आमची उद्दिष्टे

Home » आमची उद्दिष्टे

महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने १९६३ ते १९७३ दरम्यान हजारो अमराठी पारिभाषिक शब्दांसाठी पर्यायी मराठी पारिभाषिक शब्द संकलित, विकसित करून ३५ परिभाषा कोश आणि अन्य कोश छापले.
.
.महाराष्ट्र शासनात कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यानंतर *श्री. संजय भगत* यांनी हे सर्व कोश स्वतः विकत घेतले. अनेक टंकलेखकांकडून या छापील कोशांतील संज्ञा, अर्थ व अनुषंगिक आशय संगणकावर टंकित करून घेतला.
.
.२००२ ते २००५ दरम्यान ३५ परिभाषा कोशांतील २६७००० शब्द संजय भगत यांनी स्वतःचे वीस लाख रूपये खर्चून टंकित करून घेतले आणि शासकीय कोशांमधील हा अमूल्य शब्दसाठा जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला.
www.marathibhasha.org

या संकेतस्धळावर २००५ पासून हा शब्दसाठा जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम संजय भगत यांनी प्रिया इन्फॉर्मेटिक्स या श्री कानडे यांच्या संस्थेकडून करवून घेतले व कानडे यांनी त्या काळातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून संकेतस्थळ निर्मिती केली.
.
. खुडी ( पेनड्राईव) नसलेल्या काळात पेंटिअम १ व २ या कमी क्षमतेच्या मंदगती संगणकांवर हे काम केले गेले. टंकन करणारांकडे असलेल्या विविध अक्षरावल्या (फाँट) वापरून वेगवेगळ्या कोशांचे हे काम केले गेले. विशिष्ट अक्षरावलीत टंकलेले शब्द पाहण्यात त्या त्या अक्षरावली स्वतःकडे नसलेल्या लोकांना खूप अडचणी येत असत, त्यामुळे याचा वापर अतिशय कमी लोक करत असत.
.
.२०११ मध्ये मी स्वतः या संकेतस्थळाचे व्यवस्थापन करण्याचे काम विनामूल्य स्वरूपात हाती घेतले. २००२ ते २००५ अशा सुमारे चार वर्षांत टंकन करून निर्माण केलेले हे सर्व संगणकीय शब्दधन भारत सरकारच्या प्रगत संगणन केंद्र ( सी डॕक ) या संस्थेतील भारतीय भाषा विभागाने २०११ मध्ये केवळ नऊ मिनिटात युनिकोड अक्षरावलीत विनामूल्य रूपांतरित करून दिले.
.
.या सहकार्याबाबत त्यांचे आभार !
.
.युनिकोड अक्षरावलीत रूपांतरित केलेला हा शब्दसाठा जगभरातील संगणकावरून पाहणे शक्य होऊ लागले.
.
,या संकेतस्थळाची सुधारणा संजय भगत यांनी स्वखर्चाने २०१२ मध्ये आदि.कॉम कडून करून घेतली. आदि.कॉमचे मालक प्रसाद शिरगांवकर यांनी संकेतस्थळाला अधिक वापर अनुकूल केले. २०१२ पासून १०० हून अधिक देशांतील लोक मराठी शब्द शोधायला या संकेतस्थळाचा वापर करतात.
.
.२०१६ मध्ये संजय भगत यांनी पुन्हा एकदा स्वखर्चाने या संकेतस्धळात आणखी सुधारणा करवून घेतल्या आणि या सुधारणांची आखणी व व्यवस्थापन मी केले. मुंबईतील समचिकित्सा (होमिओपॕथी) वैद्यक (डॉक्टर ) श्री. विशाखादत्त पाटील आणि श्री. महादेव लोके यांनी असीम सिस्टीम्स च्या माध्यमातून हे संकेतस्थळ संगणकाप्रमाणेच भ्रमणध्वनी संचावरही वापरण्याची सुविधा करून दिली.
.
.या संकेतस्थळाचे मालक व एकमेव आर्थिक गुंतवणुकदार
.
*संजय भगत*
.आणि संकेतस्थळाचे विनामूल्य व्यवस्थापन करणारा मी
.
. *अनिल गोरे मराठीकाका*
.
.अशा आम्हा दोघांना हे संकेतस्थळ अधिक आधुनिक रूपात जनतेला विनामूल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात अतिशय आनंद वाटत आहे.
.
. मराठी भाषक तसेच अमराठी भाषक अशा सर्वांनी इंग्रजी मानल्या जाणाऱ्या पण सुमारे चार हजार भाषांमधील २६७००० शब्दांचे आजवर उपलब्ध झालेले मराठी पर्याय पाहण्यासाठी

www.marathibhasha.org

.या संकेतस्थळाचा वापर आवश्यकतेनुसार करावा आणि सक्षम, समृद्ध, संपन्न, अर्थवाही मराठी भाषेचा आपल्या सर्व प्रकारच्या कामकाजात अधिकाधिक वापर करावा है आवाहन !

प्रा. अनिल गोरे मराठीकाका