस्पतीपासून योग्य काली तुटून पडते व नवीन वनस्पती निर्माण करते. उदा. कारंदा, घायमारी, घायपात इ. सायकसच्या खोडास तळाजवळ येणारी कळी (लहान प्ररोह) व अननसाच्या फळाखाली खोडापासून येणारी लहान कळी कंदिकाच मानतात. त्या अलग करून नवीन वनस्पती बनविता येतात.

bulblet
कंदक पानाच्या किंवा फुलोऱ्याच्या बगलेत अथवा अनित्य ठिकाणी येणारा कंद

bulbose
कंदधर, कंदकल्प कंद धारण करणारी किंवा कंदासारखी संरचना असणारी (वनस्पती) उदा. भुईचाफा, नागदवणा, निशिगंध bulbous

bulbous hair
कंदकेश फुगीर तळाचा केस, उदा. आग्या, खाजोटी यांचे दाहक केस

bullate
पीटिकायुक्त, पुळीदार फोड किंवा पुटकुळ्या आलेले, उदा. कोबीचा सॅव्हॉय जातीची पाने

bulliform cell
चलिग्र कोशिका, प्रेरक कोशिका (पेशी) पूर्णपणे भरल्यावर फुगणाऱ्या व पाणी कमी झाल्यावर आकुंचन पावणाऱ्या अपित्वचेतील मोठ्या कोशिका. यांच्या प्रसरण व आकुंचन यामुळे पानांच्या कडा जवळ येऊन सुरळी बनणे किंवा ती पुन्हा उलगडून पान पसरणे घडून येते. अशा यंत्रणेमुळे बा

bundle
वृंद जुडगा. अनेक विशिष्ट कोशिकांचा किंवा उतकांचा संच. कोशिकारुप तंतूंचा किंवा सूत्रांचाही संच बनतो. वाहक कोशिका व वाहिन्या यांचेही संच आढळतात, त्यास वाहक संच म्हणतात. b. cap वृन्दत्राण वृन्दातील परिकाष्ठाबाहेरचा अर्धचंद्राकृति घनकोशिकांचा संच b. sheath

bundle end
वृंदान्त, वृंदाग्र वाहक संचाच्या शेवटी असलेला भाग, उदा. पानांच्या संरचनेतील मध्यभागी असलेल्या कोशिकांच्या समूहातील वाहक घटकांचा शेवटचा भाग.

bundle scar
वृंद किण पान गळून पडतेवेळी त्याच्या तळात खोडातून जाणाऱ्या वाहक वृंदाचा खोडावर पडलेला वण.

buoyancy
तरणक्षमता, प्लावकता हवेत किंवा पाण्यात तरंगण्याचे सामर्थ्य

bur
१ अंकुशफल २ कंटवेष्ट ३ ग्रन्थि १ आकड्यासारखे उपांग असलेले फळ २ फळाचे काटेरी आवरण, उदा. निचर्डी, धोत्रा ३ गाठ burr

burdock
रोमस्थली, रोमासन ताठर केस असलेले पुष्पासन receptacle.

Burgandy mixture
बर्गंडी मिश्रण चुन्याऐवजी सोडा (सोडियम कार्बाएनेट) मिसळलेले बोर्डाए मिश्रणासारखे फवारण्याचे औषध. Bordeaux mixture.

Burseraceae
गुग्गुळ कुल, बर्सेरेसी काकड, धूप, गुग्गुळ, बोळ, सालाई इत्यादी द्विदलिकित व उष्णकटिबंधातील वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलिझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, बहुधा संयुक्त, एकाआड एक पाने, बाल्सम व राळ यांनी भरलेल्या नलिका असतात. फुले लहान, बहुधा एकलिंगी, बिंबयुक्त, चार पाच भागी, दोन केसरमंडले असल्यास बाहेरचे पाकळ्यासमोर व आतील एकाआड एक, जुळलेली किंजदले ३-५ व ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात २ बीजके, फळ अश्मगर्भी वा बोंड, बिया अपुष्क, काकड (Garuga Pinnata Roxb.)

bush
उपक्षुप जमिनीलगत अनेक फांद्या असलेली लहान काष्ठयुक्त वनस्पती, लहान झुडुप shrub  undershrub

bush
उपक्षुप जमिनीलगत अनेक फांद्या असलेली लहान काष्ठयुक्त वनस्पती, लहान झुडुप shrub  undershrub

button
कुड्म भूछत्राचे छत्र व दांडा स्पष्टपणे (पूर्णपणे) बनून दिसण्यापूर्वीची गोळीसारखी प्रारंभिक अवस्था mushroom.

buttress root
आधारमूळ मोठ्या वृक्षांना जमिनीजवळ खोडाला आधार देण्याकरिता बुंध्यापासून निघालेले व जमिनीत गेलेले फळीसारखे मूळ, उदा. गुलमोहोर, गोरखचिंच, सावर, रबर इ. (plank root)

C
सी पुष्पसूत्रात पुष्पमुकुटाबद्दल वापरलेले आद्याक्षर floral formula, corolla

Cactaceae
नागफणा कुल, कॅक्टेसी नागफणा व काही निवडुंगाच्या जाती ह्या फुलझाडांचे (द्विदलिकित) कुल. बेंथॅम आणि हूकर यांनी याचा अंतर्भाव फायकॉइडेलीझ या नावाच्या गणात व एंग्लर आणि प्रँटल यांनी नागफणा गणात (ऑपन्शिएलीझ) केला आहे. प्रमुख लक्षणे - बहुतेक सर्व काटेरी, पर्णहीन व मांसल लहानमोठ्या मरुवनस्पती, अर्धचक्रीय, अग्रपश्च किंवा अरसमात्र, द्विलिंगी फुलात संवर्त व पुष्पमुकुट यातील दले अनेक, सर्पिल व संक्रमक तसेच केसरदले व किंजदले अनेक, किंजपुट अधःस्थ, एकपुटक व त्यात अनेक तटवर्ती बीजकाधानी, मृदुफळ, सर्वत्र काट्यांचे झुबके, बागेला कुंपणाकरिता व काही जाती शोभेकरिता लावतात.

caducous
शीघपाती लवकर गळून पडणारी (पाने, पुष्पदले इ.) उदा. वड, पिंपळ यांची उपपर्णे, संदले (अफू), प्रदले (पिवळा धोत्रा), पाने (शेंज) इ.

caeruleus
नीलाभ, आकाशी फिकट निळे, किंचित निळे, निळसर

Caesalpiniaceae
संकेश्वर (शंकेश्वर) कुल, सीसॅल्पिनिएसी संकेश्वर, सागरगोटा, दिवी-दिवी, पतंग, टाकळा, तरवड, चिंच, बाहवा, कांचन, लाल अशोक इत्यादी कमीजास्त परिचित व द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश इतर दोन (शिरीष कुल व पलाश कुल) कुलांसह शिंबी गणात (लेग्युमिनोजी) केला जा

caespitose (tufted)
झुबकेदार, पुंजकल्प झुबक्याप्रमाणे जमिनीतून वर वाढलेले, उदा. काही गवते, नागदवणा, गवती चहा, कुमूर (Pancratium triflorum Roxb).

caffeine
कॅफीन कॉफी पूड ज्या वनस्पतीच्या (Coffea arabica L.) फळापासून बनवितात त्या फळातील विशिष्ट क्षाराभ द्रव्य

cainozoic era
नवजीव (नूतनजीव) महाकल्प, केनोझोइक ईरा सुमारे ६.५ कोटी ते ११ हजार वर्षांपूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड

calamiferous
रिक्ताक्ष, नलिकाक्ष नळीसारखे पोकळ खोड असलेले उदा. नावळी, कळक बोरु

calcar
शुडिका फुलातील परिदलांच्या कोणत्याही भागापासून खाली वाढलेले नळीसारखे (व मधाने भरलेले) किंवा सोंडेप्रमाणे उपांग उदा. तेरडा, काही आमरे (ऑर्किड)

calcarate
शुंडिकायुक्त शुंडिका असलेले, उदा. आमर (Haebenaria longicalcarata Rich)

calciferae
उभयपरिदली परिदलांची दोन्ही (संवर्त व पुष्पमुकुट) मंडले असलेला एकदलिकित वनस्पतींचा गट

calcification
चूर्णीभवन खटमय (चूर्णीय) होणे, कोशिकावरणात, कोशिका द्रव्यात किंवा केसात चूर्णीय (खट) द्रव्याचा अंदर्भाव होणे. उदा. वडाच्या पानाच्या अपित्वचेतील काही कोशिका, कारा या शैवलाच्या कोशिका cystolith

calcifuge
खटद्वेष्टी, खटत्यागी चुनखडीच्या जमिनीत न वाढणारी (वनस्पती) calciphobous.

calciphilous
खटप्रिय चुनखडीच्या जमिनीवर विशेषत्वाने वाढणाऱ्या (वनस्पती)

calciphobous
खटद्वेष्टी, खटद्वषी चुनखडीची जमीन न मानवणाऱ्या (वनस्पती)

caline
वृद्धिप्रेरक द्रव्य, कॅलीन वाढीला उत्तेजन देणारा पदार्थ, मूलोत्तेजक (rhizocaline) हा मुळांच्या वाढीस चालना देणारा, क्षोडोत्तेजक (caulocaline) हा खोडाच्या वाढीस चालना देणारा.

callocity
किण जाडसर चट्टा, किणकामुळे बनलेली खपली callus.

callose
किणमय, कॅलोज एक कार्बाएहायड्रेट - १ दाहक क्षारात विद्राव्य

callus
किणक १ परिकाष्ठाच्या छिद्रयुक्त नलिकेतील आडव्या पडद्यावर (चाळणीवर) हिवाळ्यात बसणारा कॅलोज पदार्थाचा थर २ जखमेभोवती असलेल्या निकोप व जिवंत कोसिकांपासून जखमेवर बसणारा रसाळ नरम कोशिकांचा थर (किणोतक callus tissue) यापासून पुढे त्वक्षाकोशिका तयार होउन जखमेचे

calyc-
चषक पेला या अर्थी ग्रीक उपसर्ग

calycanthemy
प्रदलीभवन संदलाचे पाकळ््यात रुपांतर होण्याची अनित्य घटना.

calyciferae
संवर्ती उपवर्ग, क२लिसिफेरी हचिन्सन यांनी संमत केलेला व संवर्ताची उपस्थिती निश्चितपणे असलेला एकदलिकित वनस्पतींतील (वर्गातील) एक गट, यामध्ये मूलक्षोड असतेच. calyx.

Calycifforae
संवर्तपुष्पी (श्रेणी) Thalamiflorae

calycifforous
संवर्तपुष्पा पाकळ्या व केसरदले यांना चिकटून असलेला संवर्त धारण करणारी (वनस्पती)

calycinae
संवर्ताभ श्रेणी, कॅलिसिनी बेंथॅम व हूकर यांच्यामते संवर्तासारखी व पातळ परिदले असलेल्या फुलांच्या एकदलिकित वनस्पतींचा गट Monocotyledons.

calycine
संवर्तीय, संवर्ती संवर्ताशी संबंधित अथवा संवर्ताचे

calycoid
संवर्ताभ संवर्तासारखे

calycoid
संवर्ताभ संवर्तासारखे

calyculate
अपिसंवर्तयुक्त संवर्तासारखा भाग, संवर्ताखाली असलेले (फूल).

calycule
१ अपिसंवर्त २ चषिका १ संदलाखाली असलेल्या पानासारख्या उपांगांचे (छदांचे) वर्तुळ उदा. जास्वंद २ बीजुककोशांच्या तळाशी असलेला लहान पेल्यासारखा अवयव उदा. श्लेष्मकवक. calyculus

calyptra
पिधानी, झाकणी १ शेवाळी वनस्पतींमधील अंदुककलशाचा वरचा अर्धा भाग, ह्यामुळे बीजुकाशयाचे संरक्षण होते. २ मुळाच्या टोकावरील टोपीसारखा भाग ३ फुलाचे अथवा फळाचे टोपणासारखे आवरण उदा. निलगिरी, लवंग

calyptrogen
मूलत्राणकर, पिधानीजनक मुळाच्या टोकावरील टोपीच्या आकाराचे वेष्टन जसजसे जीर्ण होईल तसतसे आतून नवीन बनविणारे ऊतक

calyx
संदलमंडल, संवर्त फुलातील अवयवांच्या मंडलांपैकी सर्वात बाहेरचे, बहुधा हिरवे व संरक्षक मंडल, यातील प्रत्येक भागाल संदल म्हणतात. यालाच पुष्पकोश असेही म्हटल्याचे आढळते. c. tooth संवर्तदंत सूक्ष्म दातासारखे संदल c. tube संवर्तनलिका जुळलेल्या संदलामुळे बनलेली

cambiform cell
दीर्घकोशिका परिकाष्ठातील लांबट व पातळ भिंतीची टोकदार कोशिका

cambium
ऊतककर खोड, फांद्या व मुळे यातील वाहक घटकांच्या सान्निध्यात असून सतत नवीन वाहक घटक बनविणारा कोशिकांचा समूह, तसेच इतरत्रही इतर प्रकारच्या कोशिका बनविण्यास (उदा. त्वक्षा cork) असा कोशिकासमूह आढळतो c. cell (meristematic cell) विभाजी कोशिका, वर्धिष्णु पेशी

cambrian period
हैमन्त युग, कँबियन कल्प (युग) सुमारे ६० ते ५० कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय प्राचीन कालखंड, यालाच त्रिखंड युग असेही म्हणतात. कारण यातील खडकात त्रिखंड प्राण्यंआचे (trilobites) जीवाश्म सापडतात. c.pre- हैमन्तपूर्व, कँबियनपूर्व कल्प (युग) कँबियन

campanulaceae
घंटापुष्प कुल, कँपॅन्युलेसी बेंथॅम व हूकर यांनी कँपेनेलीझ आणि एंग्लर व प्रँटल यांनी कँपॅन्युलेटी गणात या कुलाचा समावेश केला आहे. बेसी व हचिन्सन यांनी ऍस्टरेलीझ गणात हे कुल घातले आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे दुधी चिकाच्या औषधी व झुडुपे, एकाआड एक साधी पाने, घंटाकृती, द्विलिंगी, अरसमात्र, युक्तप्रदल फुले, केसरदलांचे परागकोश जुळलेले, पाच किंवा तीन कप्यांचा अधःस्थ किंजपुट, बीजके अनेक, मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क बिया.

campanulales
घंटापुष्प गण, कँपेन्युलेसी या गणात सहा कुले असून फक्त घंटापुष्प कुल व सूर्यफूल कुल यांचा अंतर्भाव एंग्लरच्या पद्धतीत आहे. या गणातील वनस्पती क्वचित काष्ठयुक्त पण बव्हंशी औषधीय, पंचभागी फुलात केसरदलांचे एकच मंडल व परागकोश बहुधा जुळलेले, किंजपुट अधःस्थ किंवा

campanulate (bell shaped)
घंटाकृति तळाशी फुगीर व वर पसरट असा घंटेसारखा (संवर्त किंवा पुष्पमुकुट) उदा. भोपळा, कारंजवृक्ष (spathodea companulata Beauv)

campester
क्षेत्रवासी शेतात आढळणारे, उदा. एक भूछत्र (Mushroom, Agaricus campestris L.) campestris

camphor
कर्पूर (कापूर) काही वनस्पतींतून काढलेला पण बाष्परुपाने उडून जाणारा घन पदार्थ Dryobalanops camphora Colebr, Cinnamomum camphora (L.) T.Nees Eburn.

campylotropous
वक्रमुख, वक्र बीजबंधाशी काटकोनात वाढताना टोकास वाकडे झालेले व बीजरंध, नाभि, बीजकतल जवळजवळ असलेले बीजक, उदा. कर्दळ

canada balsam
कॅनडा बाल्सम एका वनस्पतीपासून (Abies balsamea) काढलेले विशिष्ट पारदर्शक चिकट द्रव्य. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्याकरिता एखादा नमुना एका काचपट्टीवर दुसऱ्या पातळ काचेखाली चिकटवून कायमपणे ठेवण्याकरिता हे चिकट द्रव्य उपयोगात आणतात.

canal
खोबण, सीता, नाली लहान, उथळ चीर (फट), नळीसारखी पोकळी किंवा पोकळ मार्ग

canal cell
मार्ग कोशिका, नाली कोशिका अंदुककलशाच्या नळीसारख्या भागातील कोशिका

canaliculate
ससीता, नालीयुक्त लांबट पन्हळ (खोबण) असलेले (उपांग), उदा. काही देठ (नारळ, केळ, कर्दळ).

canaliculate
ससीता, नालीयुक्त लांबट पन्हळ (खोबण) असलेले (उपांग), उदा. काही देठ (नारळ, केळ, कर्दळ).

candidus
शुभ्र पांढरे व चकचकीत, Cystopus (Albugo) candidus हे एका रोगकारक कवकाचे शास्त्रीय नाव पोकळ्यासारख्या आश्रय वनस्पतीवर पडणाऱ्या पांढऱ्या ठिपक्यामुळे पडले आहे.

canescent
भुरकट करडी लव असलेले किंवा भुरे होत असलेले उदा. कोहळा.

canker
खैरा, व्रण, कँकर सूक्ष्मजंतू किंवा कवक यामुळे मध्यत्वचेत निर्माण होणारा मर्यादित ऊतकनाश (कोशिकासमूहाचा क्षय) किंवा तो रोग necrosis.

Cannabinaceae
गंजा (गांजा) कुल, कॅनाबिनेसी गांजा, चरस, भांग ज्या वनस्पतीपासून काढतात (Cannabis sativa L.) तिचा व हॉप या द्विदलिकित वनस्पतीचा अंतर्भाव केलेले कुल, या द्विदलिकित वनस्पतीचा अंतर्भाव केलेले कुल, या द्विदलिकित कुलाचा समावेश आता हचिन्सन् यांनी वावल गणात (आर्टिकेलीझ) केला आहे. या कुलाची सामान्य लक्षणे - पहा Urticaceae, Urticales

Cannaceae
कर्दळ कुल, कॅनेसी केवळ कर्दळीच्या वंशाचा (कॅना) अंतर्भाव करणारे एकदलिकित फुलझाडांचे लहान कुल, याचा समावेश बदली गणात (सिटॅमिनी) केला जातो परंतु हचिन्सन यांनी झिंजिबरेलीझ अथवा शुण्ठी गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- मूलक्षोडयुक्त औषधी, पाने साधी, मोठी, सच्छद

canopy
छत्र, छत काष्ठयुक्त, लहान किंवा मोठ्या वृक्षांच्या जमिनीवरच्या पण उंच भागावर पाने व शाखा यांनी बनलेला छतासारखा पसरट भाग.

canus
भुरकट करडे पांढरे या अर्थी लॅटिन संज्ञा.

caoutchouc
कूटशूक, काऊट छूक काही वनस्पतींच्या दुधी चिकातील रबरासारखा पदार्थ, (उदा. Hevea, Kickxkia elastica) हेविया, किक्सिया

cap
१ छत्र २ पिधानी ३ टोपी १ भूछत्र नावाच्या कवकाचा छत्रीसारखा वरचा भाग (pileus) २ पहा calyptra पिधानी ३ ईडोगोनियम या हरित शैवलाच्या तंतूमध्ये कोशिकांवरचा टोपीसारखा भाग, अनेक टोप्या वलयाकार दिसतात.

cap cell
टोपण कोशिका नेचाच्या रेतुकाशयाच्या टोकावरील झाकणीसारखी कोशिका, ती सुटून निघाल्यावर रेतुके (पुं कोशिका) बाहेर पडतात.

capillary
केशीय, केशाभ केसासारखी सूक्ष्म जाडी (किंवा व्यास) व पोकळी असलेली (नलिका, मार्ग). c. soil water केशीय मृज्जल जमिनीतील सूक्ष्म कणांच्या पोकळ्यांमधील पाणी, हे वनस्पतींच्या मुळांना किंवा तत्सम अवयवांना उपलब्ध असते.

capillary
केशीय, केशाभ केसासारखी सूक्ष्म जाडी (किंवा व्यास) व पोकळी असलेली (नलिका, मार्ग). c. soil water केशीय मृज्जल जमिनीतील सूक्ष्म कणांच्या पोकळ्यांमधील पाणी, हे वनस्पतींच्या मुळांना किंवा तत्सम अवयवांना उपलब्ध असते.

capillitium
१ सूत्रपुंजक २ वंध्यतंतुसमूह ३ तंतूकपाश १ अनेक सूक्ष्म धाग्यांचा पुंजका. २ काही कवकांच्या वांझ तंतूचा पुंजका. ३ काही श्लेष्मकवकांच्या अलिंग प्रजोत्पादक अवयवांतील जीवद्रव्याच्या सूक्ष्म धाग्यांचा संच

capitate
सशीर्ष, शीर्षाभ १ टाचणीसारखे डोके असलेले, उदा. किंजल्क, केस २ गुच्छासारखी (स्तबकासारखी) मांडणी असलेली उदा. सूर्यफुलाची पुष्पके असलेल्या फुलोऱ्याप्रमाणे (Malachra capitata L.)

capituliform
स्तबकाभ, शीर्षाभ अनेक लहान फुलांच्या गर्द गुच्छासारखी लक्षणे असलेली (संरचना, उदा. फुलोरा) capitulum

capitulum
स्तबक अनेक बिनदेठाची लहान फुले एकत्र असलेला अकुंठित फुलोरा उदा. झेंडू, शेवंती, सूर्यफूल

Capparidaceae
वरुण कुल, कॅपॅरिडेसी (कॅपॅरेसी) वरुण (घायवर्णा) नेपती (करीर), तरटी, वाघाटी, काबरा, गोविंदफळ ह्या द्विदलिकित वनस्पतींच्या वंशाचे शास्त्रीय नाव (कॅपॅरिस) या कुलाला देण्यात वापरले असून याचा अंतर्भाव पॅपॅव्हरेलीझ अथवा अहिफेन गणात बेसींनी व वरुण गणात (कॅपॉरिडे

caprification
उदुंबरण काही लागवडीतील अंजिराच्या प्रकारात कृत्रिम परागणाची (पराग घालण्याची) प्रक्रिया, त्यानंतर अंजिराचे फळ बनते.

capsule
१ बोंड २ आशय १ शुष्क, तडकणारे, अनेकबीजी आणि ऊर्ध्वस्थ, युक्तकिंज, अनेक कप्यांच्या किंजपुटापासून बनलेले फळ उदा. भेंडी, कापूस, धोत्रा, अफू, ज्योत (जूट Corchorus capsularis L.) २ शेवाळी वनस्पतींतील बीजुके बनविणारा पिशवीसारखा अवयव (आशय), लहान पिशवीसारखा अवयव

carbohydrate
कार्बाएहायड्रेट कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने बनलेला व विशिष्ट रासायनिक संघटना असलेला पदार्थ, हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे प्रमाण २१ असते. सामान्य भाषेत तौकीर (तवकीर), ग्लायकोनेज, सेल्युलोज (तूलीर), पीठ, साखर इ. पदार्थ.

carbon assimilation
कार्बन सात्मीकरण (पानातील जिवंत व हरिदद्रव्ययुक्त कोशिकांमध्ये कार्बन डायॉक्साइड वायू, प्राणी व सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने कार्बाएहायड्रेट बनविण्याची नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया, यांमध्ये हा कार्बनयुक्त पदार्थ वनस्पतींच्या शरीरात समाविष्ट होतो व पुढे

carcerule
मुद्रिका ऊर्ध्वस्थ व संयुक्त किंजपुटापासून बनलेले, शुष्क, न फुटणारे, एकबीजी फलांश अलग करणारे फळ, उदा. चक्रभेंडी, पेटारी, मुद्रा, गुलखेरा इ. mericarp, schizocarp. carcerulus

Caricaceae
पपई कुल, कॅरिकेसी जुन्या वर्गीकरणाच्या पद्धतीत या द्विदलिकित कुलाचा अंतर्भाव पॅसिफ्लोरेलीझमध्ये (कृष्णकमळ गणात) केला जात असे, किंवा कृष्णकमळ कुलात पपईचा समावेश असे, हल्ली कॅरिकसी कुलात पपईचा समावेश करतात, दुधी चीक, युक्तप्रदल, एकलिंगी, नियमित पंचभागी फुले

carina (keel)
नौकातल, प्रदलांजली, कणा (आढे) १ वाटाणा, गोकर्ण, अगस्त्य यांच्या फुलातील पतंगरुप पुष्पमुकुटाच्या पाकळ्यांच्या मांडणीत सर्वात आत असलेल्या (पुरश्च) दोन पाकळ्यांनी बनलेला नावेसारखा (ओंजळीसारखा) भाग २ गवताच्या फुलातील तुषासंबंधी, काही तुषे नावेसारखी असून त्यां

carinal
नौकातलीय फुलातील नावेसारखा व आनुषंगिक अवयव असलेला भाग keeled

carinal canal
कटक नाली खोडावरील धारेसमोर किंवा शिरेसमोर पण प्रकाष्ठाच्या आतील बाजूस असलेला नळीसारखा मार्ग, उदा. एक्किसीटम

carinate
कटकयुक्त उठावदार, उभी व जाड मध्यशीर किंवा मध्ये कटकयुक्त रेषा असलेला (भाग), उदा. संदल, तुष, छद इ.

carnivorous
मांसाहारी कीटकांना आकर्षून व मारुन त्यांच्यावर उपजीविका करणाऱ्या (वनस्पती), उदा. घटपर्णी, कलशपर्णी (Pitcher plant), मच्छीमारी (Fly-trap), गेळ्याची वनस्पती (Bladderwort) इ.

carnose
मांसल, मगजयुक्त carnosus, fleshy

carotin
पर्णपीतक, कॅराटीन (C४o H ५ ६ ) बहुतेक वनस्पतींच्या निरनिराळ्या भागात (प्राकणूत) आढळणारे तसेच हरितद्रव्यात मिसळून असणारे नारिंगी किंवा लाल द्रव्य, उदा. गाजराच्या मुळांना त्यामुळे शेंदरी रंग प्राप्त होतो. कित्येक वनस्पतींच्या पानावर ह्या रंगाचे ठिपके असतात.

carpel
किंजदल, स्त्रीकेसर फुलातील भिन्न अवयवांपैकी सर्वात आतील (केंद्रवर्ती) व स्त्री गंतुके निर्माण करणारे पुष्पदजल, तळाशी किंजपुट, मध्ये किंजल व टोकास किंजल्क असे याचे तीन क्रमवार भाग असून किंजपुटात बीजके असतात. megasporophyll, pistil

carpellate
किंजदलयुक्त

carpophore
फलधर किंजदलांमधून वाढलेला फुलातील अक्षाचा (पुष्पस्थलीचा भाग, काही फुलांत पुढे फळांचे भाग (फलांश) याला चिकटून राहतात, उदा. जिरेनियम, जिरे, धणे, गाजराची फळे इ.

cartilagions
कूर्चाभ, कूर्चायुक्त कठीण व चिवट परंतु ठिसूळ नसलेले (आच्छादन)

caruncle
नाभिजात बीजरंधाजवळ (उदा. एरंड) किंवा नाभीजवळ (उदा. पॅन्सी) बीजावर वाढलेला फोडासारखा भाग aril. (strophiole)

Caryophyllaceae
पाटलपुष्प कुल, अरुणपुष्प कुल, कॅरिओफायलेसी डायांथस (पिंक, अरुणपुष्प), सायलीन, स्टेलॅरिया इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव बेसींनी पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझ) आणि हचिन्सन यांनी त्याच गणात पण फार संकुचित अर्थाने केला आहे. ऍल्सिनॉइडी व सायलिनॉइडी ही या कुलातील उपकुले आहेत. प्रमुख लक्षणे - खोडावरची पेरी फुगीर, साधी पाने समोरासमोर, कुंठित फुलोरा, सुट्या नखरी पाकळ्यांची व अवकिंज, पंचभागी, द्विलिंगी नियमित फुले, केसरदले पाकळ्यांच्या दुप्पट, २-५ जुळलेली किंजदले, एक कप्याच्या किंजपुटात मध्यवर्ती सुटा बीजकविन्यास आणि बोंड (फळ).

caryophyllaceous
लवंगरुप पसरट पाती व लांबट वृंतक (देठ) असलेल्या (नखरी) सर्व सुट्या पाकळ्यांचा पुष्पमुकुट, सामान्यपणे लवंगेसारखा ( Eygenia caryophyllata Thunl). दिसणारा, उदा. डायांथस (पिंक)

caryopsis
सस्यफल, धान ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून बनलेले, शुष्क, एकबीजी, फलावरण व बीजावरण चिकटून असलेले कृत्स्नफल उदा. भात, मका,गहू, जोंधळा achenial

casein
दधीन, दुग्धप्रथिन, केसीन दुधात व दह्यात असणारे एक प्रथिन protein

casparian dot (strip)
अरीय बिंदू, कॅस्परी बिंदू (पट्टा) अंतस्त्वचेच्या कोशिकांच्या अरीय भिंतीवरील भिंगाच्या आकाराचा ठिपका, कॅस्परी नावाच्या शास्त्रज्ञाच्या नावे असलेली ही सबूरीन (बूचासारख्या) द्रव्याची पट्टी अरीय कोशिकावरणाभोवती असते. endodermis, radial dot

cast
१ प्रतिमा, छाप, ठसा २ गळणे १ प्राचीन वनस्पती अथवा प्राणी यांच्या शरीरावरील विशिष्ट खाणाखुणांचे दर्शन घडविणारे पूर्वकालीन दगड (प्रशेष- उत्खात) २ शरीरावयव निसर्गतः गळून पडणे, उदा. पाने, फुले, फळे इ. fossil

casual
नैमित्तिक काही विशिष्ट निमित्ताने बाहेरुन आलेली परंतु स्थायिक न झालेली (वनस्पती, तण) alien

Casuarinaceae
खडशेर कुल, कॅजुरिनेसी खडशेरणीचा अंतर्भाव करणारे द्विदलिकित लहान कुल, पूर्वी याचा अंतर्भाव ऍमेंटिफेरीमध्ये (नतकणिश गणात) करीत. कारण त्यातील वनस्पती प्रारंभिक मानल्या असाव्या. हल्ली या गणातील वनस्पती मुक्तप्रदल वनस्पतीपासून ऱ्हास पावल्या आसून प्रारंभिक नाहीत असे मानतात. प्रमुख लक्षणे - मरुवनस्पती, शाखा हिरव्या व खोबणीदार, पाने खवल्यासारखी, मंडलित, फुलोरे एकलिंगी, पुंपुष्पे कणिशावर, स्त्री पुष्पे गुच्छावर, पुं पुष्पे सच्छद व सच्छद्रक, एक किंवा दोन परिदले, एक केसरदल व द्विखंडी परागकोश, स्त्री पुष्पे सच्छद व सच्छदक, परिदलहीन, एक कप्याचा व द्विकिंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, बीजके दोन व तटलग्न, फळ पक्षधारी, कपाली व एकबीजी, सर्व फुलोऱ्याचे एक शंकूसारखे संयुक्त शुष्क व कठीण, फळ, तलयुती, अनेक गर्भकोशिका, वायुपरागण ही वैशिष्ट्ये आढळतात व ती लक्षणे प्राचीनत्व दर्शवितात. Casuarina equisetifolia Forst. (Beef wood tree) खडशेरणी

catabolism
अपचय metabolism  katabolism

catalphyll
शल्कपर्ण वनस्पतींचे खवल्यासारखे पान, हे शुष्क किंवा मांसल आणि लहान किंवा मोठे असते. बीजातील दलिकांचाही येथे समावेश होतो. उदा. कांद्यातील मांसल खवले, कळ्यावरचे खवले

catalysis
उत्प्रेरण, निदेशन वितंचक किंवा त्यासारख्या पदार्थाच्या साहाय्याने दुसऱ्या पदार्थात रासायनिक बदल होण्याची प्रक्रिया. उदा. डायास्टेजने तवकिराची साखर बनणे, यामध्ये निदशक (उत्प्रेरक) स्वतः बदलत नाही.

catalyst
उत्प्रेरक, निदेशक निदेशन घडवून आणणारा पदार्थ

catapult mechanism
गलोल यंत्रणा, गोफण यंत्रणा गलोल किंवा गोफण ह्यासारख्या पद्धतीने बिया फळाबाहेर फेकण्याची योजना (साधन), उदा. काही फळे (तेरडा, आंबुशी).

catechu
कात खदिराच्या (Acacia catechu willd) झाडाच्या मध्यकाष्ठापासून काढलेला टॅनिनयुक्त स्तंभक पदार्थ cutch

catkin (ament)
नतकणिश amentum

caudate
पुच्छयुक्त, पुच्छाभ लांबट, निमुळते, शेपटीप्रमाणे, शेपटी असलेले, उदा. Adiantum caudatum L. ह्या नेचाच्या पानाचे टोक लांबट निमुळते असते. Amaranthus caudatus L. caudatus

caudex
१ अक्ष २ शाखाहीन खोड १ खोड व मूळ यांचा समावेश केलेला वनस्पतीचा अक्ष २ फांद्या नसलेले खोड, उदा. सायकस, वृक्षी नेचा, नारळ

caudicle
पुंजवृंतक परागपुंजाचा बारीक देठ, उदा. रूई, आमरे

caulescent
सस्कंध जमिनीवर दिसणारे सरळ खोड असणारी (वनस्पती) उदा. गुलाब, गुलमोहोर,   acaulescent

cauliflorous
स्कंधपुष्पी खोडाच्या जून पृष्ठभागापासून (प्रत्यक्षपणे) फुले येणारे (झाड) उदा. फणस, तोफगोळआ वृक्ष. पुष्पधारक अक्षाच्या अतिपुष्टीबरोबरच दोषयुक्त फुलांच्या निर्मितीमुळे बनलेला फुलोरा, कॉलीफ्लावर (फुलवर) म्हणून प्रसिद्ध आहे.

cauline
स्कंधोद्भव, स्कंधेय जमिनीवरील खोडाचे किंवा खोडापासून उगवलेले (पान), फक्त खोडातच सरळ वाढत राहणारा (वाहक वृंद)

caulis
स्कंध फक्त जमिनीवरच वाढत असलेला वनस्पतीचा अक्ष (खोड).

cavity
कोटर, कोष्ठ, गुहिका वनस्पतीतील किंवा तिच्या लहान मोठ्या अवयवांतील पोकळी

ceae
कुलवाचक संज्ञांना लावलेला प्रत्यय, उदा. Acanthaceae (वासक कुल)

cecidilogy
पिटक विज्ञान पिटकासंबंधीच्या सर्व माहितीची शाखा

cecidium
पिटक बारीक फोड किंवा ऊंचवटा, कवक किंवा कीटक यांच्या संसर्गाने झालेली अनित्य व गाठीसारखी वाढ, उदा. उंबराच्या पानावरील गाठी

Celastraceae
ज्योतिष्मती (कंगुणी) कुल, सेलॅस्ट्रेसी कंगुणी (कांगोणी) व तत्सम इतर द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. या कुलाचा अंतर्भाव ज्योतिष्मती गणात (सेलॅस्ट्रेलीझ) केला जातो. याच गणात द्राक्षा कुल व बोर कुल यांचाही समावेश असून अरिष्ट गणाशी त्याचे आप्तभाव आहेत. तसेच य

cell
१ कोशिका, पेशी २ कोटर ३ पुटक १ वनस्पती व प्राणी यांच्या शरीरातील सर्वात लहान घटक, जीवनाचे एकक, कारण काही प्राणी व वनस्पती फक्त एकाच कोशिकेचे (पेशीचे) बनलेले असतात. जिवंत कोशिकेत प्राकल नावाचा सजीव व कार्यक्षम पदार्थ असतोच व कोशिकेतील सर्व जीवनव्यापार (वृद

cellulose
तूलीर, सेल्युलोज वनस्पतींच्या कोशिकावरणातील मुख्य कार्बनी पदार्थ, कार्बाएहायड्रेट (c६H१०O५)n  c. fungus कवक तूलीर प्राण्यांतील कायटिन नावाच्या पदार्थासारखा कवकांच्या कोशिकावरणात असलेला पदार्थ c. hemi अर्धतूलीर विशेषतः काष्ठयुक्त कोशिकावरणात असलेला तूलीर,

censer mechanism
धूपपात्र यंत्रणा धूप जाळण्याकरिता वापरात असलेल्या पात्राप्रमाणे टोकास तडकलेल्या बोंडातून (फळातून) बीजे आजूबाजूस फेकली जाण्याची योजना. उदा. अफू व पिवळा धोत्रा

central
केंद्रीय, मध्यवर्ती, केंद्रस्थ केंद्राशी संबंध असलेला c. cylinder केंद्रीय चिती मध्यवर्ती भाग, मूळ व खोड यांच्या संरचनेत अंतस्त्वचेच्या आतील सर्व भाग, विशेषतः वाहक ऊतकांना उद्देशून वापरलेली संज्ञा

central body
केंद्रकाय प्रकलाप्रमाणे कार्यक्षम असा जीवद्रव्यातील रंगहीन ठिपका nucleus, Blue green algae.

centralium
सरल कोटर वस्तूंमधील उभी पोकळी

centric leaf
शलाकाकृति पर्ण वृंतहीन (देठ नसलेले), अंतर्रचनेत अरसमात्र, उभे, निमुळते, चितीय हिरवे पान, उदा. कांद्याची पात

centrifugal
अपमध्य, केंद्रोत्सारी केंद्राकडून बाहेर अशा क्रमाने, उदा. कुंठित फुलोऱ्यातील फुलांचा उमलण्याचा क्रम, जाई, जुई, मोगरा इ.

centriole
कर्षकेंद्रकण कोशिकेच्या कर्षकेंद्रातील सूक्ष्म कण (centrosome)

centripetal
अभिमध्य, केंद्रगामी परिघाकडून केंद्राकडे अशा क्रमाने, उदा. अकुंठित फुलोऱ्यातील फुलांचा उमलण्याचा क्रम, जून फुले बाहरच्या बाजूस (अक्षावर सर्वात खाली) आणि कोवळी फुले क्रमाने केंद्राजवळ (अक्षावर सर्वात टोकाकडे) उदा. संकेश्वर

centromere
तर्कयुज रंगसूत्रांच्या काही हालचाली निश्चित करणारा व स्वनिर्मिती करण्यास समर्थ असलेला रंगसूत्रातील एक सूक्ष्म कण

centrosphere
कर्षकेंद्र कोशिकेतील प्रकलाजवळ असलेले प्रथम एक नंतर दोन, वर्णहीन व प्राकलात बुडलेले, केव्हा तारकाप्रमाणे दिसणारे बिंदू, प्रकल विभाजनात रंगसूत्रांना कोशिकेच्या दोन टोकाकडे ओढणे हे त्याचे कार्य असून त्या प्रत्येकातील सूक्ष्म कणास कर्षकेंद्रकण म्हणतात.

centrum
घनकेंद्र घन वस्तूचा मध्यबिंदू.

cephalodium
अपवर्ध १ धोंडपुलाच्या (शैवाक) शरीरातून आलेले शाखायुक्त किंवा बहिर्वक्र उपांग २ स्तबक फुलोरा lichen, head

cereal
तृणधान्य, शूकधान्य ज्यांची फळे वा बीजे खाद्य आहेत अशी लागवडीतील गवते, उदा. भात, जोंधळा, गहू, मका, बाजरी इ.

ceriferous
सिक्थकयुक्त मेण बनविणारे (धारण करणारे), उदा. भुरा कोहळा (Benincasa certifera Savi)

cernuous
लोंबते, नत लोंबणारे, वाढ होत असताना वाकलेले ceruus

chaeta
दण्ड शेवाळी वनस्पतींच्या बीजुकधराचा उभा काडीसारखा आधार sporogonium  seta

chalaza
बीजकतल बीजकातील प्रदेह (मगज) व आवरणे यांचा संधिप्रदेश (बीजकाचा तळप्रदेश) nucellus

chalazogamy
तलयुति बीजकाच्या तळातून परागनलिकेचा प्रवेश व नंतरचे फलन, हा अनित्य व प्रारंभिक प्रकार काही प्राचीन वनस्पतींत आढळतो, उदा. खडशेरणी, भूर्जकुल, अक्रोड कुल, एरंड कुल, वावल कुल, कारगोळ कुल, गंजा कुल इत्यादींतील काहीं जाती porogamy

chalk gland
खट प्रपिंड चूर्णीय द्राव स्त्रवणारी ग्रंथि, उदा. पाषाणभेद (सॅक्सिफॅगा), नेफोलेपिस नेचा

chamaeophyte
निम्नकोरक पादप, निम्नपादप जमिनीच्या पृष्ठभागालगत किंवा २५-३० सें.मी. उंचीपर्यंत शाकीय अवयव धारण करणारी वनस्पती.

chamber
संपुट, पुटक, कोटर, कोष्ठ लहान बंदिस्त पोकळी c. pollen पराग संपुट परागणानंतर त्यांना काही अल्पकाळ सुरक्षित ठेवण्याची प्रदेहावरची पोकळी, उदा. सायकस एc. sperm (archegonial) रेतुक- (अंदुककलश) संपुट अंदुककलशात सुलभ प्रवेश होण्यास त्याच्या टोकास असलेली

chambered pith
कोष्ठित मज्जा, कोटरयुक्त मज्जा अनेक आडव्या पडद्यांनी विभागल्याने अनेक कप्पे असणारे भेंड

changeability
परिवर्त्यता बदल होण्याची क्षमता, सजीवात स्थिरता असून बदल होत नाहीत, अशा गैरसमजुतीविरुद्ध असलेली व सर्वमान्य विचारसरणी mutability

channel
पन्हळ, प्रणाल, नाली पाट, चर, खोबणी, लांबट खोलगट मार्ग

channelled
प्रणालयुक्त, नालीयुक्त खोबण किंवा पन्हळ असलेले (उदा. खोड, शीर, देठ इ.)

chaparral
चॅपरल अमेरिकेतील (कॅलिफोर्निया व नैऋत्य भाग येथील) सौम्य एभूमध्यसामुद्रिक ए हवामानातील जाड पानांच्या झुडपांचा समुदाय (वनश्री).

Characeae
कांडशरीरिका (शैवल) वर्ग, कारेसा हरितशैवल विभागातील (क्लोरोफायटा) एक प्रगच गट (वर्ग). प्रमुख लक्षणे - सतत गोड्या (क्वचित गोड्या व खाऱ्या पाण्याच्या मिश्रण असलेल्या) पाण्यात राहणाऱ्या अनेक कोशिक शैवल वनस्पती, टोकाकडे एका कोशिकाद्वारे वाढ, एककोशिक लैंगिक अवय

character
लक्षण, गुण भिन्न वंशातील अगर जातीतील व्यक्तींना एकमेकापासून ओळखून काढण्यास उपयुक्त भेद. उदा. गुलबुश किंवा घाणेरी यांच्या भिन्न प्रकारातील फुलांचे विविध रंग, बीजयुक्त व बीजहीन द्राक्षे, पेरु, पपई इ.

chasmophyte
विदार पादप खडकांतील भेगांमध्ये वाढणारी वनस्पती.

chemonastic
रसायनानुकुंचनी रसायनाच्या चेतनेमुळे घडून येणारे (अवयवांचे वलन किंवा वळणे), त्या चेतनेमुळे हालचाल करणारा अवयव, अवयवाची स्थिती व आकार यात बदल

chemonasty
रसायनानुकुंचन रासायनिक चेतनेमुळे वळण्याचा प्रकार, येथे चेतकाच्या दिशेचा व वळणाच्या दिशेचा संबंध नसतो.

chemosynthesis
रसायन संश्लेषण, रासायनिक संश्लेषण रासायनिक विक्रियेतून उद्भवणाऱ्या ऊर्जेचा वापर करून केलेली अन्ननिर्मिती उदा. काही स्वोपजीवी सूक्ष्मजंतु

chemotactic
रसायनानुचलनी रासायनिक चेतकामुळे घडून येणारे (चलन) उदा. अस्थिर वनस्पतींचे (सूक्ष्मजंतू, शैवले इ.) अथवा त्यांच्या सुट्या भागांचे (उदा. बीजुके, गंतुके इ.) स्थलांतर (चेतकाकडे किंवा चेतकापासून दूर)

chemotaxis
रसायनानुचलन रसायनाच्या चेतनेमुळे हालचाल (स्थलांतर) घडून येण्याचा प्रकार उदा. पाण्यातील सूक्ष्म व स्वतंत्र शैवले अथवा रेतुके विशिष्ट रसायनाकडे किंवा त्याविरुद्ध पोहत जाण्याची प्रक्रिया, नेचांची रेतुके अंदुककलशातील रासायनिक द्रव्याकडे जातात, सूक्ष्मजंतू अन्नकणाकडे पण विषारी पदार्थांपासून दूर जातात.

chemotropic
रसायनानुवर्तनी रसायनाच्या चेतनेमुळे त्याकडे किंवा त्याविरुद्ध होणारी (वाढ व त्यामुळे वळणे) उदा. परागनलिकेची किंजलातील वाढ

chemotropism
रसायनानुवर्तन रसायनाकडे किंवा त्याविरुद्ध भागाकडे वाढण्याचा प्रकार उदा. बुरशीचे काही तंतू अन्नपदार्थात वाढतात तर काही वर हवेत वाढतात

chenopodiaceae
चक्रवर्त (चाकवत), चंदनबटवा, बीट, पालक, मायाळ (मयाळ, वेलबोंडी) इत्यादी द्विदलिकित वनस्पतीचे कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी सेंट्रोस्पर्मी गणात, बेसीनी पाटलपुष्प (कॅरिओफायलेलीझ) गणात आणि हचिन्सननी चक्रवर्त गणात (चिनोपोडिएलीझ) केला आहे. प्रमुख लक्ष

chersophyte
शुष्कभूवनस्पती कोरड्या व ओसाड जमिनीवर वाढणारी वनस्पती. उदा. एकदांडी, पिवळा धोत्रा, काही निवडुंगाच्या जाती

chiasma
व्यत्यास कोशिकेतील प्रकलाच्या न्यूनीकरण विभाजनात दोन समजात रंगसूत्रांची परस्पराशी फुलीतील (क्रॉस) दोन रेषाप्रमाणे होणारी युति, या अवस्थेत त्या दोन्हीतील गुणघटकांचा विनिमय होऊ शकतो. pl. chiasmata

chilling
अतिशीतन अतिथंड करण्याची प्रक्रिया

chimaera
विचित्रोतकी एकापेक्षा अधिक व जननिकदृष्ट्या भिन्न ऊतके असलेली वनस्पती. याचा उगम उत्परिवर्तनात किंवा विकासावस्थेच्या आरंभी एखाद्या कोशिकेतील अनित्य रंगसूत्राच्या वाटणीत असतो.

chiropterophilous
जतुकापरागित पाकोळ्या किंवा वाघळे यांच्या मदतीने परागण घडवून आणणारी (वनस्पती किंवा फुले) उदा. कदंब, डाळिंब

chitin
कायटिन शृंगद्रव्यासारखा पदार्थ, हा प्राण्यांच्या विशेषतः कीटकांच्या शरीराच्या आच्छादनात असणारा, मजबूत व रसायनाच्या प्रक्रियेला सहसा दाद न देणारा असून कवकाच्या कोशिकावरणातील द्रव्यासारखा असतो, तो नायट्रोजनयुक्त बहुशर्कर असतो.

chlamydorspore
आवृतबीजुक विशेष जाड आच्छादन असलेले कवकाचे बीजुक, उदा. बुरशी

chlorenchyma
हरिमोतक हरितकणूंनी भरलेल्या कोशिकांचा समूह

Chlorophyceae
हरित शैवल वर्ग फक्त हरितद्रव्य असलेला व कायक वनस्पतींपैकी एक शैवल गट, आधुनिक वर्गीकरणपद्धतीप्रमाणे हरित शैवल विभागाचे (क्लोरोफायटा) हरितशैवल व कांडशरीरिका (कारेसी, कॅरोफायसी) असे दोन वर्ग मानतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेककोशिक, अनेक कोशिकातील वाढ

chlorophyll
हरितद्रव्य वनस्पतींच्या सर्व हिरव्या भागातील कोशिकात प्राकणूत असणारे हिरवे द्रव्य, या द्रव्यात अ आणि ब असे हिरवे द्रव्य, कॅरोटिन नामक नारिंगी व झँथोफिल हे पिवळे अशी द्रव्ये यांचे मिश्रण असते. कार्बन आत्मसात करून अन्ननिर्मिती करण्यास सौर ऊर्जा शोषून घेणे व

Chlorophyta
हरितशैवल विभाग अबीजी वनस्पतींपैकी अत्यंत साध्या शरीराच्या (कायक) हिरव्या, प्रारंभिक, स्वतंत्र वनस्पतींचा गट. प्रमुख लक्षणे- वर वर्णन केलेले हरितद्रव्य प्राकणूत असून बहुतेक सर्व गोड्या पाण्यात पण लहान असून काही समुद्रवासी आणि काहीशा मोठ्या, संचित पदार्थ स्

chloroplast
हरितकणु, हरित कवक हरितद्रव्य धारण करणारे वनस्पतींच्या कोशिकेतील एक कोशिकांगक (प्राकणु) plastid

chlorosis
हरिताभाव अन्नात लोहाभाव होऊन हिरवे द्रव्य न बनल्याने मूळच्या हिरव्या वनस्पतीस आलेला फिकटपणा etiolated

chondriosome
कलकणु सूक्ष्मजंतू व निळी शैवले याखेरीज इतर वनस्पतींत आढळणारा आणि विशेषत्व पावलेला कोशिकेतील प्राकलातील सूक्ष्म कण, हा प्रथिन व मेद (चरबी) यांचा बनलेला असून अनेक वितंचके अशा कणांपासून निर्माण होतात.

choripetalae
पृथक्दली श्रेणी, कोरीपेटॅली जुन्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे, फुलात दोन परिदलमंडले (संवर्त व पुष्पमुकुट) असून सुट्या पाकळ्या असलेल्या, परिदलाचे एक मंडल असलेल्या व परिदलांचा अभाव असलेल्या या सर्व द्विदलिकित फुलझाडांची एक श्रेणी, बेसींनी या श्रेणीला मुक्त प्रद

chorisis
भंग, खंडन दोन किंवा अधिक खंड (भाग) होण्याची प्रक्रिया (रोग) यामुळे काही अनित्य संरचना बनतात. उदा. एका पानाची किंवा तत्सम अवयवाची प्रथमपासून दोन किंवा अधिक अवयवांत (अधिक पाकळ्या, संदले, दले, दलके इ.) विभागणी होणे.

chorology
स्थानिक (सीमित) प्रसार मर्यादित क्षेत्रातील जातींचा आढळ किंवा तत् संबंधीची माहिती.

chromatid
रंगसूत्रार्ध प्रकल विभाजनात प्रत्येक रंगसूत्राच्या उभ्या (अन्वायाम) विभागणीने होणाऱ्या दोन भागांपैकी एक, मध्यावस्थेत ते एकमेकांपासून सुटे होऊन अंत्यावस्थेत कोशिकेच्या दोन टोकांकडे जातात. mitosis, meiosis, chromosome

chromatin
रंगसूत्रद्रव्य, रंज्यद्रव्य कृत्रिमरीत्या रंगवले असता ते अधिक शोषून घेणारा प्रकलातील विशिष्ट पदार्थ c. granule रंगसूत्रकणु रंगद्रव्य शोषून घेणारे रंगसूत्रातील मुख्य पदार्थाचे सूक्ष्मकण nucleo-protein

chromatophore
वर्णकणु chromoplast.

chromogenic
वर्णजनक रंगद्रव्य निर्माण करणारा (पदार्थ, सजीव, विक्रिया, प्रक्रिया इ.)

chromomere
रंगसूत्रकण प्रकल विभाजनात पूर्वावस्थेत रंगसूत्राच्या संरचनेत दिसून येणारे त्याच्या अक्षावरील अनेक सूक्ष्मकण

chromonema
रंगसूत्र तंतु रंगसूत्राच्या संरचनेत सर्पिल धाग्यांच्या वेटोळ्याच्या रुपात असणारे त्यांचे सर्व रंज्यद्रव्य (pl. chomonemata)

chromoplasm
वर्णस्तर रंगद्रव्य धारण करणारा थर, उदा. नीलहरित शैवलांच्या कोशिकेतील बाहेरचा रंगद्रव्य असलेला थर

chromoplast
वर्णकणु, रंगीत लवक वनस्पतींच्या कोशिकेतील हरितद्रव्याखेरीज इतर (नारिंगी, शेंदरी, लालसर, पिवळे) रंगद्रव्ये धारण करणारा सजीव सूक्ष्मकण (प्राकणु) plastid, chloroplast

chromosomal aberration
रंगसूत्री विपथन कोशिकेची विभागणी चालू असताना रंगसूत्रांच्या भिन्न प्रकारे होणाऱ्या संपर्कामुळे त्यांच्यातील जनुकांच्या मूळच्या सापक्ष संघटनेत घडून येणारा बदल

chromosome
रंगसूत्र, गुणसूत्र काही अपवाद वगळल्यास सर्व प्राण्यांत व वनस्पतीत, त्यांच्या शरीरातील लहानात लहान घटकात (कोशिकेत, पेशीत), विभागणीच्या वेळी त्यातील मुख्य (रंगद्रव्यशोषक) बिंदूपासून (प्रकलापासून) सुटा होणारा, वैशिषट्यपूर्ण व आनुवंशिक गुणधारक, तंतूसारखा लहान

chromosome set
रंगसूत्र संच (गट) काही सजीव व्यक्तींच्या शरीराच्या कोशिकेतील (जातिविशिष्ट) रंगसूत्रांचा एकगुणित गट, काहींच्या शरीर घटकांत असे गट दोन असून प्रजोत्पादक षटकांत एकच गट असतो. haploid, diploid.

chrysanthine
पीतपुष्पी पिवळी फुले असलेली उदा. शेवंती (chrysanthemum indicun L.)

cilia
केसले cilium

ciliaris
केसलाभ पापणीच्या केसाप्रमाणे किंवा आखुड केसाप्रमाणे

ciliary
केसली केसलामुळे घडून येणारी (हालचाल उदा. काही शैवले, बीजुके, गंतुके, सूक्ष्मजंतू) c.movement केसली चलनवलन एक किंवा अनेक केसलांमुळे होणारी हालचाल  cilium

ciliated
सकेसल केसल असलेले c,cell सकेसल केशिका प्राकलाचे सूक्ष्म धागे केसाप्रमाणे कोशिकेबाहेर असलेली कोशिका, उदा. काही सूक्ष्मजंतू, काही शैवले, बीजुके, गंतुके, कवक इ.

cilium
केसल, पक्ष्माभिका कोशिकाबाहेर आलेला प्राकलाचा फार लहान धागा (कोशिकांगक) flagellum

cincinus
वृश्चिकाभ वल्लरी फुलोऱ्याच्या मुख्य अक्षाची वाढ फूल येऊन थांबल्यावर पुढे क्रमाने पण दोन्ही बाजूस (एकांतरित) नवीन उपाक्ष येऊन त्यांची तीच गत होते, यामुळे वास्तविक नागमोडीसारखा (सर्पगती) पण प्रत्यक्षतः विंचवाच्या नांगीप्रमाणे वाकडा दिसणारा फुलोरा, उदा. हेलि

cinereous
रक्षावर्णी, राखी राखेप्रमाणे करड्या रंगाची (उदा. साल)

circinate
अवसंवलित टोकाकडून तळाकडे याप्रमाणे कळीमध्ये गुंडाळलेली पानाची अवस्था, उदा. नेफोलेपिस नेचा, सायकसची दले ptyxis

circular
वर्तुळाकृति वाटोळे (पान) उदा. कमळ, ट्रोपिओलम.

circulation
अभिसरण कोशिकेतील प्राकलाच्या सूक्ष्म प्रवाहाचे अनियमित चलन (वाहणे), उदा. ट्रॅडेस्कॅन्शियाच्या फुलातील केसरदलावरचे केस

circumnutation
प्रच्यवन, परिवर्धन खोड, मूळ व तणावा यांच्या टोकांशी एकावेळी सर्व बाजूंनी सारखी वाढ न होता ती क्रमाने टोकाच्या सर्व बाजूस होण्याचा प्रकार, यामुळे ते टोक सरळ न वाढता जवळच्या आधाराभोवती गुंडाळते, वेली व तणावा यांना हे सोयिस्कर असते. आधार न मिळाल्यास ते अवयव

circumscessile (transverse) dehiscence
वृत्तीय स्फुटन गोलसर फळाच्या भोवताली जाणाऱ्या मध्यरेषेबरहुकूम तडकण्याची प्रक्रिया, उदा. घोळ, कुरडू, निलगिरी इ.

cirrhose apex
सूत्राग्र, प्रतानाग्र तणाव्यासारखे (लांबट सुताप्रमाणे) टोक, उदा. केळीच्या पानाची सुरळी, कळलावीचे पान

citation
उल्लेख, अवतरण कुल, वंश, जाती इ. च्या नावापुढे प्रथम प्रसिद्धी दिली त्याचा संक्षिप्त नामनिर्देश उदा. Pinus longifolia Roxb. (चीड)

citreus
पीत लिंबासारखे पिवळे

citric acid
सायट्रिक अम्ल लिंबाच्या फळांत विशेषेकरून आढळणारे आम्ल

Citrus
लिंबू वंश कागदी लिंबू, पपनस, संत्रा, मुसुंब, महाळुंग, ईडलिंबू इत्यादी वनस्पतींचा गट (वंश) citron

cladode
पर्णझोड एकाच कांडाची, हिरव्या पानासारखी दिसणारी, छदाच्या किंवा लवकर पडून जाणाऱ्या पानाच्या बगलेत वाढणारी आणि पानाचे कार्य करणारी फांदी. उदा. शतावरी, रस्कस इ. cladophyll

clasping
वेष्टक, परिवेष्टी अंशतः किंवा पूर्णपणे वेढणारा (अवयव) उदा. काही आमरांची वायवीमुळे, गवतांच्या पानांचे तळभाग leaf sheath.

class
वर्ग श्रेणी, गण, कुले, वंश व जाती ह्या वर्गीकरणातील भिन्न दर्जांच्या एककांचा समावेश होतो अशी विशिष्ट अर्थाने वापरलेली गटवाचक संज्ञा, विभाग व उपविभाग या वरच्या दर्जाच्या गटात एक किंवा अनेक वर्गांचा समावेश करतात.

Classification
वर्गीकरण सर्व सजीवांतील वरवरचे आणि विशेषतः खोलवर आढळलेले साम्य व त्यावरुन निश्चित केलेले आप्तभाव लक्षात घेऊन, विशिष्ट तात्त्विक बैठकीवर आधारलेले त्यांचे भिन्न दर्जाचे लहानमोठे नैसर्गिक गट करून योजनापूर्वक सर्वांचा समावेश होईल अशी व्यवस्था असलेली पद्धती (स

classification of vegetation
वनश्रीचे वर्गीकरण एखाद्या प्रदेशातील संपूर्ण वनस्पति समुदायांचे (किंवा पादपरुप आच्छादनाचे) लहानमोठे गट करण्याची प्रक्रिया (पद्धती). यामध्ये समावास, संगति, संघात, कृत्तक, संहति, समूह इत्यादी विशिष्ट गटांचे सामान्य स्वरुप, संरचना, विकासाची पातळी, अनुक्रमणाच

clavate
गदाकृति गदेप्रमाणे (खाली निमुळते व टोकाकडे रुंदावत गेलेले) असलेले उदा. गदाकवक वनस्पतीतींल बीजुककोश, शेवाळीपैकी काहींच्या रेतुकाशयाप्रमाणे, उदा. मार्चाशिया club shaped

claw
नखर, वृंत्तक संदलाच्या किंवा पाकळीच्या खालचा देठासारखा बारीक व रुंद भाग, वरच्या रुंद भागास पाते म्हणतात. उदा. डायांथस (पिंक), काही वनस्पतींच्या दलांचे (तणाव्यांचे) आकड्यासारख्या (नखासारख्या) अवयवात झालेले रुपांतर उदा. वाघनखी वेल (Bignonia gracilis Lodd).

cleavage
पाटन, भंजन रंदुकाच्या पुनःपुनः होणाऱ्या विभागणीत प्रकल विभाजनानंतर होणारी प्राकलाची विभागणी (segmentation)

cleft
खंडित साधारण मध्यापर्यंत विभागलेले उदा. पान

cleistogamous flower
मुग्धपुष्प बंदफुल, बंद राहूनही स्वपरागकण व स्पफलन होणारे लहान फूल उदा. पॅन्सी, तेरडा, कंचट कुलातील काही जाती, काही आमरे इ.

cleistogamy
मुग्धयुति वर वर्णन केलेल्या प्रकारचे प्रजोत्पादन

cleistothecium
युक्त धानीफल धानीकवकात आढळणारा व धानीबीजुकनिर्मिती करणारा आणि कुजून फुटेपर्यंत बंद राहणारा प्रजोत्पादक अवयव

climate
जलवायुमान थंडी, उष्णतामान, ओलावा, पाऊस इत्यादी वातावरणसंबंधी परिस्थिती.

climax
चरम, परम- विद्यमान परिस्थितीतील सापेक्षतः स्थिर झालेला (असलेला) अथवा कायमपणा आलेला (पादप समूह). c.community चरम समुदाय विशिष्ट परिस्थितीत न बदलता राहिलेला वनस्पतींचा समुदाय (समूह). c. dominant चरम प्रभावी स्थिर वनस्पति समूहातील ठळकपणे आढळणारी परिणामकारक

climax stage
चरमावस्था बदलत्या नैसर्गिक वनश्रीची अंतिम अवस्था, ही परिस्थितीसापेक्ष असते.

climber
आरोहिणी आपल्या नाजूक खोडामुळे स्वतंत्रपणे सरळ न वाढता तणावे, आकडे, मुळे इत्यादी अवयवांच्या आधारे वर चढत जाणारी वेल उदा. काकडी, मोरवेल, कृष्णकमळ इ.

climbing root
आरोही मूळ वर चढत जाण्यास उपयुक्त असे वायवी मूळ, उदा. नागवेल, अंजनवेल इ.

cline
संक्रामी समुदाय परिस्थितीतील फरकामुळे भिन्नपणा आलेल्या शेजारच्या दोन समुदायांना जोडणारा काहीसा मिश्र व क्रमिकता दर्शविणारा वनस्पतींचा समुदाय उदा. सपाट मैदान व डोंगर किंवा दलदली किनारा व शेजारची चढण अशा क्षेत्रांमधील वनश्रींचा संधिप्रदेश

clinostat
नतिनियंत्रक, क्लीनोस्टॅट वनस्पतींच्या अवयवांच्या वाढीवर गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम नाहीसा करून त्याची वाढ दर्शविणारे उपकरण

clockwise
सव्य, दक्षिणावर्त उजवी, घड्याळाच्या काट्यांच्या नित्य दिशेने होणाऱ्या हालचालीप्रमाणे, उदा. काही वेलींचे आधाराभोवती वेढणे, तिचे शेंडा उजवीकडून डावीकडे वर्तुळे घेतो, उदा. गुळवेल, गारवेल, पोपटवेल इ. sinistral, anti clockwise  (dextral, right handed)

clone
कृत्तक उद्यानविद्येत (बागेसंबंधीच्या माहितीत) ही संज्ञा अलीकडे फक्त शाकीय पद्धतीने अभिवृद्धी केली जाते अशा वनस्पतीला वर्गीकरणातील एकक या अर्थी वापरतात.

clone
कृत्तक उद्यानविद्येत (बागेसंबंधीच्या माहितीत) ही संज्ञा अलीकडे फक्त शाकीय पद्धतीने अभिवृद्धी केली जाते अशा वनस्पतीला वर्गीकरणातील एकक या अर्थी वापरतात.

closed bundle
अवर्धी वृंद वाढीस जबाबदार असलेल्या (ऊतककर) कोशिकांच्या अभावामुळे नवीन वाढ न होणारा वाहक घटकांचा (वाहिकांचा व वाहिन्यांचा) संच vascular bundle, open bundle, cambium

club fungus
गदाकवक गदेप्रमाणे बीजुककोश असलेले कवक Basidiomycetes

club mosses
मुद्रल शेवाळी Lylcopodinae

cluster
गुच्छ, पुंज झुबका उदा. एकत्र वाढलेली पाने, फांद्या, फुले किंवा फळे.

co-dominance
सहप्रभाविता ईखाद्या वनस्पति संगतीत दोन किंवा अधिक प्रभावी वनस्पतीपैकी एकाचा विशेष प्रभाव (प्रभावीपणा)

co-dominant
सहप्रभावी वर वर्णिलेल्याप्रमाणे संगतीतील एक व्यक्ती

co-enzyme
सहवितंचक आंबणे, फसफसणे यासारख्या वितंचनाच्या (रासायनिक बदलाच्या) प्रक्रिया चालू राहण्यास मुख्य वितंचकाशिवाय (कार्बनी निदेशकाशिवाय) जरूर ते दुसरे द्रव्य (निदेशक), हे अलग करून प्रक्रिया थांबविता येते व पुन्हा मिसळून ती सुरू करता येते. उदा. यीस्ट (किण्व) मधी

coaction
सहक्रिया symbiosis

coadaptation
सहानुयोजन परस्परांवर अवलंबून असणाऱ्या दोन सजीवात किंवा दोन अवयवांत होणारा संबंधित बदल.

coadnate
संलग्न परस्परांना जोडलेले (दोन अवयव किंवा उपांग)

coagulate
क्लथन, साखळणे घन व विरल (द्रव) भाग निराळे होणे

coalescence
संमीलन प्रथमपासून एकमेकास जुळून वाढण्याची प्रक्रिया उदा. फुलातील भिन्न दले cohension

coastal
समुद्रतटीय समुद्र किनाऱ्यावरचे, समुद्रकाठी असलेले

coat
१ आवरण, आच्छादन २ लेपन १ वनस्पतींच्या अवयवांचे (फळ, बीज, पराग, बीजुक इ.) आवरण २ क्यूटिन, मेण यासारख्या पदार्थांच्या आवरणाला लेपन ही संज्ञा अधिक अर्थपूर्ण आहे.

coated (tunicated)
आवृत आवरण असलेले उदा. कंद, बीज tunicated bulb

cob
स्थूलाक्ष गोलाकार, दंडाकृति (चितीय) व फुगीर अक्ष उदा. मक्याच्या कणसातील कणिशकांच्या अनेक रांगा असलेला जाडजूड भाग spikelet

coccineus
शेंदरी, सिंदूरवर्णी उदा. पेंडगूळ (Ixora coccinea L.)

coccus
१ गोलाणु २ कुडी १ सूक्ष्मजंतूपैकी वाटोळ्या आकाराचे जंतू, उदा. प्रमेह जंतू २ विशिष्ट पालिभेदी (फुटून तुकडे होणाऱ्या) फळाचा एकबीजी भाग (फलांश), उदा. एरंड schizocarpic fruit

cochlea
सर्पिल शिंबा फिरकीप्रमाणे गुंडाळलेली शिंबा (शेंग), उदा. विलायती चिंच (Pithecolobium dulce Benth).

cochlear
चमचाकृति चमच्यासारख्या आकाराचा (अवयव) spoon shaped

coenanthium
स्थालीकल्प थाळीसारख्या (चकतीसारख्या) जाड पुष्पासनाच्या पृष्ठभागात अंशतः रुतलेल्या फुलांचा समूह, अकुंठित पुष्पबंधाचा (फुलोऱ्याचा) एक प्रकार उदा. डॉर्स्टेंनिया

coeno-
सह- एकत्र असणारे या अर्थाचा उपसर्ग

coenobium
निवह मर्यादित संख्या व संघटन असलेला शैवलांच्या कोशिकेचा समूह, हा एका व्यक्तीप्रमाणे वावरत असून अनेकदा तळ व शेंडा (धुवत्व) असा भेद दर्शवितो. तसेच स्वतःसारख्या कोशिकांचे समूह निर्माण करतो. उदा. हॉल्व्हॉक्स.

coenocyte
बहुप्रकल कोशिका प्राकलात अनेक प्रकले विखुरलेली कोशिका, उदा. व्हाउचेरिया शैवल, म्यूकर बुरशी, चिकाळ कोशिका

coenogamete
बहुप्रकल गंतुक अनेक प्रकले असलेली प्रजोत्पादक कोशिका, उदा. म्यूकर बुरशी

cohension
संसंग coalescence

coherent
संसक्त पूर्ण संपर्क असलेले, पण जुळून एकरूप नसलेले (सारखे अवयव) connate

cohesion mechanism
संसंग यंत्रणा पाण्याच्या कणांच्या परस्परांशी चिकटून राहण्याच्या धर्मावर अवलंबून असणारी संरचना (यंत्रासारखी कार्य करणारी रचना) उदा. नेचाच्या बीजुककोशाचा स्फोट घडविणारे वलय.

cohort
गोत्र अनेक निकटवर्ती गणांचा गट, श्रेणीपेक्षा लहान असे वर्गीकरणातील एकक

colchicine
कॉल्चिसाइन एक वनस्पतीजन्य (Colchicum autumnale) क्षाराभ द्रव्य, रंगसूत्रांची संख्या वाढविण्याकरिता याचा उपयोग केला जातो ploidy

coleoptile
आदिकोरकवेष्ट बहुतेक सर्व गवतांचे बी रुजताना प्रथम फुटणारे अंकुराचे (आदिकोरकाचे) संरक्षक आवरण plumule

coleorhiza
आदिमूलवेष्ट बहुतेक गवतांचे बीज रुजून मोड (पहिले मूळ) येत असता प्रथम फुटणारे संरक्षक आवरण, हा गर्भाचा एक भाग असतो.

collar
स्कन्धमूलसंधि खोड व मूळ यांना जोडणारा वलयासारखा भाग. collet

collateral
संलग्न एखाद्या संरचनेतील भाग परस्परास चिकटून किंवा परस्पराजवळ असण्याचा प्रकार c. vascular bundle संलग्न वाहक वृंद प्रकाष्ठ व परिकाष्ठ परस्परालगत (एका त्रिज्येवर) असलेला वाहक कार्य करणारा ऊतक संच

collateral bud
संलग्न कलिका पानाच्या किंवा छदाच्या बगलेतील कळीशेजारची अधिक कळी.

collecting cells
संग्राहक कोशिका पानातील वरच्या पृष्ठभागाखाली असणाऱ्या (व स्कंभोतकाखाली) हरितद्रव्यहीन, भरपूर प्राकलयुक्त व फुगीर तळाच्या कोशिका, शर्करायुक्त अन्न वरच्या कोशिकांतून घेऊन ते वाहकवृंदामार्फत देठ व खोडाकडे पाठविण्याचे कार्य या कोशिका करतात. palisade tissue

collective fruit
संयुक्तफळ अनेक फुले असलेल्या फुलोऱ्यापासून बनलेले एकच फळ , तुतू, फणस, अननस, अंजीर इ. composite fruit

collenchyma
स्थूलकोनोतक, स्थूलकोनोति विशेषेकरून कोनांमध्ये अधिक जाड व कठीण तूलीरमय आवरण असलेल्या बहुधा लांब कोशिकांचा समूह (ऊतक), हा वनस्पतींच्या वाढत असलेल्या भागांतच (मुळाशिवाय इतर) आढळतो व त्याचे कार्य संरक्षणाचे असते.

colletor
श्लेष्मप्रपिंड काही फुलझाडांच्या कळ्यांवरील, चिकट पदार्थ स्त्रवणारा केस

colloid
कलिल, श्लेष्माभ डिंक- गोंदासारखा चिकट पदार्थ, हा पूर्णपणे पाण्यात न विरघळणारा असून त्याचे सूक्ष्ण कण पाण्यात मिसळून तरंगत (निलंबित) राहणारे असतात, सर्व सजीवांतील जीवनरस(प्राकल) याच स्वरुपात असतो.

colloidal
कलिकवृत्ति, कलिकाभ

colonisation
वसन अनेकांनी एकत्र कायम चिकटून वाढणे किंवा राहणे.

colony
समूह, वस्ति, निवह अनेक शरीरघटक, स्वतंत्र कोशिका, व्यक्ती इत्यादींचा संच, उदा. नैसर्गिकरीत्या सहज एकत्र वाढलेल्या वनस्पीतंचा किंवा प्राण्यांचा संच, व्हॉल्व्हॉक्स, पँडेरीना, या वनस्पती म्हणजे अनेक सारख्या एककोशिक घटकांचा संच. एककोशिक सजीवांनी क्रमविकासात बह

columella
कील १ शेवाळींच्या बीजुकाशयामधील मध्यवर्ती गाभा २ काही कवकांच्या बीजुककोशातील मधला वंध्य भाग उदा. म्यूकर ३ किंजदलांना आधारभूत असा फुलातील अक्ष, उदा. चामर कुल, भांड कुल ४ काही नेचांमध्ये आढळणारा बीजुककोशधारी दांडा, उदा. ट्रायकोमॅनिस नेचा

column
स्तंभ फक्त केसरदले एकत्र जुळून बनलेली किंवा केसरदले, किंजल व किंजल्क जुळून एकरुप बनलेली संरचना

columnar
स्तंभी, स्तंभाकार स्तंभ असलेले, स्तंभासारखे

coma
गुच्छ १ काही बियांच्या टोकास असलेला केसांचा तुरा किंवा झुबका, उदा. रूई, कुडा इ. २ अननसाच्या फळाच्या टोकावरील छदांचा झुबका, ताल वृक्षांच्या खोडाच्या टोकावरील पानांचा झुबका

comate
गुच्छल तुरेवाला, झुबकेदार (अवयव)

combretaceae
अर्जुनकुल, कॉम्बेटेसी अर्जुनसादडा, हिरडा, बेहडा, ऐन, किंजळ, धावडा, लाल चमेली, धायटी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) करण्याबद्दल एकमत आढळते. प्रमुख लक्षणे (काहीशी मिटेंसी अथवा जंबुल कुलाप्रमाणे) - वृक्ष, क्षुपे व वेली, साधी पाने, क्वचित एकलिंगी, बहुधा द्विलिंगी, पंचभागी, नियमित पण क्वचित अपूर्ण, अधःस्थ किंजपुटात, एक कप्पा व दोन किंवा अधिक बीजके. फळ अश्मगर्भी किंवा शुष्क व सपक्ष

Commelinaceae
कंचट कुल, कॉमेलिनेसी कंचट (कोशपुष्प), केना, कानवला इत्यादी एकदलिकित लहान औषधीय वनस्पतींचे कुल, याचा समावेश एंग्लर व प्रँटल यांनी फॅरिनोजीमध्ये (गणात) व बेंथॅम व हूकर यांनी कॉरोनॅरी या श्रेणीत केला असून हचिन्सन यांनी कॉमेलिनलीझमध्ये (कंचट गणात) केला आहे. प

commensal
सहभागी परस्परांच्या अन्नासंबंधीच्या फायद्याकरिता एकत्र जीवन कंठणारे दोन सजीव, उदा. दगडफूल Lichen

commensalism
सहभोजिता अन्नविषयक फायद्याकरिता दोन सजीव एकत्र राहण्याचा प्रकार उदा. शैवाक Lichen

common
सामान्य, सामायिक, समान सहज व नित्य आढळणारे, दोन्हींना किंवा अनेकांना उपयुक्त. c. bundle समाइक वृंद, समानवृंद खोड व पान या दोन्हीत उपयुक्त असा वाहक संच c. petiole समाईक (सामायिक) वृंत, समान वृंत संयुक्त पानाचा प्राथमिक व प्रमुख देठ, त्यावरील सर्व दलांना हा

commose
शिखालु केसांचा झुबका असलेले

communis
संहतजीवी जमाव (समूह) करून राहणारी (वनस्पती), उदा. एरंड (Riccinus communis L.)

community
समुदाय कमीजास्त प्रमाणात सारख्याच परिस्थितीत एकत्र वाढत असलेल्या अनेक वनस्पतींचा समूह

compact
व्यूढ, घट्ट, संहत एकत्र बळकट केलेले (असलेले), उदा. कोशिकासमूह

companion cell
सहचरी कोशिका विशिष्ट कोशिकेशी आरंभापासून सतत संबंध असणारी कोशिका. परिकाष्ठातील चाळणी असलेल्या नलिकेबरोबर नेहमी (बहुधा) आढळणारी साधी कोशिका. phloem

compatible
स्वफलनशील स्वतः आपल्या पुं- व स्त्री गंतुकाचे मीलन घडवून आणण्याची क्षमता असलेली (वनस्पती, पिढी).

compensating point
समकारी बिंदु प्रकाशसंश्लेषणाच्या अन्नाची केलेली निर्मिती व श्वसनामुळे खर्च झालेले अन्न यांमध्ये समतोल राखणारी प्रकाश तीव्रता, इतर घटक स्थिर आहेत असे मानल्यास या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साइड किंवा ऑक्सिजन यांचे ग्रहण किंवा विसर्जन घडून येत नाही.

compensation period
अनुपूर्ति काल प्रकाशाभावी चालू असलेल्या हिरव्या वनस्पतीतील श्वसनामुळे खर्च झालेल्या अन्नपदार्थांची (कार्बाएहायड्रेटची) प्रकाशात निर्मितीने भरपायी करण्यास लागलेला अवधी.

competition
स्पर्धा, चुरस सामुदायिक जीवनात, समान परिस्थितीत असलेल्या सजीवांत, जीवनकलहामुळे आलेला संबंध व त्यातून एकमेकांवर विजय मिळविण्याकरिता झालेली प्रक्रिया (केलेली धडपड).

complementary
पूरक अभाव भरुन काढणारा, उदा. घटक, रंगद्रव्य इ. c.cells पूरक कोशिका त्वक्षाकरापासून बाहेरच्या बाजूस तयार होणाऱ्या उतकांमध्ये वल्करंधाचे ठिकाणी असलेल्या मोकळ्या, पातळ आवरणाच्या व भरपूर हवा खेळविणाऱ्या कोशिका c. factor पुरक घटक (कारक) संततीतील काही

complete flower
पूर्णपुष्प परंपरेने निश्चित केल्याप्रमाणे चार पुष्पदलांची मंडले असलेले फूल, उदा. धोत्रा, वांगे, टाकळा इ.

complex
जटिल, संमिश्र, व्यूह गुंतागुंत असलेली (संरचना, विक्रिया, प्रक्रिया इ.)

Compositae
सूर्यफूल कुल, कंपॉझिटी, ऍस्टरेसी माका, सूर्यफूल, झेंडू, शेवंती, एकदांडी, सहदेवी, कुसुंबा (करडई), कारळा (कोरटे), डेझी, झिनिया, डेलिया इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे मोठे कुल. या कुलाचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी ऍस्टरेलीझ या गणात एंग्लर व प्रँटल यांनी घंट

composite fruit
संयुक्त फळ collective fruit, multiple fruit  compound fruit

composition
संघटन सर्व स्थूल आणि लहान घटकांचे प्रमाण, उदा. पादप समुदायातील भिन्न वनस्पतींचे प्रमाण किंवा जमिनीतील खनिज द्रव्यांचे प्रमाण.

compost
मिश्रखत अनेक मृत, कार्बनी व कुजकट पदार्थांचे बनविलेले मिश्रण

compound
संयुक्त अनेक साध्या व सारख्या भागांचा बनलेला (अवयव) c.leaf संयुक्त पर्ण अनेक लहान दले एका प्रमुख देठावर किंवा मध्यशिरेवर असलेले पान, कधी ही दलेही पुन्हा विभागलेली असतात. उदा. निंब, संकेश्वर, शेवगा इ. c. pistil संयुक्त किंजमंडल (किंज) अनेक किंजदलांच्या

compressed
संपीडित, संदम्न एकत्र दाबलेला, दाबामुळे सपाट झालेला (अवयव)

concave
अंतर्वक्र खोलगट, मध्ये खोल असलेला, बशीसारखा, उदा. गुलाबफुलाच्या पाकळ्या

concentrated
संहत एखाद्या पदार्थाची जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र असण्याची स्थिती.

concentric
एकमध्य, समकेंद्री एकाच केंद्राभोवती असलेली (काष्ठवलये, वाहक वृंदातील प्रकाष्ठ व परिकाष्ठ, शल्कपर्णे, तौकीरकण इ.)

conceptacle
कुहर प्रजोत्पादक अवयवांनी भरलेली व बाहेरच्या बाजूस भोक असलेली पृष्ठभागाजवळची पिशवीसारखी पोकळी, उदा. फ्यूकस व पेल्वेशिया (शैवले)

concinnus
नेटका, सुरेख उदा. शिकेकाई (Acacia concina DC)

conducting (vascular) bundle
वाहक वृंद वनस्पतीतील द्रव पदार्थाची ने आण करणाऱ्या ऊतकांचा संच xylem, phloem

conducting tissue
वाहक ऊतक वर वर्णन केल्याप्रमाणे कार्य करणाऱ्या कोशिका किंवा तत्सम घटकांचा समूह.

conduction
संवहन, वहन शोषण होते तेथून इतरत्र अथवा पदार्थ बनतो तेथून अन्यत्र स्थलांतराची प्रक्रिया, संचित स्थानांतून (मूळ, बीज, खोड इ.) वापरले जाते तेथे अन्न वा पाणी नेण्याची क्रिया

conduplication
संमीलित मध्यशिरेवर उभी घडी पडून दुमडलेले (उदा. पान), पर्णवलनाचा एक प्रकार ptyxis  conduplicate

cone
शंकु खाली रुंद व टोकाकडे निमुळते होत गेलेला, खवल्यासारखी पाने व त्यांवर किंवा त्याखाली प्रजोत्पादक अवयव, बहुधा एकाआड एक धारण करणारा अवयव, उदा. सिलाजिनेला, लायकोपोडियम, सायकस, पाइन (चीड) इ. c. bisporangiate उभयबीजुककोशिक शंकु लघु व गुरु बीजुककोश असलेला

confluent
मीलित एकत्र जुळलेले (अवयव), परस्परात मिसळलेले (समुदाय), उदा. अनेक लहान फळे एकत्र होउन बनलेले संयुक्त फळ (तुती, बारतोंडी, अननस, फणस इ.)

congener
समवांशिक त्याच वंशातील दुसरी (वनस्पती किंवा प्राणी)

congeneric
समवंश त्यात (एकाच) वंशातील (जाती), उदा. वड, पिंपळ, उंबर, अंजीर इ. किंवा जास्वंद, भेंडी, अंबाडी, रानभेंडी, बेलपटा, वनकपास इ.

congenital
उपजत, जन्मजात जन्मापासून आढळलेले (लक्षण, भेद), नंतर संपादन न केलेले, उदा. फुलांचा सुवास, रंग, फळांचा रंग, संरचना, पानांचा आकार इ.

conical
शंकाकृति, शंकूसारखे

conidiophore
विबीजुकदंड विशेष प्रकारची बीजुके निर्माण करून टाकणारा लहान दांड्यासारखा भाग

conidiosporangium
विबीजुककोश वर सांगितलेल्या पद्धतीने प्रथम बनलेला बहिर्भव बीजुककोश, हा रुजून त्यातून बीजुके (उदा. पिथियम, द्राक्षावरची तंतुभुरी, आल्बुगो नांवाचा पोकळ्यावरचा पांढरा ठिपका इ.) बाहेर पडून ती नवीन कवक तंतू बनवितात.

conidium
विबीजुक कवकतंतूच्या टोकाशी आडव्या पडद्यांनी सुटी होऊन नंतर पडणारी (बहिर्भव, बहिर्जात) प्रजोत्पादक कोशिका, एकामागून एक अशा अनेक कोशिका निर्माण होतात तेव्हा त्यांची एक साखळी किंवा रांग दिसते. उदा. पेनिसिलियम, अरगट, ऍस्पर्जिलस इत्यादी बुरशीचे प्रकार, काही गदाकवक (उस्टिलॅगो) मक्यावरची काणी

conifer
शंकुमंत, शंकुधारी शंकूसारखा फुलोरा असलेली वनस्पती, उदा. चीड, सुरू, जुनिपर, चिनार, फर यांना सूचिपर्ण वृक्ष असेही म्हणतात cone

Coniferae
शंकुमत वर्ग, कॉनिफेरी प्रकटबीज वनस्पतींपैकी शंकुधारी वनस्पतींचा वर्ग, काहींनी हा उपवर्ग मानला तर काहींनी गण (कॉनिफेरेलीझ) मानला आहे. या गटातील काही विलुप्त (निर्वेश) व प्राचीन तर काही विद्यमान वनस्पतींची कुले असून एकंदरीत त्यंआची लक्षणे प्रारंभिक आहेत. का

conjoint
संयुक्त जुळलेली किंवा जुळून बनलेले c.(vascular) bundle संयुक्त वाहक वृंद प्रकाष्ठ व परिकाष्ठ या दोन्हींचा मिळून बनलेला वाहक ऊतकांचा गट (जुडगा)

conjugate
संयोग होणे दोन प्रजोत्पादक कोशिका एकरुप होणे उदा. शैवलातील गंतुके

conjugation
संयोग, संयुग्मन दोन प्रजोत्पादक सजीव घटकांचे (क्वचित एककोशिक वनस्पतींचे) एकत्रीकरण होऊन नवीन सुप्तशक्तियुक्त कोशिका बनणे (गंतुबीजुक, रंदुक) c,tube संयोग नलिका, संयुग्मन नलिका दोन सारख्या प्रजोत्पादक कोशिकांतील प्राकल एकत्र येण्यास दोन भिन्न (क्वचित एका

conjunctive
संयोजी जोडण्यास उपयुक्त, जोडणारे, जोडून असणारे c. symbiosis संयोजी सहजीवन परस्परांशी कायमपणे जोडून चालविलेले एकत्र जीवन उदा. अमरवेल व मेंदी (डुरांटा, कडवी इ.) यांचे जीवन, मनुष्य व त्याच्या पोटातील कृमी, अपि वनस्पती इ. c. tissue संयोजी ऊतक खोडाचे मध्यभागी

connaraceae
सुंदर कुल, कोनॅरेसी सुंदर, रौरिया, नेस्टिस इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश गुलाब गणात (रोजेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणांत शिंबावंत गणाशी (लेग्युमिनोजीशी) या कुलाचे साम्य आढळते.

connate
संजात एकत्र वाढलेले, सुरवातीस किंवा वाढ होत असताना पूर्ण जुळलेले सारखे भाग, उदा. लोनिसेराच्या दोन संमुख पानांचे तळ

connecting cell (heterocyst)
असमकोष्ठ तंतूच्या दोन भागांना जोडणारी मध्य कोशिका उदा. नीलरहित शैवलापैकी नॉस्टॉक c. link जोडणारा दुवा दोन लहानमोठ्या गटांचा संबंध दर्शविणारा एक स्वतंत्र गट अथवा व्यक्ती. उदा. काहींच्या मते कोंबळ कुल (नीटेसी) फुलझाडे व प्रकटबीज वनस्पती या दोन गटांना

connective (of another)
संधानी दोन परागकोशांना जोडणारा व तंतूपासून भिन्न असा भाग c. tissue संयोगी ऊतक (ऊति) दोन भाग जोडणारा कोशिकांचा समूह

consanguineous
सहोद्भवी एकाच रक्ताचे, एकाच आईबापापासून जन्मलेले, सामान्य (समान) पूर्वजांपासून अवतरलेले

consociation
संघात अनेक प्रधान वनस्पतींची विशिष्ट संगती (साहचर्य) दर्शविणाऱ्या वनस्पतींच्या समुदायात कधी कधी प्रत्येक प्रधान व्यक्तीने (इतर गौण व्यक्तीबरोबर) बनविलेले लहान उपसमूह (समुदाय), उदा. पळस-पांगारा-सावर यांच्या संगतीत, पळस संघात, पांगारा संघात, सावर संघात असे

constancy
सातत्य वनस्पतींच्या नैसर्गिक समुदायातील (संगतीतील) सारख्या आकारमानाच्या अनेक नमुना क्षेत्रांत साधारणपणे सतत आढळणाऱ्या विशिष्ट वनस्पतीचे शेकडा प्रमाण उदा. शंभर नमुना क्षेत्रांपैकी नव्वद क्षेत्रात तिचा आढळ (उपस्थिती) असल्यास तिचे सातत्य प्रतिशत धरतात.

constitutive enzyme
घटक वितंचक अनुकुली वितंचकाविरुद्ध प्रकारचे कार्बनी निदेशक, हे सदैव उपस्थित असतात.

constricted
संकुचित आकसलेले (खोड किंवा मूळ), उदा.घायपाताच्या काही जातींच्या पानांचा तळभाग

consumer
ग्राहक ecosystem.

continuity of life
जीवसातत्य पूर्वज जीवांपासून नवीन बीजांची निर्मिती, अशी सनातन परंपरा

continuous
अखंडित, सतत खंड न पडलेले, सलग c. variation अखंडित भेद, अनवरत भेद एकाच जातीतील अनेक व्यक्तींत एखादे सलगपणे कमी किंवा जास्त प्रमाणात दिसून येणारे लक्षण अथवा लक्षणांसंबंधीचा भेद, उदा. बियांच्या वजनातील फरक कमीत कमी ते जास्तीत जास्त यामधील सर्व टप्पे सलगपणे

continuum
सातत्यक वनस्पतींच्या दोन भिन्न समुदायांमधील व दोन्हीत सलगपणा राखणारा सामाइक वनस्पती समूह.

contorted (twisted)
परिवलित, पिळीव कलिकावस्थेतील पुष्पदलसंबंधाचा एक प्रकार, यामध्ये प्रत्येक पाकळीची एक कडा दुसरीचे आत व दुसरी कडा बाहेर अशी मांडणी असल्याने ती कळी पिळीव (पिळवटल्याप्रमाणे) दिसते. उदा. जास्वंद, लाल कण्हेर, कुसळी गवताचे पिळीव प्रशूक (Andropogon contortus L.)

contractile vacuole
संकोचशील रिक्तिका, संकुची रिक्तिका आकुंचन व प्रसरण पावणारी प्राकलातील सूक्ष्म पोकळी, उदा. काही शैवले व काही सूक्ष्म प्राणी C. root संकूची मूळ वयोमानानुसार आडव्या रेषा (वलये) पडलेले मांसल मूळ, यामध्ये त्याचे आकुंचन होऊन वनस्पतीस ते खोलवर जमिनीत ओढून धरते.

control (check) experiment
नियंत्रित प्रयोग कृत्रिम व ज्ञात अशी व्यवस्था केलेला सहप्रयोग, मूळच्या निरीक्षणाशी ताडून पाहण्याकरिता केलेला प्रयोग

convergence
समभिरुपता आरंभीची परिस्थिती व विकासमार्ग यांवर काही अंशी अवलंबून असून नंतर समान परिस्थितीत भिन्न पादप समुदायांचे अंतिम विकसित स्वरुप समान राहिल्याची घटना.

convergent
अभिमुख, समाभिरुपी प्रथम अलग असून शेवटी एकत्र मिळणाऱ्या, उदा. पानाच्या पात्यातील शिरा (दालचिनी, कारंदा, बोर) c. evolution समाभिरुपी क्रमविकास भिन्न वंशातील, कुलातील किंवा वर्गातील वनस्पतींचा आकार, स्वरुप व संरचना, मूलतः (तत्त्वतः) भिन्न असूनही क्रमविकासात

convolute
संवलित पर्णवलनाचा एक प्रकार, पानाच्या एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत सुरळीप्रमाणे गुंडाळण्याचा प्रकार उदा. केळ

Convolvulaceae
हरिणपदी (गंधवेल) कुल, कॉन्व्हॉल्व्ह् युलेसी अमरवेल, गारवेल, रताळे, गणेशपुष्प, मर्यादवेल, विष्णुकांता, हरिणपदी (Convolvulus arvensis L.) इत्यादी अनेक द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेसींनी या कुलाचा अंतर्भाव पोलेमोनिएलीझ या गणात तर हचिन्सननी धोतरा या गणात (सोलॅनेलीझ) केला आहे. या कुलाची लक्षणे- वेली, काही वर चढणाऱ्या तर काही जमिनीवर पसरणाऱ्या, एकाआड एक साधी पाने, कुंठित फुलोरा, अरसमात्र, नियमित, पूर्ण, द्विलिंगी, अवकिंज, मोठी, पंचभागी, आकर्षक, घंटाकृति किंवा नाळक्यासारखी, जुळलेल्या पुष्पमुकुटाची फुले, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात २-४ कप्पे आणि प्रत्येकात २-४ बीजके, मृदुफळ किंवा बोंड

coralloid
विद्रुमरुप, प्रवालसम पोवळ्याप्रमाणे, पोवळी बनविणाऱ्या विशिष्ट शाखित प्राण्यांच्या शरीराप्रमाणे दिसणारे उदा. जमिनीलगतची सायकस मुळे

cordaitales
कॉर्डाइटेलीझ पुराजीव महाकल्पातील एक निर्वंश प्रकटबीजधारी वनस्पतींचा गण. प्रमुख लक्षणे - उंच वृक्ष, खोडाच्या टोकास शाखांचा झुबका व त्यावर साधी लांबट अनेक पाने, बीजुकपर्णे आकाराने लहान व स्वतंत्र शंकूवर, गुरु बीजुकपर्णाच्या टोकावर बीजक असते. Gymnospermae

cordate
हृदयाकृति पत्याच्या डावातील बदामाच्या आकाराचे, एका टोकास खाच व दुसऱ्चा टोकास निमुळते असलेले उदा. चक्रभेंडी अथवा गुळवेलीचे पान, गुळवेल Tinospora cordifolia (Willd) Miers. (heart shaped)

coriaceous
चर्मिल, चिवट चामड्यासारखे चिवट उदा. वड, रबर, आंबा इ. ची पाने

cork
त्वक्षा जून खोडे, फांद्या व मुळे यावर अपित्वचेच्या ऐवजी नवीन बनलेल्या बुचासारख्या पदार्थाच्या (स्यूबरिन) कोशिकांचा थर, हा मृत कोशिकांचा थर संरक्षक असून काही वनस्पतींच्या (कॉर्क ओक) खोडावरचा जाड थर प्रत्यक्ष बुचे बनविण्यास वारंवार काढून घेतला जातो.

cork cambium (phellogen)
त्वक्षाकर त्वक्षा कोशिका बनविणारा अपित्वचेच्या आतील (क्वचित परिरंभ- अंतस्त्वचेखालचा थर) जिवंत कोशिकांचा सतत विभागणी चालू असलेला थर (ऊतककर), यापासून बाहेरच्या बाजूस त्वक्षाकोशिका व आतील बाजूस उपत्वक्षा (द्वितीयक मध्यत्वचा) बनते. c. formation त्वक्षासंभवन,

cork cells
त्वक्षा कोशिका वर वर्णन केल्याप्रमाणे जाड स्यूबरिनयुक्त कोशिका

corm
घनकंद जमिनीत वाढणारे, मांसल, संघटित, फुगीर, अन्नाच्या साठ्यामुळे घट्टपणा आलेले, खवल्यासारख्या पानांनी वेढलेले, खाली आगंतुक मुळे व वरच्या बाजूस कळ्या असून नवीन कंद, पाने व फुलोरा बनविणारे रुपांतरित खोड उदा. केशर, अळू, सुरण इ.

cormel
लघुघनकंद, घनकंदिका मूळच्या घनकंदापासून बनलेला लहान घनकंद

cormophyte
स्कंधवनस्पति, स्कंधपादप पाने, मुळे, खोड आणि वाहक ऊतके असलेली वनस्पती, काही अपवाद वगळल्यास (पाने व मुळे नसलेले) सर्व नेचाभ पादप व बीजी वनस्पती यांमध्ये वर सांगितलेले अवयव आढळतात. परंतु कायक वनस्पतींत नसतात. Thallophyta, Pteridophyta, Cormus

cormus
स्कंध सर्वसाधारणतः वाहक ऊतके, मुळे व पाने असलेला अक्ष thallus

corniculate
लघुशृंगाग्र टोकावर लहान शिंगासारखा उंचवटा असलेला (अवयव, छद, खवला), उदा. आंबुटीचे (Oxalis corniculata L.) फळ.

corolla
प्रदलमंडल, पुष्पमुकुट फुलातील पाकळ्यांचा समूह (मंडळ, वर्तुळ), केसर मंडल व किंजमंडल यांचे संरक्षण व गंध आणि स्वरुप यांच्या साहाय्याने प्राण्यांना आकर्षित करून प्रजोत्पादनास मदत करणे ही पुष्पमुकुटाची कार्ये होत.

corolliform
पुष्पमुकुटाभ पुष्पमुकुटासारखे (परिदलमंडल) उदा. गुलबुश

corona
मुकुट, तोरण पाकळ्यांपासून किंवा तत्सम पुष्पदलांपासून उगम पावलेले दले, केस, खवले यासारख्या सुट्या अथवा जुळलेल्या उपांगांचा समूह (वर्तुळ) उदा. कृष्णकमळ, लाल कण्हेर, कुमूर, पिंक इ. क्वचित केसरदलांना हे तोरण चिकटून असते. (उदा. रुई कुल) crown

coronans
अग्रस्थ मुकुटाप्रमाणे शोभणारे

corpusculum
पुंजकणिका दोन परागपुंजांना जोडणारा गाठीसारखा भाग, उदा. रुईचे फूल pollinium  pollen carrier

correlation
सहसंबंध दोन इंद्रियांचा एकमेकांवर असलेला अंमल अथवा नियंत्रण उदा. खोडाचा शेंडा खुडल्यास बगलेतील कळ्यांची जोमाने वाढ होणे, खालची पाने मोठी व जाड होणे किंवा नव्या कळ्या फुटणे, इत्यादी. एखाद्या इंद्रियाची हानी दुसऱ्याने भरुन काढण्याचा प्रकार reparation,

corrugated
वलीवन्त, पन्हाळी एखाद्या सपाट अवयवावर खोबणी (पन्हळी) अथवा खोलगट रेषा असण्याचा प्रकार, उदा. काही तालवृक्षांची पाने corrugate

cortex
मध्यत्वचा द्विदलिकित वनस्पतींच्या कोवळ्या खोडाच्या अथवा मुळाच्या अंतर्रचनेत अपित्वचेच्या आतील अंतत्त्वचेपर्यंतचा भाग, सामान्य भाषेत साल. rind

corticate
मध्यत्वचायुक्त मध्यत्वचा अगर तत्सम भाग असलेले

corymb
गुलुच्छ फुलोऱ्याचा (पुष्पबंधाचा) एक प्रकार, यामध्ये केंद्राजवळची फुले सर्वात लहान व परिघाजवळची अधिकाधिक जून असा परिघाकडून केंद्राकडे (अभिमध्य) उमलण्याचा क्रम असतो, फुलांच्या देठांची लांबी साहजिकच केंद्राजवळ (अक्षाच्या टोकास) कमी व परिघाकडे (अक्षाच्या तळाकडे क्रमाने) अधिक होत जाते व सर्वसाधारणपणे सर्व फुले एकाच पातळीत येऊन सर्व दृष्य आकर्षक होते. उदा. मोहरी, व्हर्बिना, कँडिटफ्ट इ.

costa
सिरा, शीर पानांमध्ये व तत्सम अवयवांत (पुष्पदले, छदे) पाणी व अन्नरसाची ने आण करणाऱ्या ऊतकांचा संच (वाहक वृंद) unicostate, multicostate, costate  rib, vein

costate
सिराल ईक अथवा अनेक शिरा असलेले (पान)

cotyledon
१ दलिका, बीजपत्र, डाळिंबी २ कॉटिलेडॉन १ बीजातील गर्भावस्थेत असलेल्या वनस्पतीचे पान, सामान्य भाषेत दळ. यांची संख्या एक किंवा दोन असून क्वचित अधिक असते. अन्नसंचय, अन्नशोषण, कधी अन्ननिर्मिती (बी रुजल्यावर जमिनीवर येऊन) ही कार्ये ती दलिका करते. २ एका वनस्पतीचे नाव

cotype
सहमूलप्ररुप मूळचा नमुना ज्या वनस्पतीपासून घेतला तिचाच दुसरा नमुना.

counter clockwise
अपसव्य, वामावर्त घड्याळाच्या काट्यांच्या नित्याच्या दिशेविरुद्ध (हालचाल) anti clockwise

cover
आवरण, आच्छादन व्यापलेले क्षेत्र. c.herbage औषधीय आवरण वरुन पाहिले असता पूर्ण झाकलेले दिसणारे व वनस्पतींच्या अवयवांनी व्यापलेले जमिनीवरील क्षेत्र. c. plant- पादपावरण जमिनीवरील वनस्पतींनी व्यापलेला भाग. area occupied

cover
आवरण, आच्छादन व्यापलेले क्षेत्र. c.herbage औषधीय आवरण वरुन पाहिले असता पूर्ण झाकलेले दिसणारे व वनस्पतींच्या अवयवांनी व्यापलेले जमिनीवरील क्षेत्र. c. plant- पादपावरण जमिनीवरील वनस्पतींनी व्यापलेला भाग. area occupied

cover cell
छादन कोशिका शेवाळी वनस्पतीतील अंदुककलशाच्या ग्रीवामार्गाच्या तोंडाशी असलेली कोशिका

cover slip
छादनी, झाकणी, आच्छादन काच सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करण्याकरिता वस्तूवर बसवलेली काचेची पातळ चकती (गोल, चौकोनी किंवा आयत चौकोनी)

Crassulaceae
घायमारी कुल, क्रॅसुलेसी घायमारी, पानफुटी (पर्णबीज), कलांचो इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव गुलाब गणात (रोजेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - मरुवनस्पती, मांसल अवयव असलेल्या औषधी व क्षुपे, फुलोरा कुंठित, नियमित, द्विलिंगी, समभागी फुले, ऊर्ध्वस्थ किंजपुट, किंजदले सुटी किंवा जुळलेली, फळ शुष्क पेटिकेसारखे, कॉटिलेडॉन, क्रॅसूला, सेडम, सेंपरव्हायव्हम इत्यादी वंशांचा यातच समावेश आहे.

creation
निर्मिती निर्माण केलेले, बनविलेले, निर्माण करण्याची प्रक्रिया

creeper
प्रसर्पी जमिनीवर सरपटत जाणारी व आगंतुक मुळांनी चिकटून राहणारी वेल, उदा. रताळे, बाम्ही, आंबुशी

cremocarp
आंदोलिपालि शुष्क, दोन कप्याचे, अधःस्थ, पालिभेदी फळ, पक्क झाल्यावर याचे दोन एकबीजी भाग (फलांश) फळ धारण करणाऱ्या दांड्यापासून (फलधर) अलग होतात पण बारीक तंतूच्या आधारे लोंबत राहतात. उदा. ओवा, धणे, गाजर, जिरे इत्यादी चामर कुलातील वनस्पती. schizocarp,

crenate
स्थूलदंतुर, गोलदंती बोथट गोलसर दाते असलेले उदा. बाम्ही, पानओवा अथवा पानफुटी यांची पाने अथवा त्यांची कडा

crenulate
सूक्ष्मदंतुर, सूक्ष्मदंती बोथट, गोलसर पण फार बारीक दाते असलेले (पान अथवा त्याची किनार) crenulated

crescent shaped (lunate)
अर्धचंद्राकृति अर्ध्या चंद्राच्या आकाराप्रमाणे, उदा. कृष्णकमळ (Passiflora lunata Juss.), एक नेचा (Adiantum lunulatum Burm.) रातकोंबडा

crest
१ माथा, शिखर, शिखा, शीर्ष २ कटक, कंगोरा शेंडा, उदा. झाडाचे टोक, फळाचे टोक ridge, crown

crested
शिखी, कटकित विशिष्ट प्रकारचा शेंडा किंवा अनियमित कंगोरा असलेले

creta
खडू, खट chalk

cretaceous
१ खटी २ खटवर्णी ३ क्रेटेशियस काल १ खडू असलेले २ खडूसारखे पांढरे, शुभ्र, सफेत ३ सुमारे १४ ते ७ कोटी वर्षापूर्वीचा काळ

crevice
फट, भेग, चीर खोडावर, खडकावर किंवा जमिनीवर असलेली कमी जास्त खोलीची पण अरुंद चीर

crisp
वलित अनियमितपणे खाली किंवा वर दोन्हीकडे वळलेली (वाकलेली) उदा. कडा, किनार, तगारीच्या पाकळीच्या कडा (Tabernemontana crispa L.) crisped, curled

crista
१ शिखा, तुरा, गुच्छ २ प्रकटक २ विशेष प्रकारचा कंगोरा उदा. काही सूक्ष्म जंतूवरचा कंगोऱ्यासारखा पापुद्रा, प्राकणूतील अनेक पोकळ्याभोवती वेढून राहणारा दुहेरी पापुद्रा

cristate
तुरेबाज, तुरेदार, गुच्छल तुरा असलेले, उदा. मयुरशिखा (Celosia cristata L.) या वनस्पतीच्या शेंड्यावर (टोकास) असलेल्या तुऱ्यासारख्या फुलोऱ्यामुळे हे नांव पडले.

crooked
वाकडातिकडा अनेक ठिकाणी वाकडे वाढलेले, उदा. खोड

crop
पीक विशेष प्रकारे वाढविलेल्या वनस्पतींचा समूह, उदा. धान्ये, फळझाडे, फुलझाडे

cross
१ स्वस्तिक चिन्ह २ संकर प्रजा, संकरज १ बेरजेकरिता वापरलेले अधिक जिन्ह, गुणिले चिन्ह, फुली, स्वस्तिक चिन्ह २ दोन भिन्न जाती किंवा प्रकार यांचेपासून निर्मिलेली प्रजा (संतति) c.breed १ संकर २ संकरज १ दोन जातींच्या किंवा प्रकारांच्या व्यक्तीत (सजीव)

crown
१ मुकुट २ माथा, डेरा १ कारा या शैवलाच्या प्रजोत्पादक अवयवाचे (अंदुकाशयाचे) टोकावरील कोशिकांचा समूह. २ वृक्षाच्या खोडावरील सर्व शाखा व पानंआचा समूह, हा अर्धगोलाकार, गोलाकार किंवा स्तूपासारखा असतो. c. graft खुंटी कलम जमिनीत असलेल्या एका झाडाच्या खुंटात

cruciate
क्रूसाकार, स्वस्तिकाकृति स्वस्तिक किंवा गणितातील अधिक (बेरजेच्या) चिन्हाप्रमाणे आकार असलेला, उदा. मोहरीच्या फुलाचा पुष्पमुकुट cruciform, cross shaped

Cruciferae
मोहरी (सर्षप) कुल, क्रुसिफेरी (बॅसिकेसी) मोहरी (सर्षप), कोबी, नवलकोल, मुळा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव बेसींनी अहिफेन गणात (पॅपॅव्हरेलीझ), बेंथॅम व हूकर यांनी पराएटेलीझ गणात व हचिन्सन यांनी क्रुसिफेरेलीझ किंवा मोहरी (सर्षप) गणामध्ये क

crumpled
वलिवंत कळीमध्ये सुरकुतलेले (वेड्यावाकड्या घड्या पडलेले), पर्णवलनाचा एक प्रकार, उदा. कोबीची पाने

crust
कवच, पुट खपलीसारखा कठीण पापुद्रा (rind, shell)

crustaceous
कवची ताठर व ठिसूळ (पाने), दगडास किंवा झाडाच्या सालीस चिकटून सपाट कवचासारखे वाढलेले, उदा. काही धोंडफूल वनस्पती crustose

Cryptogamia
अबीजी वनस्पती विभाग कायक वनस्पती, शेवाळी, नेचाभ पादप इत्यादी वनस्पतींचा अंतर्भाव असलेला (जुन्या वर्गीकरणाप्रमाणे) गट, यातील प्रजोत्पादक इंद्रियंआत केसरदले, किंजदले, फळ व बीज यांचा संपूर्ण अभाव असतो., तथापि काही नेचाभ पादपातील लघुबीजुकपर्णे व गुरु बीजुकपर्

cryptophyte
गूढपादप, गूढ कलिकोद्भिद जमिनीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या भागावर सुप्त कळ्या धारण करणारी वनस्पती.

crystal
स्फटिक खनिज अथवा कार्बनी पदार्थांचे घनावस्थेतील पैलूदार स्वरुप (संरचना), उदा. कॅल्शियम कार्बाएनेट, कॅ. ऑक्झेलेट, खडीसाखर, मोरचूद इ.

crystalloid
स्फटिकाभ रवाळ स्वरुप, स्फटिकासारखे, याविरुद्ध कलिल स्वरुप असते. उदा. बदाम, एरंड, मका यांच्या बीजातील अन्नसाठ्यातील प्रथिनकण colloid

cucullate
स्फटिकाकृति, स्फटायुक्त नागाच्या फण्याप्रमाणे, फणा (फडी) असलेला उदा. एका जलनेचाच्या पानाप्रमाणे (Salvinia cucullata Roxb)

Cucurbitacae
कर्कटी (काकडी) कुल, कुकर्बिटेसी लाल भोपळा, काकडी,कलिंगड, टरबूज इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गोत्रात (पॅसिफ्लोरेलीझ), एंग्लर व प्रँटल यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ), बेसींनी लोझेलीझ गणात व हचिन्सननी कर्कटी ग

culm
संधिक्षोड, सांधेदार खोड बहुधा पोकळ किंवा भरीव, शाखा नसलेले व पेरी घन व स्पष्ट असलेले खोड, उदा. ऊस, बांबू, मका इ.

cultigen
संवर्धित सतत लागवाडीने विकास पावलेली व फक्त लागवडीतच आढळणारी (जंगली अवस्थेत नसलेली) उदा. वनस्पती किंवा त्यांचा गट.

cultivable
कृषियोग्य लागवडीस योग्य (सोयीचे, फायद्याचे)

culture
संवर्धन विशेष प्रकारे, कृत्रिम वाढ करण्याची प्रक्रिया

cuneate
शंकाकृति, कीलाकार पाचरीसारखे किंवा लांबट त्रिकोणासारखे असून तळाशी टोकदार, उदा. गोंडाळाची पाने cuneiform

cup shaped
चषकाकृति वाटी किंवा पेला यासारख्या आकाराचे, उदा. गुलाबाचे पुष्पासन, काही कवक

cupule
चषिका, वाटिका लहान वाटीसारखा अवयव, उदा. ओक (बंज) च्या फळाच्या (वंजूफळ) तळाशी असलेले छदावरण, काही तालवृक्षांच्या फळांच्या तळाशी परिदलांचे आवरण, उदा. नारळ

Cupuliferae
चषिका कुल, क्युप्युलिफेरी जुन्या वर्गीकरणाप्रमाणे (बेंथॅम व हूकर) ओक (बंज), चेस्टनट, बीच इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव बंज (ओक) गणात किंवा क्वर्सिफ्लोरीत केला जात असे. एंग्लर व प्रँटल यांनी या कुलाला गणाचा (फॅगलीझ) दर्जा दिला आहे व भूर्ज

curcumine
हरिद्राद्रव्य जमिनीतील हळदीच्या खोडातील प्रमुख पिवळे द्रव्य (Curcuma longa L. हळद)

curvature
वक्रता, वलन वाकडेपणा, वळण, बाक c. movement of वक्रताजन्य हालचाल वळल्यामुळे घडून आलेली हालचाल, उदा. खोडाचे किंवा मुळाचे टोक चेतकामुळे वळुन खाली, वर किंवा बाजूस वाढते, कळी उमलणे, फूल मिटणे किंवा उघडणे

curved
वक्र वाकलेले वाकडे, उदा. काही झाडावरील (उदा. वेत, बोर) काटे bent

cushion
पुलवृंत पानाच्या देठाचा तळास असलेला फुगीरभाग, यातील कोशिकांच्या आकुंचन वा प्रसरणामुळे पानाचे पाते वरखाली होते. उदा. तरवड, लाजाळू इ. c. plant उपधान वनस्पति जमिनीजवच्या अनेक फांद्या एकत्र येऊन वाढल्याने उशीसारखा (अर्धगोल) आकार प्राप्त झालेली वनस्पती, उदा.

cusp
कंटक, काटा

cuspidate
कटकाग्र शेंड्यास किंवा टोकास तीक्ष्ण काटा असलेले, उदा. घायपात, युका यांची पाने

cuticle
उपत्वचा, क्यूटिकल क्यूटिन द्रव्याचा लेप

cutin
क्यूटिन मेदविशिष्ट द्रव्य, याचा पातळ लेप पानावर असून एक चकाकित, पानाला अपार्य पण प्रकाशाला पार्य असे संरक्षक आच्छादन बनते. उदा. आंबा

cutinisation
क्यूटिनीभवन, उपत्वचाभवन क्यूटिनचा लेप बसण्याची प्रक्रिया, मूळ कोशिकावरणात क्यूटिन द्रव्य मिसळून त्याचा थर बनण्याची प्रक्रिया cuticularisation

cutting
छिन्नकांड, छाटकलम जिवंत खोड अथवा फांदी यांचा कापून काढलेला तुकडा, मूळच्या वनस्पतीपासून तशीच नवीन वनस्पती बनविण्याकरिता हा तुकडा (कलम) उपयुक्त असतो, उदा.त गुलाब, जास्वंद, कण्हेर इ.

Cyanophycae
नीलहरित शैवले व४ग, सायनोफायसी Blue green algae

cyathium
चषकरुप फुलोऱ्याचा (पुष्पबंधाचा) एक प्रकार, पेल्यासारख्या छदमंडलात बहुधा केसरदलाचे पाच गट व मध्यभागी एक लहान दांड्यावर तीन किंजदलाचा तीन कप्पी किंजपुट असतो. प्रत्येक केसरदल एक सच्छद पुं-पुष्प व किंजपुट एक स्त्री पुष्प मानतात. छेदमंडलावर अनेक मधुप्रपिंड कधी कधी असतात. उदा. पानचेटी, शेर, शेंड इ. एरंड कुलातील कित्येक वनस्पतीत (युफोर्बिया वंश) हा फुलोरा (क्वचित रुपांतरित) आढळतो.

Cycadaceae
सायकॅडेसी, सायकस कुल प्रकटबीज वनस्पतींपैकी सायकस, झामिया, दिऊन इत्यादींचे कुल, अलिकडे नवीन वर्गीकरण पद्धतीत यांचा अंतर्भाव एका विभागात (सायकॅडोफायचा) केला जातो. तर काहींनी सायकॅडेलीझ असा गण मानला आहे. त्यात विलुप्त व विद्यमान वनस्पती समाविष्ट केल्या आहेत.

Cycadofilicales
बीजी नच गण, सायकॅडोफिलिकेलिझ Pteridospermae

cycle (whorl)
मंडल, चक्र अनेक अवयवांचे वर्तुळ, काही फुलात पुष्पदलांची बहुधा चार मंडले असतात. काही खोडावर पानांची (उदा. खडशेरणी, सातवीण) तर काहीवर फांद्यांची (उदा. कारा व एक्किसीटम) मंडले असतात. spiral

cyclic
चक्रिय, मंडलित वर्तुळाकार, चक्राकार किंवा मंडलाकार (मांडणी) whorled

cyclosis
भ्रमण कोशिकावरणाच्या आतील बाजूस चालू असलेली जिवंत द्रव्याची (प्राकलाची) प्रवाहरुपी हालचाल. नियमित प्रकारे प्रदक्षिणा करणे, परिगमन (rotation) अथवा अनियमितपणे इतस्ततः किंवा प्रकलाभोवती फिरणे, अभिसरण (circulation). streaming

Cyeadales
सायकस गण cycadaceae

cylinder
चिती, दंडगोल गोलसर दंडाप्रमाणे आकाराचा (्अवयव), उदा.बहुतेक खोडे, देठ, फुलांचे व फुलोऱ्याचे दांडे (अक्ष)

cylindric
चितीय, दंडगोलाकृति गोलसर दांड्याप्रमाणे, उदा. ऊस, वेळू इत्यादींचे खोड

cymba
पोय, पोत नावेसारखा, कठीण, दीर्घकाल राहणारा, महाछद, उदा. काही तालवृक्ष spathe

cyme
वल्लरी फुलोऱ्याचा एक प्रकार, अक्षाच्या शेंड्यावर फूल आल्याने पुढे वाढ खुंटते, केव्हा त्याच्या बाजूस दोन नवीन अक्ष येऊन त्यांचीही फूल आल्याने वाढ खुंटते व तीन फुलांची साधी वल्लरी बनते. उदा.मोगरा, कधी बाजूच्या दोन अक्षावर फूल येऊन पुनरपि त्यांच्या दोन्ही बा

cymule
लघुवल्लरी लहान वल्लरी

cynophyta
नीलहरित शैवल विभाग, सायनोफायटा Blue green algae

cyperacease
मुस्तक (मुस्ता, मोथा) कुल, सेजीस, सायपेरेसी लव्हाळा, मोथा, कुंदा, कचेरा इत्यादी गवतासारख्या दिसणाऱ्या एकदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश तृण कुलाबरोबर तृण गणात (ग्रॅमिनेलीझ) केला जातो. हचिन्सन यांनी मात्र मस्तक गण (सायपेरेलीझ) स्वतंत्र करून त्यात मुस्तक

cyphella
निगर्तिका दगडफुलाच्या पृष्ठभागात खोलवर असलेला व शैवल कोशिकांची निर्मिती करणारा पेल्यासारखा अवयव Lichens

cypsela
संकृत्स्न शुष्क, एकबीजी, न तडकणारे, पातळ फलावरण व बीजावरण एकमेकांपासून अलग असलेले, अधःस्थ व दोन किंजदलांपासून बनलेले फळ उदा. सूर्यफूल, सहदेवी, एकदांडी, ओसाडी, करडई इ.

cyrrhus
प्रतान, ताणा तणावा, बारीक दोऱ्याप्रमाणे, आधाराला गुंडाळून धरण्यास उपयुक्त, असा संवेदी अवयव किंवा तशा अवयवात रुपांतर झालेला दुसरा प्रमुख अवयव (खोड, पान, उपपर्ण, फुलोऱ्याचा अक्ष इ.), उदा. द्राक्षवेल, मोरवेल, वाटाणा, कळलावी, ँटिगेनॉन, भोपळा इ. tendril

cyst
कोष्ठ बंदिस्त पोकळी, लहान बंद पिशवीसारखा अवयव.

cystolith
खटिकापुंज चुनखडीच्या कणांचा झुबका, उदा. वडाच्या पानाच्या अपित्वचेतील कोशिका

cytase
सायटेज तूलीरावर (सेल्यूलोजवर) क्रिया करणारे वितंचक किंवा कार्बनी निदेशक, अनेक बिया रुजताना हे क्रियाशील असते.

cytochemistry
कोशिकारसायनशास्त्र कोशिकेच्या सर्व भागासंबंधीचे रासायनिक ज्ञान

cytogamy
कोशिकायुति, कोशिकासंगम दोन कोशिकांचा संपूर्ण संयोग

cytogenesis
कोशिकाजनन कोशिकांचा उगम व विकास

Cytogenetics
कोशिकाजननविज्ञान, कोशिका आनुवंशिकी कोशिकाविज्ञान व कोशिकाजनन या दोन्हींच्या संबंधी उपलब्ध ज्ञानाने कोशिकेतील भागांचे व गुणधर्माचे पिढ्यानुपिढ्या अनुहरण कसे होते हे ज्ञान देणारी शाखा

cytokinesis
परिकल विभाजन कोशिकेतील परिकलाची (प्रकलादीशिवाय इतर सजीव द्रव्याची) विभागणी

Cytology
कोशिकाविज्ञान कोशिकेचा आकार, संरचना, विभागणी इत्यादी सर्व माहितीची ज्ञानशाखा

cytoplasm
परिकल, कोशिका (पेशी) द्रव्य कोशिकेतील प्रकल, प्राकलकणु किंवा अशी विशिष्ट कोशिकांगके सोडून इतर सजीव व अर्धघन कलिल द्रव्य

cytoplasmic fibres
परिकल तंतू कोशिका विभागणीत सहज दिसून येणारे परिकलाचे सूक्ष्म धागे c. inheritance परिकलानुहरण प्रकलाद्वारे कोशिकेचे (किंवा व्यक्तीचे) बहुतेक गुण पुढील पिढीत उतरतात, तथापि काही परिकलाद्वारेही उतरत असावे असा पुरावा मिळाल्याने ती उपपत्ती स्वीकृत झाली आहे व

daily period of growth
दैनिक वर्धनभेद दर चोवीस तासात होणारा वाढीतील चढ उतार

Darwinism
डार्विनवाद, डार्विनची उपपत्ती नैसर्गिक निवडीच्या तंत्रानुसार नवीन जातींची निर्मिती, स्पष्टीकरण - सर्व सजीवांची संख्या भूमितिश्रेणीने वाढते, परंतु जीवनावश्यक वस्तू मर्यादित असल्याने त्या प्राप्त करून घेण्यास सजीवांमध्ये स्पर्धा होते (जीवनार्थ कलह), सजीवांमध्ये सबल व दुर्बल असे भेद निसर्गतःच असतात. साहजिकच स्पर्धेमध्ये सबल यशस्वी होऊन दुर्बल नाश पावतात, म्हणजेच जगण्यास लायक अशा सबलांची सृष्टीकडून निवड केली जाते. ज्या भेदांमुळे सबल यशस्वी होतात ते भेद आनुवंशिकतेमुळे नवीन पिढीत उतरतात, तीव्रतर होत जातात व काही नवीन फायदेशीर भेदही दिसून येतात, यांचेही अनुहरण होऊन व असा प्रकार शेकडो पिढ्यात चालू राहून नवीन गुणधर्मयुक्त सजीव निर्माण होत जातात, हानिकारक भेद पण असतात व नवीन येतात, परंतु ते धारण करणाऱ्या व्यक्ती दुर्बल ठरून नवीन संततीची परंपरा फाल काल चालू ठेवीत नाहीत. या प्रकारे सर्व सजीव साध्या समान पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असून ते परवर्तनीय आहेत व सध्या आहेत तसे पूर्वी एकेवेळी एकदम निर्मिलेले नाहीत.

daughter cell
जन्य कोशिका, जन्य पेशी मूळच्या एका कोशिकेपासून जन्मलेली नवीन कोशिका, मूळची कोशिका मातृकोशिका ठरते.

daughter chromosome
जन्य रंगसूत्र मूळच्या रंगसूत्रापासून बनलेले नवीन रंगसूत्र

daughter-axis
जन्याक्ष एका अक्षापासून उद्भवलेला नवीन उपाक्ष

day length
दिनावधि दिवसातील प्रकाशपूर्ण काल

day position
दिनस्थिति दिवसा उजेडी असलेली स्थिती, उदा. चिंच, बाहवा इत्यादी झाडांची पाने दिवसाच्या प्रकाशात सपाट राहतात परंतु रात्री त्यांची दले मिटून लोंबती राहतात त्याला रात्रि स्थिती म्हणतात.

de novo
नवीन, नूतन पूर्वी असलेल्यापासून नसून, पूर्णपणे नवीन उत्पत्ती

decapitation
विमुंडकन विशेष प्रकारची छाटणी

deciduous
पतिष्णु विशिष्ट ऋऋतूत किंवा वेळी आपोआप गळून पडणारी, उदा. पांगारा, पळस, वड इत्यादींची पाने, वडाची उपपर्णे, गुलाबाच्या पाकळ्या इ. d. tree कदापर्णी वृक्ष, पानझडी वृक्ष पाने झडून जाणारा वृक्ष, उदा. शाल्मली, ओक, पांगारा, साग, भूर्ज, खैरचाफा इ.

declinate
अभिनत पुढे किंवा खाली वाकलेले, उदा. काही फुले, केसरदले, किंवा किंजले इ.

decoloratus
वर्णहीन, विवर्ण, रंगहीन discoloured

decolouration
वर्णनाश, विरंजन रंगद्रव्याचा नाश होणे किंवा करणे

decomposer
अपघटक ecosystem.

decompound
बहुदलित, बहुदली तीनपेक्षा अधिकवेळा पूर्णपणे, पानाचे पाते विभागून बनलेले संयुक्त पान, उदा. गाजर, शेवगा

decorticated
वल्कहीन साल काढलेले, मध्यत्वचेपासून बाहेरचा भाग सोलून काढलेले (उदा. खोड) girdling

decumbent
पार्श्वारोही जमिनीवर सरपट वाढून टोकास वर वळलेले (खोड) उदा. पुनर्नवा

decurrent
अधोगामी खोडास चिकटून पर्णतलाच्या खाली काही अंतरावर वाढत गेलेले (पाते), उदा. गोरखमुंडी running down

decussate opposite
जात्यसम संमुख समोरासमोर असलेल्या पानांच्या जोड्या एकाआड एक (खोडाच्या) पेऱ्यावर, एकमेकांशी काटकोनात असण्याचा प्रकार, उदा.रुई, पेरु, झिनीया, कडू (Swertia decussata Nimmo. ex. Grah) इ.

dedoublement
द्विखंडन पाने किंवा पुष्पदले यांच्या दुभंगण्यामुळे त्यांची संख्या दुप्पट किंवा अधिकपट होणे उदा. मोहरीच्या फुलातील केसरदले (doubling, chorisis)

deficiency
न्यूनता, त्रुटि, अभाव आवश्यक रासायनिक घटकाचा अभाव, रंगसूत्राच्या टोकाचा भाग नाहीसा होणे (लोप होणे), त्या भागात तर्कयुज नसतो centromere.

definite
कुंठित, मर्यादित अक्षाची मर्यादित वाढ होण्याचा प्रकार, पुष्पबंधाच्या (फुलाऱ्याच्या) अक्षाची वाढ फूल टोकास आल्यावर थांबणे d. inflorescence कुंठित पुष्पबंध

definitive nucleus
अंतिम प्रकल फुलझाडांच्या बीजकातील गर्भकोशात त्याच्या दोन्ही टोकांकडून आलेल्या एकेक एकगुणित प्रकलाच्या संयोगाने बनलेला एक द्विगुणित प्रकल d. host अंत्याश्रय जीवोपजीवी वनस्पतींच्या अनेक आश्रय देणाऱ्या वनस्पतींपैकी शेवटचा (निश्चित) diploid, haploid

deflexed
बहिर्नत बाहेरच्या बाजूस वाकलेले उदा. संकेश्वराची केसरदले reflexed

defoliation
पर्णत्यजन, पर्णत्याग, पानगळ निसर्गतः पानांचा त्याग करण्याची (पाने गळण्याची) प्रक्रिया

deformation
विरुपण, विकृति कुरुपता येण्याची प्रक्रिया, रोग, जखम इत्यादी कारणांमुळे अवयवांना अनित्य आकार येणे उदा. पाने किंवा फळे वाकडीतिकडी होणे

deformity
विकृति, विद्रूपता अनित्य आकार, नित्यस्वरुपात बदल

degeneration
अवनति, ऱ्हसन, अपकर्ष निकृष्टपणा येण्याची प्रक्रिया, विशिष्ट अवयवांतील कार्यक्षमता व त्यांचे मूलस्वरुप यात कमीपणा येणे, एखादी पिढी व जाती क्रमाने निकृष्ट होत जाणे, उदा. पानाऐवजी खवले येणे, जलवनस्पतीतील संरचनेत काही भागांचा (उदा. वाहक संच, काठिण्य इ.) अंशतः लोप होण्याची घटना

degradation
परागति, प्रतिगमन retrogression

dehiscence
स्फुटन, स्फोट बीजुकाशय, बीजुककोश, परागकोश किंवा शुष्क फळे यांची आपोआप तडकण्याची प्रक्रिया, उदा. शेवाळी, नेचे, बोंड, शेंगा इत्यादी फळे d. lateral पार्श्विक स्फुटन बाजूच्या चिरीतून किंवा भोकातून फुटून बी किंवा बीजुके बाहेर पडण्याचा प्रकार, उदा. एक्किसीटमचा

dehiscent
स्फुटनशील, फुटीर आपोआप तडकणारे (अवयव), उदा. फळ, बीजुककोश इ.

dehydration
निर्जलीकरण पदार्थातील पाणी काढून टाकण्याची प्रक्रिया

deletion
लोप, उच्छेद, वगळणे रंगसूत्राच्या मधल्या भागाचा नाश होण्याची प्रक्रिया, यात तर्कुयुज नसतो.

delimitation
परिच्छेदन निश्चित मर्यादा घालून काही भाग वेगळा करणे, उदा. एखाद्या कोशिकेतील प्राकलाचा काही भाग विशिष्ट कार्याकरिता मध्ये पडदा घालून वेगळा करणे

delimited
परिछिन्न वर वर्णन केल्याप्रमाणे वेगळा केलेला (भाग), उदा. शैवले, कवक

deliquescent
१ बहुशाखित २ चिघळणारा १ जमिनीवर वाढणाऱ्या प्रमुख अक्षावर (खोडावर) काही उंचीवर अनेक फांद्या असलेली वनस्पती, उदा. वड २ हवेतील ओलावा शोषून काहीसा अर्धवट विरघळत जाणारा अवयव, उदा. काही कवक, काहींच्या फुलातील परिदले, उदा. केना, इकॉर्निया इ. Phallaceae

deltoid
त्रिकोनी तीन कोन असलेल्या आकृतीप्रमाणे (उदा. पान, छद).

dendroid
शाखित, वृक्षाभ वृक्षासारखा, अनेक शाखा असलेला

dendrology
वृक्षविज्ञान वृक्षांसंबंधीच्या माहितीची ज्ञानशाखा

denitrification
विनायट्रीकरण नायट्रोजनयुक्त पदार्थातील अपघटनामुळे नायट्रोजन वेगळा होऊन जाणे

density
घनता एखाद्या स्थलविषयक एककातील (ठराविक क्षेत्रातील) व्यक्तींची संख्या abundance.

dentate
प्रदंतुर, दंतुर, सरलदंती बाहेरच्या बाजूस टोके असलेले दाते असणारी (कडा किंवा किनार), उदा. शिंगाडा

denticulate
लघुदंतुर बाहेर टोके असलेले पण लहान दाते असणारी (किनार)

depressed
अवनत झुकलेला किंवा खाली दबलेला (भाग)

dermatogen
त्वचाजनक खोड अथवा मूळ यांच्या टोकास असलेल्या व सतत वाढ चालू असलेल्या भागातील सर्वात बाहेरचा कोशिकांचा थर, यापासून अपित्वचा बनते. protoderm  protoderm

dermis
त्वचा कोशिकांचा थर epidermis, hypodermis, endodermis इ.

descending axis
अवरोही अक्ष खाली वाढत जाणारा वनस्पतीचा आस d. ovule अवरोही बीजक किंजपुटाच्या बाजूच्या भिंतीत उगम पावून खाली वाढत गेलेले बीजक

descent
१ अवरोह २ अवतरण १ भूमीत किंवा भूमीकडे खाली वाढण्याची (वाहण्याची) प्रक्रिया २ एका पिढीतून दुसरी पिढी याप्रमाणे चालू राहणारा क्रम d. doctrine of common सामान्य अवतरण सिद्धांत सर्व सजीव सारख्याच व प्राचीन (प्रारंभिक) पूर्वजांपासून क्रमाक्रमाने बदल होत जाऊन

desert
मरुभूमी, मरुस्थल रुक्ष प्रदेश, पाण्याची कमतरता, भयंकर ऊष्णता, कडाक्याची थंडी, रेताड किंवा खडकाळ जमीन इत्यादीमुळे वनस्पतींच्या वाढीस प्रतिकूल असा प्रदेश, उदा. गोबी, सहारा, कलहारी, धुव प्रदेश, कच्छचे रण इ. d. flora मरुपादपजात प्रतिकूल परिस्थितीतही (वर

desertion of host
आश्रयत्याग ज्या सजीवावर आपली उपजीविका चालू असते तिला विशिष्ट काली सोडून अलग होण्याची प्रक्रिया, उदा. अर्गट lipoxeny

dessication
आर्द्रशोषण ओलावा काढून घेण्याची कृति (प्रक्रिया)

destarched
निर्ताऐकीकृत विशिष्ट अवयवात असलेले तौकीर (स्टार्च) नाहीसे केलेले अथवा त्याचे साखरेत रुपांतर करून ते इतरत्र नेलेले.

destructive metabolism (katabolism)
अपचय, विध्वंसक (भंजक) चयापचय संयुक्त अन्नकणांचे अथवा ऊतकांचे अनुक्रमे साध्या पदार्थात अथवा थोड्याफार नाशात रुपांतर करण्याची रासायनिक प्रक्रिया उदा. रूजणाऱ्या बिया, बटाटे व तत्सम कंद अथवा मुळे

determinant
निर्धारक, गुणघटक (कारक) संततीत उतरणाऱ्या गुणांची (लक्षणांची) अगाऊ निश्चिती करणारा प्रजोत्पादक कोशिकेच्या (गंतुकाच्या) रंगसूत्रातील घटक, याचे स्वरुप जनुक प्रकारचे असते, जनुके व त्यांचे रासायनिक स्वरुप याबद्दलच्या कल्पना आता काही अंशी निश्चित झाल्याने, वरील

determinate
१ निश्चित, निर्धारित २ कुंठित १ पुढे कोणती घटना, ऊतक, गात्र इ. होणार त्याची अगाऊ निश्चिती २ टोकावरच्या फुलामुळे मर्यादित झालेल्या अक्षाचा फुलोरा, वल्लरी d.growth निश्चित वर्धन (वृद्धि) वनस्पतींच्या कोणत्याही अवयवाची आधी निश्चित झालेली अथवा मर्यादित वाढ,

determination
निश्चिती, निर्धारणा, निर्णय निश्चित करणे उदा. वनस्पतीचे नाव (ती पूर्वी नोंदली असल्यास) व तिचे वर्गीकरणातील स्थान नक्की करणे d. of sex लिंगनिश्चिती, लिंगनिर्णय भावी पिढीतील संततीच्या लिंगभेदासंबंधी फलनापूर्वी अथवा फलनक्रियेत घडून येणाऱ्या घटना, कोणत्या

deuteromycetes
अपूर्ण कवक वर्ग, ड्युटेरोमायसेटीज (ड्युटेरोमायसेटी) ज्यांच्या विषयी पूर्ण माहिती उपलब्ध नाही किंवा त्यांच्या प्रजोप्तादक अवयवांसंबंदी पूर्ण कल्पना येत नाही व त्यामुळे ज्यांचा इतर कवकवर्गात अंतर्भाव करता येत नाही अशा कवकांचा (काहीसा तात्पुरता) गट

development
विकास, विकसन प्राप्त परिस्थितीत सजीवाच्या किंवा त्याच्या एखाद्या अवयवाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते पूर्णावस्थेपर्यंत होणाऱ्या बदलाची प्रक्रिया, यामध्ये संरचनात्मक प्रभेदन अभिप्रेत असते.

deviation
विचलन, अपगम ठराविक अवस्थेपासून किंवा नित्यस्थितीपासून काही कारणामुळे (उदा. भेदामुळे) घडून आलेला बदल. उदा. एखाद्या फळाच्या किंवा बियाच्या वजनात किंवा आकारमानात आणि नित्याच्या सरासरी वजनात किंवा आकारमानात आढळलेला फरक.

Devonian period
डेव्होनियन पीरीयड, डेव्होनी कल्प सुमारे ४० कोटी ते ३६.५ कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड, सिल्यूरियन व कॉर्बाएनिफेरस कल्पांमधील कालखंड.

dextral
सव्य, दक्षिणावर्त, उजवा d. twiner सव्य वलयिनी, उजवी वेल पहा clockwise twiner  clockwise  dextrose, clockwise, right handed

di-
द्वि- दोन किंवा दुप्पट या अर्थाचा उपसर्ग

diad
युगुल, जोडी, द्वय उदा. द्विसंयोजी रंगसूत्रे dyad

diadelphous
द्विसंघ केसरदलांचे दोन जुडगे (गट) असलेले उदा. अगस्ता, वाटाणा यांच्या फुलातील केसरमंडले

diageotropic
क्षितिजानुवर्तनी, भूपृष्ठानुवर्तनी क्षितीजाशी किंवा भूपृष्ठाशी समांतर (आडवी) वाढत राहणारी किंवा गुरुत्वाकर्षणाच्या रेषेशी काटकोनात वाढणारी उदा. मुळाशी अगर खोडाची बाजूची फांदी, काही फुलांचे देठ, पाने इ.

diageotropism
क्षितिजानुवर्तन, भूपृष्ठानुवर्तन वर वर्णन केल्याप्रमाणे वाढीची प्रक्रिया किंवा प्रवृत्ती, गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेमुळे दर्शविलेली (वाढ अभिप्रेत असलेली) प्रतिक्रिया

diagnosis
प्रवर्णन लॅटिन भाषेत वनस्पतीचे अधिकृत व आंतरराष्ट्रीय संकेतानुसार केलेले वर्णन

diagonal plane
कर्ण प्रतल फुलाच्या पुढच्या (पुरश्च, खोडापासून दूरच्या) व मागच्या (पश्च, खोडाजवळच्या) बाजूतून जाणारी पातळी व ह्या पातळीस काटकोनात छेदणारी पातळी. ह्या दोन्हींच्या मधल्या कोनाला सारखी विभागणारी तिसरी पातळी. anterior, posterior

diagrammatic representation
रेखाकृति प्रतिरुपण वस्तूचा, व्यक्तीचा किंवा अवयवाचा आकार किंवा रचना रेषांनी दर्शविणारी आकृती

diaheliotropic
प्रकाशजात्यानुवर्तनी प्रकाशकिरणांशी काटकोनात वाढणारे, उदा. सामान्य (द्विपार्श्व) पाने

diaheliotropism
प्रकाशजात्यानुवर्तन वर वर्णिलेली वनस्पतींच्या काही अवयवांची प्रतिक्रिया उदा. पानांची (सामान्यपणे) स्थिती.

diakinesis
चतुष्ट्यावस्था प्रकलातील न्यूनीकरण विभाजनातील मध्यावस्थेतील रंगसूत्रांची अंतिम स्थिती, यावेळी समजात रंगसूत्रांच्या जोड्या तयार होऊन त्यांच्या अर्धांनी आपल्या काही भागांची अदलाबदल केलेली असते, प्रकलावरण अद्याप टिकून असते व एकंदर रंगसूत्रे चारीच्या संचात असतात.

Dialypetalae
मुक्तप्रदली गोत्र द्विदलिकित वनस्पतींतील संवर्त व सुट्या पाकळ्या असलेल्या फुलांच्या वनस्पतींचा एक गट, एका गोत्रात अनेक गण व कुले असून वरील लॅटिन संज्ञा एंडलिकर व् जुस्यू या वनस्पतीशास्त्रज्ञांनी दिली आहे. cohort (गोत्र) Polypetalae

diandrous
द्विकेसरी फक्त दोन केसरदले असलेले, उदा. जाई, जुई, इत्यादींची फुले

diaphragm
अंतःपटल, मध्यपट शरीरांतर्गत पातळ पडदा, उदा. कमळाचा देठ

diarch
द्विसूत्र, द्विसूत्री खोड व मूळ यांच्या अंतर्रचनेत दोन ठिकाणी आद्यप्रकाष्ठ असलेले (प्रकाष्ठ अगर रंभ) d. stele द्विसूत्र रंभ काही नेचे

diastase
डायास्टेज तौकिराचे शर्करेत रुपांतर करणारे कार्बनी निदेशक (वितंचक) amylase

diaster stage
द्वितारकावस्था समविभाजनात रंगसूत्रे विभागून कोशिकेच्या दोन टोकाकडे जात असताना (मध्यावस्था) त्यांच्या दोन तारकेसारख्या होणाऱ्या आकृती

diastole
प्रसरण जीवद्रव्यातील (प्राकलातील) संकोचशील रिक्तिकांचे (रित्या जागांचे) प्रसरण पावणे systole

Diatomacae
करंडक कुल, डायाटोमेसी, बॅसिलॅरिओफायसी शैवल वनस्पतींपैकी अएककोशिक व एकावर दुसरे डबीप्रमाणे (करंड्याप्रमाणे) बसणाऱ्या दोन (वालुकामय झाकणाचे) सारख्या भागांचे शरीर असलेल्या गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातील सूक्ष्म वनस्पती. (Bacillariophyceae, Diatomeae, Diatoms)

diatomaceous earth
करंडकीय मृदा करडक वनस्पतींच्या मृत शरीराची अवशेषरुपी माती (रेती)

dicarpellary
द्विकिंज bicarpellary

dicaryon
प्रकलयुग्म एका कोशिकेच्या प्राकलात असलेल्या दोन स्वतंत्र प्रकलांच्या संयोगाचा एक संयुक्त प्रकल, अथवा हे सतत जोडीने पण अलग राहणारे दोन प्रकल, उदा. काही कवक (तांबेरा)

dichasial cyme
द्विशाख वल्लरी biparous cyme  dichasium

dichlamydeous
द्व्यावृत संवर्त व पुष्पमुकुट अशी दोन परिदलमंडले असलेले (फूल) उदा. चिंच, बाहवा, गुलाब monochlamydeous, achlamydeous

dichogamy
भिन्नकालपक्वता, असमपकता केसरदले व किंजदले एकत्र असूनही (एकाच फुलात) एकाच वेळी पक्क न होण्याचा प्रकार, यामुळे परपरागण अथवा असमयुति सहज साध्य होते. फुलझाडांखेरीज इतर वनस्पतींच्या बाबतीतही ही संज्ञा वापरतात.

dichotomous
द्विशाखी एका अक्षाच्या टोकाची कळी विभागुन दोन अक्ष वाढतात व पुढे त्या प्रत्येकाची वाढ अशाच प्रकारे होते. उदा. डिक्टिओटा शैवल, रिक्सिया शेवाळी, केवडा, शंखपुष्पी (Canscora sp.), भोकर (Cordia dichotoma Forst) इ.

dichotomy
द्विशाखाक्रम, द्विपदशाखाक्रम प्रमुख खोडाच्या टोकास वाढ थांबून, बाजूच्या बगलेतून दोन फांद्या (अक्ष) वाढून व त्याच पद्धतीने वाढ चालू राहून शाखा विस्तार होण्याचा प्रकार d. false छद्मी (आभासी) द्विशाखाक्रम अक्षावरची शेंड्याची कळी निसर्गतः किंवा अपघाताने नाश

diclinous
विभक्तलिंगी नर व मादी हे दोन प्रकारचे प्रजोत्पादक अवयव एकत्र (एका फूलात) नसणारे (फूल), उदा. मका, एरंड, काकडी इ. unisexnal, imperfect

dicliny
विभक्तलिंगता वर वर्णन केलेला प्रकार अथवा स्थिती

Dicotyledoneae
द्विदलिकित वनस्पती वर्ग बीजामध्ये दोनच दलिका (गर्भावस्थेतील पाने) असलेल्या वनस्पतींचा मोठा गट, याचा अंतर्भाव फुलझाडांमध्ये (आवृतबीज वनस्पतींच्या उपविभागात) करतात. सामान्य भाषेत द्विदल वनस्पती म्हणतात. दुसरा वर्ग एकदलिकितांचा होय. Monocotyledoneae,

dicotyledonous
द्विदलिकित, द्विबीजपत्री दोन दलिका (डाळिंब्या) असलेलं (बीज), उदा. पावटा, मोहरी, आंबा इत्यादी. अशी बीजे असलेल्या सर्व वनस्पतींना हेच विशेषण सामान्यपणे लावतात. द्विदळ अशी संज्ञा सामान्यपणे रुढ आहे. ह्या वनस्पतींची इतर प्रमुख लक्षणे - पानांमध्ये शिरांचे जाळे

dictyostele
जलरंभ, बहुलाद्यरंभ अनेक प्रारंभिक (साधे) रंभ असलेले, उदा. नेफोलेपिस नेचा protostele

dicyclic
द्विचक्रिक, द्विमंडलित विशिष्ट प्रकारच्या पुष्पदलांची एकाऐवजी दोन मंडले असणारे (फूल), उदा. मोहरीच्या फुलातील केसरमंडल, निशिगंधा (गुलछडी) च्या फुलातील परिदले, हिरव्या चाफ्याचे फुल

didymous
द्विभक्त १ फलांशाच्या जोड्या असलेले (फळ), उदा. धने, जिरे, अरसूळ (Conthium didymum Gaertn.) २ दोन भाग असलेले, उदा. काही परागकोशखंड उदा. साल्व्हिया

didynamous
दीर्घद्वयी, द्व्योन्नत दोन लांब व दोन आखूड केसरदले असलेले उदा. तुळशीच्या फुलातील केसरमंडल, पातेरी, टोरेनिया

differentiated
विभेदित आकार व संरचना यात विशेष रीतीने फरक (भेद) पडलेले (शरीर किंवा अवयव)

differentiation
प्रभेदन, विभेदन शरीरातील भिन्न कार्याला उपयुक्त असे भिन्न संरचनेचे व आकारमानाचे घटक बनण्याची प्रक्रिया, अवयवांच्या विकासात ही प्रक्रिया प्रमुखपणे आढळते. संरचनेत भेद वाढत जाणे हे येथे अभिप्रेत आहे.

diffuse
प्रसूत, विरलशाखी पसरुन वाढणारी वनस्पती, उदा. पुनर्नवा (Boerhaavia diffusa L.)

diffusion
विसृति, विसरण वनस्पतींच्या शरीराबाहेरील वायू, पाणी, जमिनीतील विद्राव (त्यातील आयने) इत्यादींचा भौतिक नियमाने होणारा शरीरात प्रवेश, विशिष्ट परिस्थितीत त्यांचे आतून शरीराबाहेर येणे. gland, stoma, hydathode, osmosis

digestive gland
पचन प्रपिंड, पचन ग्रंथि अन्नाचे सात्मीकरण होण्यास त्याचे रुपांतर करण्याकरिता उपयुक्त द्रव पदार्थ (उदा. वितंचक) स्त्रवणारे उपांग (संरचना, ग्रंथि, कोशिका इ.) उदा. कीटकभक्षक वनस्पती. d. sac पचनकोश मुळातून त्याची शाखा बाहेर पडत असताना मुळाच्या सालीतून बाहेर

digitaliform
हस्ताकृति हातमोज्याप्रमाणे आकार असलेले उदा. तीळ, विंचवी, तिलपुष्पी (Digitalis purpurea) इत्यादींच्या फुलांचे पुष्पमुकुट

digitate
चपेटाकृति बोटासह तळहाताप्रमाणे (पंज्याच्या) आकाराचे उदा. सावर, पून, गोरखचिंच इत्यादींची संयुक्त पाने, भुईकोहोळा (Ipomea digitata L.)

digonous
द्विकोनी आडवे कापल्यास दोन कोन दिसणारे,

digonous
द्विकोनी आडवे कापल्यास दोन कोन दिसणारे,

dihybridisation
द्विसंकरण वर सांगितलेली गुणद्वय संकरप्रक्रिया (प्रयोग)

dilation
विस्तार, विस्फारण प्रकाष्ठाच्या परिसरातील मृदूतकाच्या कोशिकांच्या विभागणीमुळे प्रकाष्ठात मधून मधून खंड पडल्यामुळे ते सर्वच फुगण्याचा प्रकार

Dilleniaceae
करंबळ कुल, डायलेनिएसी करंबळ, करमळ इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लरच्या पद्धतीत याचा समावेश पराएटेलीझ गणात व हचिन्सन यांना याचा अंतर्भाव करंबळ गणात (डायलेनिएलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, झुडुपे कधी वर चढणारी, जाड एकाआड एक पाने व कुंठित फुलोऱ्यावर द्विलिंगी, अवकिंज फुले, सदले ३-५ किंवा अनेक व सर्पिल आणि फळावर सतत राहतात. पाकळ्या ३-५ व सुट्या, केसरदले अनेक, तसेच किंजदले १ ते अनेक, सुटी किंवा जुळलेली व बीजकेही एक किंवा अनेक. मृदुफळ किंवा पेटिकाफळ, सपुष्क बीजावर बीजोपांग.

dimerous
द्विभागी प्रत्येक मंडलात दोनच पुष्पदले असणारे (फूल) उदा. मोहरी

dimorphic
द्विरुप दोन आकारात आढळणारे (अवयव, सजीव) उउदा. काही नेचंआची पाने

dimorphism
द्विरुपता वर वर्णन केलेला प्रकार, उदा. बिशकोप्रा heterostyly, trimorphic

dioecious
विभक्तलिंगी भिन्न लिंगभेद दर्शविणारे अवयव (उदा. केसरदले किंजदले, अंदुककलश, रेतुकाशये इ.) दोन भिन्न वनस्पतीवर असणारी जाती, उदा. पपई, कुंकुमवृक्ष, सायकस, कॉलेर्पा आणि कोडियम या हरित शैवलांच्या काही जाती, एक्किसीटम अर्वेन्से इ.

dioecism
विभक्तलिंगता वर वर्णन केलेला प्रकार

Dioscoriaceae
आलुक कुल, डायॉस्कोरिएसी कणगर, गोराडू, कारंदा इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी पलांडु गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- वेली, भूमिस्थित ग्रंथिल खोड व मुळे, साधी, एकाआड एक पाने (जाळीदार शिरांची), नियमित, एकलिंगी, त्रिभागी, लहान फुले भिन्न वनस्पतीवर असतात, अधःस्थ किंजपुटात १-३ कप्पे व प्रत्येकात २ बीजके, मृदुफळ किंवा बोंड, सपुष्क बी

diplo-
द्वि जोडी या अर्थाचा प्रत्यय d. coccus द्विगोलाणु जोडीने असणारे गोलाणु (गोल सूक्ष्मजंतू). d. idization द्विगुणन कोशिकेतील रंगसूत्रांंची संख्या दुप्पट होण्याची प्रक्रिया, एका एकगुणित प्रकलाऐवजी दोन तशीच प्रकले एकत्र येणे. d.phase (diploid phase)

Dipterocarpaceae
शाल कुल, डिप्टेरोकार्पेसी चालन (गुर्जन), शाल (साल), बोर्निओ कापूर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम व हूकर यांनी वृंदार (कोकम) गणात समावेश केला आहे. प्रमुख लक्षणे - साध्या एकाआड एक, जाड, सोपपर्ण पानांची उंच झाडे (वृक्ष), अकुंठित फुलोऱ्यावर, द्विलिंगी, नियमित, पंचभागी, अवकिंज फुले, ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व त्या प्रत्येकात दोन बीजके, सतत संवर्ताने वेढलेले कपाली सपक्ष फळ. साल (Shorea robusta Gaertn)

disc
विम्ब, चकती १ फुलातील पुष्पदलांमध्ये पुष्पस्थलीची वर्तुळाकार चकतीसारखी वाढ २ स्तबक फुलोऱ्यातील पसरट पुष्पासन ३ कंदातील खोडाचा संक्षिप्त चकतीसारखा भाग ४ थाळी, तबकडी इत्यादी अर्थाने वापरतात. d. adhesive आसंगी बिम्ब पहा adhesive disc. d. floret बिम्बपुष्पक

Disciflorae
बिम्बपुष्पी श्रेणी वर्गीकरणाच्या बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत फुलझाडांच्या द्विदलिकित वर्गातील सुट्या पाकळ्या असणाऱ्या उपवर्गातील बिम्बयुक्त फुले असलेल्या वनस्पतींची श्रेणी Thalamiflorae

disciform
बिम्बसदृश सपाट व गोलाकार चकतीसारखे अथवा वर्तुळासारखे

discoid gland
बिम्बाभ प्रपिंड चकतीसारखे किंवा अर्धगोलाकार डोके असलेली, लांब अथवा आखुड दांड्यावर आधारलेली स्त्रावक ग्रंथि

discolour
भिन्नवर्णी दोन्ही पृष्ठभाग निरनिराळ्या रंगाचे असलेले, उदा. काळा चाफा (Unona discolour Vahol.) कानवला (Rhoeo discolour Hans), बिगोनिया इ. ची पाने

discontinuous
खंडित, असंतत सलगपणा (क्रमिकपणा) नसलेले (उदा. भेद) d.variation खंडित भेद अनेक व्यक्तींमध्ये (एकाच जातीच्या) आढळणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान अशा भेदांमध्ये ठराविक क्रमाचा अभाव. उदा. फळाचे सरासरी आकारमान व भेददर्शक असे मोठे फळ यामध्ये काही सलगपणा नसणे

disjunction
वियोजन प्रजोत्पादन कोशिका (गंतुके) निर्मिणाऱ्या जनक कोशिकेच्या न्यूनीकरण विभाजनात प्रथम एकत्र येणाऱ्या समजात लिंगसूत्रांच्या जोडीतील (एक बापाकडील व एक मातेकडील) प्रत्येक नंतर नित्याप्रमाणे अलग होण्याची प्रक्रिया, त्यानंतर त्यापैकी प्रत्येक स्वतंत्र गंतुकात राहतो. रंदुकात ते दोन्ही परत एकत्र येतात. मात्र क्वचित ते वर सांगितल्याप्रमाणे अलग न होता दोन्ही एकाच गंतुकात येतात व दुसऱ्या गंतुकात त्या रंगसूत्राचा अभाव आढळतो. या प्रकारास 'अवियोजन' म्हणतात (non disjunction) हाच प्रकार इतर रंगसूत्रांच्या बाबतीतही होणे शक्य असते. ह्यामुळे संततीच्या लिंगभेदात व काही लक्षणात फरक (भेद) पडतात, तसेच विशिष्ट लिंगभेदयुक्त व्यक्तींचे प्रमाणही बदलते.

disjunctive symbiosis
वियोजी (वियुक्त) सहजीवन परस्परांचे कायम निकट संबंध न राखता चालू असलेले सहजीवन (एकत्र जगणे). उदा. पक्षी आणि वृक्ष यांचा सहवास फक्त फळे खाण्यापुरता किंवा रात्री घरट्यात विश्रांतीकरताच असतो. ते कायमपणे चिकटलेले नसतात. conjunctive symbiosis

dispersal
विकिरण, प्रसार फळे, बीजे, बीजुके इत्यादींना जनक वनस्पतीपासून अलग करून इतरत्र नेण्याची नैसर्गिक प्रक्रिया

displacement
विस्थापन, स्थानच्युति एखादा अवयव निसर्गतः अनित्य जागी येणे. उदा. सूर्यफुलाच्या पुष्पासनाखाली, बाजूस दुसरे लहान स्तबक (फुलोरा) आलेले क्वचित आढळते.

dissected
१ खंडित २ विच्छेदित १ निसर्गतः अनेक भाग पडलेले, उदा. पाण्यातील पाने २ वर सांगितल्याप्रमाणे सुटे केलेले इ. (अवयव) उदा. फूल किंवा फळ

dissecting microscope
विच्छेदक सूक्ष्मदर्शक सूक्ष्म विच्छेदनाकरिता सोइस्कर असे उपकरण

dissection
विच्छेदन विशिष्ट पद्धतीनुसार वनस्पती अथवा प्राणी व त्यांचे भाग अभ्यासाचे दृष्टीने सुटे करणे, कापणे इ. प्रक्रिया

dissemination
प्रसार विशेषतः सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांचे मूळ वनस्पतींपासून अलग करून दूरवर नेण्याची प्रक्रिया. उदा. बुरशी व भूछत्रे यांची बीजुके dispersal

disseminule
विकिर्णी स्थलांतराच्या अवस्थेतील वनस्पती, उदा. बीज, बीजुक, फळ इ.

dissepiment
पटल पातळ पडदा उदा. किंजपुटात किंजदलाच्या आत वाढलेल्या बाजू जुळून तयार झालेला पडदा, त्यामुळे त्यात कप्पे तयार होतात उदा. भेंडी d. spurious (replum) छद्मपटल किंजपुटाच्या बाजूकडून (शिवणीकडून) नंतर आत वाढत आलेला पडदा उदा. मोहरी partition

dissimilar
असम, विषम, असदृश सारखेपणा नसलेला (अवयव), उदा. वाटाण्याच्या फुलातील पाकळ्या, मुळे व खोड यांची संरचना, मुळे, खोड, पाने अनेक दृष्ट्या विषम असतात. unlike

dissolved
विलीन विरघळलेले

distal
दूरस्थ दूर असलेला, दूरचा उदा. पानाचे टोक देठाशी तुलना केल्यास खोडापासून दूर असते. proximal

distichous
द्विपंक्तिक दोन रांगांत असलेली उदा. गवताची पाने, रायआवळा (Phyllanthus distichous Muell).

distillation
ऊर्ध्वपातन एखादा द्रव पदार्थ उकळेपर्यंत तापवून व त्याची वाफ निववून तो परत द्रवरुपात (बहुधा पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध स्वरुपात) आणण्याची प्रक्रिया

distinct
मुक्त, अयुक्त सुटे, न जोडलेले (न जुळलेले), उदा. काही केसरतंतू, परागकोश खंड, किंजदले, इत्यादी पुष्पदले

distractile
वियोजी परागकोशाच्या दोन खंडांना परस्परांपासून पूर्णपणे दूर ठेवणारी संधानी उदा. सॅल्व्हिया.

diurnal
१ दैनिक २ दिनचर १ दिवसा घडणारे २ दिवसा संचार करणारे d. sleep movements दैनिक (दिवा) निद्रावलन दिवसा (सूर्यप्रकाशात) रात्रीप्रमाणे घडून येणाऱ्या हालचाली उदा. लाजाळू, तरवड, चिंच इत्यादींची पाने daily

divaricate
अत्यपसारी परस्परापासून बव्हंशी दूर असलेले भाग, उदा. काही परागकोशांचे खंड, काही पानांतील शिरा divergent, forked.

divergence
परामुखता, अपसारण परस्परांपासून दुरावत जाणे, उदा. ताड, एरंड इत्यादींच्या पानातील शिरा, रुईची दोन पेटिकाफळे, कुडा, माकडशिंगी इत्यादींची फळे d.angle of उद्गमन कोन, परामुखता कोन पहा angle of divergence

divergent
परामुख, अपसारी परामुखता असलेले, परस्परापासून दूर होत गेलेल्या (उदा. शिरा)

divided
खंडित,मुक्त सुटे, एकमेकांपासून तळापर्यंत अलग झालेले (भाग), उदा. संदले, प्रदले, पानांची दले, पुष्पदले इ.

division
१ विभाग २ विभाजन १ वर्गीकरणातील मोठा गट (एकक), कोटीहून किंवा उपकोटीहून लहान २ विभागण्याची प्रक्रिया, उदा. कोशिका, प्रकल

DNA
डी एन ए प्राणी व वनस्पती यांच्या शरीरघटकातील एक रासायनिक पदार्थ, डी ऑक्सिरिबोज न्यूक्लीइक ऍसिड, प्रकलातील एक आम्ल chromosome, nucleotide

domesticated
१ संवर्धित २ पाळीव १ लागवडीमुळे टिकून राहिलेली (वनस्पती) २ पाळलेला प्राणी

dominance
१ प्रभाव २ प्राधान्य १ संकराच्या प्रक्रियेत दोन वैकल्पिक गुणांपैकी एकाची अधिक छाप संकरजात दिसण्याचा प्रकार २ वनस्पतिसमुदायातील काही व्यक्तींचा ठळकपणा ३ परिस्थितिविज्ञानात, एखाद्या पादपसमुदायातील प्रत्येक जातीच्या व्यक्तींनी व्यापलेली क्षेत्रमर्यादा, एखाद्या समुदायात अनेक थर असल्यास प्रत्येक थरातील प्रभाव स्वतंत्रपणे मोजला जाणे आवश्यक असते.

dominant
१ प्रभावी, प्रकट २ प्रधान १ संकरजात प्रत्यक्ष दिसून येणारे (लक्षण) पहा recessive २ संगति व संघात यातील सर्वात प्रभावी वनस्पती d. character प्रभावी लक्षण (गुण) संकरजातील प्रकट लक्षण association, consociation

dormancy
प्रसुप्तावस्था, तंद्रावस्था, प्रसुप्तता dormant

dormant
१ प्रसूर २ अप्रकट १ योग्य परिस्थितीच्या अभावी प्रकट न झालेले, उदा. कळी, बीज अथवा बीजुक यातील जीवन २ दोन वैकल्पिक गुणांपैकी संकरप्रजेत न दिसणारा पण त्यापुढच्या पिढीतील काही अपत्यांत आढळणारे लक्षण   d. bud सुप्तकलिका तात्पुरती वाढ थांबलेली कळी, मुका डोळा

dorsal
पृष्ठीन, पृष्ठीय, पश्च पाठीकडचा, पानाच्या बाबतीत वरची किंवा प्रकाशाकडे असलेली बाजू d.suture पृष्ठसेवनी पाठीकडची शिवण, किंजदलाची मध्यशीर, उदा. वाटाण्याच्या शेंगेतील बीजके न चिकटलेली शीर पहा ventral suture  adaxial

dorsifixed
पृष्ठालग्न, पृष्ठाबद्ध पाठीकडून चिकटलेले, उदा. कमळाचे परागकोश adnate  adnate

dorsiventral
द्विपार्श्व दोन बाजू असणारे d.(bifacial) leaf द्विपार्श्व पर्ण बाह्य स्वरुप व अंतर्रचना या बाबतीत दोन बाजू स्पष्ट दर्शविणारे पान d.(zygomorphic) flower द्विपार्श्व पुष्प एक पुरस्थ अर्ध दुसऱ्या (पश्च) अर्धाहून भिन्न असणारे (एकसमात्र) फूल, उदा. तेरडा पहा

dosage
मात्रा योग्य परिणामकारक व्हावे असे एखाद्या औषधाचे प्रमाण dose

double
द्विगुणित, दुहेरी, दुप्पट, द्वि (उपसर्ग) दुप्पट भाग असलेले, उदा. पाकळ्या (निशिगंध), तगर, मोगरा, जास्वंद, तेरडा इ.) d.cross दुहेरी संकर, द्विसंकर एका संकरजाचा दुसऱ्या संकरजाशी घडविलेला संकर d. fertilisation द्विफलन फुलझाडाच्या बीजकातील अंदुकाशई

down
मृदुलोम मऊ लव उदा. ऐसर (ईश्वर)

downy
मृदुलोमश, लवदार मऊ लव असलेले, उदा. रुई, तीळ d. mildew तंतुभरी जीवोपजीवी कवकापासून होणारा रोग, यामुळे पानांवर पांढरट रंगाचे मऊ लवीसारखे कवकतंतूंचे ठिपके येतात. उदा. द्राक्षाच्या वेलीवर हा रोग होतो. pubescent

draining point
निःसरणाग्र, प्रकुंचिताग्र acuminate apex  drip tip

drepanium
वक्रवल्लरी, दात्रवल्लरी कोयत्याच्या आकाराचा कुंठित फुलोरा helicoid

dropping
लोंबती, नत खाली लोंबणारी, उदा. फुले (कोरफड, कलांचो), फांद्या, पाने (हिरव्या अशोकाचा एक प्रकार)

drought
जलदुर्भिक्ष, जलाभाव पाण्याची दुर्मिळता (तुटवडा), रुक्षता d.physical भौतिक (वास्तव) जलदुर्भिक्ष वाळवंट किंवा खडकाळ ठिकाणी आढळणाऱ्या जमिनीतील पाण्याची टंचाई d. physiological क्रियावैज्ञानिक जलदुर्भिक्ष जमिनीत पाणी असूनही, क्षार, लवणे, अम्लता, अति थंडपणा,

drug
औषध शरीरातील दोष नाहीसे करून आरोग्यप्राप्तीचा लाभ देणारा पदार्थ

drupe
अश्मगर्भी फळ, अष्ठीला, आठळी फळ, बाठी फळ फलावरणाचा सर्वांत आतला कठीण (कवचासारखा) असलेले (बाठी असलेले) रसाळ फळ, उदा. आंबा, बदाम, अक्रोड, जरदाळु इ. d.fibrous तंतुमय अश्मगर्भी फळ रस किंवा मगज याऐवजी धाग्यांनी भरलेले पण करवंटी असलेले फळ उदा. नारळ nut  stone

drupelt
उपाष्ठीला अनेक आठळ्यांच्या घोसफळातील एक उदा. रासबेरी

duct
नलिका, वाहिनी राळ, श्लेष्मल (चिकट) द्रव्य, चीक यांसारखे पदार्थ साठविणे, किंवा बाहेर टाकणे, याकरिता शरीरातील सलग नळीसारखा घटक किंवा कोशिकांमधून जाणारा मार्ग उदा. चीड, चिल, अफू, सायकस इ.

dulcis
मधुर गोड, खारट, तुरट, कडवट इत्यादी नसलेले उदा. विलायती चिंचेतील (इंगा डल्सिस) बीजाभोवतालचा मगज (Pithecolobium dulce Benth). sweet

dune
वालुकाराशि वाऱ्याने किंवा मोठ्या लाटांनी किनाऱ्यावर किंवा वाळवंटात जमलेल्या वाळूचे लहान मोठे ढीग (उंचवटे)

duplex
द्विघटक विशिष्ट आनुवंशिक गुणांचे बाबतीत आई किंवा बाप यांच्याकडून एकाच लक्षणाचे दोन प्रभावी गुणघटक संततीत उतरण्याची घटना, एकच प्रभावी घटक उतरल्यास एकघटक (simplex) आणि एकही न उतरल्यास अघटक (nulliplex) अशा संज्ञा आहेत. dominant, allelomorph

duplicate
द्विगुण्य, द्विरुप दुप्पट संख्या असलेले उदा. आनुवंशिक परिमाणात्मक लक्षणांचे संततीत अनुहरण होताना दोन प्रभावी घटक जबाबदार असण्याचा प्रकार, उदा. गव्हाचा रंग

duplication
द्विगुणन दुप्पट होणे, उदा. फुलातील मंडले किंवा त्यातील अवयव, रंगसूत्रे, कोशिका इ.

duramen
अंतःकाष्ठ जून खोडाच्या मध्यभागी असलेले गडद रंगाचे (मृत) लाकूड, यांचे कार्य फक्त मजबुती आणण्याचे असते. alburnum  heart wood

duration of life
आयुर्मान, आयुःकाल वनस्पतीची सर्वसाधारण जीविताची मर्यादा

dwarf male
ऱ्हस्व पुं-तंतु, लघु नर फार लहान आणि फक्त पुं-गंतुके निर्माण करणारा तंतू, उदा. इडोगेनियम शैवल

dwarf shoot
ऱ्हस्व प्ररोह, लघु शाखा १ केवळ दोन किंवा तीन पाने असणाऱ्या लहान मर्यादित शाखा, उदा. चीड, चिल इ. २ अत्यंत मर्यादित वाढ असणाऱ्या शाखा, उदा. फणसाच्या खोडावरील फुलोऱ्याच्या शाखा

dwarfishness
ऱ्हस्वता, लघुत्व खुजेपणा, खुरटेपणा, वाढीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे आलेला अथवा कृत्रिमरीत्या आणलेला, साधारणपणे निसर्गतः रुक्ष प्रदेशातील वनश्री खुरटी असते. dwarfism

e
- हान नकार (अभाव) दर्शक उपसर्ग, मराठीत प्रत्ययाप्रमाणे- 'हीन' वापरतात ebracteate

ear
१ कर्ण २ संयुक्त कणिश १ सामान्य अर्थाने कान अथवा तत्सम भाग २ अनेक लहना कणिशांचा छदयुक्त फुलोरा, उदा. मका, पहा spike, spiklet

earlier
पूर्वतर अधिक आरंभी असलेले

earliest
पूर्वतम सर्वात आरंभी असलेले

early
पूर्व आरंभी असलेले

earth
पृथ्वी

Earth
पृथ्वी

Ebenaceae
टेंबुर्णी (तिंदुक) कुल, एबेनेसी टेंबुर्णी, काकी, तिमरु, तेंडू, अबुनस इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे कुल, याचा अंतर्भाव तिंदुक गणात (एबेनेलीझ) मध्ये करतात. बकुल कुलाशी (सॅपोटेसी) याचे निकट संबंध आहेत. प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, साधी, अखंड व चिवट पाने, नियमित, बहुधा विभक्तलिंगी, सच्छदक, ३-७ भागी फुले, परिदले जुळलेली, संवर्त सतत राहणारा, पुष्पमुकुट संवलित, केसरदलांची दोन मंडले व तळाशी ती पाकळ्यास चिकटलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुट, किंजदले २-१६ व जुळलेली, मृदुफळ, क्वचित तडकणारे फळ, सपुष्क बिया

ebracteate
छदहीन छद (फुलाच्या तळाशी असलेले उपांग) नसलेले (फूल), उदा. संकेश्वर, मोगरा इ.

ecalcarate
शंउडिकाहीन शुंडिका नसलेले calcarate

ecesis
वसन प्रक्रिया, स्थिरावणे नव्या जागी आक्रमक वनस्पतींचे बी अथवा बीजुक रुजून नवीन वनस्पती वाढणे, प्रजोत्पादन होणे व अशा रीतीने ती स्थिर होणे invasion

echin-
कंटकित (ग्रीक उपसर्ग)

echinate
कंटकित, काटेरी मजबूत, काटे असलेली (वनस्पती, अवयव इ.), उदा. उटकारी (Echinops echinatus Roxb.) prickly

eciliate
केसलहीन, पक्ष्माभिकाहीन केसल नसलेला (अवयव, उपांग) cilium

ecological system
पारिस्थितिकीय तंत्र एक किंवा अनेक सजीव आणि त्यांचा परिसर यांमधील ऊर्जेच्या विनिमयाचे जटिल संबंध दर्शविणारी व्यवस्था

ecology
परिस्थितिविज्ञान, स्थलविज्ञान, पारिस्थितिकी वनस्पतींच्या परिस्थितीसापेक्ष अभ्यासाने मिळविलेल्या ज्ञानाची शाखा oecology

economic botany
आर्थिक वनस्पतीशास्त्र (वनस्पतीविज्ञान), व्यावहारिक किंवा सांपत्तिक दृष्टीने उपयुक्त अशी वनस्पतींच्या अभ्यासाची (अन्वेषणाची) ज्ञानशाखा

ecorticate
मध्यत्वचाहीन मध्यत्वचा अगर तत्सम ऊतक नसलेले, उदा. कांडशरीरिका (कारेसी) शैवल वर्गातील काही वनस्पती Characeae

ecostate
सिराहीन शिरा नसलेले (पान अथवा तत्सम अवयव), मांसल पानावर शिरा दिसत नाहीत, उदा. पानफुटी, घायपात इ. unicostate, multicostate

ecosystem
स्थूल व्यूह, स्थल तंत्र, निवास तंत्र पादपसमुदायातील सर्व सजीव व निर्जिव घटकांची परस्परावलंबी एकत्रित संस्था (व्यूह), सजीवांपैकी कोणी अपघटक (decomposers), कोणी उत्पादक (producers) आणि इतर ग्राहक (consumers) असतात. साधारणपणे हिरव्या वनस्पती अधिकांश उत्पादक, सूक्ष्मजंतू व कवक हे अपघटक (जटिल कार्बनी पदार्थांचे रुपांतर अकार्बनी पदार्थांत करणारे) व प्राणी अधिकांश ग्राहक (उपयोगांत आणणारे) असतात.

ecotone
पादपी सीमा, एकोटोन दोन पादपसमुदायातील सीमारेषा दर्शविणारे संक्रमणस्थल (परस्परात मिसळलेले ठिकाण). vegetational boundary

ecotype
स्थितिरुप, स्थलरुप, एकोटाइप १ विशिष्ट परिस्थितीशी (जननिक दृष्ट्या) वंशपरंपरेने अनुकूलित झालेल्या एकाच जातीतील काही वनस्पतींचा गट, यांचा याच जातीतील अन्य परिस्थितीशी अनुकूलित झालेल्या इतर वनस्पतींशी मुक्तपणे संकर होऊ शकतो. २ एखाद्या वनस्पतीचा निवासानुरुप बनलेला रुपप्रकार.

ecto-
बाह्य बाहेरचे या अर्थी उपसर्ग

ectoparasite
बाह्योपजीवी आश्रयाच्या पृष्ठभागावर राहून आतील अन्नरस शोषून घेणारे, उदा. अमरवेल, काही कवक

ectophloic
बाह्यपरिकाष्ठी केवळ बाहेरच्या बाजूस परिकाष्ठ असलेला (रंभ), उदा. बहुतेक सर्व खोडात आतील बाजूस प्रकाष्ठ व त्या बाहेर परिकाष्ठ असते, काही नेचे (ऑस्मुंडा) व तत्सम वनस्पती यांच्या खोडात आत व बाहेर परिकाष्ठ असते. siphonostele, stele

ectoplasm
बाह्यप्राकल कोशिकेच्या आवरणाच्या आतील बाजूस असलेला प्राकलाचा (जीवद्रव्याचा) थर, हा अधिक दाट व पारदर्शक असतो. ectoplast

ectotrophic mycorrhiza
बहिःस्थित संकवक इतर झाडांच्या मुळांच्या पृष्ठभागावर आश्रय घेणारे व आपली उपजीविका चालविणारे कवक, हे मुळाला जमिनीतील अन्नरस उपलब्ध करून देते, उदा. चीड, सहजीवनाचा एक प्रकार symbiosis  ectophytic

edaphic
भौम वनस्पतींना आधारभूत अशी मुख्यतः जमीन, पाणी, अन्य वनस्पती, कुजणाऱ्या काटक्या, प्राणिज पदार्थ इत्यादींचा या संज्ञेत समावेश होतो. e.factor भौम घटक वनस्पतिजीवनावर परिणाम करणाऱ्या भूमिविषयक वर सांगितलेल्या बाबींचा तपशील, उदा. जमिनीचे काठिण्य, रंग, रासायनिक

edge
धारा, किनार पानाची किंवा तत्सम अवयवांची कडा (margin)

effective publication
अनुवृत्त प्रकाशन वनस्पतींच्या नावांसंबंधीची प्रसिद्धी छापील मजकूर, विक्री, देवघेव, प्रसार इ. साधनांनी करण्याची अधिकृत पद्धती.

effloration
१ पुष्पोद्गम, पुष्पनिर्मिती २ पुष्पकाल १ फुले येणे २ फुलांचा मोसम.

efflux
बहिर्वाह, उत्प्रवाह बाहेर वाहून येण्याची क्रिया किंवा तो पदार्थ

egg
अंदुक, स्त्री अंदुक, अंडपेशी, अंडे प्रजोत्पादनाचे सामर्थ्य (क्षमता) असलेली स्त्री लिंगधारक कोशिका e.apparatus अंदुक परिवार फुलझाडांतील बीजकांच्या गर्भकोशांतील बीजरंधाच्या जवळ असलेल्या अंदुकाजवळच्या दोन सहचर कोशिका व अंदुक e. shaped (ovate) अंडाकृति तळाशी

ejection
विक्षेपण आतून जोराने फेकण्याची प्रक्रिया उदा. काही बीजे व बीजके

ejectory mechanism
विक्षेपक यंत्रणा (योजना) वर वर्णन केल्याप्रकारची कार्यकारी योजना, उदा. तेरडा, संकेश्वर, एरंड इऍही फळे, नेफोलेपिस नेचा (बीजुक कोश), काही शेवाळी व कवक

Elaegnaceae
आंबगूळ कुल, एलेग्नेसी आंबगूळ व इतर काही (एकूम तीन वंश व सुमारे ४५ जाती) वनस्पतींचा अंतर्भाव असलेले एक द्विदलिकित फुलझाडांचे कुल, याचा समावेश जंबुल गणात (मिर्टेलीझ) केला जातो. हचिन्सन यांनी बदरी गणात (ऱ्हॅम्नेलीझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- शाखायुक्त व बहुधा काटेरी झुडपे, खवल्यासारख्या केसांनी भरलेली साधी चिवट पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, २-४ भागांची (पुष्पदलांची) मंडले, पुष्पासन नळीसारखे व बहुधा किंजपुटाला वेढणारे, पाकळ्या नसतात. परिदले ४ (क्वचित २ किंवा ६) केसरदले किंजपुटात एक कप्पा व त्यात बीजक, आठळीफळात एक अपुष्क बी.

elaioplast
तैलकणु, मेदलवक, एलिओप्लास्ट तैलबिंदू बनविणारा कोशिकेतील सजीव कण plastid

elastic limit
स्वाग्रही सीमा कायम ताणले जाण्यापूर्वी वनस्पतीसूत्राने (धाग्याने) पेललेले जास्तीत जास्त वजन

elater
क्षेपक बीजुकांच्या प्रसाराला मदत करणारा जलशोषी व बहुधा सपाट तंतू, उदा. एक्किसीटम, मार्चाशिया, पेलिया, इ. शेवाळी

elaterophore
क्षेपकधर क्षेपकांना आधार देणारा स्तंभासारखा तंतुमय भाग, उदा. पेलिया (शेवाळी)

electrotactic
विद्युतचनुचलनी विजेच्या चेतनेमुळे होणाऱ्या हालचालीची प्रतिक्रिया

electrotropic
विद्युतनुवर्तनी विजेच्या चेतनेमुळे होणाऱ्या वाढीमुळे वळण्याची प्रतिक्रिया

eligulate
जिव्हिकाहीन जिभेसारखे लहान उपांग (पानाच्या बगलेत) नसलेली (वनस्पती) उदा. लायकोपोडिएलीझ.

elliptic
दीर्घवृत्ताकृति लंबगोलासारखे, उभट वर्तुळासारखे उदा. सदाफुली, बकुळी इत्यादींची पाने elliptical, ellipsoidal

elongate
लंबित, लांबलेले

elongation
लंबन, दीर्घीकरण लांबीत वाढ होण्याची प्रक्रिया

elongation phase
लंबनावस्था नवीन कोशिकांची निर्मिती झाल्यावर त्यांची लांबीत वाढ होण्याची अवस्था, त्यानंतरच आकारास कायमपणा येतो, हा प्रकार विशेषतः टोकास असलेल्या (अग्रस्थ विभज्या) कोशिकात आढळतो.

emarginate
निम्नमध्य, निम्माग्र टोकास त्रिकोनी खाच असलेले, उदा. ऊंडी, अंबुशी यांची पाने

embryo
गर्भ, भ्रूण अंदुककलशातील किंवा बीजातील वनस्पतीची अविकसित अवस्था, फलनानंतर रंदुकापासून ती वनस्पती स्वावलंबी होईपर्यंतची अवस्था. प्राण्यांच्या बाबतीत फलित अंड्यापासून (युग्मनजापासून) ते तो प्राणी जातिविशिष्ट लक्षणांनी परिपूर्ण अशा अवस्थेत येईपर्यंतची अवस्था

embryogeny
गर्भविकास रंदुकापासून गर्भाची वाढ होण्याची प्रक्रिया किंवा तत्संबंधी माहितीची शाखा embryonic development

embryology
गर्भविज्ञान गर्भासंबंदी संपूर्ण माहिती.

embryomy
गर्भत्व, भ्रूणत्व गर्भ असण्याचा प्रकार

embryonic axis
गर्भाक्ष गर्भाच्या दोन टोकास जोडणारा आस (कणा) e. rudiment गर्भांकुर गर्भाची अत्यंत प्रारंभिक अवस्था

embryophyta
गर्भपादप विभाग, एमबियोफायटा एंग्लर यांच्या पद्धतीप्रमाणे वनस्पति कोटींचे तेरा विभाग केले असून पहिल्या अकरांचा एक गट कायक वनस्पती (थॅलोफायटा) म्हणून ओळखला जातो, दुसरा गट शेवाळी व नेचाभ (बायोफायटा व टेरिडोफायटा) यांचा व तिसऱ्या गटात (स्परमटोफायटा) बीजी वनस्

emergence
त्वगुत्थित त्वचेवर वाढलेले व त्वचेखाली असलेल्या थराचाही संबंध असणारे उपांग, उदा. काही केस, काटे इ.

emission
उत्सर्जन बाहेर टाकण्याची क्रिया

emulsion
पायस एक कलिल द्रवाचे दुसऱ्या द्रवात मिसळून निलंबित (तरंगत) राहण्याची स्थिती. उदा. दुधात मेदाचे कण व प्रथिनाचे कण पाण्यात एकत्रित तरंगत असतात.

enation
अपवर्धित अपित्वचेपासून वर चढलेले उपांग.

encysted
कोष्ठित बहुधा जाड आवरणात, पिशवीत बंद केल्यासारखे राहिलेले, उदा. काही सूक्ष्मजंतू किंवा इतर सूक्ष्म वनस्पती काही काल सुप्तावस्थेत अशा प्रकारे काढतात, त्याला कोष्ठावस्था (encystment) म्हणतात,   aplanospore

endarch
अंतर्वर्धी काष्ठनिर्मितीत प्रथमतः परिघाजवळ सुरवात होऊन तेथे आद्यप्रकाष्ठ व नंतर परिघापासून केंद्राकडे (अधिमध्य) उत्तर प्रकाष्ठ बनण्याची प्रक्रिया, उदा. बहुतेक सर्व खोडे

endemic
प्रदेशनिष्ठ विशिष्ट ठिकाणीच आढळणारी (वनस्पती), आंबा (Mangifera indica L.) व लाल अशोक (Saraca indica L.) या भारतातील वनस्पींच्या शास्त्रीय नावात जातिवाचक शब्द त्या अर्थाने वापरलेला आढळतो.

endemism
प्रदेशनिष्ठा वर वर्णन केलेली प्रवृत्ति (प्रकार), उदा. कारवी, तेरडा

endergonic reaction
ऊर्जाग्राहक विक्रिया ऊर्जेचा पुरवठा करावा लागणारा रासायनिक बदल घडवून आणणारी घटना

endo-
अंतः आतील या अर्थी उपसर्ग

endocarp
अंतःकवच फळाच्या तीन आच्छादनांपैकी सर्वात आतील भाग, अष्ठीलात हा कवचासारखा परंतु मृदुफळात पातळ असतो. drupe, berry

endodermis
अंतस्त्वचा तल्पोतकाचा सर्वात आतील थर, उदा. खोड व मूळ यात केंद्रवर्ती रंभाशी हा थर बाहेरून चिकटुन (परिरंभाभोवती) असतो stele, pericycle

endogenous
अंतर्जात, अंतर्भव आतील कोशिकाथरापासून उद्भवलेले, उदा. मुळाच्या शाखा, बीजुककोशात बनलेली बीजुके exogenous

endoparasite
अंतर्जीवोपजीवी आश्रयाच्या शरीरात राहून उपजीविका करणारी (वनस्पती अथवा प्राणी), उदा. तांबेरा, काणी, कित्येक रोगकारक सूक्ष्मजंतू, जंतासारखे किंवा नारुसारखे प्राणी

endophyte
अंतर्वनस्पती एका वनस्पतींच्या शरीरात असलेली (पण जीवोपजीवी असेलच अशी नव्हे) दुसरी वनस्पती, उदा. सायकसच्या मुळातील नीलहरित शैवल (नॉस्टॉक), ँथोसिरॉस (शेवाळी) मधील नॉस्टॉक, ऍझोलातील (जलनेचा) ऍनाबीना शैवल

endoplasm
अंतःप्राकल कोशिकेतील बाह्यप्राकलाने वेढलेला आतील जीवद्रव्याचा भाग, हा अधिक कणीदार व पातळ असतो. ectoplasm

endoplasmic reticulum (ER)
अंतःप्राकल जालक जिवंत कोशिकेतील प्राकलात आढळणारे अतिसूक्ष्म धाग्यांचे जाळे, संक्षिप्त रुपात अंजा ही संज्ञा इंग्रजी ER ऐवजी वापरण्यास हरकत दिसत नाही.

endoscopic
अंतरग्र अंदुककलशाच्या तळाकडे, विकासावस्थेत स्वतःचा अग्रभाग (वरचे टोक अथवा ऊर्ध्वधुव) असलेला (गर्भ), उदा. बीजी वनस्पतीतल्याप्रमाणे,   exoscopic

endosmosis
अंतस्तर्षण बाहेरील पातळ विद्रवाचा आतील अधिक दाट विद्रवाकडे पार्य पडद्यातून (पादुद्र्यातून) होणारा प्रवेश (विसरण), उदा. जमिनीतील लवणाचा पातळ विद्रव या नियमाने मूलकोशात ओढला जाण्याचा प्रकार osmosis

endosperm
पुष्क, गर्भपोष, भ्रूणपोष बीजकातील दलिकाबाहेरील अन्नसाठा करणारे ऊतक, उदा. एरंड, मका e. nucleus पुष्कप्रकल, भ्रूणपोष केंद्रक फुलझाडांच्या बीजकांच्या गर्भकोशातील पुष्क तयार होण्याच्या आरंभी असलेले द्विगुणित (दुय्यम) प्रकल पहा double fertilisation. e.

endospermic
सपुष्क, गर्भपोषयुक्त गर्भपोषक अन्न असलेले, उदा. गहू, जायफळ, खारीक, नारळ इत्यादींची बीजे e. non-(exalbuminous) अपुष्क, गर्भपोषहीन पुष्क नसलेले, उदा. चिंच, हरभरा, वाटाणा यांची बीजे endospermous albuminous

endospore
अंतर्बीजुक बीजुककोशात बनलेले बीजुक, उदा. म्यूकर बुरशी, कित्येक शैवले, धानीकवक exospore

endosporium
बीजुकांतःपटल बीजुकाचे आतील आवरण exosporium

endothecium
अंतःकोश बीजुकाशयाच्या विकासातील प्राथमिक अवस्थेत आढळणारे ऊतक, उदा. शेवाळी amphithecium

endotrophic mycorrhiza
अंतःस्थित संकवक उच्च वनस्पतींच्या मुळात शिरकाव कपुन व तेथेच आपले तंतू वाढवून त्यांचे पोषण करणारी कवक वनस्पती, यापासून आश्रय वनस्पतीस कार्बनी द्रव्य मिळते, यामुळे सहजीवनाचा हा एक प्रकार आहे. उदा. नौओशिया आमर   conjunctie symbiosis

energesis
ऊर्जानिर्मिती, ऊर्जामुक्ति विश्लेषणात्मक किंवा विध्वंसक प्रक्रियेने पदार्थातील ऊर्जा अलग करण्याचा प्रकार. उदा. श्वसन, वितंचक, ज्वलन इ.

energy
ऊर्जा एखादी क्रिया घडवून आणण्यास आवश्यक असलेली शक्ती (उत्साह) e. chemical रासायनिक ऊर्जा रासायनिक विक्रियेतून उद्भवणारी शक्ती e. kinetic गतिज ऊर्जा गतिमान शक्ती (ऊत्साह), उपलब्ध (मुक्त) झालेली शक्ती उदा. मेणातील ऊर्जा ही मेणबत्ती जळत असता ऊष्णता व प्रकाश

ensiform
खड्गाकृति तरवारीच्या पात्यासारखे, उदा. केशर, बाळवेखंड, बेलमकँदा यांची पाने, आबईची शेंग, आबई (Canavalia ensiformis DC)

entire
अखंड न फाटलेली किंवा दाते नसलेली (किनार) उदा. पेरू, सदाफुली, कण्हेर इत्यादींची पाने

entomophilous
कीटकपरागित कीटकांद्वारे परागण (परागांचा प्रसार) घडवून आणणारे, उदा. आंबा, मेंदी, संकेश्वर, सूर्यफूल यांची फुले

entomophily
कीटकपरागण (पद्धत) वर वर्णन केल्याप्रमाणे परागण करविण्याचा प्रकार

enucleate
प्रकलहीन प्रकल नसलेली कोशिका, सूक्ष्मजंतुमध्ये प्रकलाचे कण विखुरलेले असतात. तसाच काहीसा प्रकार नील हरित शैवलात आढळतो.

environment
परिस्थिति, आसमंत, पर्यावरण वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात व प्रजोत्पादन करतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश येथे (या संज्ञेत) होतो. ecology

enzyme
वितंचक नेहमीच्या तापमानात दुसऱ्या कार्बनी द्रवपदार्थात रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारा कार्बनी प्रेरक (निदेशक) उदा. डायास्टेज, किण्वातील (यीस्ट) किंतक (झायमेज) इ. e. inhibitor वितंचक रोधक कार्यद्रव्य (मूळ पदार्थ) व त्यात रासायनिक बदल घडविण्यास साहाय्य

ephemeral
अल्पजीवी, अल्पायुषी फार थोडे दिवस जिवंत राहून सर्व जीवनावस्थांतून जाणारी (वनस्पती), काही आमरे, धुव प्रदेशातील किंवा अत्यंत उंचीवर वाढणाऱ्या काही वनस्पती, काही शेवाळी, शैवले, शैवाक इ.

epi-
बाह्य बाहेरचा किंवा वरचा (वर असलेले) या अर्थी उपसर्ग, प्रत्ययाप्रमाणेही उपयुक्त

epibasal
अपितल गर्भपूर्वावस्थेतील रंदुकाचा वरचा अर्ध, इतर काही अवयवांच्या टोकाकडील अर्धा भाग e. cell अपितल कोशिका शेवाळी व नेचाभ वनस्पती यातील रंदुकाच्या पहिल्या विभागणीनंतरची (रंदुकातील) वरची कोशिका e. octant अपितल अष्टम रंदुकाच्या विभागणीत त्याच्या आठ सारख्या

epibiotic
अपिजैव निर्वंश पादपजातीतील अवशिष्ट (शिल्लक ) जाती.

equatorial division
समविभाजन mitosis

Equisetinae
बंधकतृण वर्ग, हयवाल वर्ग, एक्किसिटीनी नेचाभ पादपापैकी (वाहिनीवंत अबीजी वनस्पतीपैकी) काही प्राचीन व काही विद्यमान वनस्पतींचा गट, यालाच आर्टिक्युलेटी असेही इंग्रजी नाव आहे. यात वनस्पतींची प्रमुख पिढी बीजुकधारी, मुळे, खोबणीदार हिरवे खोड व बहुधा फार लहान मंडल

equitant
अध्यारुढ कळीमध्ये पानांच्या मांडणीचा एक प्रकार, कळीमध्ये प्रत्येक पात्याचे दोन्ही अर्ध एकमेकाजवळ बिजागरीप्रमाणे (संमीलित) असून एकात दुसरे पान याप्रमाणे बाहेरून आत क्रम असतो. उदा. बेलमकँदा, ग्लॅडिओलस इ. e.semi- अर्ध अध्यारुढ, अर्धाध्यारुढ कळीतील पानांच्या

era
महाकल्प, ईरा भूशास्त्रीय कालाचा सर्वात मोठा भाग (कालखंड), याचे अनेक उपविभाग (कल्प) बनविलेले आहेत. period.

erect
१ ऊन्नत २ ऊर्ध्वमुख १ सरळ उभे, भरपूर काठिण्यामुळे (काष्ठामुळे) ताठ उभे राहणारे (खोड) उदा. जांभूळ, आंबा किंवा घनकोशिकांमुळे उभे राहणारे (पान), उदा. बेलमकँदा, कांदा, पांढरा माका (Eclipta erecta L.), झेंडू (Tagetes erecta L.) इ. २ बीजकरंध वर असलेले सरळ (बीजक) उदा. पॉलिगोनम

ergastic substances
अजैव पदार्थ कोशिकेतील जीवद्रव्यापासून निघालेले अक्रिय (मेदबिंदू, पिष्ठकण, बहिःस्त्राव इ. सारखे पदार्थ)

ergot
अर्गट कवक रोगामुळे गवताच्या (उदा. बाजरी) किंजपुटाचे ऐवजी तेथे वाढलेला (कवकतंतूंचा बनलेला) काळा शिंगासारखा अवयव (जालाश्म) selerotium

ergotine
अर्गटिन अर्गटातील विषारी व औषधी द्रव्य

Ericaceae
संतानक कुल, एरिकेसी संतानक, गंधपुरा, ँड्रोमेडा, एरिका, कॅलूना, काऊबेरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव संतानक गणात (एरिकेलीझ) करतात. प्रमुख लक्षणे- मरुवासी लक्षणे असलेली झुडपे, बहुधा अवकिंज व जुळलेल्या पाकळ्यांची द्विलिंगी ४-५ भागी फुले, केसरदले ८-१०, बाहेरचे मंडल पाकळ्यासमोर, २-१२ किंजदलांचा अनेक कप्यांचा बहुधा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ विविध, परागकोशातील परागांच्या चौकड्या छिद्रावाटे बाहेर पडतात, बिया अनेक

Eriocaulaceae
एरिओकॉलेसी एरिओकॉलॉन, पीपॅलँथस इत्यादी लॅटिन नावाच्या वंशांतील एकदलिकित वनस्पतींचे कुल. एंग्लर व प्रँटल यांनी फॅरिनोजी गणात व हचिन्सननी एरिओकॉलेलीझ या गणात अंतर्भूत केले आहे. बेंथम व हूकर यांनी ग्लुमेसी श्रेणीतील एरिओकॉली या नावाने हे कुल वर्णिले आहे. प्र

esculent
खाद्य खाण्यास उपयुक्त (योग्य) उदा. Hibiscus esculentus L. भेंडी

essential
आवश्यक अत्यंत जरुरीचे उदा. फुलांमध्ये केसरदले व किंजदले प्रजोत्पादनार्थ आवश्यक असून त्यांचेशिवाय फुलाचे कार्य होत नाही. सापेक्षतः संवर्त व पुष्पमुकुट ही पुष्पदलांची मंडले साहाय्यक होत. e.oil (ethereal oil) बाष्पनशील तेल हवेत उडून जाणारे तेल उदा. लिंबाच्या

estiole
सूक्ष्मरंध काही कवकंआच्या गर्तिकांचे, धानीफलांचे आणि काही पिंगल शैवलातील कुहराचे द्वार, उदा. फ्यूकस, पेल्व्हेशिया conceptacle, perithecium, pycnidium  ostium

estipulate
अनुपपर्ण exstipulate

etaerio
संघफल, घोसफळ एकाच फुलातील सुट्या किंजदलापासून प्रत्येकी एक या प्रमाणे बनलेल्या साध्या फळांचा झुबका, उदा. मोरवेल, सोनचाफा, हिरवा चाफा, रुई, कुडा, अनंतमूळ, सदाफुली इत्यादींत फक्त दोन फळांच्या जोड्या असतात. aggregate fruit

etiolated
तमोविकृत प्रकाशाभावी पिवळटपणा व इतर दोष (लांब काडी, खवल्यासारखी पाने, नाजुकपणा इ.) आलेली (वनस्पती)

etiolation
तमोविकृति वर उल्लेखिलेला रोग (असण्याचा प्रकार)

Eubasidii
सत्यगदाकवक उदवर्ग, युबेसिडी गदाकवकातील एक गट, अर्धगदाकवक हा दुसरा. Hemibasidii, Basidiomycetes

Eugenics
सुप्रजाननशास्त्र, सुजननविज्ञान नवीन संतती (भावी पिढी) आनुवंशिक दृष्ट्या चांगली निपजण्यासंबंधीची ज्ञानशाखा

Eumycetae
सत्यकवक विभाग, युमायसेटी कवक (अळंबे) वनस्पतींतील या गटात चार वर्गांचा (शैवलकवक, धानीकवक, गदाकवक आणि अपूर्ण कवक) समावेश करतात. काही शास्त्रज्ञ श्लेष्मकवक (मिक्सोमायसेटी) कवकांतच अंतर्भूत करतात, तथापि त्यांना अलग करून हल्ली सत्यकवकांचा दर्जा (मिक्सेआथॅलोफाय

Euphorbiaceae
एरंड कुल, यूफोर्बिएसी पॅरा व सीरा रबर, एरंड, शेर, टॅपिओका, आवळा, पानचेटी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लर व प्रँटल यांच्या आणि बेसींच्या पद्धतींत याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझ), परंतु हचिन्सन यांनी एरंड गणात (यूफोर्बिएलीझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व क्वचित वृक्ष, दुधी चीक बहुधा आढळतो. बहुधा साधई एकाआड एक पाने, कधी चषकरुप फुलोरा, सच्छद, लहान, एकलिंगी फुले, कधी पाकळ्या नसतात, केसरदले अनियमित (संख्या), किंजदले तीन,किंजपुट एक व ऊर्ध्वस्थ, तीन एकबीजी कप्पे, बोंड फळात पुष्कयुक्त बीजे, क्रोटन, ऍकॅलिफा, पानचेटी बागेत लावतात

Eusporangiatae
स्थूलबीजुककोशी उपवर्ग, युस्पोरँजिएटी जाड आवरणाचे व प्रत्येकी अनेक कोशिकापासून बनलेले बीजुककोश असलेला नेचे गट Filicinae

eusporangiate
स्थूलबीजुककोशिक, युस्पोरॅजिएट वर वर्णन केलेल्या प्रकारचा (नेचा) ophioglossales, Marattiales

eustele
वृन्दरंभ अनेक स्वतंत्र वाहक वृन्दाभोवती एक अंतस्त्वचेचा थर असून मध्ये भेंड असलेला रंभ उदा. सूर्यफूल, अनेक द्विदलिकित खोडे व मुळे यात सामान्यपणे आढळणारा रंभ stele

euxerophyte
सत्यमरुपादप पूर्ण विकसित मूलतंत्र असलेली, पाणी शोषून घेण्यात अडथळा आल्यास त्वरित कोमेजणारी व रुक्ष ठिकाणी वाढणारी वनस्पती.

evaporation
बाष्पीभवन, बाष्पीकरण पाण्याची वाफ बनून वातावरणात मिसळून जाणे, तसाच दुसरा एखादा द्रव पदार्थ (उदा. अल्कोहॉल) सामान्य तापमानात उडून जाणे

evaporimeter
बाष्पीभवनमापक वनस्पतींतून सोडल्या जाणाऱ्या बाष्परुप पाण्याचे तौलनिक मोजमाप करण्याचे उपकरण atmometer

evergreen
१ सदापर्णी २सदाहरित ३ चिरहरित १,२ - झाडावरील सर्वच पाने एकावेळी गळून न पडल्याने सदैव हिरवे दिसणारे (झाड किंवा वन) २,३ - दीर्घकाळ हिरवी राहणारी (पाने).

evolution
उत्क्रंआति, क्रमविकास सामान्यतः क्रमाने हळूहळू बदल किंवा विकास होण्याची प्रक्रिया. प्राणी व वनस्पती यांच्या अनेक पिढ्यांत ही चालू असणे शक्य असून त्यामध्ये बदल, प्रगति व वाढ अभिप्रेत आहे. या प्रक्रियेत सर्वांगीण बदल व प्रगती असतेच असे नाही, अंशतः किंवा पूर

ex
बाह्य, अ-, -हीन, बहि अभावदर्शक अथवा बाहेरील या अर्थी उपसर्ग, संज्ञांमध्ये उपसर्ग किंवा प्रत्यय असा उपयोग केला आहे.

exalbuminous
अपुष्क, पुष्कहीन बीजातील गर्भाभोवतीचा विशेष अन्नसाठा नसण्याची स्थिती उदा. वाटाणा, हरभरा, चिंच इत्यादींची बीजे. non endospermic

exaltatus (raised high)
उच्च उंच, भव्य उदा. इतर नेचांच्या मानाने भव्य असा हंसराज नेचा (Nephrolepis exaltata Schott) याला मराठीत आपर्णांग नेचा असेही नाव आढळते.

exarch
बहिर्वर्धी बहुतेक सर्व मुळांमध्ये आढळणारी अपमध्य प्रकाष्ठनिर्मिती, येथे आद्यप्रकाष्ठ बाहेर व उत्तरप्रकाष्ठ आत असण्याचे कारण केंद्राकडून परिघाकडे वाढ होत असते. endarch

excentric
१ उत्केंद्र २ विमध्य १ केंद्रापासून दूर. केंद्राभोवती नियमितपणे न बनलेले उदा. बटाटा, कर्दळ, आरारुट यातील तौकीर कणात कणबिंदू कणाच्या केंद्रापासून दूर असून त्याभोवतीचे थर सारख्या रुंदीचे (प्रमाणात) नसतात, या उलट काही तौकीरकणात कणबिंदू व केंद्र अलग नसतात व थरांची जाडी प्रमाणबद्ध असते. २ खऱ्या केंद्राभोवती वलयांमध्ये प्रमाणबद्धतेचा अभाव उदा. झाडाला सतत एकाच दिशेकडून जोराने वारा लागत असल्याने खोडाच्या संरचनेत काष्ठवलयांची जाडी वाऱ्याच्या दिशेप्रमाणे केंद्राभोवती सारखी नसते. संरक्षित बाजूस ती अधिक असते कारण तिकडे वाढ चांगली होते. केंद्रातून काढलेल्या त्रिज्यांची लांबी सारखी नसते.

excitability
उद्दीपनक्षमता, उत्तेजनक्षमता उत्तेजकाला (चेतकाला) प्रतिसाद देण्याचे सामर्थ्य (क्षमता).

excretion
उत्सर्ग, उत्सर्जन टाकाऊ (निरुपयोगी) पदार्थ बाहेर (कोशिकेबाहेर) टाकण्याची प्रक्रिया, कधी कधी असे पदार्थ कोशिकेत साठूनही राहतात (उदा. उडणारी तेले, काही स्फटिक) किंवा शरीरातील लहान मोठ्या पोकळ्यात साचतात उदा. राळ, टॅनीन, चीक इ.   secretion

excretory product
उत्सर्जित पदार्थ चयापचयाच्या क्षेत्राबाहेर टाकलेला पदार्थ

excretory system
उत्सर्जन तंत्र उत्सर्जनात उपयुक्त अशी संरचना व कार्यक्षम अवयव, उपांगे इ. उदा. सोलून जाणारी साल, तिचे ढलपे, आपोआप गळून पडणारी पाने, जुने मध्यकाष्ठ यांमध्ये असे पदार्थ आढळतात.

excurrent
१ पत्रातीत २ असीमिताक्ष १ पानाच्या पात्याच्या बाहेर गेलेली (उदा. शीर) २ फांद्या नसून सतत वाढत सरळ गेलेले खोड असलेली (वनस्पती), उदा. पिसिया, ऍबीस इ.)

exendospermous
अपुष्क exalbuminous

exergonic process
ऊर्जादायी प्रक्रिया ऊर्जेचे उत्पादन घडून येते असा रासायनिक बदल करविणारी घटना उदा. श्वसन

exerted (protruding)
बहिरागत पुष्पमुकुटाच्या बाहेर स्पष्टपणे दिसत असलेले (डोकावणारे) उदा. वनजाई, संकेश्वर, पेरु व जांभुळ यांची केसरदले

exfoliation
अपपर्णन सपाट तुकडे किंवा खवले या स्वरुपात सोलून जाण्याचा प्रकार उदा. पेरु, अर्जुन इ. वनस्पतींची साल

exine
अधिलेप बाह्यावरण (परागकणांचे), यातील विविधता (काटे, रंधे, रेषा, आकार) लक्षात घेऊन त्यांचे प्रकार अथवा जनक वनस्पती ओळखणे शक्य असते. extine

exocarp
बाह्यकवच फलावरणातील सर्वात बाहेरचा पदर epicarp

exodermis
बहिस्त्वचा मुळाच्या अपित्वचे खालचा एककोशिक जाडीचा थर. मूलत्वचेच्या जून भागाखालील ह्या थरातील कोशिकावरण उपत्वचायुक्त (क्यूटिकल) अथवा स्यूबरिनयुक्त असते. उदा. मका epiblema

exogenous
बहिर्भव, बहिर्जात बाहेरील कोशिकांच्या थरातून उगम पावणारे, पाने, उपांगे, शाखा इ.

exoscopic
बाह्याग्र, बहिरग्र अंदुककलशाच्या मानेकडे (ग्रीवेकडे) स्वतःचा वरचा भाग (अग्रधुव) असलेला (गर्भ), उदा. शेवाळी

exosmosis
बहिस्तर्षण आतील पातळ विद्रवाचा बाहेरील अधिक दाट विद्रवाकडे पार्य पडद्यातून प्रवेश (विसरण), diffusion

exospore
बहिर्बीजुक बीजुककोसाबाहेर (विबीजुकाप्रमाणे) बनलेले बीजुक, उदा. धानीबीजुक conidium

exosporium
बीजुकबाह्य पटल बीजुकाचे बाह्याच्छादन, विबीजुकाचे बाहेरचे आवरण, उदा. हिरवी बुरशी

exotic
विदेशी, आयात बाहेरील देशातून आलेली (वनस्पती), उदा. कुंती, कामिनी (Murraya exotica L.) alien

exploration
समन्वेषण लहान व मोठ्या प्रदेशातील वनस्पतींचा परिस्थिति विज्ञानाच्या दृष्टीने केलेला पूर्ण अभ्यास

explosive mechanism
स्फोटक योजना फळ तडकून बी बाहेर फेकले जाण्याची यंत्रणा, उदा. तेरडा, आबई, अंबुशी

exposed
उभ्दासित वारा, पर्जन्य व सूर्यप्रकाश इत्यादींचा परिणाम होण्यास उघडा पडलेला (संरक्षित नसलेला, एखादा प्रदेश किंवा व्यक्ती)

exposure
उभ्दासन वर वर्णिल्याप्रमाणे उघडे पडलेले असणे

expulsive fruit
निष्कासयी फल आतील बीज जोराने बाहेर ढकलणारे फळ, उदा. काटेरी इंद्रायणीचे फळ टोकास फुटून आतील मगज अनेक बीजांसह एकदम बाहेर फेकला जातो.

exserted
बहिरागत exerted.

exsiccate
शुष्क करणे वनस्पतींचे नमुने अवयवांसह कायम टिकून राहावे म्हणून सुकविण्याची प्रक्रिया (exsiccation) करणे

exstipulate
अनुपपर्ण, उपपर्णहीन पानाच्या तळाशी लहान उपांग नसलेली (पाने) stipule, stipulate  estipulate

extensibility
तन्यता, विस्तरणीयता, वर्धनक्षमता ताणले जाण्याचे सामर्थ्य, वाढण्याची क्षमता. उदा. प्रतान (ताणा), देठ इ.

exterior
बाह्य फुलाच्या बाबतीत पुरस्थ, बाहेरचे anterior  external

extinct
लुप्त, विलुप्त, निर्वेश पूर्वी असलेली परंतु हल्ली नाहीशी झालेली (वनस्पती अथवा प्राणी), उदा. बीजी नेचे

extra-
बाह्य- बाहेरचा या अर्थी उपसर्ग, मराठीत उपसर्ग किंवा प्रत्यय  e. axillary कक्षाबाह्य पानाच्या बगलेबाहेर असलेले, उदा. कळ्या, ताणे इ. e. cellular कोशिकाबाह्य कोशिकाबाहेरचे उदा. कोशिकेबाहेर आलेल्या पाचक द्रव्याने कीटकाचे केलेले रुपांतर e. fascicular वाहक

extrorse
बहिर्मुख बाहेरच्या बाजूस तोंड असणारे उदा. कळलावी वनस्पतीच्या फुलातील परागकोश बाहेरच्या बाजूस तडकतात introrse

exudation
निर्यास शरीरातून काही द्रवपदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया, उदा. जखम झाल्यावर बाहेर चीक गळणे, विशिष्ट हवामानात निसर्गतः पानांतून पाण्याचे थेंब गळणे, उदा. कॅलॅडियम, अंजनवेल इ.

eye
१ नेत्र २ कलिका ३ बिंदू १ डोळा २ कलमावरील डोळा (कळी) किंवा भूमिगत खोडावरची कळी ३ फुलातील ठळकपणे दिसणारा ठिपका उदा. गुलखेरा, भेंडी इ. e. piete नेत्रभिंग सूक्ष्मदर्शक यंत्रातून वस्तू पहाण्याकरिता वापरलेले डोळ्याजवळचे दर्शकाचे भिंग, याशिवाय वस्तूजवळचे भिंग

face
१ पृष्ठ २ मुख १ पानाची खोडाकडील किंवा प्रकाशाकडील बाजू २ परागकोशाची तडकणारी बाजु

facies (societies)
१ संहति, समाज २ स्वरुप १ पादपसंगतीतील जातींच्या संख्येत विलक्षण फरक दर्शविणारे लहानमोठे समुदाय २ वनस्पतीएचे सामान्य रुप (आकार) association, society

factor
कारक, घटक आनुवंशिक गुण किंवा लक्षणे यांना कारणीभूत मानलेले रंगसूत्रातील सूक्ष्म कण, वनस्पतींच्या परिस्थितीविषयक चर्चेत समाविष्ट असलेली प्रत्येक बाब, उदा. जैव घटक, हवामानासंबंधी घटक इ.

facultative
प्रासंगिक, प्रसंगोपात्त परिस्थिति (प्रसंगा)नुरुप वर्तन करणारे, उदा. काही जंतू, कवक इत्यादी गरजेनुसार जीवोपजीवी किंवा शवोपजीवी f. anaerobe प्रासंगिक अननिल हवेशिवाय जगणे आवश्यक असल्यास तसे करणारा (सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव इ.) f. parasite प्रासंगिक जीवोपजीवी

Fagaceae
बंज (बान) कुल, ओक कुल, फॅगेसी ओक (बान), बीच, चेस्टनट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल, क्युफ्युलिफेरी असेही याला म्हणतात. प्रमुख लक्षणे - वृक्ष, साधी सोपपर्ण पाने, नतकणिश फुलोरा, वायुपरागित एकलिंगी फुले, ४-७ खवल्यासारखी परिदले, केसरदले संख्येने अनियमित, तीन, अधःस्थ व जुळलेली किंजदले, किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, छदांच्या पेल्याने वेढलेली कवची फळ (कपाली), पुष्कहीन बिया, भूर्ज कुलाशी (बेट्युलेसी) साम्य

fairy ring
भूछत्र वर्तुळ जमिनीवर वर्तुळाकार उगवलेली भूछत्रे, त्यांचा उगम जमिनीतील कुजकट पदार्थावर वर्तुळाकार बहुवर्षायू तंतंउपासून होतो, रात्री जणू स्वर्गीय पऱ्या तेथे फेर धरून नाचल्या असाव्या अशा जुन्या गैरसमजुतीमुळे त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले असावे mushroom

falcate
दात्राकृति कोयत्यासारखे, उदा. काही कवकातील (काणी) विबीजुके, फळे उदा. मेढशिंगी (Dolicandrone falcuta Seem).

fall of leaves
पानगळ वर्षातून एकदा होणारी पानांची गळून पडण्याची प्रक्रिया, निष्पर्ण होणे

false (pseudo)
छदमी, आभासी, खोटे खऱ्याचा फक्त भास उत्पन्न करणारा अवयव f.axis छदमी अक्ष अनेक उपाक्षांचा बनलेला, पण एक दिसणारा अक्ष f.fruit छद्मफल, आभासी फल भोंदू फळ, किंजपुटापासून न बनता इतर भागांपासून (देठ, पुष्पस्थली, पुष्पदले इ.) बनलेले व सामान्यपणे फळ मानले गेलेले

family
कुल अनेक संबंधित वंशांचा गट genus, order

fan shaped
व्यंजनाकृति पंख्यासारख्या पसरट आकाराचे, उदा. ताडाचे (borassus flabelifer L.) पान flabelliform

farinaceous
१ भुरकट २ पिष्टमय १ पिठुळ आवरण असलेले २ स्टार्च किंवा तत्सम पदार्थ असलेले. farinose

fasciated
सपाट अनित्यपणे सपाट झालेले (खोड), एक विकृति, उदा. शतावरीची एक जाती.

fascicle
वृन्द गट, संच, झुबका, उदा. अनेक फुलांचा किंवा वाहिन्यांचा गट

fascicular
वृन्दस्थ गटामध्ये असलेला f. cambium वृन्दस्थ ऊतककर वाहिन्यांच्या गटातील नवीन घटक बनविणारे ऊतक tissue

fasciculate leaves
वृन्दपर्णे एकत्र झुबक्यात असलेली अनेक पाने, उदा. पाइन, भुईचाफा, निशिगंध, कुमूर, नागदवणा इ.

fastigate
समृजु परस्परांच्या फार जवळ वाढणाऱ्या उभ्या शाखा असलेला (वृक्ष)

fat
मेद, वसा स्निग्ध (तुपकट) किंवा चरबीयुक्त पदार्थ, चरबी

father plant
पितृ वनस्पति संकर प्रक्रियेत पराग (नर गंतुके) देणारी वनस्पती

fatty acid
मेदी आम्ल, मेदाम्ल स्निग्ध पदार्थाचा एक घटक, दुसरा घटक म्हणजे ग्लिसरिन f.body मेदकण, मेदीकाय चरबी इ. स्निग्ध पदार्थांचे कण

fauna
प्राणिजात विशिष्ट प्रदेशातील सर्व प्राणी अथवा त्यांची संकलित नावांची यादी, पूर्ण माहितीचा ग्रंथ flora

feather-veined
पिच्छसिराल पिसासारखी शिरांची मांडणी असलेले (पान), आंबा, रामफळ इ. penninerved

fecundation
फलन अंदुक व रेतुक यांचा संयोग, स्त्री- व पुं- गंतुकांचे मीलन (एकरुप होणे). fertilisation

feeder
१ पोषक २ पोषकावयव १ आश्रय वनस्पती २ अन्नपाण्याचा पुरवठा करणारा अवयव (साधन), उदा. सिलाजिनेलाच्या गर्भांकुराचा तळभाग (पद), नीटेसी

feeding process
अशनक्रिया अन्नपाणी घेऊन ते आत्मसात करणे

felted
ऊर्णजालकित बुरणुसासारखे केसाच्या गुंतवळ्याचे (नमनाचे) आवरण असलेले f. tissue ऊर्णाएतक वर वर्णिल्याप्रमाणे ऊतक (कोशिकांचा समूह)

female
मादी, स्त्री स्त्रीत्व दर्शविणारे विशेषण, आंतरराष्ट्रीय चिन्ह o + f.cone स्त्री शंकु प्रकटबीज वनस्पतींत आढळणाऱ्या दोन प्रकारच्या शंकूपैकी बीज निर्मिणाऱ्या अवयवांचा (शंकूसारखा) समूह (फुलोरा) पहा cone उदा. चिल, देवदार इ. f. flower स्त्री पुष्प फक्त किंजदले

female cell
स्त्री पेशी, स्त्री कोशिका अंडे, अंदुक female gamete.

feminine
किंजी, किंजदलयुक्त, स्त्रीलिंगी उच्च दर्जाच्या वनस्पतींत किंजदलांचे मंडल असलेले (फूल, वनस्पती), उदा. पपई.

fenestrate
सच्छिद्र अनेक बारीक भोके असलेले.

feral
वन्य जंगली, रानटी, वनात आढळणारी किंवा लागवडीत नसलेली (वनस्पती)

ferment
वितंचक, विरजण enzyme

fermentation
वितंचन कार्बनी पदार्थांचे वितंचकाने (कार्बनी निदेशकाने) घडवून आणलेले रासायनिक रुपांतर (विघटन) उदा. दूधाचे दह्यात रुपांतर, लोणी खंवट होणे, साखरेचे रुपांतर मद्यार्कात होणे, मद्यार्कापासून ऍसेटिक आम्ल बनणे, सामान्य भाषेत आंबणे, अशा प्रक्रिया प्राणवायूचा उपयो

fern
नेचा (वनस्पती) Filicinae, Filicales

ferrobacteria
लोहजंतु लोखंडाच्या लवणात बदल घडवून आणणारे सूक्ष्मजंतू

ferruginous
१ ताम्रवर्णी, गंजवर्णी २ लोही, लोहयुक्त, लोहमय १ गंजलेल्या लोखंडाच्या रंगाचे २ लोखंड असलेले

ferrugo
तांबेरा कवक वनस्पतींपैकी (गदाकवक) एका प्रकाराने आश्रय वनस्पतीवर आलेला तांबूस ठिपके पाडणारा जीवोपजीवी रोग (rust) उदा. गहू, जोंधळा, चमेली, कुसर इ.

fertile
१ सुपीक २ फलनक्षम, अवंध्य १ चांगले पीक येईल अशी (जमीन), पिकाऊ २ फळ (अपत्य, गर्भ) उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असलेले, उदा. फूल, पराग, बीजक

fertilisation
फलन नर व स्त्री प्रजोत्पादक कोशिकांची (घटकांची) एकरुप होण्याची प्रक्रिया, लैंगिक प्रजोत्पादनातील मौलिक प्रारंभीची प्रक्रिया f.cross परफलन दोन भिन्न व्यक्तींच्या (एकाच जातींच्या) प्रजोत्पादक कोशिकांचा संयोग व रंदुकाची निर्मिती. f. self आत्मफलन एकाच

fertilise
१ फलित करणे (होणे) २ फलनक्षम करणे १ अंदुक व रेतुक यांचे मीलन होणे २ जमिनीची सुपीकता वाढविणे, त्याकरिता खते घालणे fertilize

fertility
१ जननक्षमता २ सुपिकता १ फलित होण्याची पात्रता २ जमिनीचा पिकाऊपणा

fertilizer
खत जमिनीची सुपिकता वाढविणारे पदार्थ

fetidus
दुर्गंधित, दुर्गंधी वाईट वास येत असलेले, उदा. कृष्णकमळाची एक जाती (Passiflora foetida L.) foetid

fibre
सूत्र, धागा वनस्पतींच्या अवयवांत बळकटी आणणारी जाड कोशिकावरणाची लांबट कोशिका f. crop धागा पीक उपयुक्त धाग्यांच्या उत्पादनाकरिता केलेली लागवड उदा. अंबाडी, घायपात, ताग इ. prosenchyma, sclerenchyma

fibril
सूत्रक अतिसूक्ष्म धागा, कोशिकावरणात व प्राकलात हे धागे आढळतात.

fibrillose
सूत्रकी अनेक सूत्रकांनी बनलेले

fibro vascular bundle
सूत्रल वाहक वृंद अनेक कठीण लांबट कोशिका असलेला वाहक ऊतकांचा जुडगा vascular bundle

fibrous
सूत्रमय, सूत्रल धागेदार, अनेक धाग्यांचे बनलेले, उदा. वाहकवृंदात धागे आढळतात. f. covering सूत्राच्छादन, सूत्रावरण सूत्रांचे आवरण, उदा. नारळ व सुपारी यासारख्या कित्येक फळात जाड धाग्यांचे मध्यकवक असते. या धाग्यांस काथ्या म्हणतात पहा mesocarp. f. drupe सूत्रल

Ficoideae
वालुक कुल, फायकॉइडी (फायकॉइडेसी, ऐझोएसी) वळू (वालुक), झरस, धाप, वसू, दसरा साग इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अंतर्भाव करणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी फायकॉइडेसी नावाने पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझमध्ये) केल

fid
खंडित, भिन्न अंशतः विभागलेले या अर्थाचा पत्यय cleft

fidelity
निष्ठा विशिष्ट प्रकारच्या पादप समुदायातच आढळण्याचे एखाद्या वनस्पतीच्या जातीएचे प्रमाण, अनेक भिन्न समुदायांत आढळणाऱ्या जातीची निष्ठा (प्रमाण) कमी दर्जाची असून फार कमी समुदायातील आढळणाऱ्या उच्च दर्जाची निष्ठा (प्रमाण) दर्शविते. f.exclusive अनन्य निष्ठा

fig-insect
उदुंबर कीटक उंबर, अंजीर, पिंपळ, वड इ. यांच्या फळात आढळणारे व फुलोऱ्यात परागण घडवून आणणारे वराटक प्रकारचे कीटक (केंबरे).

filament
तंतु बारीक दोऱ्यासारखा अवयव, अनेक कोशिकांची माळ, उदा. युलोथिक्स, स्पायरोगायरा इ. शैवले किंवा अनेक कवक f. of stamen केसरतंतु केसरदलाचा परागकोशधारी देठासारखा अवयव hypha

filamentous
तंतुमय, तंतुयुक्त तंतूंचे बनलेले, शेवाळीतील गंतुकधारीची आरंभीची अवस्था, शैवलांचे किंवा कवकांचे शरीर

filar
सूत्राभ लांबट व पातळ (केस, उपांग इ.)

filial
पैतृक, संतानक संततिविषयक f.generation संतानीय पिढी संकरापासून प्रसवलेली पिढी, संकरज पिढी f. regression संतानीय परागति एखाद्या लोकसमुदायामध्ये, सरासरीने पाहता, एखाद्या आनुवंशिक लक्षणांबाबत, मुले सामान्य पातळीहून आईबापापेक्षा कमी ढळतात, म्हणजेच मुले शक्य तो

Filicales
नेचे गण, फिलिकेलीझ नेचे वर्गातील एकमेव गण. काही नेचाभ पादपातील एक वर्ग मानतात. एंग्लर यांना याचे दोन गट (स्थल नेचे व जल नेचे) केले होते. लक्षणे- पहा Filicinae

Filicinae
नेचे वर्ग, फिलिसीनी नेचाभ पादप (टेरिडोफायटा, वाहिनीवंत अबीजी वनस्पती) या विभागातील एक वर्ग, काही शास्त्रज्ञांनी यात दोन उपवर्ग (स्थूलबीजुककोशी व तनुबीजुककोशी) केले असून त्यापैकी एकात समबीजुक सत्यनेचे (फिलिसीज) व असमबीजुक जल नेचे असे दोन गण अंतर्भूत केलेले

filiform
तंतुसम सुतासारखे बारीक, तंतूप्रमाणे बारीक व लांबट, उदा. अमरवेलीचे खोड (Cassytha filimformis L.)

fimbriate
कंकतिकाकृति फणीसारखे दातेरी, झालरीसारखे, उदा. पिंक (डायांथस) च्या पाकळ्या, माकडशिंगाच्या (Caralluma fimbriata Wall). फुलाच्या पाकळ्या fringed

fimicolous
शमलवर्धी खताच्या ढिगावर वाढणारी (वनस्पती)

fissile
विखंडी, विखंडनशील चिरलेले, चिंबलेला किंवा ती क्षमता असलेला (अवयव)

fissiparous
द्विभंजन, भंजन सहज दोन अथवा अधिक संपूर्ण भाग होणे (भंगणे) उदा. सूक्ष्मजंतूच्या कोशिका, नील हरित शैवले, यामध्ये प्रकलाची तपशीलवार विभागणी नसते.

fissured
स्फाटित, भेगाळ बाहेरुन भेगा (चिरा) पडलेली (मोठ्या झाडाची साल), उदा. चिंच, बाभूळ, शिरीष इ. उन्हाळ्यात सुकल्यामुळे तडकून भेगा पडलेली जमीन

fistular
नलिकासम नळीसारखे लांब व पोकळ, उदा. कांद्याचे पान व फुलोऱ्याचा दांडा, बाहव्याची (Cassia fistula L.) शेंग प्रथम पोकळ परंतु नंतर त्यात अनेक आडवे पडदे बनतात.

fixation
१ अवबंधन, रोपण २ स्थिरीकरण १ कुंडीत अथवा जमिनीत वनस्पती बसविणे २ सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्याकरिता वनस्पती अथवा त्यांचे पातळ काप, प्राणी किंवा त्यांचे सूक्ष्म भाग रासायनिक प्रक्रियेने कायम करणे f.of carbon dioxide कार्बन सात्मीकरण, कार्बन स्थिरीकरण

fixative
स्थिरकारी स्थिर करणारा पदार्थ

fixity
अपरिवर्त्यता पिढ्यानुपिढ्या सजीवांत काहीही बदल न होता ते आरंभापासून होते तसेच राहिले आहेत अशी जुनी समजूत, क्रमविकासाची उपपत्ती याउलट आहे. organic evolution  immutability

flabellate
व्यजनाकृति पंख्यासारखे fan shaped  flabelliform

flaccid
शिथिल, सैल कोशिकेतील पाणी कमी झाल्यावर तिला येणारी अवस्था (limp, floppy)

flaccidity
शैथिल्य शिथिलता, म्लानता उदा. कोमेजलेल्या (पाणी कमी झालेल्या) पानांची स्थिती

Flacourtiaceae
अत्रुण कुल, फ्लॅकोर्टिएसी तांबट, अत्रुण, अट्टाक व काकर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम व हूकर यांनी याला सॅमिडेसी असे संबोधले असून एंग्लर व प्रँटल यांनी फ्लॅकोर्टिएसी नावानेच त्याचा उल्लेख व अंतर्भाव पराएटेलीझ गणात केला आहे. हचिन्सन यांनी बिक्सेलीझ (केसरी गण) मध्ये समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, पाने चिवट, साधी एकाआड एक, सोपपर्ण, नियमित चार किंवा अधिक भाग प्रत्येक पुष्पमंडलात असतात. पुष्पदले कधी सर्पिल, कधी पाकळ्यांचा अभाव, असल्यास सुट्या व अनेक, संदले २-१५ सुटी किंवा जुळलेली, केसरदले अनेक व कधी त्यांचे अनेक संघ, बहुधा ऊर्ध्वस्थ, २-१० किंजदलांच्या किंजपुटात तटलग्न बीजकाधानीवर अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात एक किंवा अनेक सपुष्क बिया व त्यावर कधी बीजोपांग

flaescence
पीतता पिवळेपणा

flagellate
प्रकेसलयुक्त (प्रकेसलवान), कशाभिकायुक्त प्रकेसल असलेले

flagelliform
कशाभिकारुप, प्रकेसलाभ, प्रकेसलासारखे

flagellum
प्रकेसल, कशाभिका कोशिकेच्या बाहेर आलेला, प्राकलाचा लांबट, केसलापेक्षा मोठा व जटिल संरचनेचा धागा, यांची संख्या बहुधा एक किंवा दोन, क्वचित अधिक असून कोशिकेला ते गति प्राप्त करून देतात. सुक्ष्मजंतूंची केसले लहान व साधी असतात. चर बीजुके, चर गंतुके (नेचे) इत्य

flask shaped
सुरईप्रमाणे, कलशाकृति गोलसर बसका तळभाग व लांब मान असलेले प्रायोगिक काचपात्र, उदा. शेवाळी व नेचांतील अंदुककलश.

flavescent
पीत पिवळट, वनस्पतींच्या अवयवांना येणारा नैसर्गिक फिकट पिवळा रंग

flavous
पिवळेजर्द

fleixble
नम्य, लवचिक दाबामुळे वाकून (न मोडता) पुनः पूर्ववत होणारे. उदा. लव्हाळ्याचा दांडा, कित्येक पानांचे देठ, अनेक खोडे, ताणे इ.

fleshy
मांसल, रसाळ, मगजयुक्त गर (मगज) असलेले, रसयुक्त (केस अथवा कोशिकांनी भरलेले) काही वनस्पतींच्या शरीराचा एखादाच भाग मांसल किंवा रसाळ असतो, उदा. निवडुंगाचे खोड, पानफुटीची पाने, तुतीच्या फळातील किंवा फणसातील परिदले, काजूचा देठ, सफरचंदाची पुष्पस्थली, नारळातील पुष्क (खोबरे), अननसाच्या फुलोऱ्यातील दांडा व फुलाचे भाग, संत्री व मुसुंबातील पातळ अंतःकवचातील केस, विलायती चिंचेतील बीजोपांग

flexibility
नम्यता वर वर्णन केलेला गुण

flexuous
वाकडातिकडा, नागमोडी flexuose

float
तरंड तरंगणारा किंवा तरंगण्यास मदत करणारा अवयव, उदा. फ्यूकस शैवलाची एक जाती, सरगॅसम शैवल, पाण्यातील हायसिंथ अथवा शिंगाडा यांचे देठ, फळातील काथ्यामुळे नारळ (शहाळा) तरंगतो.

floating
प्लवमान, प्लव, प्लवन तरंगणारे

floating mechanism
तरंडयोजना, प्लवनयोजना वर वर्णिल्यासारखी व इतर काही तशी तरंगण्याची साधने, बहुधा अशा साधनांत हवायुक्त पोकळी असते, उदा. कमळाच्या बिया, ऊंडीची फळे, नारळातील काथ्याचे आवरण

floccose
ऊर्णी, तूलीय, तूलाच्छादित लोकरीसारख्या दिसणाऱ्या नरम केसांनी आच्छादलेला (अवयव)

flocculent
ऊर्णाभ लोकरीसारखे दिसणारे व सहज निघून जाणारे (केस)

flora
पादपजात १ देशातील किंवा प्रदेशातील सर्व वनस्पती २ विशिष्ट स्थानातील वनस्पतींच्या वर्णनाचा ग्रंथ यामध्ये वनस्पती ओळखून काढण्याकरिता विशिष्ट योजनाही असते. उदा. Flora of India म्हणजे भारतातील पादपजात.

floral
पुष्पीय, पुष्प- फुलांचा, फुलासंबंधी, फुलांतील f.axis पुष्पीय, पुष्प- फुलांचा, फुलासंबंधी, फुलांतील f.bud पुष्पाक्ष फुलाचा किंवा फुलातील अवयवांचा दांडा (अक्ष) f.diagram पुष्पचित्र फुलातील सर्व भाग, त्यांचे परस्परांशई व खोडाशी संबंध दर्शविणारी छेदासारखी

florescence
पुष्पकाल फुले येण्याचा मोसम anthesis

floret
पुष्पक स्तबक फुलोऱ्यातील (उदा. सूर्यफूल, झिनिया, झेंडू, शेवंती इ.) असंख्य लहान फूलांतील एक फूल

floribundus
विपुलपुष्पी, बहुपुष्पी खूपच फुले येणारी (वनस्पती), उदा. ऊक्षी Calycopteris floribunda lam), धायटी (Woodfordia floribunda salish)

floriculture
पुष्पसंवर्धन विशेषतः फुलांची पैदास करण्याचा प्रयोग (उद्योग)

floridean starch
फ्लॉरिडी स्टार्च, फ्लॉरिडी मंड लाल शैवक वनस्पतींत आढळणारे आरक्षित कार्बाएहायड्रेट, याचे कण परिकलात विखुरलेले असून त्यांवर आयोडिनचा थेंब टाकल्यास ते लाल किंवा पिंगट दिसतात. खऱ्या स्टार्चप्रमाणे ते जांभळट दिसत नाहीत तसेच ते वर्णकणूंत नसतात.

floriferous
पुष्पी, पुष्पधारी, सपुष्प फुले धारण केलेला (अक्ष, वनस्पती)

floriform
पुष्पाकृति, पुष्पाकार फुलासारखा आकार असलेले

florist
१ पुष्पसंवर्धक २ पादपजातलेखक १ फुलझाडांची लागवड, फुलांची पैदास व खरेदी विक्री करणारा २ फ्लोरा (पादपजाती) संबंधीचा ग्रंथकर्ता

floristic
पादपी, पादपजातीय पादपजातीसंबंधी flroa

floristic composition
पादपी संघटना (रचना) विशिष्ट क्षेत्रातील भिन्न वनस्पती व त्यांचे शेकडा प्रमाण इत्यादी माहिती

floristics
पादपीसंघटनाशास्त्र पादपजाती, त्यांचा उगम, विकास, स्थानिक व भौगोलिक प्रसार इत्यादी सर्व बाबींच्या तपशीलवार माहितीची विज्ञानशाखा

florus
- पुष्पी फुले असलेले, उदा. एकपुष्पी, द्विपुष्पी, बहुपुष्पी (अनुक्रमे एक, दोन किंवा अनेक फुले असलेले) cauliflorus  flowered

flower
पुष्प, फूल सुमन, कुसुम, सुम, प्रसून ही नावेही संस्कृत वाङमयात आढळतात. केसरदले व किंजदले यापैकी निदान एकाचे मंडल व सामान्यतः त्याभोवती परिदलांचे निदान एक मंडल यांनी बनलेले संक्षिप्त प्रजोत्पादक इंद्रिय (प्ररोह). परिपूर्ण फुलात चार प्रकारची मंडले (संवर्त, प

flowering
पुष्पविकसन फुलांच्या कळ्या उमलणे, झाड मोहरणे (बहरणे) f. glume बाह्यतुष गवतांच्या फुलांचे बाहेरचे छद, त्या बाहेरील छदास परितुष (outer glume) म्हणतात., f. plant सपुष्प वनस्पती, फुलझाड पहा Angiospermae, Phanerogamae

flowerless plant
अपुष्प वनस्पति फुले नसलेल्या वनस्पती Gymnospermae, Cryptogamae

fluctuating variation
चंचलित भेद एखाद्या लक्षणासंबंधी सामान्य स्थितीच्या (मूल्याच्या) आसपास ढळणारा फरक, उदा. फळाच्या सर्वसामान्य आकारापेक्षा कमी व जास्त आकार असलेली फळे त्याच झाडावर (किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या झाडावर असल्याने दिसणारा फरक continuous variation

fluorescent
प्रतिदीप्तीशील अतिनील किंवा इतर प्रारणात ठेवल्यानंतर प्रकाश देणारे

flush
१ पुनर्वृद्धी २ आकस्मित जलवृद्धी १ काष्ठमय वनस्पतीचा पुन्हा वाढ होण्याचा काळ २ पाऊस किंवा अन्य कारणाने मर्यादित क्षेत्रात पाण्याचा पुरवठा व त्यामुळे येणारी वनश्रीतील संपन्नता

fluviatile
नदीय प्रवाहात किंवा नदीत वाढणारी (वनस्पती).

fly flower
मक्षिका पुष्प माश्यांच्या साहाय्याने परागित होणारे फूल, उदा. सुरण, पपनस, मेंदी इ.

fly trap
मक्षिका पJण्जर माशा किंवा तत्सम कीटक आकर्षून, पकडून, मारुन त्यांचा अन्नाप्रमाणे वापर करण्याचे साधन (सापळा, चापासारखी यंत्रणा), उदा. डायोनिया, ड्रॉसेरा इ. कीटकभक्षक वनस्पतींची पाने)

flying hair
उड्डानकेश वाऱ्याने तरंगत दूर जाण्यास व हवेत अधांतरी राहण्यास उपयुक्त केस (धागा) उदा. सहदेवीचा संवर्त, कुडा, कापूस, रूई, सावर यांच्या बीजावरील केस (धागे)

flying membrane
उड्डानपटल फळ किंवा बी यांना चिकटून असलेला पंखासारखा पातळ व पसरट भाग, उदा. शाल, पेट्रिया, चिल, शेवगा, वावळा, बिबला, टेटू इ.

flying tissue
उड्डानोतक वर वर्णन केलेल्या पंखातील विशिष्ट ऊतक (कोशिका समूह).

foetid
दुर्गंधी fetidus उदा. हिंगडा (Ferula foetida Regel)

folded
संमीलित दुमडलेले, मध्यशिरेवर पात्याचे दोन्ही भाग पुस्तकाप्रमाणे मिटविलेले conduplicate

foliaceous
पर्णसम पर्णाभ हिरव्या पानासारखे, उदा. वाटाण्याची उपपर्णे phylloclade, cladode

foliage
पर्णसंभार सर्व हिरव्या पानांचे खोडावरील आवरण f. leaf हरितपर्ण कोणतेही रुपांतर न पावलेले हिरवे पान

foliar
पर्णसम, पर्णसंबंधित पर्णरुप, पानासारखे, पानाशी संबंधित f.gap (leaf gap, folial gap) पर्ण विवर, पर्णांतराल खोडाच्या रंभामदील, पानात जाणाऱ्या वाहक ऊतकांमुळे (वृंदामुळे) मूळच्या वाहक चितीत पडलेली खिंड (पोकळी), उदा. काही नेचे पहा stele f. spur पर्णप्ररोह पहा

foliate
पत्री, दली दले असलेले (संयुक्त पान), उदा. दोन दलांचे ते द्विदली (हिंगणबेट), तीन दलांचे ते त्रिदली (बेल), लिंबूचे पान हे एकदली संयुक्त पान मानतात. foliolate

foliation
पर्णागम, पर्णन वनस्पतील पाने किंवा पालवी येणे (पल्लवित होणे) leafing

folicole
पर्णजीवी जिवंत किंवा मृत पानावर जगणारी (दुसरी वनस्पती)

folicolous
पर्णवासी पानावर राहणारी (अन्य वनस्पती) epiphyte

foliicolous
पर्णवासी पानावर वाढणारी अपिवनस्पती, उदा. काही शैवले, कवक, धोंडफुले

foliiferous
पर्णधारी, सपर्ण पाने असणारे (उदा. खोड)

foliolose
दलयुक्त दलांचे (पानासारख्या लहान उपांगांचे) बनलेले

foliose
१ सपर्ण २ पर्णाभ १ अनेक पाने दाटीवाटीने उगवली आहेत अशी (वनस्पती) उदा. हरिता वर्ग २ पानासारखे पातळ, हिरवे व पसरट उदा. काही धोंडफुले, शैवले, गंतुकधारी इ. Musci (mosses) Lichen  foliaceous

folium (folius)
-पर्णी पानाचे या अर्थी प्रत्यय उदा. खंडितपर्णी, लंबपर्णी, ऱ्हस्वपर्णी, हिरवा अशोक (Polyalthia longifolia Thw.)

follicetum
पेटिकागुच्छ एकाच फुलातील अनेक सुट्या किंजदलांपासून बनलेला पेटीसारख्या फळांचा घोस, उदा. सोनचाफा, रायणी (Manilkana hexandra Roxb.) follicle.

follicle
पेटिकाफल पेटीसारखे (तळ व झाकण असलेले) उघडणारे फळ, एका ऊर्ध्वस्थ किंजदलापासून बनलेले, एका शिवणीवर तडकणारे शुष्क फळ उदा. रूई, सोनचाफा, सदाफुली इत्यादींच्या घोसफळांतील प्रत्येक लहान फळ

food body
खाद्यपिंडिका, अन्नगुलिका पानाच्या आसपास असलेली व कीटकांस अन्नाकरिता उपयुक्त अशी कोशिकांची गाठ, उदा. बाभळीच्या एका जातीतील पानांच्या दलावरची गाठ f. pollen खाद्यपराग वांझ परागकण, कधी अलग व विशिष्ट परागकोशात बनलेले व कीटकांस आकर्षक खाद्य असे परागकण f.

food chain
अन्नशृंखला अन्न व त्यापासून प्राप्त होणारी ऊर्जा ज्या अनेक सजीव व्यक्तींच्या (किंवा सजीव गटांच्या) श्रेणीतून (मालिकेतून) पूर्णपणे खर्ची पडण्यापूर्वी, स्थानांतर करते ती साखळी.

foot
पद १ काही वनस्पतींच्या गर्भांकुराचा तळचा पोषक व शोषक भाग उदा. शेवाळी, नेचे इ. २ केसाचा तळ

forbe
प्रशाक गवताशिवाय इतर कोणतीही लहान वनस्पती herb

force
प्रेरण कृत्रिम उपायांनी वनस्पतींना पाने, फुले व फळे लवकर किंवा उशीरा बनविण्यास लावणे, मोसमापूर्वी किंवा नंतर भाज्यांचे पीक काढणे

forcipate
चिमटाकार चिमट्याच्या आकाराचे

forest
अरण्य, वन मुख्यतः मोठी झाडे, वेली व काही त्यांखाली अथवा त्यांमधून वाढणारी झुडपे व रोपटी असलेले घनदाट जंगल (वनश्रीचा प्रकार), मोठ्या वनस्पतींचा समावास f.climax वनचरम अनेक वृक्ष असलेली पादपसमुदायाची अंतामावस्था (चरमावस्था) f. product वनोत्पाद वनात

forestry
वनविज्ञान वनासंबंधी सर्व प्रकारची (संवर्धन, संरक्षण, उपयोग इ.) माहिती देणारी ज्ञानशाखा

foriculate
कर्तनीरुप कात्रीच्या आकाराचे

forked
द्विशाखी प्रत्येक वेळी दोन फाटे फुटलेले उदा. देठ, शिरा इ. f.venation द्विशाखी सिराविन्यास मध्यशीर व विशेषतः बाजूच्या शिरा पुनः पुनः दुभंगल्याप्रमाणे असलेली मांडणी, उदा. नेचे furcate

form
१ आकृति २ रुप १ संपूर्ण शरीराचा किंवा अवयवाचा आकार २ स्वरुप व लक्षणांत फरक असलेले दोन किंवा अधिक वंश किंवा जाती. उदा. लोंबती पाने व ताठ पाने असणारी झाडे, यामध्ये त्यातील व्यक्तींच्या अवतरणातील संबंध (नाते) अनिश्चित असतो. f.genus रुप वंश अनेक रुप जातींचा

formation
१ समावास २ संभवन १ सारख्या परिस्थितीत आढळणाऱ्या व समान वृत्तीच्या वनस्पतींचा समुदाय, उदा. वन, दलदल, तृणक्षेत्र. सारख्या आकृतींच्या समुदायांचे गट, वर्ग व वनश्री यांचे अनेक प्रकार करता येतात. २ निर्माण होण्याची प्रक्रिया, उदा. नवीन कळ्या, कोशिका, गर्भ, उपां

formative phase
संभवनावस्था, निर्मायी अवस्था वनस्पतींच्या अवयवांची वाढ होत असताना व त्यांना आकार येत असताना व त्यांना आकार येत असताना नवीन कोशिका बनण्याची अवस्था, मुळांच्या व खोडांच्या टोकांस हा भाग असतो व त्यामागे लंबनावस्था असलेला भाग असतो. f. region निर्मायी क्षेत्र

fossil
जीवाश्म, अश्मीभूत प्रशेष प्राचीन कालातील वनस्पती किंवा प्राणी यांचा किंवा त्यांच्या अवयवांचा दगडावरील ठसा अथवा कार्बन, रेती किंवा चुनखडीने पूर्णपणे व्याप्त असा अवशेष, उदा. दगडी कोळसा हा प्राचीन वनस्पतींचा अश्मीभूत पण कार्बनयुक्त भाग होय. f. animal जीवाश्म

foster(host) plant
आश्रय वनस्पति इतर वनस्पतींना पोषण किंवा आधार देणारी वनस्पती

fovea
गर्तिका लहान खाच, उदा. आयसॉएटिसच्या पानाच्या तळाशी असलेले खाच, त्यातच बीजुककोश असतो.

foveola
प्रगर्त अर्थ वर दिल्याप्रमाणे

foveolate
प्रगर्ती एक लहान खाच किंवा अनेक खाचा असलेला (अवयव)

fragment
खंड, शकल पूर्ण भागाचा एक लहान तुकडा

fragmentation
खंडन प्रत्यक्ष विभागणीने अनेक तुकडे (उदा. प्रकलाचे) होण्याचा प्रकार

free
मुक्त, सुटे इतर भागास न चिकटलेले, उदा. संदले, पाकळ्या इ. f.cell formation मुक्त कोशिका निर्मिति जनक कोशिकेत अनेक नवीन (बहुधा) आठ सुट्या कोशिका बनणे उदा. परागकण, धानीबीजुके f.central placentation मुक्त मध्यवर्ती बीजकविन्यास किंजपुटात सर्व बीजके मधल्या

frequency
वारंवारता, बाहुल्य वारंवार असण्याची किंवा आढळले जाण्याची घटना, एखाद्या पादपसंगतीतील अनेक नमुना क्षेत्रात विशिष्ट जाती किती क्षेत्रात आढळते व एकूण किती क्षेत्रे तपासली यांच्या गुणोत्तरावरुन बाहुल्याचे मापन करतात.

frequent
बहुल एखाद्या मर्यादित क्षेत्रात वारंवार आढळणारी (वनस्पती)

fringing forest
अनुतट वन, तटवर्ती वन किनारी वन, सतत वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळाच्या किंवा तळ्याच्या कडेने वाढणारे वन

frond
विपत्र, पाते १ सायकस, नेचे व तालवृक्ष यांच्या पानाचे विविध प्रकारे विभागलेले पाते २ समुद्रशैवलाचे पात्यासारखे कायक (शरीर) ३ शैवाकाचे (दगडफुलाचे) कायक stipe

frondose
विपत्रसम सपाट, पसरट विभागलेल्या किंवा अखंड पात्यासारखे

fructescence
पक्वकाल फळे पिकण्याचा काळ

fructiferous
फलधारी फळे असणारे किंवा निर्माण करणारे (झाड)

fructification
फलित १ बीजुकोत्पादन अवयव २ फलनानंतरची प्रजोत्पादक संरचना ३ फळे येण्याची प्रक्रिया ४ लैंगिक प्रक्रियेनंतर (वनस्पतीत) बनणारी बीजयुक्त किंवा बीजुकयुक्त संरचना

fructose
फलशर्करा फळापासून काढलेली विशिष्ट रासायनिक संघटनेची साखर, केटो-हेक्सोज शर्करा

fruit
फल, फळ सपुष्प वनस्पतींच्या फुलातील लैंगिक प्रक्रियेनंतर (फलनानंतर) किंजपुटापासून बनलेले, बीजास संरक्षण देणारे व बीजप्रसारास मदत करणारे इंद्रिय, लैंगिक प्रक्रियेचा फळ व बीज हा दृश्य परिणाम होय, क्वचित फलनाशिवाय अशी फळे बनतात व त्यात वांझ बिया असतात किंवा त

frutescens
क्षुपीय, क्षुपाभ झुडपासारखे (वाढलेले), उदा. मिरची (capsicum frutescens L.) frutescent

fruticose
क्षुपिल लहान झाडासारखे अवयव असलेले, क्षुपासारखे f. lichen क्षुपिल शैवाक अक्ष, उपाक्ष, फांद्या इत्यादी पण साधे (कायकाभ) अवयव असलेले धोंडफूल उदा. टंड्रातील रेनरियर मॉस, उस्निया

fucoxanthin
पिंगल शैवलद्रव्य, फ्यूकोझॅन्थीन पिंगट शैवलांतील रंगद्रव्य phaeophyceae.

fuligineus (sooty)
कज्जलाभ, काळेकुट्ट काजळासारखे उदा. काणी रोगासारखे

fumaginous
धूम्रवर्णी fumeous.

Fumariaceae
पर्पटकुल, फ्यूमॅरिएसी फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील पर्पट, भूतकेशी, मामिरान इत्यादी वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव ऱ्हीडेलीझ ह्या गणात करतात. प्रमुख लक्षणे- पाण्याचा अंश अधिक असलेल्या औषधी, क्वचित वेलीसारख्या, पाने साधी, बहुधा एकाआड एक, मूलज किंवा स्कंधेय, कधी फार विभागलेली व काहीशी समोरासमोर, फुले द्विलिंगी, एकसमात्र, परिदले तीन मंडलात असून संदले दोन, प्रदले चार, केसरदले सहा व किंजपुटाच्या दोन्ही बाजूस तीनच्या गटात व जुळलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात दोन किंवा अनेक बीजके. फळ (बोंड) तडकणारे किंवा कपाली, बी एक किंवा अनेक. पर्पट अगर पित्तपापडा (Fumaria parviflora L.)

fumeus
धूमकल्प, धुरकट, धुरासारखे smoky

function
कार्य इंद्रियाने किंवा अवयवाने केले जाणारे काम

fundamental
मौलिक मूलभूत, आधारभूत, उदा. ऊतक, तंत्र, अवयव इ. f. (ground) tissue तल्पोतक मौलिक ऊतक, बाहेरील त्वचा व वाहक भाग वगळल्यास इतर सर्वसामान्य आधारभूत व इतर अनेक कार्ये करणारा कोशिकांचा समूह, बहुधा हा भाग मृदूतक स्वरुपाचा असतो. f. systme तल्पोतक तंत्र अभित्वचा,

fungal
कवकीय कवकासंबंधी fungus

Fungi Imperfecti
अपूर्ण कवक वर्ग Deuteromycetes

fungicidal
कवकनाशक कवकांचा (त्यापासून होणाऱ्या रोगांचा) नाश करणारे (द्रव्य) fungicide

fungicolous
कवकवासी कवकावर आधार किंवा कवकापासून अन्नरस घेणारी (वनस्पती).

fungiform
भूछत्राकृति भूछत्रासारखे दिसणारे mushroom

fungoid parasite
जीवोपजीवी कवक इतर वनस्पतींवर उपजीविका करणारी कवक प्रकारची वनस्पती, उदा. भुरी, तांबेरा, काणी, अर्गट इ.

fungous
कवकजन्य कवकापासून झालेला (रोग), उदा. भुईमुगावरील टिक्का रोग

fungus
कवक, अलिंब, अळभे हरितद्रव्यहीन परोपजीवी साधी वनस्पती, पूर्वी कायक वनस्पती (थॅलोफायटा) विभागातील हा गट एक उपविभाग मानला जात असे व यामध्ये सर्वच हरितद्रव्य नसलेल्या वनस्पतींचा (सूक्ष्मजंतू, श्लेष्मकवक, सत्यकवक इ.) समावेश असे, परंतु हल्ली ही संज्ञा सामान्य भ

funicle
बीजबंध, बीजांड वृंत किंजपुटातील बीजकास जोडणारा तंतूसारखा भाग अथवा बीजकाचा देठ funiculus

funicular
तंतुसम, तंतुवत् बारीक दोऱ्यासारखे, सुतासारखे

funiform
रज्जुसम लहान दोरासारखे, जाडजूड दोरीसारखे.

funnel cell
नालिका कोशिका नाळक्याच्या आकाराचा (वरच्या बाजूस रुंद व खाली क्रमाने निमुळता होत गेलेला) शरीरातील सूक्ष्म घटक. काही पानांच्या अंतर्रचनेत अपित्वचेखाली असलेल्या कोशिका समूहातील एक घटक (कोशिका).

funnel shaped
नालिकाकृति, नसराळ्यासारखा आकार असलेला, उदा. धोत्र्याच्या फुलाचा पुष्पमुकुट funneliform, infundibuliform

fur
मृदुकोम मऊ, पातळ व लहान केस

furcate
द्विशाखी forked उदा. रानभेंडीची (Hibiscus furcatus Roxb.) संदले

furcellate
अल्पद्विशाखी द्विशाखीचा संक्षिप्त प्रकार उदा. एक तांबडे शैवल (Scinaia furcellata)

furrow
सीता, खोबण लहान पन्हळ, चर, सरी

furrowed
ससीता पन्हळ किंवा खोबण असलेले उदा. केळीच्या पानाची मध्यशीर, एक्किसीटमचे खोड, खडशेरणीची फांदी

furry
लोमश मऊ केस असलेले उदा. समुद्रशोकाची व आघाड्याची पाने, नॅफॅलियम इंडिकम Gnaphalium indicum L. इ. pubescent

fusiform
लुंठसम, तर्कुरुप दोन बाजूस निमुळते (अरुंद) व मध्ये फुगीर, लाटणे, कुकडे यासारखे, उदा. रताळे

fusion
संयोग, मीलन, संगम एकरुप होणे, संपूर्णपणे मिसळून जाणे, उदा. प्रजोत्पादक घटकांच्या (गंतुकांच्या) मीलनामुळे रंदुक बनते. कोशिकांच्या संयोगाने वाहिन्या (उदा. चिकाळ नलिका, काष्ठवाहिन्या) बनतात. f.nucleus मलिन प्रकल दोन प्रकलांच्या संयोगाने बनलेला (बहुधा

G
जी G पुष्पसूत्रात (किंजमंडलाबद्दल) स्त्रीकेसरांबद्दल वापरलेले अक्षर floral formula, gynoecium

galactin
गॅलॅक्टिन १ गॅलॅक्टोडेंड्रान या नावाच्या वनस्पतीतील रसात आढळणारे प्रमुख द्रव्य २ शिंबी कुलातील वनस्पतींच्या बीजात आढळणारा डिंकासारखा पदार्थ Leguminosae

galactose
गॅलॅक्टोज गॅलॅक्टिनपासून काढलेली साखर (C६ H१२ O६)

galbulus
गोलशंकु, मांसल शंकु गोलाकार शंकूपासून बनलेले बीजयुक्त इंद्रिय (उदा. सुरु व थुजा), यातील बीजधारी खवले टोकांशी मोठे मांसल व छत्राकृती असून त्यांच्या खालच्या बाजूस उघडी बीजे असतात Gymmospermae, Coniferae

galea
स्फटा फडी, फणा

galeate
स्फटाकृति फणाकार, उदा. बचनागाच्या फुलातील एक संदल hooded  galeiform

galericulate
चषकछदी पेल्याप्रमाणे झाकण असलेला

galeriform
चषकरुप पेल्याप्रमाणे

gall
गुल्म, विकृतवृद्धी कीटकांच्या दंशाने किंवा जीवोपजीवी कवक वनस्पतींच्या संसर्गामुळे वनस्पतींच्या ऊतकांमध्ये दोष निर्माण होऊन व अनित्य (असामान्य) स्थानिक वाढ होऊन भिन्न प्रकारच्या गाठी, फोड इत्यादी बनण्याचा प्रकार, उदा. पापटी, ऊंबर याची पाने, ऊंबरातील काही फ

gallic acid
गॅलिक आम्ल ओक( बंज, बान) वृक्षावर असलेल्या गाठीतील स्तंभक द्रव्य

gallotanin
गॅलोटॅनिन ओकच्या सालीतील ग्लुकोसाइड

Galton's laws
गॉल्टनचे नियम Law of ancestral heredity (inheritance), Law of filial regression.

galvanotropism
विद्युतनुवर्तन चलविद्युत् प्रवाहाच्या चेतनेने घडून येणाऱ्या वाढीमुळे अवयवास वाकडेपणा (वळण) येण्याचा प्रकार हे वळण विद्युत धनाग्राकडे असते. tropism.

gametangium
गंतुकाशय, युग्मकधानी गंतुके (प्रजोत्पादन कोशिका) निर्माण करणारा एककोशिक किंवा अनेककोशिक अवयव g. unilocular एकपुटक गंतुकाशय एकच कप्पा असलेली गंतुकयुक्त पोकळी g. plurilocular अनेकपुटक गंतुकाशय मूळच्या एक कोशिकेचे रुपांतर अनेक कप्याच्या पोकळीत होऊन बनलेला

gamete
गंतुक, युग्मक लैंगिक प्रजोत्पादन कोशिका, ही स्वरुपविषयक (पुं. व स्त्री लिंगभेद दर्शविणारी किंवा न दर्शविणारी असते. तथापि, तिची कार्यक्षमता दुसऱ्या (बहुधा भिन्न) गंतुकाशी संयोग झाल्याशिवाय दिसून येत नाही, फारच क्वचित ती एकटीच नवीन प्रजा निर्माण करु शकते (अ

gametic number
गंतुकी सूत्रसंख्या, युग्मकी सूत्रसंख्या एका गंतुकातील रंगसूत्रांची एकपट संख्या (एकगुणित)

gametogenesis
गंतुकजनन गंतुकाशयात गंतुके निर्माण करण्याची प्रक्रिया

gametophore
गंतुकधर, युग्मकधर गंतुकाशयाला आधार देणारा देठासारखा भाग, गंतुके निर्माण करणारा, तंतुयुक्त भाग, उदा. काही शैवले व कवक (बुरशी)

gametophyte
गंतुकधारी गंतुकांच्या साहाय्याने नवीन संतती निर्माण करणारी वनस्पतींच्या जीवनातील एकगुणित अवस्था किंवा लैंगिक पिढी, उदा. फुलझाडांतील तीन प्रकलयुक्त परागनलिका व आठ प्रकलयुक्त गर्भकोश

gametophytic budding
गंतुकधारीय मुकुलायन पुं-नर जननेंद्रिये (रेतुकाशये) धारण करणाऱ्या पिढीपासून शाकीय पद्धतीने सूक्ष्म कळ्यासारख्या अवयवांची निर्मिती व नंतर त्यापासून नवीन एकगुणित पिढ्यांची उत्पत्ती.

gametoplasm
गंतुकप्राकल, गंतुकद्रव्य सलिंग प्रजोत्पादक कोशिकेतील जीवद्रव्य

gamogenesis
लैंगिक प्रजात्पादन (पुनरुत्पादन) sexual reproduction

gamogenic
फलनज, निषेचनज गंतुकांच्या संयोगापासून बनलेले

Gamopetalae
मुक्तप्रदल उपवर्ग sympetalae

gamopetalous
युक्तप्रदली अंशतः किंवा पूर्णपणे जुळलेल्या पाकळ्या असलेला (पुष्पमुकुट अथवा फूल) उदा. सदाफुली, रूई, पारिजातक, धोत्रा

gamophyllous
युक्तपरिदली परिदले (संवर्त व पुष्पमुकुट असा भेद न दर्शविणारी) जुळलेली असलेले फूल, उदा. कुमूर, नागदौना, गुलबुश इ. perianth

gamosepalous
युक्तसंदली सर्व संदले पूर्णपणे किंवा अंशमात्र चिकटलेली असण्याचा प्रकार किंवा जुळलेली असलेला (संवर्त) उदा. धोत्रा, तुळस, तेरडा इ.

gamostely
रंभमीलन प्रथम स्वतंत्र असलेल्या ्नेक रंभांचे नंतर एक होण्याचा प्रकार stele रंभ

gamotropic movement
फलनपूर्व हालचाल प्रजोत्पादक घटकांच्या संयोगापूर्वी घडून येणारी त्यांची किंवा संबंधित अवयवांची (उपांगांची) हालचाल.

gangliform
गंडिकारुप, गंडिकाम, गुच्छिकारुप अनियमित फुगवट्याप्रमाणे.

ganglion
१ गंडिका २ गुच्छिका १ कवकतंतूतील विविधप्रकारे (कमी अधिक) फुगलेला भाग २ तंत्रिका तंत्रात (चैतनव्यूहात) आढळणारा अनेक कोशिकांचा गाठीसारखा समूह.

gap
विवर सलग पृष्ठभागात पडलेली खिंड leaf gap (foliar gap)

Gardening
उद्यानविज्ञान भिन्न प्रकारच्या बागा (उद्याने) बनविण्यासंबंधीच्या व त्यांच्या संवर्धनासंबंधीच्या माहितीची शाखा

Garigue
गॅरीग भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील खुरटी झाडी, यात मुख्यतः तुलसीकुल, शिंबीकुल आणि सुगंधी औषधीय वनस्पती यांचा भरणा असतो.

gas (gaseous) exchange
वायुविनिमय सामान्यपणे कार्बन डायॉक्साइड वायु बाहेर सोडणे ऑक्सिजन (प्राणवायू) आत घेणे ही सजीवंतील प्रक्रिया, वनस्पतीत प्रकाश संश्लेषणात या उलट प्रक्रिया आढळते. photosynthesis, respiration

gas diffusion
वायु विसरण एका वायुचे दुसऱ्या वायुत किंवा द्रवात विलीन होणे. diffusion

gas vacuole
वायुरिक्तिका ऍनाबीनासारख्या नील-हरीत शैवलांच्या कोशिकेतील प्राकलात असणारी वायूने भरलेली पोकळी, याबद्दल मतभेद आहेत.

Gasteromycetes
भूकंदक (कवक) उपवर्ग, गॅस्टरोमायसेटीज सत्यकवकांपैकी गदाकवक वर्गातील एक उपवर्ग, काही शास्त्रज्ञ या गटाला गणाचा (लायकोपर्डेलीझ) दर्जा देतात, भूतारका, कंदकवक (आभासी), नीडकवक, पूतिकवक इत्यादींचाही येथे समावेश करतात. गदाबीजुके गदाकोशिकावर येतात व गदेसारख्या पुन

Geaster
भूतारका पक्व झाल्यावर खालचा भाग (बाह्याच्छादन) तडकून व उलटा होऊन तारकाप्रमाणे दिसणारे कवक, वरचा भाग नंतर फुटुन बीजुके बाहेर पडतात, भूकंदुक कवकंआच्या उपवर्गात याचा अंतर्भाव केलेला आढळतो. Earth star

geitonocarpy
आसन्न फलोत्पत्ति, समीप फलोत्पत्ति समीप (आसन्न) युतीमुळे फळ बनण्याचा प्रकार

geitonogamy
आसन्न युति, समीप युति, निकट परागण, एक पादप परागण एकाच वनस्पतीच्या दोन जवळच्याच फुलातील परागणामुळे घडून आलेली फलनक्रिया xenogamy

gelatine
शुद्ध सरस कडक, डिंकासारखा चिकट, पाण्यात न विरघळणारा पण मिसळून बुळबुळीत आणणारा पारदर्शक, रुचिहीन पदार्थ उदा. तालिमखाना किंवा इसबगोल यांचे बी, पिवळ्या तिळवणीची पाने, खोड व फळे यावरचे (प्रपिंडीय) केस, कित्येक जलवनस्पती.

gelatinous
पिच्छिल शुद्ध सरसयुक्त, चिकट, बुळबुळीत, उदा. थलथलित कवक mucilaginous

gelose
थलथली, जेली गेलिडियम या तांबड्या शैवलापासून मिळणारी थलथली (जेली) अथवा बुळबुळीत पदार्थ, एगर या सामान्य इंग्रजी नावाने असा पदार्थ ओळखतात, तो इतर काही शैवलापासूनही मिळतो, जेलीयुक्त खाद्य पदार्थात हा उपयुक्त असतो.

gemini
युगुले, जोड्या जोडीने असणारे, प्रकलाच्या न्यूनीकरणात पूर्वावस्थेत जोडीने असणारी समरचित रंगसूत्रे, यापैकी एक पित्याकडून व एक मातेकडून आलेले असते. meiosis

geminus
युगुल, जोडी bivalent

gemma
मुकुलिका काही वनस्पतीतील सूक्ष्म प्रजोत्पादक अलिंगी कळ्यासारखे (शाकीय) अवयव, उदा. शेवाळी g.cup मुकुलिका चषक मुकुलिका निर्माण करणारा, पेल्यासारखा अवयव उदा. मार्चाएशिया नावाची शेवाळी

gemmation
मुकुलिकासंभव मुकुलिकांची निर्मिती, सूक्ष्म कळ्या येणे उदा. किण्व (यीस्ट) या एककोशिक कवक वनस्पतीवर तशाच कोशिका कळ्याप्रमाणे वाढून त्यांची माळ बनते, म्यूकर बुरशीतही कधी कधी हा प्रकार आढळतो.

gene
जनुक, जीन संततीत पिढ्यानुपिढ्या उतरणाऱ्या लक्षणांबद्दल जबाबदार असा रंगसूत्रातील जटिल घटक. जनक वनस्पतीच्या प्रजोत्पादक कोशिकेत (गंतुकात) रंगसूत्रांचा एकच संच असून त्यातील प्रत्येक रंगसूत्रावर अनेक जनुकांचाही एकच संच असतो. परंतु दोन गंतुके (पुं. व स्त्री) ए

gene dosage
जनुकमात्रा प्रकलातील एखाद्या आनुवंशिक घटकाच्या उपस्थितीची संख्या duplex, simplex

generation
पीठिका, पिढी निर्लिंग (अलिंग) पद्धतीने अथवा एका शाकीय साधनाने एका व्यक्तीपासून किंवा सलिंग पद्धतीने दोन प्रजोत्पादक कोशिकांपासून (रंदुकापासून) निर्माण झालेली संतती.

generative cell
जनन कोशिका, जननपेशी प्रकटबीज वनस्पतींच्या परागकणातील पुं-गंतुके बनविणारी कोशिका g.nucleus जनन प्रकल फलनाशी संबंध येणारा परागकणातील प्रकल

generic
वांशिक, वंशासंबंधी वंशविषयक (गुणासंबंधी), वंसनिदर्शक genus

genesis
निर्मिती नव्याने निर्माण करण्याची प्रक्रिया, उगम व विकास

genetic
जननिक, वंशागत, जनन- एका पिढीतून दुसरीत (अनुहरणामुळे) येणारे, जननासंबंधी, अनुहरणाशी संबंधित g.code जननिक सांकेतिक वर्ण अनुहरणाच्या प्रक्रियेत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकांद्वारे उतरलेल्या लक्षणांच्या माहितीचे संक्षिप्त स्वरुप, डीएनए मधील चार क्षारक हे

genetic complex
जननिक संच कोशिकेतील परिकल आणि रंगसूत्रातील आनुवंशिक गुणदोषवाहक घटक यांचा संपूर्ण गट g. vriation १ जननिक (वांशिक) भेद, वंशागत भेद २ जनुक विभेदन १ वंशपरंपरेने आलेला संततीतील फरक, २ रंगसूत्रातील आनुवंशिक घटकासंबंधीचा बदल

geneticist
जननवैज्ञानिक, आनुवंशिकीविज्ञ जननविज्ञानासंबंधी विशेष ज्ञान असलेला (तज्ञ)

Genetics
जननविज्ञान, आनुवंशिकी प्रजोत्पादनाची प्रक्रिया, त्याशी संबंधित इंद्रिये, अवयव, काशिका व तदंतर्गत कोशिकांगके, आनुवंशिक लक्षणे, त्याशी संबंधित घटक (जनुके) व त्यांचा पिढ्यानपिढ्या प्रवास (अनुहरण) आणि त्या संबंधीचे प्रयोग, निष्कर्ष वि सिद्धांत इत्यादीसंबंधीच्

geniculate
अवनत जानु वाकलेल्या गुडघ्याप्रमाणे, उदा. काही फुलांच्या पुष्पमुकुटाचा तळभाग

genome
रंगसूत्र (गुणसूत्र) संच विशेषतः जननिक दृष्ट्या विचारात घेतलेला एकगुणित रंगसूत्रांचा गट genom

genotype
१ जनुकविधा २ वंशरुप १ एखाद्या व्यक्तीतील लक्षणांच्या अभ्यासाने निश्चित केलेला जनुकांचा संच, प्रकट व अप्रकट लक्षणे विचारात घेऊन विशिष्ट पिढीतील त्या लक्षणाच्या जनुकासंबंधी संक्षिप्त स्वरुपात व्यक्त केलेले सूत्र उदा. (अ) उंच व्यक्तीत सुप्तपणे असणारा खुजेपणा उं (खु) या सूत्राने दर्शविता येईल तर (आ) तसा खुजेपणा सुप्तरुपाने नसणाऱ्या व्यक्तीचा जनुकसंच उं उं या सूत्राने व (इ) उंचपणाचे जनुक नसणाऱ्या व्यक्तीचा जनुकसंच खु खु या सूत्राने दर्शविता येतो. येथे (अ) व (आ) या व्यक्तींचे बाह्यस्वरुप उंच म्हणजे सारखे असले तरी जनुकसंच भिन्न असतात, (इ) ही व्यक्ती खुजीच असते. ह्या बाह्यस्वरुपांना सरुपविधा (pnenotype) म्हणतात. यावरुन सारखी सरुपविधा असलेल्या दोन व्यक्तींतील जनुकसंच सारखे असतातच असे नाही, त्यांच्या जनुकविधा भिन्न असू शकतात. २ ज्या जातीवरुन वंशाची निश्चिती केली आहे ती जाती.

Gentianaceae
किराइत कुल, जेन्शिएनेसी किराइत (किरात, काढेचिराइत), कुमुद, इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश जेन्शिएनेलीझ किंवा किराइत गणात केला जातो. प्रमुख लक्षणे- (खाली दिलेल्या गणाच्या लक्षणांशिवाय)- आल्प्स पर्वतात विशेषेकरून आढळणाऱ्या लहान मोठ्या आकाराच्या वनस्पती, फुले भडकरंगी, कळ्या पिळीव व एका कप्याचा किंजपुट

Gentianales
किराइत गण, जेन्शिएनेलीझ या गणात जेन्शिएनेसी, ओलिएसी (पारिजातक कुल), ऍपोसायनेसी (करवीर कुल) व ऍस्क्लेपिएडेसी (रुई कुल) इत्यादींचा समावेश बेसींनी केला असून हचिन्सन यांनी फक्त किराइत कुलच अंतर्भूत केले आहे. प्रमुख लक्षणे- पूर्ण, नियमित, पंचभागी फुले, द्विकिंज, ऊर्ध्वस्थ किंजपुट व समोरासमोर पाने इत्यादी लक्षणे मुख्यतः आढळतात. लोगॉनिएसी (कुचला कुल) याचाही येथेच पूर्वी समावेश करीत.

genuine tissue
सत्योतक, सत्य ऊति संबंधित कोशिकांच्या समूहातून विभागणीने निर्मिलेल्या व पुढे प्रभेदन घडून आलेल्या कोशिकांचा समूह, आभासी नसलेले ऊतक, tissue.

genus
वंश, प्रजाति वर्गीकरणात जाती हे सर्वात शेवटचे एकक मानून वंश हे त्यापेक्षा वरच्या दर्जाचे एकक मानतात, कारण अनेक भिन्न व संबंधित जातींचा संच म्हणजे वंश होय, मात्र एका वंशातील जातीतील फरक हे भिन्न वंशातील जातींतील फरकांपेक्षा कमी असतात, अनेक वंशांचा गट म्हणज

geocarpous
भूफलित

geocarpy
भूफलन, भूफलता प्रथम फूल जमिनीवर बनून नंतर ते जमिनीत घुसून फळ पक्क होण्याचा प्रकार उदा. भुईमूग

Geographic botany
वनस्पति भूगोल पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक परिस्थितिसापेक्ष वनस्पतींच्या अथवा पादपसमूहांच्या विस्ताराच्या माहितीची शाखा, उदा. शंकुधारी वने, विषुववृत्तावरील निबिड वने, भिन्न तृणक्षेत्रे इ. phytogeography

Geologic botany
पुरावनस्पतिविज्ञान Fossil botany  Palaeobotany

geonasty
गुरुत्वानुकुंचन भूगर्भाकडे वळण्याची अवयवांची प्रक्रिया, उदा. आदिमूळ.

geoperception
गुरुत्वसंवेदन गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेला प्रतिक्रिया दर्शविण्याचा प्रकार geotropism

geoperceptive organ
गुरुत्वसंवेदी अवयव गुरुत्वाकर्षणाला प्रतिसाद देणारा अवयव, उपांग किंवा कोशिकांगक, उदा. अंतस्त्वचेतील तौकीरकण, मुळाचे टोक

geophilae
मृदाशैवले मातीवर वाढणारी शैवले, उदा. व्हाऊचेरिया.

geophilic
भूमिप्रिय, भूरागी १ जमिनीत फळे बनविणारी वनस्पती, उदा भुईमूग २ जमिनीवरच वाढणारी (वनस्पती), स्थलवासी. geophilous

geophilous
१ भूमिप्रिय २ स्थलवासी, स्थल १ पहा geocarpy २ सदैव जमिनीवर वाढणारी (वनस्पती) g.fungus स्थलकवक जमिनीतील कुजक्या पदार्थावर वाढणारी कवक वनस्पती, उदा. भूछत्र, भूकंदुक, भूतारका इ.

geophyta
स्थलवनस्पति सदैव जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती परंतु आपल्या कळ्या जमिनीत असणाऱ्या बहुवर्षायु खोडावर (उदा. कंद, मूलक्षोड, ग्रंथिक्षोड इ.) बनवून त्या तेथेच कायम ठेवणाऱ्या वनस्पती. परिस्थितिविज्ञानात सर्वच शाकीय भाग जमिनीत असणाऱ्या वनस्पतीस भूपादप (geophyte) म्हणतात.

geophyte
गूढपादप जमिनीतील खोडावर प्रतिकूल परिस्थितीत कळ्यांचे संरक्षण करून जगणारी वनस्पती (उदा. आले, हळद इ.) त्यावेळी जमिनीवरील तिचा भाग सुकून जातो. geophyta.

geotaxis
गुरुत्वानुचलन, गुरुत्वीय अनुचलन गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेमुळे घडून येणारी हालचाल (प्राप्त होणारी गति) किंवा स्थलांतर, वनस्पतींचे सुटे भाग किंवा मुक्तपणे संचार करणाऱ्या वनस्पती, हा प्रकार दर्शवितात.

geotome
मृदाखंडक, मृदाकर्तक प्रायोगिक अभ्यासाकरिता मातीचे नमुने (लहान तुकडे) गोळा करण्याचे शास्त्रीय साधन (उपकरण).

geotropic
गुरुत्वानुवर्तनी गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेमुळे त्या दिशेने (संमुख) किंवा त्या दिशेविरुद्ध (विन्मुख) होणारी अवयवाची वाढ (वळणे), उदा. खोडाचे टोक जमिनीवर गुरुत्वाकर्षणाविरुद्ध व मुळाचे टोक खाली गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढते.

geotropism
गुरुत्वानुवर्तन वर वर्णन केल्याप्रमाणे वाढ होऊन वळण्याची प्रतिक्रिया g.lateral पार्श्विक गुरुत्वानुवर्तन खोडाच्या टोकास डाव्या अथवा उजव्या बाजूस अधिक वाढ झाल्याने वेलीचे कोवळे खोड प्रथम मोठी वेटोळी घालते व त्यामुळे जवळपासचा आधार मिळवते, या प्रकारास वरील

Geraniaceae
भांड कुल, जिरॅनिएसी भांड गणातील (जिरॅनिएलीझ) द्विदलिकित फुलझाडांचे एक कुल. बेथॅम व हूकर यांनी या कुलात ऑक्सॅलिडेसी, लिग्नँथेसी, ट्रोपिओलेसी व बाल्ममिनेसी यांचाही समावेश केला आहे. प्रमुख लक्षणे-बव्हंशी केसाळ औषधी, अनेकदा उपपर्णयुक्त साधी पाने, नियमित द्विलिंगी, पंचभागी फुले, संवर्त चिरस्थायी, पाच सुट्या पाकळ्या व त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट तळाशी जुळलेली केसरदले, किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यात मध्यवर्ती अक्षावर अनेक बीजके, किंजल्क पाच, फळ बहुधा पालिभेदी, मध्यवर्ती चंचूपासून किंजदले सुटी होतात. जिरॅनियम व पेंलॅर्गाएनियमची झाडे बागेत लोकप्रिय आहेत.

germ
१ अंकुर २ सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव १ खोडावरील कळी, बियातील गर्भ २ सूक्ष्म जंतू, रोगजंतु, अतिलहान साधे जीव g.cell गंतुक, जननकोशिका, जननपेशी पुनरुत्पादक (प्रजोत्पादक) कोशिका g. disc अंकुर बिम्ब बीजुक रुजून त्यापासून बनलेली चकतीसारखी सूक्ष्म पहिली शारीरिक

germen
१ किंजपुट २ कलिका ovary, bud. ovary

germicide
जंतुघ्न, जंतुनाशक जंतूंचा नाश करणारे द्रव्य fungicide

germinable disc
अंकुरबिम्ब, जननबिम्ब बीजुक रूजून त्यापासून काही कोशिकांचे बनलेले व सूक्ष्म चकतीसारखे प्राथमिक शरीर, उदा. मार्चांशिया शेवाळी. g. tube जनननलिका, अंकुरनलिका पहा germ tube. viable

germinal
१ जन्मजात २ जनक, निर्मायी १ अनुवंशिकतेमुळे उपजत असलेले (लक्षण) २ निर्माण करणारा, उदा. कोशिकांचा थर g.vesicle (oosphere) अंदुक स्त्री गंतुक किंवा त्यातील प्रकल   meristem  congenital

germination
अंकुरण, उगवण बीज किंवा बीजुक अनुकूल परिस्थितीत रुजण्याची प्रक्रिया, अंकुर येणे, सुप्तावस्थेतील कळ्या जागृत होऊन फुले किंवा प्ररोह वाढीस लागण्याची घटना (sprouting) sprout

Gesneriaceae
शिलापुष्प कुल, जेस्नेरिएसी पाथरफोडी (शिलापुष्प), जेस्नेरिया डग्लसी इ. वनस्पतींचे (बियात दोन दलिका असलेल्या फुलझाडांचे) कुल, याचा अंतर्भाव पर्साएनेलीझ गणात करतात. प्रसार - उष्ण व उपोष्ण कटिबंध, प्रमुख लक्षणे- औषधी झुडपे, वृक्ष, वेली व काही अपि वनस्पती, पाने साधी, समोरासमोर, क्वचित थोडीफार विभागलेली, फुलोरा कुंठित, किंवा फुले एकेकटी, ती द्विलिंगी, पंचभागी, आकर्षक, संदले जुळलेली व तशीच प्रदले, केसरदले दोन, चार किंवा पाच, पाकळ्यांस चिकटलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ, क्वचित अधःस्थ व जुळलेली, किंजपुटात एक कप्पा व अनेक बीजके, मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंड), बिया लहान, असंख्य, बाम्ही कुल, टेटुकुल व बंबाखू कुल याशी साम्य, पाथरफोडी औषधी आहे. ग्लॉक्सीनिया, जेस्नेरिया यांच्या जाती बागेत लावतात.

gibberillins
जिबरिलिन्स वनस्पतीत आढळणारे व नैसर्गिकरीत्या वाढीस साहाय्य करणार कार्बनी संप्रेरक, काही बाबतीत हे ऑक्सिन ह्या नावाच्या वृद्धि संप्रेरकापासून भिन्न असतात. यांचा कृत्रिमरित्या उपयोग करून वनस्पतीची ऊंची वाढविणे, फलनाशिवाय फळांची उत्पत्ति करणे, फुलण्याची क्रि

gibbous
कोशयुक्त अवयवाच्या तळाशी पिशवीसारखा एकांगी फुगीरपणा येऊन खोलगट खाच असलेला, उदा. संवर्त (मोहरी), स्नॅपड्रॅगॉन saccate  gibbose

gigantic
प्रचंड, राक्षसी, भीमकाय फार मोठे,दांडगे, उदा. अमेझॉन नदीतील कमलपुष्प, सुमात्रा बेटातील एक भुईपुष्प (रॅप्लेसिया आर्नाएल्डी), बम्हदेशातील बांबूची एक जाती (Dendrocalamus giganteus Munro), रुई (Calotropis gigantea R. Br.)

gigantism
भीम- (बृहत्-) कायिता प्रचंडपणा अथवा फार मोठा आकार असण्याचा प्रकार.

gill
पटल पातळ पडद्यासारखा अवयव, उदा. भूछत्रे g.fungus पटल कवक बीजुकोत्पादक पापुद्रे असलेले कवक Agaricales.

gilvous
पिंगल तपकिरी किंवा पिंगट रंगाचे उदा. अशोक, आंबा, माधवलता (मधुमालती Hiptage madablota Gaertn.) यांची कोवळी पाने.

gimped
स्थूल दंतुर crenate.

Gingkoales
व्यजनपर्ण वृक्ष (कन्याकेश वृक्ष) गण, गिंकोएलीझ मध्यजीव महाकल्पातील प्रकटबीज वनस्पतींचा एक गण, यामध्ये गिंकोएसी हे एकच कुल व गिंको बायलोबा ही एकच जाती, प्रमुख लक्षणे- विभक्तलिंगी वृक्ष, ऱ्हस्व व दीर्घ प्ररोह असतात. पंख्यासारखी पाने (व्यजनपर्ण) व त्यात द्वि

girder
तुळई, धरण खोड किंवा काही पाने यांमध्ये ताण आणि दाब सहन करण्याकरिता वा आधाराकरिता उपयुक्त अशा कठीण आवरणाच्या घटकांची तुळईसारखी मांडणी. g. sclerenchyma धरण दृढोतक कित्येक वरच्या दर्जाच्या वनस्पतींच्या अवयवांच्या आडव्या छेदात तुळईच्या किंवा इंग्रजी I,T,H व O

girdle
मेखला १ करंडक वनस्पतींत आढळणाऱ्या शरीर कोशिकांच्या बाजूस असलेला दोन्ही कोशिकावरणांना जोडणारा सूक्ष्म पट्टीसारखा भाग २ सायकसच्या पर्ण लेशाची वलयाकृती शाखा g.view मेखला दृश्य करंडक वनस्पतींच्या कोशिकांची मेखला दिसून येणारी बाजू पहा valve- view

girdle structure
मेखला संरचना खोडाच्या आडव्या छेदात त्रिज्येच्या दिशेने पसरलेल्या व हरित्कणूंनी भरलेल्या लांबट कोशिकांनी वेढलेला वाहक कोशिकांचा संच.

girdling
मेखलन झाडाची वलयासारखी पट्टी काढणे

glabrescent
अल्परोमश, अल्पकेशी काहीसे केसाळ किंवा बव्हंशी गुळगुळीत असलेला (अवयव) उदा. ओसाडीचे पान.

glabrous
केशहीन, रोमहीन केस नसलेले (अवयव), उदा. करंज (Pongamia glabra Vent)

glaciation
हिमानी क्रिया पृष्ठभागावरुन हिमनदी वाहात जाण्याची प्रक्रिया व त्यामुळे झालेला बदल, उदा. पूर्वीची वनश्री नाहीशी होणे.

gladiate
खड्गाकृति, अस्याकृति तरवारीसारखे, उदा. पान, फळ ensiform.

gland
१ प्रपिंड, ग्रंथि २ छदककपाली, वंजुफल १ शरीरात किंवा शरीरावर, पाणी अथवा इतर द्रव पदार्थ (उदा. मधुरस, पाचक रस) स्त्रवणारी किंवा साठवून ठेवणारी कोशिका किंवा अन्य निश्चित संरचना (उपांग), ग्रंथि, उदा. जलस्त्रावक ऊतक, २ ओकचे किंवा तत्सम फळ, कठीण कवचाचे, शुष्क ए

glandula
प्रपिंडक आमराच्या फुलातील किंजल्कावरची चिकट चकती

glandular hair
प्रपिंडीय केश, ग्रंथियुक्त केश, प्रपिंडकेश टोकास स्त्रावक किंवा संचयी (ग्रंथी) संरचना असलेले केसासारखे उपांग, उदा. कीटकभक्षक वनस्पती, पिवळी तिळवण, तुळस, खाजकुयली, चित्रक g.tissue प्रपिंडोतक प्रपिंडाप्रमाणे कार्यक्षम असलेला कोशिकांचा समूह पहा laticiferous

glandular serrate
प्रपिंडदंती, ग्रंथिदंतुर पानाच्या किंवा अन्य अवयवांवरील दातेरी किनारीवर (कडेवर) किंवा टोकावर प्रपिंडे (ग्रंथी) असण्याचा प्रकार.

glandulose
प्रपिंडसम, प्रपिंडयुक्त, प्रपिंडी, ग्रंथियुक्त प्रपिंडासारखे किंवा प्रपिंड (ग्रंथी) असलेले (अवयव, पृष्ठभाग, केस, बिम्ब इ.)

glaucesant
१ समुद्रवर्णी २ किमानील १ समुद्राच्या पाण्याच्या (हिरवट) रंगाचे २ काहीसे निळसर हिरवे पहा glaucous

glaucescent
अल्पानील काहीसे आनील

glaucous
आनील मेणाच्या पातळ थरामुळे निळसर हिरवा रंग असलेले, उदा. घायपाताचे पान, एरंडाचे खोड, देठ इ.

gleba
गाभा काही कवकांच्या बीजुकोत्पादक शरीरातील अनेक कप्पे असलेले ब बीजुके निर्मिणारे ऊतक. phallaceae.

gleba
गाभा काही कवकांच्या बीजुकोत्पादक शरीरातील अनेक कप्पे असलेले ब बीजुके निर्मिणारे ऊतक. phallaceae.

glebula
गोलवर्ध गोलसर उंचवटा Lichens.

glebulose
गोलवर्धयुक्त पृष्ठभागावर गोलसर उंचवटे असलेले (साधे शरीर, कायक), उदा. धोंडफूल.

gliadin
ग्लायडीन विशेषतः गव्हाच्या दाण्यात असलेले प्रथिन.

glide
विसर्पण घसरत जाणे, हळू सरकणे उदा. काही नीलहरित शैवले व करंडक वनस्पती.

gliding growth
विसर्पी वृद्धि sliding growth.

globoid
गोलाभ प्रथिनाच्या कणातील गोलाकार खनिज कण उदा. एरंडाचे बीजातील पुष्क crystalloid

globular
गोलाकार चेंडूसारखे उदा. जाफरी गेंदाचा फुलोरा, बाभळीचा फुलोरा

globule
नर गुलिका, गोळई, ग्लॉब्यूल नर (पुं.) गंतुके निर्मिणारे वाटोळे जटिल इंद्रिय उदा. कारा (शैवल), या वनस्पतींत तंतुयुक्त अवयवात (रेतुकाशयात) पुं-गंतुके असून असे अनेक तंतु एकत्र असलेल्या संरचनेभोवती अनेक कोशिकांच्या एका थराचे वेष्टन असते. सामान्य अर्थी गोळी

globulin
ग्लॉब्यूलिन गोल व पारदर्शक कण, गोलाभातील मुख्य पदार्थ

glochidium
लोमांकुश, रोमांकुश टोकाशी बाणाप्रमाणे वाकडा असलेला केस किंवा काटा, उदा. ऍझोला नावाचा जलनेचा, काही निवडुंगाच्या जाती glochid

glome
गोल गुच्छ अनेक लहान फुलांचा चेंडूसारखा फुलोरा उदा. बाभूळ, लाजाळू इ.

glomerate
गोल गुच्छित १ वर वर्णिल्याप्रमाणे फुलोऱ्यात असलेली (फुले) २ अनेक गुच्छ एकत्र असलेले उदा. औदुंबर (Ficus glomerata Roxb.)

glomerulate
पुष्पकपुंजित, बीजुकपुंजित काही अवयवांचे (बीजुके, पुष्पके इऍहे) झुबके असलेली (वनस्पती) glomerule.

glomerule
स्तबकपुंज अनेक स्तबकांचा एकाच छदमंडलातील पुंजका उदा. उटककारी (Echinops echinatas Roxb.) glomerulus

glucose
द्राक्षशर्करा, ग्लुकोज वनस्पतीतील साखरेचा एक प्रकार C६H१२O६ grape sugar

glucoside
ग्लुकोसाइड विघटनानंतर द्राक्षशर्करेत रुपांतर पावणारा जटिल पदार्थ उदा. अमिग्डॅलीन, कोनीफेरीन, सॅलिसीन ही द्रव्ये अनुक्रमे बदाम, चीड, वाळुंज यामध्ये आढळतात.

glumaceous
तुषसम गवतांच्या फुलातील तुसासारखे bract

glume
तुष, तूस विशेषतः गवतांच्या फुलोऱ्यातील कणिशकात आढळणारे शुष्क छद, उदा. मका, गहू g.flowering बाह्यतुष पुष्पदलाबाहेरचे छद (तूस) g. inner (palea) अंतस्तुष आतील तूस, अक्षाजवळचे छद, बाह्यतुष व अंतस्तुष यामध्ये केसरदले व किंजदले असतात. g. outer (lemma) परितुष

glumella
अंतस्तुष palea. palea

Glumiflorae
तृणगट, ग्लुमिफ्लोरी बेंथॅम व हूकर यांनी या गटाला श्रेणी म्हटले आहे, एंग्लर व प्रँटल यांनी गण व बेसींनी तृणगण (ग्रॅमिनेलीझ) अशी नावे देऊन त्यामध्ये तृणकुल व मोथाकुल अंतर्भूत केले आहेत, हचिन्सन यांनी या गटाला विभाग मानून तृणगण व मोथागण असे दोन गण व त्या प्र

gluten
ग्लुटेन १ स्टार्च वेगळा काढल्यानंतर राहिलेले काही वनस्पतींतील चिवट व आरक्षित प्रथिन २ काही भूछत्रावरचे चिकट आवरण.

glutinous
चिक्कणछादित चिकट पदार्थाचे आवरण असलेले, उदा. विंचवी (वृश्चन) व तंबाखूचे पान

glycogen
मधुजन, ग्लायकोजेन आवश्यकतेनुसार साखरेत रुपांतर केला जाणारा तौकीरासारखा कोशिकेतील पदार्थ, उदा. यीस्ट, कित्येक कवक, अनेक प्राणी

Gnetales
उंबळी (कोंबळ) गण, नीटेलीझ प्रकटबीज वनस्पती उपविभागापैकी एक गण, यांची काही लक्षणे आवृतबीज वनस्पतीप्रमाणे (फुलझाडे) असून या गणात नीटेसी- उंबळी (कोंबळ) कुल या एकाच कुलाचा अंतर्भाव होतो. द्वितीयक काष्ठ भागात वाहिन्या, बीजकातील अंदुककलशाचा अभाव (अपवाद- एफेडा),

goblet shaped
चषकाकृति पसरट तळ, मध्ये दांडा व वर काहीसा फुगीर भाग अशा पेल्याच्या आकाराचे

golgi body
तनुकल, गॉल्गी बॉडी, गॉल्गी पुंजक काही थोड्या वनस्पतींच्या पण बहुधा सर्व प्राण्यांच्या कोशिकेतील प्राकलात आढळणारा, अनेक सूक्ष्मतंतू अथवा सूक्ष्मबिंदू यांचा पुंजका, याचे कार्य कोशिकेच्या स्त्रवणाशी संबंधित असावे असे मानतात.

gonidangiophore
बीजुककोशदंड बीजुककोशाचा आधारतंतू sporangiophore

gonidangium
बीजुककोश वनस्पतींच्या गंतुकधारी अवस्थेतील बीजुकांची निर्मिती करणारा प्रजोत्पादक अवयव, बीजुकधारी अवस्थेतील बीजुकांचे कार्य याहून भिन्न नसते. म्हणून मराठी पर्याय तोच ठेवला आहे. sporangium

gonidial layer
१ शैवलस्तर २ बीजुकदंडस्तर १ काही धोंडफुलांच्या (शैवाक) शरीरातील शैवल कोशिकांचा थर पहा Lichen २ कवकांच्या शरीरातील बीजुककोश धारण करणाऱ्या तंतूंचा थर पहा Fungi

gonidiophore
बीजुकदंड बीजुकांना आधारभूत तंतू उदा. बुरशी sporophore

gonidium
१ बीजुक २ शैवलकोशिका १ लिंगभेदविहीन पद्धतीने बनलेली व रुजल्यावर सलिंग अथवा गंतुकधारी अवस्था निर्मिणारी प्रजोत्पादक कोशिका २ धोंडफुलातील शैवल spore

gonoplasm
पुं द्रव्य प्रजोत्पादक नर-कोशिकायुक्त अवयवापासून, फलन नलिकेद्वारा, स्त्री कोशिकायुक्त अवयवातील स्त्री कोशिकेशी संयोग होण्यास जाणारा नर जीवद्रव्याचा एकप्रकलयुक्त भाग, उदा. द्राक्षवेलीवरील भुरी.

gracilis
तनु बारीक या अर्थी लॅटिन संज्ञा, हिचा वापर वनस्पतींच्या जातिवाचक नावाकरिता करतात. Bignonia gracilis Lodd.

gradate sorus
क्रमि (बीजुककोश) पुंज, क्रमिपुंज बीजुककोशांची पक्व होण्याची वेळ व स्थान क्रमाने (तळापासून वर) बदलत असणारा पुंज, उदा. प्रारंभिक नेचे, त्यावरुन Gradatae क्रमिपुंजी- क्रमिपुंज असलेले नेचे (गट)   Mixed sorus, Mixtae, Simplices

gradient
क्रमिकता, उतार, प्रवणता परस्पराशेजारी असलेल्या दोन भिन्न प्रदेशांतील (उदा. डोंगर व मैदान) जमीन, हवामान इत्यादींतील फरकांमुळे एकातून दुसऱ्यात जाणाऱ्या सीमाप्रदेशात आढळणारा चढौतार, हा त्यातील वनस्पतींच्या समुदायात हळुहळु संघटनात्मक फरक पडण्यातही दिसून येतो.

graft
कलम, भेटकलम, कलम करणे दोन वनस्पतींचा शाकीय संबंध घडवून आणण्याकरिता एका स्थिर (बहुधा मजबुत) वनस्पतीच्या फांदीवर व खोडावर (याला खुंट म्हणतात) कृत्रिमरीत्या सांधलेली दुसरी इष्ट तर काट किंवा छाट ह्या स्वरुपातील वनस्पती g.hybrid (chimaera) कलम संकरज,

grain
१ कण २ शूकधान्य १ कोणत्याही घन पदार्थांचे अत्यंत लहान भाग २ पिकविलेल्या गवतांचे फळ अथवा बीज, कित्येकांच्या छदावर टोकाशी लांब राठ केस असतो, ते शूक आणि त्यामुळे शूकधान्य हे नाव. उदा. भात, गहू, बाजरी cereal, pulse, awn

Graminaceae
तृणकुल, गवते, ग्रॅमिनेसी (ग्रॅमिनी) गवत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव ग्लुमिफ्लोरी (ग्रॅमिनेलीझ) गणात केला जातो. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, पोकळ किंवा भरीव दंडगोलाकृति खोड व पाने बहुधा साधी व दोन रांगांत, ल

Graminales
तृणगण Glumiflorae

graminicolous
तृणप्रिय, तृणवासी गवतावर उपजीविक करणारी (जीवोपजीवी) वनस्पती, उदा. चिकटा (Sclerospora graminicola) नावाचा कवकापासून होणारा रोग बाजरीवर वाढतो.

grana
तरंगक, कण, ग्रॅना १ हरितकणूंतील रंगद्रव्याचा बिंदुक (सूक्ष्मथेंब) २ कोणताही सूक्ष्म कण stroma  granum

Granataceae
दाडिम कुल, ग्रॅनॅटेसी Punicaceae

grand period of growth
महावृद्धिकाल कोशिका, ऊतक व अवयव यांच्या पूर्ण वाढीकरिता आरंभापासून शेवटपर्यंत लागलेला संपूर्ण वेळ.

grandis
महा-, बृहत्- मोठा या अर्थाचा लॅटिन उपसर्ग, त्यावरुन grandiflora किंवा grandiflorus महापुष्पी, उदा. अगस्ता (Sesbania grandiflora Poir).

granular
कणमय, कणयुक्त रवाळ, कणीदार, कणांनी बनलेले, उदा. कोशिकेतील प्राकल, सूक्ष्मकणांचे आवरण असलेले granulose

grassland
तृणभूमी, गवताळ प्रदेश हवामानादी परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी मुख्यतः नैसर्गिकरीत्या फक्त गवताची मुबलक वाढ होते असा प्रदेश

graveolens
उग्रगंध न आवडण्याइतका उग्र वास, उदा. सताप (Ruta graveolens L.), शेपू (Peucedanum graveolens L.)

graviperception
गुरुत्वबोध, गुरुत्वागम गुरुत्वाची (पृथ्वीच्या आकर्षणाची) अथवा स्वतःच्या वजनाची जाणीव.

gravitational water
गुरुत्वीय जल गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीत शिरुन विशिष्ट खोलीवर (खडकाळ थरांवर) साचलेले पाणी, हे द्रवरुप असून वनस्पतींना उपलब्ध होते.

green alga
हरित शैवल, हिरवे शैवल Chlorophyceae

green house
पादपगृह तीव्र प्रकाश व रुक्ष हवा यांपासून संरक्षित असलेले व वनस्पतींच संवर्धन करण्याच्याच सोयिस्कर खोलीसारखे झोपडे, येथे सावली, मंद प्रकाश व दमट हवा मिळण्याची कृत्रिम परिस्थिती राखलेली असते.

gregarious growth
सांघिक वाढ, सामूहिक वाढ एकाच जातीच्या अनेक वनस्पतीची एकत्र होणारी वाढ, उदा. कर्दळ, केळ, आले, बांबू इ.

grit cell
कठक, दृढ पेशी फार घन आवरणाची कोशिका sclereid  stone cell

gritty
रेवाळ कठीण कण (रेव) असलेले sandy

groove
चर, खोबण furrow

ground meristem
तल्प विभज्या खोडाच्या किंवा मुळाच्या टोकाशी सतत कोशिकांचे विभाजन व तज्जन्य नवीन ऊतकांची निर्मिती झाल्याने त्यातील तीन भागांपैकी केंद्रवर्ती भाग, त्यापासून वनस्पतीतील पक्व भागात भेंड, निकाष्ठ किरण व मध्यत्वचा, अंतस्त्वचा इत्यादी मौलिक ऊतके बनतात. meristem

ground respiration
मूलश्वसन जमिनीत असणाऱ्या मुळांचा श्वासोच्छ्वास, याचा खनिजांच्या शोषणाशी संबंध नसतो. g.water भूजल, मृ्ज्जल जमिनीच्या खालच्या थरात निसर्गतः मातीने धरुन ठेवलेले पाणी. या भूजलाच्या पृष्ठभागाला भूजल प्रतल म्हणतात. पहा water table.

ground tissue
तल्पोतक अपित्वचा, वल्क, वाहक ऊतके इत्यादी विशिष्ट ऊतकाखेरीज वनस्पतीतील इतर व आधारभूत मृदूतकांचा संच, यामध्ये मध्यत्वचा, निकाष्ठ (भेंड), निकाष्ठ किरण इत्यादींचा अंतर्भाव होतो.

ground vegetation
निम्नस्तर (भूस्तर) वनश्री वनातील सर्वात खालचा (जमिनीजवळचा) वनस्पतींचा थर

group
गट, समूह अनेक सारख्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थ, ऊतके, उपांगे, जाती, वंश इत्यादींचा एकत्र संच

growing point
वर्धनाग्र, वर्धिष्णु अग्र, वर्धी अग्र सतत वाढ चालू असलेले वनस्पतींच्या अवयवांचे टोक apex

growing zone
वर्धी क्षेत्र वनस्पतींच्या अवयवांची प्रत्यक्ष लांबीत वाढ होत असलेला भाग. उदा. खोड, मूळ व शाखआ यांची टोके किंवा तळभाग इ.

growth
वृद्धि, वर्धन, वाढ नवीन कोशिकांची निर्मिती होऊन किंवा असलेल्या कोशिकांच्या आकारमानात वाढ होऊन अवयवांची आकाराने व संख्येने कायम वाढ होण्याची प्रक्रिया, बीज रुजताना या दोन्ही क्रिया घडून येतात.

growth curvature
वृद्धिवक्रता वाढ चालू असताना येणारा वाकडेपणा g.engyme वृद्धि वितंचक वाढीला चालना देणारे वितंचक पहा engyme e.form (life form) वृद्धि रुप केवळ शरीराच्या विस्तारावरून बनविलेली वर्णनात्मक संज्ञा उदा. वृक्ष, क्षुप, औषधी इ. g.hormone वृद्धि संप्रेरक पहा hormone

growth inhibiting
वृद्धिरोधक वाढीस प्रतिबंध करणारा किंवा वाढीचा वेग मंद करणारा व कोशिकांत बनविला जाणारा (पदार्थ). g. limiting वृद्धिमर्यादक, वृद्धिनियंत्रक वाढीला मर्यादा घालणारा अथवा वाढीचे नियमन करणारा (घटक).

guard cell
रक्षक कोशिका पानावरील त्वग्रंधाची (सूक्ष्म छिद्राची) उघडझाप करण्याबद्दल जबाबदार असलेली बहुधा अर्धचंद्राकृती हरितद्रव्ययुक्त कोशिका, ह्यांची जोडी असते. क्वचित हिरव्या खोडावर, देठावर व किंजपुटावर या कोशिका आढळतात. stoma

gum
गोंद, डिंक

gummosis
डिंक्या रोग, गोंद रोग खोड किंवा फांद्या यामधून डिंकासारख्या चिकट द्रव पदार्थाचा स्त्राव चालू असण्याचा प्रकार

gutta
थेंब, ठिपका, तैलबिंदु (drop)

guttate
अश्रुवत्, बिंदुयुक्त ठिपकेदार, उदा. गोलदार वृक्ष (Sterculia guttata Roxb.) spotted

guttation
निस्यंदन पानांतून अथवा तत्सम अवयवांतून पाण्याचे थेंब निसर्गतः गळून पडण्याचा प्रकार, रात्रीच्या थंड हवेत बाष्पोच्छवासाच्या अभावी हा प्रकार घडून येतो, उदा. गवते, अंजनवेल, ट्रोपिओलम, इत्यादी यांमध्ये जलस्त्रावक ऊतके व जलरंधे यांचा संबंध येतो. hydathode,

Guttiferae
वृंदार (कोकम) कुल, गटिफेरी (क्लुसिएसी) सुरंगी, कोकम, नागचाफा, आमली, ऊंडी (पुन्नाग), ओट इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश कोकम (वृंदार) गणात (गटिफेरेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- पिवळट किंवा हिरवट चीक असलेले वृक्ष किंवा झुडपे, पाने साधी,

gymno-
नग्न-, प्रकट-, अनावृत- उघडे (आवरण नसलेले) या अर्थाचा ग्रीक उपसर्ग g. carpous नग्नफली, प्रकटफली, अनावृतफली १ परिदलाशी जोडून नसलेल्या फलावरणांनी युक्त २ लव किंवा केस नसलेल्या फळांची (वनस्पती) ३ बीजुके पक्व होत असताना बीजुकोत्पादक थर उघडा असलेले (कवक). g.

Gymnospermae
प्रकटबीज वनस्पति उपविभाग, जिम्नोस्पर्मी ज्यांची बीजे किंजपुटात (भावी फळात) बंदिस्त नसून किंजदलावर उघडीच असतात अशा सापेक्षतः प्रारंभिक बीजधारी वनस्पतींचा उपविभाग. प्रमुख लक्षणे- काही जीवाश्मरुपात व काही विद्यमान वनश्रीत आढळतात. लघुबीजुकपर्णे व गुरुबीजुकपर्

Gynaecium
किंजमंडल, स्त्री केसर मंडल फुलातील सर्वात आतील महत्त्वाचे बीजोत्पादक पुष्पदलांचे (किंजदलांचे) वर्तुळ, किंजदलावरील बीजकात स्त्री गंतुक (अंदुक) असल्याने या सर्वच भागाला स्त्रीलिंगी (स्त्री केसर) समजतात   carpel, ovule, ovary  gynoecium, pistil

gynandromorph
पुं-स्त्रीरुप, पुंजायरुप नर वनस्पतीसारखी दिसणारी स्त्री वनस्पती (मादी वनस्पती).

Gynandrophore
किंजकेसरधर (किंकेधर) किंजदले व केसरदले यांना आधारभूत असा फुलातील अक्षाचा लांबट भाग (दांडा), उदा. पांढरी तिळवण androgynophore

Gynandrous
किंजकेसरित किंजदलाला केसरदले चिकटलेली असण्याचा प्रकार, उदा. आमर पुष्प (ऑर्किड)

gynobasic
किंजतलोद्गामी किंजलाचा तळ किंजपुटाच्या तळाशी असून किंजपुट पुष्पस्थलीमध्ये असण्याचा प्रकार उदा. तुळस, दीपमाळ, बुरुंबी इ.

gynophore
किंजधर किंजदलांना आधार देणारा फुलातील केसरमंडलातून वाढलेला अक्ष, उदा. वाघाटी, पांढरी तिळवण, मुचकुंद इ.

gynospore
गुरुबीजुक, बृहत्बीजाणु megaspore.

gynostemium
किंजकेसराक्ष किंजमंडल व केसरमंडल यांचा संयुक्त व संक्षिप्त अक्ष उदा. आमरे (ऑर्किड), पोपटवेल, सापसंद इ.

gyrate
अवसंवलित, चक्राकृति, अग्रवलित circinate.

gyrose
नतोन्नतपृष्टी, तरंगितपृष्ठी नागमोडी रेषा किंवा कंगोरे यांनी भरलेला पृष्ठभाग असलेला (अवयव).

habit
१ रीति २ बाह्यरुप १ वृत्ति, वर्तन अथवा आहारविषयक सवय, उदा. जीवोपजीवी, स्वोपजीवी २ बाहेरून दिसणारी शारीरिक रुपरेखा (स्वरुप), उदा. गुच्छाकृती, चवरीसारखे, उशीसारखे, सरपटणारे, चढत जाणारे, वृक्ष, क्षुप, औषधी इ.

habitat
अधिवास, निवासक्षेत्र वनस्पती जेथे निसर्गतः फुलते, वाढते, प्रजोत्पादन करते असे ठिकाण, उदा. दाट वन, कुरण, खडकाळ किंवा रेताड मरुप्रदेश, समुद्रतट, जलाशय इ.

hadrocentric
मध्यप्रकाष्ठक, केंद्रकाष्ठिक

hadrocentric bundle
मध्यप्रकाष्ठक वृंद मध्ये प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असलेला वाहक ऊतकांचा संच, उदा. नेचाची तिरश्वर शाखा concentric bundle

hadrome
प्रकाष्ठ, काष्ठ वाहक वृंदातील काष्ठयुक्त वाहकांचा भाग, विशेषतः पाण्याची ने आण करणारा घन आवरणाच्या मृत कोशिकांचा (ऊतकाचा) भाग xylem  xylem

haematoxylin
हीमॅटॉक्सिलीन गर्द तांबूस रंगाचे द्रव्य, एका वनस्पतीच्या (Haematoxylon campechianum L.) मध्य काष्ठापासून काढलेले असून त्याचा उपयोग सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षणाकरिता करतात.

hair
केश वनस्पतींच्या शरीरावर अपित्वचेपासून वाढणारे भिन्न प्रकारचे केस, हे एककोशिक, अनेककोशिक, मऊ, राठ, दाहक, संरक्षक, प्रपिंडीय इ. विविध प्रकारचे असतात. उदा. कापसाचे धागे

hair shaped
केशाकृति केसासारखे बारीक व लांब

hairiness
केशालुत्व, केसाळपणा

hairy
केशालु, केसाळ, रोमिल

halbert-rhaped
तोमराकृति भाल्याच्या आकृतीचे उदा. हरणखुरीचे पान, त्रिकोनी व तळाकडील दोन कोनांची टोके बाहेरच्या बाजूस वळलेली hastate

half (semi) cylindric
अर्धचितीय ईक बाजू सपाट व दुसरी अर्धगोलाकार अशा आकाराचा लांबट (अवयव), उदा. कित्येक पानांचे देठ, काही पाती, उदा. कोरफड

half bred
संकरज cross breed  hybrid

half equitant
अर्धारुढ semi-equitant

half inferior
अर्धाधःस्थ संवर्ताच्या नलिकेत किंजपुट अर्धवट सुटा असून त्या सभोवार पाकळ्या व केसरदले असलेला किंजपुट

half moon shaped
अर्धचंद्राकृति अर्ध्या चंद्राप्रमाणे आकाराचे, उदा. कृष्णकमळाच्या एका जातीचे, तसेच एका नेचाच्या जातीचे पान (Adiantum lunulatum) lunate, crescent shaped

haliplankton
समुद्रप्लवक समुद्रातील सजीवांचा तरता व पृष्ठाचा आसपासचा समूह.

halobiontic
लवणांबुवासी. फक्त खाऱ्या पाण्यातच राहणारी (वनस्पती).

halophilous
लवणप्रिय मिठाशिवाय इतर क्षार असलेल्या किंवा खारट जमिनीत विशेषेकरून वाढणारी (वनस्पती), माचुरा, कांकरा, चिप्पी, तिवार, कांदळ इत्यादी समुद्रकिनारी वाढणारी झाडे

halophobous
लवणद्वेष्टी, लवणविरोधी क्षारमुक्त किंवा खारट जमीन टाळणारी (वनस्पती) halophobe

halophyte
लवण वनस्पति क्षारयुक्त (विशेषतः खारट) पाण्याच्या सान्निध्यात वाढणारी वनस्पती, पीलू, केवडा, ऊंडी, नारळ इत्यादी आणि वर उल्लेखिलेल्या लवणप्रिय वनस्पती, सागरशैवले

hand microtome
हस्त सूक्ष्मछेदक हाताने चालविता येणारे, सूक्ष्म छेद घेण्याचे यंत्र

handle cell
हस्तक कोशिका, मुष्टि कोशिका कांडशरीरिका शैवलाच्या रेतुकाशयाच्या (पुं- जननेंद्रियाच्या) बाहेरील आवरणातील आधारभूत कोशिकांपैकी एक Characeae. manubrium

hanging root
पारंबी झाडाच्या शाखेपासून निघून खाली लोंबणारे व पुढे जमिनीत खोलवर घुसून आधार देणारे मूळ, उदा. वड

haploid
एकगुणित प्रजोत्पादक कोशिकेच्या प्रकलातील रंगसूत्रांची एकपट संख्या, इतर कोशिकात ही संख्या दुप्पट असते. बहुतेक सर्व गंतुकधारी पिढीत एकपट व बीजुकधारी पिढीत ती दुप्पट (संख्या) असते व बीजुके तयार होताना ती संख्या पुन्हा एकपट होते. diploid

haploidization
एकगुणन कोशिकेतील रंगसूत्रांची संख्या दुप्पट असताना, ती एकपट होण्याची प्रक्रिया, अर्धसूत्रण

haploidy
एकगुणितत्त्व एकगुणित रंगसूत्रे असण्याचा प्रकार

haplophase
एकगुणितावस्था haploid  gamophase

haplophase
एकगुणितावस्था haploid  gamophase

hapteron
दृढधर बहुकोशिक पण वाहक ऊतके नसलेला आणि चिकटून राहण्यास उपयुक्त असा अवयव उदा. फ्यूकस शैवल holdfast

haptogropism
स्पर्शानुवर्तन खडबडीत पृष्ठभागाच्या स्पर्शाच्या चेतनेमुळे वेटाळत वाढण्याची प्रतिक्रिया, उदा. अमरवेल, प्रतान, मोरवेलीची देठे, कित्येक वेलींची टोके

haptostele
प्रथमाद्यरंभ मध्ये प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असा सममध्य वाहक संच असलेला अत्यंत साधा व अतिप्राचीन वाहक वनस्पतींत आढळणारा रंभ उदा. ऱ्हिनिया stele

haptotropic
स्पर्शानुवर्तनी स्पर्शामुळे घडून येणारी वाढ दर्शविणारे (अवयव)

hard bast
उपकाष्ठ परिकाष्ठाच्या सूत्रल (घनकोशिकायुक्त) भाग phloem, bast

hastate
प्रशराकृति, तोमराकृति halbert shaped

haulm
संधिखोड सांधेदार खोड culm

haustorium
शोषक आश्रय वनस्पतींतून अन्न शोषून घेण्याचा जीवोपजीवी वनस्पतीचा लहान मुळासारखा रुपांतरित अवयव उदा. अमरवेल, बांडगूळ

head
१ स्तबक २ शीर्ष १ पहा capitutum २ टोकाचा भाग h. cell शीर्ष कोशिका कारा (या नावाच्या) शैवल वनस्पतीतील रेतुकजनक तंतूंच्या तळाशी असलेली कोशिका, यामध्ये प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकार आहेत.

heart shaped
हृदयाकृति cordate

heart wood
मध्यकाष्ठ खोडातील भेंडाभोवती (केंद्रवर्ती) असलेला सर्वात जून व मृत लाकडाचा भाग duramen

helicoid
शुंडी गोगलगाईच्या शिंपल्याप्रमाणे वेटोळे असलेला (फुलोरा अथवा शाखांची मांडणी), सोंडेप्रमाणे h.cyme (bostryx, depranium) वक्रवल्लरी, शुंडी फुलोऱ्यातील अक्षाच्या एकाच बाजूस पण भिन्न पातळीत नवीन अक्ष येऊन आणि दरवेळी त्यावर टोकास आलेल्या फुलांमुळे वाढ थांबून

heliophilous
प्रकाशप्रिय भरपूर सूर्यप्रकाशात वाढणारी (वनस्पती), उदा. सूर्यफूल, एरंड, गुलाब, निंब, आंबा, नारळ इ.

heliophobous
प्रकाशद्वेष्टी प्रत्यक्ष सूर्यप्रकाश टाळणारी, नेचे, सिलाजिनेला इ.

heliophyte
प्रकाशप्रिय वनस्पति

heliotactic
प्रकाशानुचलनी प्रकाशाच्या चेतनेनुसार होणाऱ्या शरीरांतर्गत प्रक्रियेमुळे त्याकडे किंवा त्याविरुद्ध दिशेकडे (अनुक्रमे धन व ऋऋण) स्थानांतर करणारी वनस्पती किंवा घडणारी (हालचाल), उदा. स्वतंत्र व चलनशील वनस्पती (शैवले) अथवा त्यांचे सुटे भाग (बीजुके, गंतुके इ.)

heliotaxis
प्रकाशानुचलन वर वर्णन केलेली स्थानांतराची प्रक्रिया, उदा. हरित्कणु, सूक्ष्मजंतू

heliotropic
प्रकाशानुवर्तनी प्रकाशाच्या दिशेला किंवा दिशेविरुद्ध वाढत वळणारा (वनस्पतीचा अवयव), खोडाची व मुळाची टोके

heliotropism
प्रकाशानुवर्तन, सूर्यावर्तन वर वर्णन केल्याप्रमाणे वाढण्याची प्रक्रिया (प्रतिक्रिया) apheliotropism

helmet shaped (galeate)
स्फटाकृति पोकळ व अर्ध्या कमानीसारखे, उदा. अतिविषाच्या फुलातील पाकळीसारखे संदल hooded

helophyte
आर्द्रप्रिय वनस्पति दलदलीत वाढणारी वनस्पती, उदा. पाणकणीस, लव्हाळा, अळू, एक्किसीटम, जलनेचे, शिंगाडा

helotism
दास्यत्व धोंडफुलातील कवक व शैवल यांच्या परस्परसंबंधात कवक हे आश्रित व शैवल आश्रय असा संबंध ध्वनित करणारी संज्ञा, वास्तविक तो परस्परावलंबनाचा (सहजीवनाचा) एक प्रकार आहे Lichen

hemi cryptophyte
अर्धगूढपादप, अर्धगूढ कलिकोद्भिद जमिनीच्या पृष्ठालगत अनेक वर्षे राहणारा पोषक (शाकीय) अवयव आणि कळ्या असणारी वनस्पती, यावर अनेकदा पालापाचोळ्याचे आवरण असते.

hemi-
अर्ध निम्मेपणा दाखविणारा उपसर्ग

Hemibasidii
अर्धगदाकवक उपवर्ग, हेमिबेसिडी गदाकवक वर्गातील तांबेरा व काणी या दोन गणांचा समावेश असलेला गट, यामध्ये विशिष्ट विश्रामी बीजुकाच्या अंकुरणानंतर गदाकोशिका बनते. h. cellulose अर्धतूलीर, हेमी सेल्युलोज कोशिकावरणातील एक कार्बाएहायट्रेट संचित पदार्थ उदा. खारकेचे

hemicarp
फलांश, अंशफल mericarp

hemiparasite
अर्धजीवोपजीवी semiparasite, semisaprophyte

hepaticae
यकृतका वर्ग, हिपॅटिसी शेवाळी (बायोफायटा) विभागातील तीन वर्गापैकी एक. या वनस्पतींचे शरीर पानासारखे सपाट, साधे व जमिनीवर केसासारख्या मुळांनी चिकटलेले, क्वचितच साधे खोड व साधी सूक्ष्म पाने असलेले व अंतर्रचनेत भिन्न ऊतकांनी भरलेले असते. प्रजोत्पादक इंद्रिये ब

herb
औषधी लहान, मऊ, वर्षापेक्षा बहुधा जास्त न जगणारी, पण जगल्यास जमिनीवर कायम काष्ठयुक्त खोड नसलेली वनस्पती. उदा. सूर्यफूल, मका, कोबी, डेलिया, झेंडू इ.

Herbaceae
औषधीय उपवर्ग, हर्बेसी द्विदलिकित वनस्पतींच्या वर्गातील गट, हचिन्सन यांनी येथे सर्व औषधी आणि त्यांपासून विकास पावलेल्या झुडपांचा समावेश केला आहे.

herbaceous
औषधीय वर वर्णन केल्याप्रमाणे (खोड अथवा वनस्पती), उदा. काकडीचा वेल, गुलबुश

herbage
पल्लव वनस्पतीचे शाकीय भाग

herbal
औषधी ग्रंथ, पादप कोश सर्व तऱ्हेच्या वनस्पतींची विविध माहिती संकलित करून देणारा जुन्या पाश्चात्य पद्धतीचे ग्रंथ, उदा. जॉन जेरार्डचा ग्रंथ

herbalist
औषधी ग्रंथकर्ता, पादपकोशकर्ता वर वर्णन केल्याप्रकारच्या ग्रंथाचा लेखक (संकलन, संपादक)

herbarium
वनस्पतीसंग्रह अभ्यासाच्या सोयीकरिता विविध प्रकारे जमवून ठेविलेल्या वनस्पतींचा साठा, व्यापकप्रमाणात हल्ली सजीव वनस्पतींचे संवर्धन व संशोधन अशा संस्थेत केले जाते.

herbivorous
वनस्पत्याहारी, शाकाहारी केवळ वनस्पती (गवते, पाचोळा, तण, फळे इत्यादी) खाऊन राहणारे (प्राणी), उदा. काही पक्षी, गाईबैल,मेंढ्या, घोडे, हत्ती इ. मनुष्यांपैकी काही फक्त वनस्पतिज पदार्थ खाऊन जगतात त्यांना शाकाहारी म्हणतात.

hercogamy
विष्कंभयुति संरचनेतील विशेषत्वामुळे स्वयंफलन न होऊ देणारी योजना. उदा. सूर्यफुलातील केसरदले व किंजदले यांच्या पक्व होण्याच्या भिन्न वेळा व ऊंचीतील फरक, कळलावीच्या फुलातील या दोन अवयवांचे स्थान h. half अर्ध विष्कंभयुति जमल्यास परफलन, पण ते न जमल्यास निदान

hereditary
आनुवंशिक वंशपरंपरेने आलेले (लक्षण), संपादित नसलेले, उदा. पुष्पगंध, पुष्पसंरचना h. symbiosis आनुवंशिक सहजीवन जनक वनस्पतींच्या ऊतकातून (बीजुक, बीज) काही जंतू किंवा कवक संततीच उतरण्याचा प्रकार

heredity
आनुवंशिकता आईबापापासून व काही प्रमाणात इतर पूर्वजांकडून संततीत कमीजास्त प्रमाणात लक्षणे उतरण्याची प्रवृत्ती व त्यामुळे दिसणारे साम्य, ह्या प्रक्रियेत होणाऱ्या काही घटनांमुळे काही लक्षणांत फरक पडून संततीस वेगळेपणा येतो अथवा नवीन लक्षणे प्राप्त होतात.

heritability
अनुहर्यत्व एका पिढीतून दुसरीत उतरण्याची लक्षणांची शक्यता (क्षमता)

heritable
अनुहर्य एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरणारे (लक्षण), सर्वच आनुवंशिक लक्षणे किंवा वंशपरंपरा चालू ठेवले जाणारे लक्षण (गुण, दोष) germinal, congenital, aquired

hermaphrodite
उभयलिंगी, द्विलिंगी चिन्ह ४ + केसरदले व किंजदले असलेले (फूल). दोन्ही लिंगभेद दर्शविणारी इंद्रिये असणारी गंतुकधारी पिढी (उदा. काही शैवले, शेवाळी इ.) पहा bisexual, monoclinous, perfect

hesperidium
जंबीरसम, नारंगक नारिंगासारखे फळ, अनेक जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलापासून बनलेले, अनेक कप्प्यांचे, रसाळ केसांनी भरलेले व चिवट सालीचे मृदुफळ, उदा. लिंबू, पपनस इ.

hetero carpous
विषमफली एकापेक्षा अधिक प्रकारची फळे निर्मिणारी (वनस्पती). h. chlamydeous विषमपरिदली संवर्त व पुष्पमुकुट स्पष्टपणे भिन्न असलेले (फूल) उदा. जास्वंद, गुलाब. h. gametic विषमगंतुकी, विषमयुग्मकी दोन प्रकारची नर गंतुके (पुं-गंतुके) किंवा स्त्री गंतुके निर्मिणारी

hetero-
असम-, विषम ग्रीक भाषेमध्ये, भिन्न अथवा अनित्य या अर्थाचा उपसर्ग

heterochromosome
असमरंगसूत्र, विषमरंगसूत्र नर व मादी यांच्या शरीरातील लिंगविषयक किंवा अन्य प्रकारे फरक पडलेले रंगसूत्र

heterochromous
असमवर्णी, विषमवर्णी एकाच फुलोऱ्यातील काही फुले एका रंगाची व इतर दुसऱ्या रंगाची असण्याचा प्रकार, उदा. कॉसमॉस, ऍस्टर, डेलिया, इत्याईदंचे स्तबक फुलोरे. बुगनवेलियाचा एक प्रकार

heterocotylous
असमदलिकित दोन्ही दलिका सारख्या नसलेले (बी)

heterocotylous
असमदलिकित दोन्ही दलिका सारख्या नसलेले (बी)

heterocyst
असमकोष्ठ इतराहून भिन्न (मोठी, पारदर्शक, जिवंत व दुहेरी आवरणाची) शैवल कोशिका, उदा. नीलहरित शैवले

heteroecious
अनेक (बहुधा दोन) आश्रयावर वाढणारी (उपजीविका करणारी, वनस्पती), उदा. तांबेरा गहू व दारुहळद या आश्रयावर आळीपाळीने वाढते. autoecious

heteroecism
अनेकस्थता, भिन्नाश्रयता वर वर्णन केलेला प्रकार

heterogamous
१ भिन्नपुष्पकी २ विषम गंतुकी १ दोन प्रकारची (उभयलिंगी व एकलिंगी किंवा वंध्य) फुले असणारे स्तबक अथवा तो फुलोरा धारण करणारी वनस्पती उदा. सूर्यफूल, झिनिया, गोरखमुंडी, शेवंती, दवणा इ. २ भिन्न गंतुके (स्त्री व नर) असलेली (वनस्पती)

heterogamy
१ असमयुति २ विषमगंतुकत्व ३ पुष्पविविधता १ दोन भिन्न गंतुकांचा संयोग २ दोन प्रकारची (पुं. व स्त्री) गंतुके असण्याचा प्रकार ३ नर व स्त्री पुष्पांच्या कार्याचा अथवा मांडणीचा बदल isogamy

heterogeneity
असमजनन १ पहा alternation of generations, abiogenesis, २ कळ्यातील भेदांमुळे किंवा निसर्गलीलेमुळे झालेली निर्मिती

heterogeneity
असमजनन १ पहा alternation of generations, abiogenesis, २ कळ्यातील भेदांमुळे किंवा निसर्गलीलेमुळे झालेली निर्मिती

heterogenetic
असमजनित परफलनामुळे झालेले h. variation असमजनित भेद परफलनामुळे उद्भवलेले बदल

heterogenous
नैकविध विविधतापूर्ण (वैचित्र्यपूर्ण) असणारे, एकविध (एकरुप) नसलेले

heteromerous
१ असमभागी २ स्तरित १ पहा heterocyclic २ भिन्न थरांचे बनलेले, उदा. धोंडफुलातील शैवल आणि कवक यांची स्वतंत्र थरयुक्त मांडणी असलेले शरीर homoimerous

heteromorphic
असमरुपी, विषमरुपी अनित्य संरचना असलेले किंवा विकृतियुक्त, अवयवातील भिन्नत्व दर्शविणारे dimorphic  heteromorphous

heteromorphism
असमरुपता, विषमरुपत्व वर वर्णन केलेली लक्षणे असण्याचा प्रकार

heterophyllous
विषमपर्णी भिन्न माध्यमात (पाणी व हवा) असलेल्या खोडाच्या भागंआवर भिन्न प्रकारची पाने असणारी (वनस्पती). उदा. कमळ, शिंगाडा, अतिविष (Aconitum heterophyllum Wall).

heterophylly
विषमपर्णत्व वर वर्णिलेला प्रकार

heteroplasy
अनित्यवृद्धि जखमेमुळे त्यानंतर तेथे होणारी अनित्य वाढ उदा. गाठ, फोड इ.

heteroprothally
विषम पूर्वकायकत्व नर व स्त्री गंतुकधारी (पूर्वकायक) अलग असण्याचा प्रकार उदा. सिलाजिनेला, एक्किसीटम unisexual, dicliny

heterosis
संकरज (संकर) ओज दोन सापेक्षतः शुद्ध प्रकारातील वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या संततीत एकत्र आलेल्या व आकारमान आणि जोम याशी संबंधित अशा अनेक जनुकांच्या श्रेणीच्या संमिश्र परिणामामुळे आढळून येणारे विशेषत्व in breeding  hybrid vigour

heterospermy
असमबीजत्व एकाच वंशातील काही जातीत सपुष्क व काहीत अपुष्क बीजे असण्याचा प्रकार. उदा. मोरस (Morus)

heterosporous
असमबीजुक नर व स्त्री गंतुकधारी निर्माण करणारी दोन (लघु व गुरु) प्रकारची बीजुके प्रसवणारी (वनस्पती), उदा. सिलाजिनला, आयसॉएटिस, काही जनलेचे (सालव्हीनिया)

heterospory
असमबीजुकत्व दोन प्रकारची बीजुके निर्माण करण्याचा प्रकार (क्षमता).

heterostyly
भिन्न किंजलत्व एकाच जातीत भिन्न उंचीची किंजले असणारी फुले असण्याचा प्रकार, उदा. कदंब कुल, आंबुशी, प्रिम्यूला

heterothallic
विषमजालकित, विषमकायिक नर व स्त्री अशी दोन प्रकारची गंतुके भिन्न कायकावर किंवा तंतूमय शरीरावर असणारी वनस्पती, उदा. म्यूकर बुरशी, काही शैवले, शेवाळी इ. homothallic

heterothallism
विषमजालकता, विषमकायिकता वर वर्णन केलेला प्रकार homothallism

heterotrophic
परोपजीवी इतर सजीव किंवा मृत शरीरावर उपजीविका करणारी (वनस्पती), उदा. बुरशी, सूक्ष्मजंतू, कवक इ. autotrophic

heterotropism
परोपजीवन, परोपजीविता वर वर्णन केलेला प्रकार

heterotropous
तिर्यङमुख  amphitropous

heterotypic division
विषमविभाजन कोशिकांच्या विभाजनात द्विगुणित रंगसूत्रांच्या संख्या विभागणीने संपूर्ण सारख्या जनुकांचे नसलेले व एकपट (एकगुणित) संरचनेचे दोन संच बनण्याची प्रक्रिया meiosis, homotypic division

heterozygosis
विषमरंदुकत्व खाली वर्णिलेला प्रकार

heterozygote
विषमरंदुक दोन वैकल्पिक भिन्न लक्षणे (जनुके) असलेल्या गंतुकांच्या संयोगाने बनलेली संयुक्त कोशिका, यापासून होणाऱ्या संततीत लक्षणांचा संकर आढळतो allelomorphic pair of characters

heterozygous
विषमरंदुकी विषमरंदुकता असलेले

hexacyclic
षट्चक्रीय सहा मंडलाचे (फूल), संवर्त व पुष्पमुकुट यंआची मिळून चार किंवा केसरदलांची दोन अथवा तीन मंडले व इतरांची अनुक्रमे चार किंवा तीन अशी एकूण सहा

hexagonous
षट्कोनी सहा धारा असलेले (खोड, बी किंवा फळ)

hexamerous
षट्भागी प्रत्येक मंडलात सहा पुष्पदले असलेले फूल

hexandrous
षट्केसरी, षट्पुंकेसरी

hexandry
षट्केसरत्व फुलात सहा केसरदले असण्याचा प्रकार, उदा. मोहरी, नागदवणा

hexapetalous
षट्प्रदली सहा पाकळ्या असलेले (फूल), उदा. हिरवा चाफा

hexaploid
षट्गुणित रंगसूत्रांची सहापट संख्या असलेली (वनस्पती)

hexarch
षट्सूत्र, षडादिकाष्ठ आदिप्रकाष्ठाचे सहा गट असलेला रंभ stele

hibernal aspect
शिशिर दृश्य, शिशिर प्रभाव हिवाळ्यात आढळणारे वनस्पति समुदायाचे स्वरुप hiemal

hibernation
शीत निष्क्रियता, ग्रीष्मनिद्रा हिवाळ्यातील सुस्ती अथवा निष्क्रियता, काही झाडांची पाने गळून पडल्याने खोड व फांद्या यांचे क्रियाशीलत्व तात्पुरते थांबलेले आढळते, उदा. खैर, काटेसावर, रामफळ इत्यादींची पाने गळतात. शीतकटिबंधात प्रखर थंडीत हा प्रकार विशेषेकरून आढळतो. भूमिगत खोड किंवा बीजस्वरुपातही अशीच निष्क्रीयता आढळते.

hilum
१ नाभि २ कणकेंद्र ३ परागकेंद्र १ बीजक जेथे बीजबंदास अथवा बीजकाधानीस चिकटलेले असते तेथे त्यावर पडलेला वण २ तौकीर पदार्थांचे थर कणातील ज्या बिंदूभोवती बनतात तो बिंदू, यालाच कोणी locus म्हणतात ३ परागकणाचे छिद्र

hippocrepiform
अश्वक्षुराभ, अर्धवर्तुळाकृति घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेला, उदा. गर्भ, परागकोश.

hirsutus
दीर्घकेशी, दीर्घरोमी लांब व विरळ केसाचे उदा. गजकर्णी (Rhinacanthus hirsuta Kurg). (hirsute)

hispid
राठकेशी, दृढरोमी राठ किंवा ताठर केस असलेले, उउदा. भोपळीचा वेल, Acalypha hispida Burm शोभेचे झुडुप

histogenesis
ऊतकजनन, ऊतिजनन ऊतकांचा उगम व निर्मिती आणि त्यांचा विकास

histology
सूक्ष्मशारीर, ऊतकविज्ञान सूक्ष्मदर्शकांच्या साहाय्याने केला जाणारा वनस्पतींच्या (किंवा प्राण्यांच्या) शरीरांच्या संरचनेचा अभ्यास अथवा त्यासंबंधीच्या माहितीची शाखा

hoary
पलित भुरकट, पांढरट व दाट लव असलेले

holandric
य रंगसूत्री, वाय रंगसूत्री. य रंगसूत्र असलेले. Y chromosomal

hold fast
दृढबंध आधाराला घट्ट धरुन ठेवून स्थिरत्व देणारा चकतीसारखा अवयव, उदा. शैवले, शैवाक (धोंडफूल), hapteron

hollard
पूर्ण जलांश जमिनीतील पाण्याचा पूर्णांश

hologamy
प्रकलसंयोग गंतुकातील प्रकलांचा संयोग

holoparasite
पूर्ण जीवोपजीवी अन्य सजीवावर पूर्णपणे आपले पोषण करणारी (वनस्पती), उदा. अमरवेल, तांबेरा, काणी

holophytic
पूर्ण स्वोपजीवी, पादपसमभोजी संपूर्णपणे स्वावलंबनाने पोषण करणारी

holophytism
पूर्ण स्वोपजीवन संपूर्णपणे स्वावलंबी असलेले जीवन

holosaprophyte
पूर्ण शवोपजीवी (मृतोपजीवी) saprophyte

holotype
मूलस्वरुप ज्यावरुन प्रथम वर्णन लिहिले गेले तो मूळच्या वनस्पतीचा एकमेव नमुना किंवा तिचा अन्य अवयव. allotype

homo chlamydeous
समपरिदली संदले व प्रदले असा फरक नसलेले (फूल) उदा. कमल कुल  h. gametic समगंतुकी, समयुग्मकी एकाच प्रकारटची नर (पुं-) किंवा स्त्री गंतुके निर्मिणारी (अनुक्रमे नर किंवा स्त्री व्यक्ती), उदा. काही पक्षी व मासे यांमध्ये नर समगंतुकी व माद्या विषमगंतुकी असतात.

homo-
सम- सारखेपणा दर्शविणारा ग्रीक भाषेतील उपसर्ग

homochlamydeous
समपरिदली सर्व परिदले सारखी असलेले (फूल), संवर्त व प्रदले यात फरक नसतो. उदा. निशिगंध, कुमूर, नागदवणा

homocyclic
समचक्रीय, समवलयी सर्व पुष्पदलांची मंडले दलसंख्येने सारखी असलेले (फूल) उदा. नारळ, धोत्रा.

homoeomerous
अस्तरित, संमिश्र भिन्न स्तर नसलेले, काही धोंडफुलाच्या संरचनेत शैवल व कवक यांचे मिश्रण असलेले (शरीर, कायक)

homogamy
१ समपक्कता २ समयुति १ एकाचवेळी पूर्ण फुलातील पराग व किंजल्क पक्क होऊन कार्यक्षम असण्याचा प्रकार, उदा. धोत्रा २ सारख्या गंतुकांचा संयोग

homogeneous
एकविध एकजिनसी, एकाच प्रकारचे अथवा गुणधर्माचे, विविधता नसलेले.

homologous
१ समजात, सजातीय २ समरचित, समजातीय १ वरकरणी भिन्न वाटले तरी मूलतः एकाच प्रकारचे, सारख्याच मूलभूत संरचनेचे, उदा. संदले व प्रदले, प्राण्यातील काही अवयव, उदा वाघळाचे पंख व व्हेल माशाचे (देवमाशाचे) पर २ संततीमध्ये माता व पिता यांच्याकडून आलेल्या व तत्त्वतः समान लक्षणांबद्दल जबाबदार असलेल्या रंगसूत्रांच्या एका जोडीपैकी प्रत्येक रंगसूत्र

homology
समजातता, सजातीयत्व मूलभूत सारखेपणा असण्याचा प्रकार, उदा. फड्या निवडुंगाचे खोड (पानासारखे दिसणारे) व त्रिधारी निवडुंगाचे खोड शास्त्रीय दृष्ट्या अक्ष, परंतु वरकरणी भिन्न आहेत. तसेच वाटाण्याची पानासारखी उपपर्णे, घोटवेलीचे ताणे व बोरीची काटेरी उपपर्णे यांचे स्वरुप भिन्न पण मूलतः तिन्ही पर्णतलाची उपांगे आहेत.

homoplasy
समवृद्धि, समतोविकास काही कारणाने होणाऱ्या अनित्य वाढीत पूर्वीप्रमाणेच नवीन भाग अंतर्भूत असण्याचा प्रकार

homosporangic
समबीजुक जनक एकाच प्रकारची बीजुके बनविणारी

homosporic
समबीजुकोद्भूत एकाच प्रकारच्या बीजुकापासून झालेली, उदा. (बहुतेक) नेचांचा पूर्वकायक (गंतुकधारी)

homosporous
समबीजुक सर्वच बीजुके सारखी असलेली (वनस्पती) उदा. अनेक नेचे heterosporous

homospory
समबीजुकत्व सर्व बीजुके सारखी असण्याचा प्रकार

homothallic
समजालकित, समकायिक प्रजोत्पादक लैंगिक अवयवांच्या निर्मितीच्या दृष्टीने एकाच प्रकारचे जालक (कलकतंतूंचे व शैवल तंतूंचे जाळे) अथवा कायक असलेली जाती उदा. काही कवक, शैवले, शेवाळी इ.

homothallism
समजालकता, समकायिकता गंतुकांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सारखे किंवा सामान्य तंतू किंवा कायक असण्याचा प्रकार heterothallism

homotypic division
समविभाजन कोशिकेच्या न्यूनीकरण विभाजनातील पहिल्या विषम विभागणीनंतरची रंगसूत्रांची संख्येबाबत सारखेपणा राखणारी दुसरी विभागणी, परिणामी आरंभीच्या द्विगुणित कोशिकेपासून चार एकगुणित कोशिका (बीजुके, रेतुके, अंदुके इ.) बनतात. heterotypic division meiosis, mitosis

homozygosis
समरंदुकत्व सारख्या प्रजोत्पादक कोशिकांच्या (गंतुकांच्या) संयोगाने रंदुक बनण्याचा प्रकार, खालील संज्ञा पहा.

homozygote
समरंदुक सारख्या (वैकल्पिक जनुकांच्या सारखेपणा असलेल्या) गंतुकांच्या संयोगापासून बनलेली संयुक्त कोशिका, अशा कोशिकेपासून संकरप्रजा निर्माण होत नाही heterozygote, allelomorphic pair of characters

homozygous
समरंदुकी वर वर्णन केलेल्याप्रमाणे समरचित रंगसूत्रांच्या जोडीतील प्रत्येकावर विशिष्ट स्थानी सारखीच जनुके असलेली व्यक्ती

honey
मध प्रथम मधमाश्यांनी शोषून घेऊन आपल्या पोवळ्यात साठविल्यावर पुढे मनुष्याने त्यातून काढून घेतलेला, फुलातील गोड रस (मधुरस) h. dew मधुबिंदु एका (अर्गट) रोगकारक कवक वनस्पतीने आपल्या बीजुकांच्या प्रसाराकरिता कीटकांना खाद्य म्हणून बनविलेला गोड रस h. guide

hood
स्फटा, फणा

hooded
स्फटाकृति, फणाकृति नागाच्या फडीच्या आकाराचा (अवयव), उदा. साल्व्हिया, तुळस, सब्जा इत्यादींच्या पुष्पमुकुटातील मोठी वरची पाकळी cucullate

hook
अंकुश टोकाशी आकड्यासारखे (गळासारखे, वक्र) मागे वळलेले उपांग उदा. हिरवा चाफा, वेत h. climber अंकुशलता अंकुशासारख्या उपांगानी किंवा अवयवांनी वर चढत जाणारी वेल, उदा वाघनखी h. sensitive संवेदी अंकुश स्पर्शग्राही व त्यानुसार प्रतिक्रिया दर्शविणारा अंकुशासारखा

hordein
होर्डाइन बार्लीत असणारे विशेष प्रकारचे प्रथिन

hormogonium
मालांश, मालाखंड नीलहरित शैवलांच्या तंतुयुक्त शरीराच्या अनेक कोशिकांचे माळेसारखे तुकडे, हे विशिष्ट (असमकोष्ठ) कोशिकांच्या साहाय्याने सुटे होऊन नवीन वनस्पती बनवितात उदा. नॉस्टॉक, ऍनाबीना इ. heterocyst

hormone
संप्रेरक, हॉर्माएन सर्व सजीवांच्या शरीरातील चयापचयामध्ये चालना देणारा व त्यातील विविध प्रक्रियांची गति कमीजास्त करणारा वितंचकासारखा कार्बनी पदार्थ, भिन्न प्रक्रियात भाग घेणारे संप्रेरक भिन्न असून त्यांपैकी काही विशिष्ट प्रपिंडातून स्त्रवतात व सर्व शरीरभर

Horned liverworts
शृंगका, शृंगी यकृतका Anthocerotae

hortensis
उद्यानविषयक, उद्यानवासी बागेतील किंवा बागेसंबंधी, उदा. आकाशनिंब (Millingtonia hortensis L.) हा वृक्ष बागेत शोभादायक म्हणून किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावतात.

horticulture
उद्यानविज्ञान बागेसंबंधी सर्व माहिती संकलन करणारी ज्ञान शाखा

hortus
बाग, उद्यान विशेष प्रकारे वाढविलेल्या निवडक वनस्पतींचा समूह

host
आश्रय दुसऱ्या सजीवास आधार अगर पोषण देणारा प्राणी अगर वनस्पती epiphyte, parasite

hull
१ तूस २ टरफल १ पहा glume २ पहा pericarp, epicarp

humus
कुजात, कुजकट पदार्थ जमिनीतील काळपट व कुजकट कार्बनी (वनस्पतिज व प्राणिज) पदार्थ, जमिनीच्या पोताशी व सुपिकतेशी याचा निकट संबंध असून त्यामुळे जमीन धुपून जात नाही. h.plant (saprophyte) शवोपजीवी वनस्पती मृत शरीरावर उपजीविका करणारी वनस्पती, उदा. कवकांपैकी काही

husk
तुष फोल, चौडे, सालपट, काही फळांचे अथवा बियांचे बाहेरचे आवरण, हे परिदले किंवा छदे यापासून बनलेले असते, उदा. गूजबेरी

hyaline
पारदर्शक पलीकडचे दर्शविणारे (उपांग अवयव इ.)

hyaloplasm
बाह्यप्राकल ectoplasm

hyalosome
अवर्णकणु रंगद्रव शोषून न घेणारा प्राकलातील सूक्ष्म कण

hybrid
संकरज अशुद्ध वंश, मिश्र प्रजा, जननिक दृष्टीने भिन्नता असलेल्या दोन जाती किंवा प्रकार यांच्यापासून जन्मलेले h.bisexual द्विलिंगी संकरज आई व बाप यांची लक्षणे (गुणदोष) मिश्र (जोड) स्वरुपात दर्शविणारी संकरप्रजा h. derivative साधित संकरज दोन संकरजांची अथवा एक

hybridisation
संकरण वर वर्णिलेली प्रक्रिया (कृति)

hybridise
संकर करणे कृत्रिमरित्या दोन भिन्न जातींत किंवा प्रकारात प्रजोत्पादन घडवून आणणे अथवा मिश्रप्रजा निर्माण करणे cross breed

hybridology
संकरविद्या संकरणासंबंधीची माहिती

hydathode
जलप्रपिंड शरीरातील अत्याधिक पाणी बाहेर टाकण्याची योजना (प्रपिंड) यामध्ये जलस्त्रावक ऊतक व जलरंध यांचा अंतर्भाव होतो, जलरंधाचा कधी अभाव असतो पण असल्यास त्याची संरचना पर्णरंधाप्रमाणे असून उघडझाक नसते. नेफोलेपिस नेचामध्ये टाकलेल्या पाण्यात चुना विरघळलेला असत

Hydnaceae
शूलकवक कुल सत्य गदाकवक उपवर्गातील व पटलकवक गणातील त्रिकोनी काट्यासारखा अवयवावर गदाकोशिका असलेल्या कवकांचे कुल Eubasidii, Agaricales  Spine fungi

hydric
जलविषयक पाण्यातील, पाण्यासंबंधी

hydrocarpic
वारिफलजनक, जलफलजनक परागणाची कृति पाण्याच्या पृष्ठावर झाली असताही त्यानंतर फळ पाण्याखाली बनविणारी (वनस्पती), उदा. सवाला (Vallismeria).

hydrocentric
मध्यप्रकाष्ठक hadrocentric

hydrochasy
आर्द्रस्फुटन h. sere (hydrarch succession) जलीय क्रमक पाणथळ जागी आरंभापासून विकास होणारा पादप समुदाय अथवा वनस्पतींचा समूह. hygrochasy.

hydrogenase
हायड्रोजनेज रेणुवीय हायड्रोजनचा कार्यद्रव्यासारखा वापर करणारे कार्बनी निदेशक, नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणण्याशी हे संबंधित असते. क्लोरेला नावाच्या शैवलामध्ये नायट्राइटचे क्षपण घडवून आणण्यात याचा संबंध येतो.

hydrolase
हायड्रोलेज जलविच्छेदनामध्ये साहाय्यक वितंचक (कार्बनी निदेशक)

hydrolysis
जलविच्छेदन, जलापघटन, हायड्रॉलिसिस पाण्याचा वापर करून रासायनिक संयुगाचे दोन भाग करविणे, एक भाग H व दुसरा OH बरोबर संयोग पावतो. उदा. Nacl चे NaOH आणि HCl असे दोन भाग पडतात.

hydrome
जलवाहक पाण्याची ने आण करणाऱ्या शरीर घटकांचा संच, xylem  hadrome

hydromorphy
जलानुरुपता, जलरुपता पाण्यात राहून जीवन काढण्यास उपयुक्त असे (रुपांतरित) शरीर असण्याचा प्रकार उदा. हायड्रिला, नायास इ.

hydronastic
जलानुकुंचनी पाण्याच्या सान्निध्यामुळे कमीजास्त वाढ होऊन झालेले (अवयवांचे वलन), या वळणाचा पाण्याच्या दिशेशी संबंध नसतो.

hydrophilous
१ जलप्रिय २ जलपरागित ३ जलसाधित १ सदैव भरपूर ओलावा असलेल्या ठिकाणी वाढणारी वनस्पती उदा. बाम्ही, शेवाळी २ पाण्याकडून पराग नेण्याची कृति घडविणारी उदा. सवाला, नायास ३ रंदुकनिर्मितीत (प्रजोत्पादनात) पाण्याच्या माध्यमाचा वापर करणारी (वनस्पती) उदा. शैवले व जलकवक

hydrophobe
जलद्वेष्टी, जलविरोधी पाणी वर्ज्य करणारी hydrophobous

hydrophyte
जलवनस्पति, जलोद्भिद सतत अंशतः अगर पूर्णपणे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती, उदा. कमळ, कुमुद, शिंगाडा इ.

hydroponics
मृदहीन कृषि, जलकृषि नित्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीत लागवड न करता पोषण भरपूर मिळेल अशा विद्रवात किंवा अशा विद्रवाच्या वापराने केलेली वनस्पतींची लागवड अथवा संवर्धन, चांगल्या शेतजमिनीची दुर्मिळता असते तेथे ही पद्धत फायदेशीर होते. soilless cultivation, water

Hydropteridales
जलनेचे गण पाण्यात वाढणारे नेचे, यांचा स्वतंत्र गण न मानता त्यांचा अंतर्भाव तनुबीजुककोशी (लेप्टोस्पोरँजिएटी) उपवर्गात स्वतंत्र कुलात करतात. Filicinae, Filicales  water ferns

hydrotactic
जलानुचलनी पाण्याच्या चेतनेमुळे घडून येणारे (स्थलांतर) उदा. श्लेष्मकवक वनस्पतींचा प्राकल

hydrotaxis
जलानुचलन वर वर्णन केल्याप्रमाणे घडून येणारी प्रतिक्रिया chemotaxis

hydrotropic
जलानुवर्तनी पाण्याच्या चेतनेमुळे वाढ होऊन घडून येणारे वनस्पतींच्या अवयवांचे वलन (वळणे) chemotropic, geotropic

hydrotropism
जलानुवर्तन वर वर्णन केलेली पाण्याकडे किंवा पाण्यापासून दूर वाढण्याची अवयवांची प्रतिक्रिया, उदा. बीज रुजल्यावर त्यातील मोड जमिनीतील ओलसर भागाकडे वळुन वाढतो, त्याउलट रोपाचे वरचे टोक (अंकुर) प्रकाशाकडे वर वाढते. phototropism, heliotropism, geotropism

hygrochasy
आर्द्रस्फुटन पाणी शोषून घेतल्यामुळे घडून येणारी वनस्पतींच्या अवयवांची तडकून फुटण्याची प्रतिक्रिया, उदा. काही प्रदेशातील वनस्पतींची फळे, उदा. जेरीकोचा गुलाब xerochasy  hydrochasy

hygrometer
आर्द्रतामापक हवेतील ओलावा (बाष्पांश) मोजण्याचे उपकरण

hygrophilae
आर्द्रप्रिय वनस्पती, उन्दोद्भिद ओलसर हवा व जमीन पसंत करणारी वनस्पती. उदा. काही नेचे, शेवाळी, अळू, कर्दळ, केळ इ. hygrophyte

hygroscopic
उन्देक्षीय, आर्द्रताशोषी पाणी शोषून फुगणे व पाण्याअभावी आकसणे अशी प्रतिक्रिया दर्शविणारे उदा. शेवाळी (परितुंड दंत), नेचे (बीजुककोशाचे वलय), बीजुक क्षेपक (एक्किसीटम) इ. h.cell चलित्र कोशिका पहा bulliform cell

hymen
पटल पापुद्रा, त्वचेसारखा पण पातळ पडदा

hymenium
बीजुकोत्पादक स्तर (थर) गदाकवकात आढळणारा व बीजुकघरातील बीजुकांची उत्पत्ति करणाऱ्या कोशिकांचा सलग थर Basidiomycetes, Agaricales

Hymenomycetae
पटलकवक गण, हायमेनोमायसेटी Agaricales

hypanthodium
कुंभासनी पुष्पासनाचा फुगून वाढलेला व कुंभाच्या (कलशाच्या) आकाराचा सूक्ष्म व बहुधा एकलिंगी फुलांचा समूह, उदा. अंजिर, वड, उंबर इ. syconus

hyperplasy
अतिवृद्धि कोशिकांच्या संख्यावाढीमुळे ऊतक व अवयव यांच्या आकारात अधिक वाढ होण्याचा प्रकार

hypertrophy
अतिपुष्टी कोशिकांच्या आकारवाढीमुळे अवयवांच्या किंवा ऊतकांच्या आकारात अति वाढ होण्याची प्रक्रिया

hypha
कवकतंतु कवक वनस्पतींच्या शरीराचा एक तंतू, यात कधी आडपडदे असतात व तंतूंना कधी शाखा असतात, कवकतंतूंच्या कोशिकांत प्राकलकणू नसतात, एक किंवा दोन प्रकल किंवा अनेक प्रकल असतात, अनेक तंतू एकत्र येऊन पातळ पापुद्रे, छदे, ऊतके किंवा मांसल अवयव बनतात, उदा. बुरशी, भू

hypnospore
विश्रामी बीजुक प्रतिकुल परिस्थितीत सुरक्षित स्थितीत जिवंत राहणारे बीजुक spore

hypo-
अधः, अव-, अधर-, अभि- खालचे या अर्थी उपसर्ग

hypobasal
अवतल तळाकडील अर्धा भाग, गर्भकोशिकेच्या (रंदुकाच्या) विभाजनात पहिल्या अवस्थेतील गंतुकधारीला चिकटलेला तिचा खालचा अर्धा भाग, उदा. नेचे, शेवाळी इ.

hypocotyl
अधराक्ष बीजातील दलिकांच्या खाली असलेला प्रारंभिक अक्षाचा भाग, द्विदलिकित बीजातून बाहेर आलेल्या मूळांकुराच्या टोकामागील भाग epicotyl

hypodermal
अभित्वचीय अपित्वचेच्या खालच्या कोशिकांच्या थराशी संबंधित असलेले

hypodermis
अभित्वचा, अधस्त्वचा अपित्वचेखालचा थर, कधी हे थर दोन किंवा तीन असून कोशिकावरण कधी जाड तर कधी फक्त त्यांचे कोपरे जाड व अनेकदा कोशिका मृत असतात. सजीव कोशिकात हरितकणूही आढळतात. उदा. सूर्यफुलाचे अथवा मक्याचे खोड epidermis

hypogeal
अवभौम बीज रुजताना, बीजातील दलिका जमिनीत राहून गर्भांकुराचे पोषण करतात, अशा प्रकारे बीजाची रुजण्याची पद्धती (अंकुरण) उदा. हरभरा

hypogynous
अवकिंज किंजमंडलाच्या खालच्या पातळीवर पण त्यास न चिकटलेले असे (इतर भाग- पुष्पदले) अथवा असा संरचनेचे (फूल), उदा. मोहरी, तिळवण इ.

hyponasty
अधर (अधो) वर्धन खालची बाजू (पृष्ठभाग) अधिक जलद वाढून अवयवास वक्रता येण्याचा प्रकार, उदा. कलिकावस्थेत प्रथम अशा वाढीने फुलातील सर्व अवयव परस्परास वेढून संरक्षण होते. फूल उमलण्याच्या वेळी याउलट कृति (वाढ) होऊन फूल उमलते. बीजाच्या रुजण्याच्या वेळी मूलांकुर ज

hypophyll
१ अवपर्ण २ पर्णतल १ पानाच्या किंवा तत्सम अवयवाच्या खाली अर्धवट वाढलेले पान किंवा खवल्यासारखा अवयव किंवा उपांग उदा. रस्कस २ पानाच्या देठाचा खोडाशी चिकटलेला भाग

hypophysis
मूलजनक प्राथमिक मूळ व त्याची टोपी यांची निर्मिती करणारी, फुलझाडांच्या गर्भाची कोशिका

hypoplasy
विकृतवृद्धि अपुऱ्या पोषणाने वाढ थांबल्याने झालेली विचित्र वाढ

hypopodium
१ पर्णतल २ किंजवृंत १ पानाच् तळ २ किंजदलाचा देठ

hyposperm
अवबीजक बीज अथवा बीजक यांचा तळभाग, याच्या वरच्या बाजूस बीजकाचे आवरण प्रदेहापासून सुटे होते.

hyposporangium
अवपुंजत्राण बीजुककोशाच्या खालून वाढणारे आवरण, उदा. काही नेचे

hypostatic
संनियंत्रित epistatic

hypotrophy
अवविकास अवयव किंवा भाग यांची अपूर्ण वाढ

hypsophyll
छद bract

hysterophyte
शवोपजीवी मृत पदार्थांवर उपजीविका करणारी (वनस्पती), उदा. भूछत्र, कंदकवक, भूकंदुक इ.

hysterostele
लघुरंभ ऱ्हसित किंवा नष्टप्राय झालेले रंभ (वाहक ऊतकांचा चितीय भाग) उदा. काही जलवनस्पती stele

icone
पादपाकृति वैज्ञानिक आकृतीच्या रुपाने वनस्पतीचे दर्शन

identical
समरुप, समान सर्व दृष्टीने सारखे, उदा. व्यक्ती, अवयव, अपत्य i. twins समान (समरुप) जुळी एकाच फलित अंड्यापासून बनलेली दोन सारखी अपत्ये, दोन स्वतंत्र अंड्यापासून बनलेल्या दोन सारख्या अपत्यांना सहजात (fraternal twins) म्हणतात.

identification (of plant or parts)
अभिज्ञान वनस्पतीचे अथवा तिच्या अवयवांचे इतर वनस्पतीशी विरोध अथवा साम्य निश्चित करून ती ओळखणे, वर्गीकरणातील स्थान समजून घेणे i.idea (-ideus)- सम साम्यदर्शक प्रत्यय, उदा. पाकळीसारखे (प्रदलसम) petaloideus, ऑलिव्हसारखे (oleoides), ऑर्किडसारखे (orchioides) इ.

idioblast
विषम कोशिका, भिन्न कोशिका ऊतकातील इतर कोशिकांपेक्षा भिन्न अशी एखादी कोशिका, उदा. कमळाच्या पानाच्या किंवा फुलाच्या देठातील ऊतकात आढळणाऱ्या तारकाकृति कोशिका, अशा काही कोशिकात टाकाऊ पदार्थ (राळ, टॅनिन, स्फटिक इ.) असतात, stellate cell

idiochromosome
लिंगसूत्र लिंगविशिष्ट प्रवृत्तींचे अनुहरण करणारे रंगसूत्र

illegitimate name
अवैध नाम आंतरराष्ट्रीय संकेत व नियम यांनी मान्य न केलेले प्राणी व वनस्पतीचे शास्त्रीय नाव.

imbibe
विचोषण करणे, अंतःशोषण करणे शोषून घेऊन संचय करून ठेवणे, उदा. बीजाची साल पाण्याशी संपर्क होताच ते शोषून घेऊन धरुन ठेवते, सुके लाकूड, कोशिकावरण किंवा कोशिकांतर्गत द्रव्य पाणी शोषून फुगते.

imbibition
विचोषण, अंतःशोषण वर वर्णिलेली प्रक्रिया, विसृतीचा एक प्रकार diffusion

imbricate
परिहित १ छपरावरील कौलाप्रमाणे एकावर दुसरे अंशतः असलेली (पुष्पदले) २ कळीमध्ये विशिष्ट पुष्पदलांच्या (पाकळ्यांच्या) मांडणीत काही दले वर वर्णिल्याप्रमाणे तर इतर एखाद्या दलाच्या दोन्ही कडाजवळच्या दोन दलांनी अंशतः झाकलेल्या व दुसऱ्याच्या दोन्ही कडा पूर्णतः बाह

immersed (plunged)
निमज्जित बुडलेले, पाण्याच्या किंवा पानाच्या पृष्ठभागाखाली राहिलेले, असलेले अथवा वाढलेले

immobile
स्थिर, अचल न हालणारा (अवयव), उदा. केतकीचा परागकोश immovable

immunity
प्रतिकारक्षमता रोगकारक पदार्थाला किंवा परिस्थितीला प्रतिकार करण्याची पात्रता.

immutability
अपरिवर्त्यता सजीवांची वर वर्णन केलेली, न बदलण्याची प्रवृत्ति (एक जुनी गैर समजूत). fixity

immutable
अपरिवर्त्य कोणतेही फरक न पडता जसेच्या तसे राहणारे (सजीव)

impenetrable
अभेद्य मधून आरपार जाण्यास अशक्य (कठीण) असे (जंगल).

imperfect flower
एकलिंगी पुष्प आवश्यक पुष्पदलात न्यूनता असणारे फूल, एकलिंगी फूल उदा. पपई, भोपळा इ.

imperforate
रंधहीन, अच्छिद्री, छिद्रहीन भोके नसलेले

impermeability
अपार्यता अपार्य असण्याची क्षमता.

impermeable
अपार्य द्रवरुप, वायुरुप अथवा घनरुप पदार्थ आरपार सूक्ष्म गतीने (विसरणाने) जाऊ न देणारा (पडदा) diffusion, osmosis

impervious
अप्रवेश्य छिद्रांच्या अभावी आरपार जाऊ न देणारा, उदा. मेणाच्या लेपामुळे, उपत्वचेमुळे किंवा वल्कामुळे पाणा आतबाहेर जाऊ देणारा (पानाचा अथवा इतर अवयवांचा पृष्ठभाग) cuticle, bark

imported
आयात परठिकाणाहून आलेली (वनस्पती) alien उदा. कुंती Murraya exotica L.

impregnating tube
फलन नलिका दोन विरुद्धलिंगी प्रजोत्पादक कोशिकांच्या संयोगाचे वेळी रेतुकाशयापासून वाढलेला नळीसारखा अवयव, उदा. पिथिमय कवक

impregnation
फलन रेतुक व अंदुक यांचा संयोग, गर्भाधान

impression
मुद्रा, ठसा मऊ चिखलावर वनस्पतीच्या अवयवाचा ठसा उमटून तो पुढे कठीण दगड झाल्याने बनलेला जीवाश्म (एक प्रकारचा शिलारुप अवशेष) fossil i.fossil जीवाश्म मुद्रा वनस्पतीचा, प्राण्याचा किंवा त्यांच्या अवयवांचा ठसा दर्शविणारा दगडाचा तुकडा

impulse
आवेग बाह्य परिस्थितीतील काही घटकामुळे सजीवास मिळालेला ज्ञान स्वरुपातील धक्का

impure
अशुद्ध दोन शुद्ध वंशातील पण भिन्न जाती अथवा प्रकार यांच्या संकराने बनलेली संतति (संकरज)

inae
वनस्पतींच्या वर्गीकरणात वंशाच्या वरच्या दर्जाच्या गटाचे शास्त्रीय नाव हा प्रत्यय लावून दर्शवितात. उदा. Rosinae (Rose हे वंशाचे नाव), येथे वरच्या दर्जाचा गट म्हणजे subtribe. पूर्वी वर्गाकरिता हा प्रत्यय वापरीत.

inanimate
निर्जिव, जड, अचेतन जीवनव्यापार अथवा सजीवात आढळणारी क्रियाशीलता न दर्शविणारे, कसल्याही चेतनेला प्रतिक्रिया न करणारे

inarticulate
संधिहीन सलग, सांधे नसलेले (उदा. खोड) articulated

inborn
उपजत आनुवंशिक, जन्मापासून असलेले (शारिरीक वा मानसिक लक्षण) congenital, hereditary

inbred
अंतःप्रजनन फारच जवळच्या आप्तांमध्ये शरीरसंबंध होऊन प्रजानिर्मिती होण्याची घटना (प्रक्रिया) heterosis, outbreeding

incipient
प्रारंभिक आरंभीच्या अवस्थेतील, उदा. नीलहरित शैवलातील प्रकल

incised
छेदित अनियमितपणे निसर्गतः फाटलेले, दातेरी व खंडित यांमधील प्रकार

incision
छेदन निसर्गतः कापून पडलेली अथवा कृत्रिमपणे पाडलेली चीर, उदा. पानाच्या किंवा पाकळ्यांच्या कडा कमी जास्त प्रमाणात फाटलेल्या (चिरलेल्या) आढळतात.

included
अंतःस्थित आत (दुसऱ्या अवयवाच्या पोकळीत) राहिलेले, उदा. पुष्पमुकुटात असलेली केसरदले, धोत्रा, गारवेल इ. exerted

inclusion
अंतर्विष्ट समावेश झालेले, उदा. परिकलात किंवा कोशिकेत समावेश झालेले पदार्थांचे कण

incompletae
अपूर्णपुष्पी उपवर्ग Monochlamydeae

incomplete flower
अपूर्ण पुष्प साहाय्यक पुष्पदलात (परिदलात) न्यूनता असलेले (फूल), उदा. पुनर्नवा, चाकवत, शेर, शेंड इ.

incompressible
असंकोच्य, अदम्य न दाबले जाणारे (खोड)

incrustation
पुट, कवच १ खनिज द्रव्याने लपेटलेले वनस्पतींचे अवशेष (जीवाश्म), यात कार्बनी द्रव्याचा अभाव असून शरीर संरचनेतील वैशिष्ट्य मात्र आढळते. २ खपलीसारखे आच्छादन

incumbent
१ प्रणत २ आधारित १ जमिनीवर भार टाकून वाढणारे (खोड) २ इतरावर भार टाकणारी व वाढणारी (वनस्पती)

incurved
अंतर्वक्र बाहेरुन आतील बाजूस वाकलेले, उदा. पाकळ्या, केसरदले

indefinite
१ अमर्याद, असंख्य २ अकुंठित १ संख्या व आकारमान यात मर्यादा नसणारे, उदा. बीजके, केसरदले, पाकळ्या इ., आंतरराष्ट्रीय चिन्ह ०० २ प्ररोह किंवा फुलोरा यांच्या प्रमुख अक्षाची न थांबता चालू राहणारी वाढ racemose

indehiscence
अस्फुटन स्फोट (तडकणे, उकलणे) न होणे, उदा. बीजुकाशय, बीजुककोश किंवा फळ आपोआप न फुटण्याचा प्रकार dehiscence

indehiscent
अस्फुटनशील आपोआप न तडकणारे (अवयव)

independent assortment
स्वतंत्र व्यवस्थापन आईबापापासून संकरप्रजेत आलेले काही वैकल्पिक गुण पुढील पिढीत स्वतंत्रपणे उतरुन त्यातील संततीत त्या गुणांची अलग वाटणी

indeterminate
१ अनिश्चित, अनिर्धारित २ अकुंठित १ पुढील घटनांची (उदा. वाढ, बदल इ.) खात्रीपूर्वक माहिती नसण्याचा प्रकार २ अक्षाची वाढ मर्यादित नसलेला (फुलोरा)

indicator species
निदर्शक जाती आपल्या अस्तित्वाने परिस्थितीची (हवामान किंवा त्यातील बदल) जाणीव करून देणारी वनस्पतीची जाती उदा. रामेठा ही जाती अधिक उंच, अधिक पावसाचे प्रमाण व कमी तपमान इत्यादी असलेल्या प्रदेशाची जाणीव उत्पन्न करते, कारण ती अशा ठिकाणीच आढळते.

indigenous
स्वकीय, रहिवासी एतद्देशीय, बाहेरुन न आलेली, उदा. आंबा, कोकम, पांगारा, मोह इत्यादी वृक्ष भारतीय असल्याने त्यांच्या लॅटिन नावात त्या अर्थाची जातिवाचक संज्ञा (indica) समाविष्ट आहे. cultigen  indigen

indirect division
अप्रत्यक्ष विभाजन mitosis, karyokinesis

individual
व्यक्ति एकाच जातीतील प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती, अनेक सारख्या व्यक्तींची जाती बनते,   species

induced
प्रवर्तित, प्रेरित बाहेरील चेतकामुळे (चेतना देणाऱ्या घटकामुळे) घडून आलेली (वनस्पतीतील प्रतिक्रिया) उदा. अवयवांचे वलन, सुट्या भागांचे स्थलांतर i. polyploidy प्रवर्तित बहुगुणन चेतकाच्या साहाय्याने कृत्रिमपणे घडवून आणलेली रंगसूत्रांची संख्यावाढ

indumentum
घनलोमावरण दाट लवीचे आच्छादन

induplicate
अंतर्नत धारास्पर्शी कलिकावस्थेतील मांडणीचा एक प्रकार, प्रत्येक लहान पानाच्या दोन्ही कडा आतील बाजूस वळलेल्या असून जवळच्या तशाच दुसऱ्या पानांच्या कडांना स्पर्श करतात.

indurated
घनीभूत विकासावस्थेत विरळपणा जाऊन दृढता आलेले.

indusiate
पुंजत्राणयुक्त बीजुककोशांच्या समूहावरचे आवरण असलेले

indusium
पुंजत्राण बीजुककोशांच्या समूहाचे आच्छादन, उदा. नेचे

ineae
वनस्पतींच्या उपगणांच्या शास्त्रीय नावामध्ये असलेला प्रत्यय, उदा. नेचे उपगण (Filicineae).

ineffective publication
अननुवृत्त प्रकाशन अनुवृत्त प्रकाशनाच्या पद्धतीने केला नसलेला वनस्पतींच्या नावाचा मजकूर effective publication.

inermis
अकंटकित बिनकाटेरी, काटे नसलेली (वनस्पती), उदा. वनजाई (Clerodendron interme (L.) Gaertn.) unarmed

inextensibility
अतन्यता न ताणले जाण्याची क्षमता (गुण), उदा. मुळे व खोड अतन्य असणे आवश्यक असते.

inextensible
अतन्य न ताणता येणारा (अवयव)

infection
संसर्ग रोगजंतूंशी प्रत्यक्ष संबंध व जंतूंचा शरीरप्रवेश i.tube संसर्ग नलिका रोगजंतूंना प्रवेश मिळवून देणारा नळीसारखा भाग

infectious
सांसर्गिक बाहेरून संसर्गाने येणारा (जडणारा)

inferior
अधःस्थ, निम्न इतर पुष्पदलांच्या खालच्या पातळीवर असणारा (किंजपुट), उदा. पेरु, डाळिंब, भोपळा इ., पुष्पसूत्रात हे लक्षण G किंवा जी या आद्याक्षरापुढील आकड्यावर, आडवी रेषा काढून दर्शवितात floral formula.

infertile
१ निकस, नापीक २ वंध्य १ पोषणक्षमता नसलेली जमीन २ जननक्षम नसलेली (वनस्पती)

inflated
फुगीर फुगवलेले, हवा अथवा पाणी यामुळे तुडुंब भरलेले, उदा. काही शैवलांचे तरंड, काही फळांचे आच्छादन, काही फळाभोवती असलेले संवर्त (पोपटी व कपाळफोडी)

inflexed
अंतर्नत आतील बाजूस वाकलेले (दुमडलेले), उदा. तिवाराच्या कळीतील केसलदले

inflexibility
अनम्यता दाबाने न वाकण्याची क्षमता, उदा. उभे खोड

inflexible
अनम्य बाहेरील दाबाने न वाकणारे

inflorescence
पुष्पबंध, फुलोरा १ फुले असणाऱ्या फांदीवरील (अक्षावरील) त्यांची मांडणी, पुष्पविन्यास २ अनेक फुलांचा घोस, (झुबका), फांदीच्या टोकाचे एकच फूल

infra-
अव- खालचा या अर्थी उपसर्ग. i.axillary अवकक्षस्थ, कक्षतलीय पानाच्या बगलेखाली असलेले i.foliar अवपर्ण पानाखाली असलेले (उपांग, ग्रंथि इ.) i. nodal अवपर्वस्थ, पर्वतलीय, पर्वतलस्थ खोडावरील पेऱ्याच्या खालच्या बाजूस उगवलेले

infrageneric
१ अंतर्वेशी २ अववांशिक १ पहा intrageneric २ वंशापेक्षा खालच्या दर्जाचे, उदा. उपवंशातील किंवा त्या दर्जाचे.

infraspecific
१. अंतर्जातीय २ अवजातीय १ पहा intraspecific २ वर्गीकरणात जातीपेक्षा खालच्या दर्जाचे उदा. उपजाती, प्रकार, वाण इ. च्या दर्जाचे.

infundibular
नालिकाकृति नाळक्यासारखा उदा. धोत्र्याच्या पुष्पमुकुट infundibuliform

inherent
अंगभूत, स्वाभाविक निसर्गदत्त, नैसर्गिक प्रवृत्तीमुळे असणारे किंवा येणारे (गुण), उदा. जीवद्रव्याची प्रमुख लक्षणे

inheritance
अनुहरण वारसा, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण उतरण्याची प्रक्रिया, यामुळे संततीत व आईबापात कमी जास्त साम्य दिसुन येते, तसेच जातिविषयक गुणांच्या (लक्षणांच्या) अनुहरणामुळे प्रत्येक जीव आपल्यासारखीच प्रजा निर्माण करतो. cytoplasmic inheritance.

inhibition
कुंठन, अवरोधन थांबविण्याची क्रिया, स्थगित करण्याचा प्रकार, उदा. वाढ, विकास, प्रजोत्पादन, शोषण इ.

inhibitor
रोधक, दमक, निरोधक, निरोधी, अवरोधक रासायनिक व जैव प्रक्रियांचा वेग कमी करणारा किंवा प्रक्रिया थांबविणारा घटक, संततीत एखादे लक्षण प्रकट होण्यास विरोध करणारा (घटक, कारक)

initial cell
आदिकोशिका, आरंभिक कोशिका जिच्यापासून पुढे विशिष्ट बनतो ती आरंभीची कोशिका

injection
१ अंतःक्षेपण २ सूचिकाभरण १ बाहेरुन आत सोडण्याची प्रक्रिया, उदा. अंतराकोशिकी पोकळ्यात जवळच्या कोशिकेतून पाणी सोडण्याची क्रिया २ सुईसारख्या सूक्ष्म नळीने द्रवरुप अथवा वायुरुप पदार्थ शरीरात घालणे

innate
अधःबद्ध, तलबद्ध तळाशी चिकटून आधारलेला (परागकोश), उदा. मोथा, वांगे, टोमॅटो, मोहरी इ. basifixed

inner
१ अंतः २ अंतस्थ १ आतील या अर्थी उपसर्ग २ आतील, केंद्राजवळचे i.bark अंतर्वल्क मृत अपित्वचा, त्वक्षाकोशिका व (द्वितीयक) त्वक्षाकर (सर्व मिळून वल्क) यांच्या आतील भाग पहा bark i. glume अंतस्नुष पहा glume i. integument अंतरावरण बीजकाच्या दोन्हीपैकी आतील आवरण

inorganic
अकार्बनी, अकार्बनिक, अजैव खनिज, सजीवाशी संबंध नसलेले (पदार्थ)

inrolled
अंतर्वलित आतील बाजूस गुंडाळलेली, उदा. कळीमध्ये पाकळीची किंवा पानाची किनार, कमळ, अळू, पहा involute

insect pollination
कीटक परागण कीटकांकडून घडवून आणलेला फुलातील परागांचा किंजल्काशी संपर्क pollination

insectivorous plant
कीटकभक्षक वनस्पति carnivorous

inserted
निवेशित, संलग्न attached

insertion
निवेशन, संलग्नता एका अवयवाचा दुसऱ्याशी असलेला निकट संबंध, उदा. पाने व खोड, पुष्पस्थली व पुष्पदले, पाकळ्या व केसरदले इ. epipetalous

insolation
सौरतापन सूर्यकिरणात प्रत्यक्षपणे तापून निघण्याची प्रक्रिया

insoluble
अविद्राव्य, अविलेय, अद्राव्य न विरघळणारा (पदार्थ)

insusceptible
ग्रहणाक्षम, अग्रहणशील ग्रहण न करु शकणारी अथवा एखाद्या रोगाच्या जंतूंना पूर्ण विरोध करणारी (व्यक्ती)

integer
अखंडित न फाटलेले (चिरलेले), उदा. पान

integerrimus
अखंडित अवयवाच्या अखंडत्वाची विशेष ग्वाही देणारी संज्ञा, उदा. पांशी (Carallia integerimma DC).

integrifoloius
अखंडपर्णी अखंड कडा असलेल्या पानाची (वनस्पती), उदा. फणस Artocarpus integra (Thumb.) Merr.syn.A. integrifolia L.

integument
आवरण बीजकाचे (प्रदेहाभोवतीचे) आच्छादन, यापासून बीजावरण बनते, हे एक किंवा दोन असतात indusium, testa, tegmen

inter-
आंतर-, अंतरा- संबंधित भागांच्या बाबतीत मध्ये या अर्थी उपसर्गाप्रमाणे उपयोग करतात.

interaction
अन्योन्य क्रिया, आंतरक्रिया दोन पदार्थांमध्ये होणारी परस्परावर परिणामकारक क्रिया, उदा. एकाच लक्षणाबाबत दोन जनुकांमध्ये होणाऱ्या परस्पर संबंधामुळे कधी कधी संततीत अनपेक्षित परिणाम दिसून येतो. complimentary factor

intercalary
मध्यस्थित दोन कायम ऊतकांमध्ये असलेले अथवा वनस्पतीच्या दोन्ही टोकास नसून अक्षावर मध्ये असलेले (ऊतक, कोशिका, वर्धनशील भाग इ.) i.growth मध्यस्थित वृद्धि (वर्धन) अवयवाच्या टोकास नसलेली (इतरत्र असलेली) वाढ, उदा. काही एकदलिकित वनस्पतीत पेऱ्यांजवळ अधिक काळ वाढ

intercalation
मध्यस्थापन जुन्या कणांमध्ये नवीन कण प्रविष्ट होण्याचा प्रकार, उदा. कोशिकावरणाची वाढ, कधी नवीन कोशिका पूर्वीच्या कोशिकासमूहात प्रवेश करून समूहाकार वाढतो.

intercarpellary
आंतर (अंतरा) किंजदली अनेक किंजदलांमध्ये असलेले (उदा. प्रपिंड)

intercellular
अंतराकोशिकी दोन किंवा अनेक कोशिकांमधून असलेले (उदा. पदार्थ, पोकळ्या इ.) i.passage (duct) अंतराकोशिकी मार्ग (नलिका) i. space अंतराकोशिकी पोकळी i. substance अंतराकोशिकी पदार्थ

intercostal
अंतरासिराल शिरांमधून असणारे

intercrossing
अंतरासंकरण दोन जाती किंवा प्रकार यांमध्ये घडविलेले प्रजोत्पादन

interfascicular
अंतरावृंदीय दोन किंवा अधिक वाहक संचांमधील i. cambium अंतरावृंदीय ऊतककर वाहक संचांमद्ये असलेले वर्धनशील ऊतक

interfoliar
अंतरापर्णी अनेक पानांमधून

intergeneric hybrid
अंतरावंशीय संकरज दोन वंशातील व्यक्तींमधील संकरणाने झालेली संतति

intermediate host
मध्याश्रय, मध्यस्थ आश्रय जीवोपजीवी वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या सतत आश्रयाखेरीज अल्पकाळ असणारा दुसरा एक आश्रय, उदा. गव्हावरील तांबेऱ्याचा मध्यस्थ आश्रय, दारुहळद (बार्बेरी, Berberis aristata DC).

internal phloem
अंतःपरिकाष्ठ प्रकाष्ठाच्या आतील (भेंडाजवळच्या) बाजूस असलेले परिकाष्ठ, उदा. काकडीचे खोड bicollateral bundle

internodal
अंतरापर्वीय दोन पेऱ्यांमधील (भाग, कोशिका इ.)

internode
कांड कांडे, खोडाच्या अथवा शाखेच्या दोन पेऱ्यांमधील भाग

interpetiolar
अंतरावृन्तीय समोरासमोर असलेल्या दोन पानांच्या देठांमधील (भाग, उपपर्ण)

interrupted
खंडित, असंतत मधूनमधून खंड पडलेले

interseminal
अंतराबीजी, आंतरबीजी अनेक बीजकांमधून किंवा बीजांमधून असलेले (विखुरलेले), उदा. सायकॅडिऑइडियाच्या उभय बीजुककोशधारी शंकूतील खवले.

interspecific hybridisation
अंतराजातीय संकरण दोन भिन्न जातींतील व्यक्तींमध्ये झालेला संकर

interstaminal
अंतराकेसरदली दोन किंवा अधिक केसरदलांमध्ये असलेले उदा. बिम्ब

interxylary phloem
अंतराप्रकाष्ठीय परिकाष्ठ प्रकाष्ठ भागात पसरलेला परिकाष्ठाचा भाग उदा. वाघनखी, टेटू, यांमध्ये प्रकाष्ठाचे त्रिज्येप्रमाणे खंड पडून त्यामधून परिकाष्ठ असते. xylem, phloem

intine
आलेप परागकणाचे सर्वात आतील आवरण exine

intra-
अंतः आतील या अर्थी उपसर्ग i. axillary अंतःकक्षी पानाच्या बगलेतील (अवयव, उपांग) i. cambial अंत ऊतककर ऊतककराच्या आतील बाजूने i. cellular अंतःकोशिकी कोशिकेच्या आतील बाजूचे i. fascicular अंतर्वृन्दी वाहक घटकांच्या संचातील (उदा. ऊतककर) i. floral अंतर्पुष्पदली,

intrafoliar
अंतःपर्णी पानांमधून असलेले उदा. काही तालवृक्षांचे फुलोरे.

intricate
जटिल गुंतागुंत असलेले (उदा. जाळे, संरचना इ.)

introduced
आनीत परठिकाणाहून आणून वाढविलेली (वनस्पती) उदा. तंबाखू, बटाटा, गुलबुश इ.

introduction of plants
वनस्पतिप्रवेशन नवीन वनस्पतींची लागवड करणे किंवा ती यदृच्छया आणली जाऊन तिची वाढ व प्रसार होणे

introrse
अंतर्मुख आतील बाजूस उघडणारा, उदा. कमळाचा परागकोश extrorse

intrusion
अंतभेदन, अंतर्वेशन आत घुसून राहण्याची (वाढण्याची) प्रक्रिया), उदा. एक अन्यदेशीय वनस्पती दुसऱ्या क्षेत्रात प्रविष्ट होणे, एक ऊतक दुसऱ्यात प्रविष्ट होणे.

intrusive
अंतर्भेदी, अंतर्वेशी आत घुसणारे, आत वाढणारे अथवा आत प्रवेश करणारे (ऊतक). i.growth अंतर्भेदी वृद्धि दुसऱ्या संरचनेत होणारी (झालेली) वाढ

intussusception
कणाधान पूर्वी असलेल्या पदार्थाच्या कणांमध्ये नवीन कणांचा प्रवेश. उदा. कोशिकावरणाच्या आकारमानात वाढ होण्याची एक प्रक्रिया.

inulase
इन्यूलेज इन्यूलिन नावाच्या स्टार्चसारख्या कार्बाएहायड्रेट पदार्थांचे शर्करेत (लेव्ह्युलोज) रुपांतर करणारे वितंच