आवाहन

Home » आवाहन

मराठीत शब्दकोश, परिभाषा कोश निर्माण करणाऱ्या किंवा संकलन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना आवाहन

जर आपण मराठी भाषेत शब्दकोश, परिभाषा कोश, ज्ञानकोश, पारिभाषिक शब्दावली, स्पष्टीकरणकोश अथवा लघु संदर्भकोश (vade-mecum) अथवा अतुलसंग्रह किंवा सर्वसमावेशक सारांश असलेला सारग्रंथ (compendium) प्रकाशित केले असेल तर त्या बद्दल माहिती आम्हाला द्या.

या संकेतस्थळावर आम्ही या विषयावरील ग्रंथांची सूची उपलब्ध करणार आहोत. या सूचीत ग्रंथ समाविष्ट करण्या करता आम्हाला माहिती खालीलप्रमाणे पाठवा

1. ग्रंथाचे नाव
2. संकलन करणार्‍या व्यक्तींचे अथवा संस्थेचे नाव
3. प्रकाशकाचे नाव
4. प्रकाशन वर्ष
5. वर्तमान किंवा सद्यकालीन उपलब्धता किंवा विक्रेत्यांची माहिती
6. माहिती पुरवणार्‍यांचे नाव आणि संपर्क तपशील
7. पुस्तक जर आज उपलब्ध नसेल तर त्याच्या प्रकाशन हक्कासंबंधी माहिती

माहिती info@marathibhasha.org या वी-पत्त्यावर पाठवा.